Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



सर्दी : सामान्य पण घातक विकार

अधूनमधून होणार्‍या सर्दीला वैद्यकीय शास्त्रात कॉमन कोल्ड असे म्हटले जाते. सर्दी झाली की, घसा खवखवायला लागतो, नाक वहायला लागते, शिंका येतात, काही वेळा डोळ्यातून पाणी सुद्धा येते. सर्दी सर्वांनाच होते, परंतु लहान मुलांना ती जास्त प्रमाणावर होते. जस जसे वय वाढत जाते तस तसे सर्दीचे प्रमाण कमी होते. परंतु निरोगी प्रौढांच्या आरोग्यावर सर्दीचा घातक परिणाम होऊ शकतो. सर्दी ही संसर्गजन्य असते. ती नेमकी कशाने होते हे १०० टक्के नेमकेपणाने सांगता येत नाही. परंतु सर्दी होण्यास दोनशे प्रकारचे व्हायरस कारणीभूत ठरू शकतात. त्यातील बहुतेक व्हायरसपासून होणारी सर्दी ही ङ्गार घातक नसते आणि कसलीही गुंतागुंत न होता आपोआप दुरुस्त होऊन जाते. सर्दीची काही लक्षणे आणि फ्ल्यूची लक्षणे जवळपास सारखी असतात.

अंग दुखणे, बारीक ताप येणे इत्यादी लक्षणांमुळे नेमका फ्ल्यू झाला आहे की सर्दी याबाबत संभ्रम निर्माण होतो. तेव्हा अशी लक्षणे दिसताच नेमकी तपासणी करून घेतली पाहिजे. कॉमन कोल्ड किंवा सर्दी या आजारावर कसलेही औषध नाही. सर्दी झाल्यानंतर ती एखाद्या औषधाने दुरुस्त झाली आहे असे होत नाही. तरी लोक औषधे घेतात. त्या औषधांमुळे सर्दीच्या काही लक्षणांवर इलाज होतो. उदा. डोकेदुखी थांबते, ताप कमी होतो. पण हा इलाज मूळ सर्दीवरचा नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

सर्दी साधारणत: ७२ तासाने किंवा काही प्रकारात आणखी २४ तासांनी आपोआप दुरुस्त होऊन जाते. परंतु जाता जाता ती आपल्या शरीरातल्या काही संस्थांवर परिणाम करून जाते. म्हणून प्रत्यक्षात सर्दीमध्ये ङ्गार त्रास होत नसला तरी वारंवार होणार्‍या सर्दीमुळे विविध संस्थांवर होणार्‍या परिणामाने नंतर त्याला त्रास होऊ शकतो. म्हणून सर्दी होण्याची वाट पाहण्या-पेक्षा तिला प्रतिबंध केला पाहिजे. प्रतिबंध करण्याचा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे विश्रांती घेणे.

सर्दी झाल्यानंतर शरीराला विश्रांती आवश्यक असते म्हणून ती घेतली पाहिजे. पण तिचे परिणाम आपल्या शरीरावर होऊ नयेत म्हणूनही ती आवश्यक असते. त्याशिवाय सर्दी झाल्यानंतर आपण ङ्गार ङ्गिरायला लागलो, लोकांत मिसळायला लागलो तर लोकांना सर्दी होण्याची शक्यता असते. डॉक्टर मंडळी सध्या गरम पाण्याच्या वाङ्गा घेणे हा सर्वात सोपा उपाय सांगत असतात. सर्दी झाल्यास तो जरूर अवलंबावा.

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी पाच घरगुती उपाय!

सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात. या घरगुती उपयांमुळे आपण सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकता.

दूध आणि हळद: गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.

आल्याचा चहा: आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.

लिंबू आणि मध: लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.

लसूण: लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या. असं एक-दोन वेळ्या केल्यानं आराम मिळतो. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसून झपाट्यानं दूर करतं.

तुळशीची पानं आणि आलं: तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल.

वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर सहाजिकच सर्दी, खोकल्याचा, व्हायरल इंफेक्शनचा त्रास बळावतो. सर्दी, पडशाच्या समस्येमध्ये अनेकांना श्वास घेतानाही त्रास होतो. या त्रासामुळे चिडचिड होते. म्हणूनच अशा समस्येवर उपाय म्हणून डॉक्टरांच्या औषधगोळ्यांऐवजी घरगुती उपायांचा वापर करा. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करून चोंदलेलं नाक मोकळं करण्यासाठी मदत होऊ शकते.

कसा कराल उपाय?

सर्दी, पडशामुळे नाक चोंदलं असेल तर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे दोन थेंब आणि अर्धा चमचा मध, ग्लासभर गरम पाण्यामध्ये मिसळून प्यावे. सकाळी उठल्याबरोबर हे मिश्रण प्यावे.

लिंबू आणि मध

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरऐवजी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. चमचाभर लिंबाच्या रसामध्ये थोडं मध मिसळून हे मिश्रण नियमित 2-3 दिवस सकाळी प्यायल्यास मदत होते. सकाळी नियमित या मिश्रणाने दिवसाची सुरूवात केल्याने नाक मोकळे होण्यास मदत होते.

सार्व‍जनिक ठिकाणी वावरताना बर्‍याच वेळा खोकला, शिंक किंवा उचकी आल्याने आपल्याला ऑकवर्ड वाटते.

त्यामुळे आपण शिंक रोखण्याचा प्रयत्न करतो पण त्या गोष्टी शरीरासाठी खूप हानिकारक असतात. त्यामुळे शिंक न रोखण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात.

शिंक रोखल्याने एका तरुणाने आवाज गमावल्याची घटना घडली आहे. शिंक रोखण्यासाठी त्याने आपले तोंड व नाक बंद ठेवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्याच्या घशाला सूज आली व त्याचा घसा दुखू लागला व थोड्याच वेळात आपण आवाज गमावल्याचे समजले.

ब्रिटेनच्या लीसेस्टर यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली पण त्याने आवाज मात्र कयमचा गमावला.

शिंक रोखल्यास मेंदूला होणारा रक्तप्रवाह विस्कळीत होऊ शकतो आणि आपल्या रक्तवाहिन्या आणि मज्जातूंतू ही संकुचित होतात. यामुळे डोकेदुखी, रक्तवाहिन्या डॅमेज होऊ शकतात.

त्यामुळे कधीही स्वत:ला शिंकण्यापासून थांबवू नका. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस हेल्थ सायन्स सेंटरचे मुख्य आणि सर्जन डॉ. जी यांग म्हणतात की शिंक रोखल्याने तुमच्या शरीराला खूप नुकसान होऊ शकते.

तुम्हाला सतत शिंका येत असतील अनू तुम्ही त्या रोखत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या फुक्फुसांवर होतो.

मुंबई : वातावरणात बदल झाला की त्याचा लगेचच परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पावसाळा म्हटला की आजार हे आलेच. यावेळी सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे अधिक दिसून येतात. मात्र या आजारांवर तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करु शकता. सर्दी झाल्यास तुमच्या किचनमधील काही पदार्थांचा वापर करुन यावर मात करु शकता.

मध आणि आल्याचा रस
घश्यात त्रास असल्यास मधाच्या सेवनाने फायदा होतो तर आल्यामध्ये अँटीबायोटिक गुण असतात. आले आणि मध समप्रमाणात घेऊन एकत्र वाटा. या मिश्रणात तुम्ही अर्धा ग्लास दुधही मिसळू शकता. यामुळे सर्दी बरी होते. तसेच घश्याचा त्रास होत असल्यास तोही बरा होतो.

हळद
हळदीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. हळकुंड एका बाजूने जाळा. त्याच्या गंधाने तुम्हाला सर्दीपासून सुटका मिळू शकते.या यासोबतच दुधातही तुम्ही हळद टाकून प्यायल्यास घसा मोकळा होतो.

अळशी, लिंबाचा रस आणि मध
सर्दीमध्ये अळशीचा वापर प्रामुख्याने केला जातो. पाण्यात अळशी टाकून हे पाणी उकळवा. जोपर्यंत हे मिश्रण दाट होत नाही तोपर्यंत उकळवत राहा. यात लिंबाचा रस आणि मध टाका. सर्दीचा त्रास सतावत असेल तर दिवसातून दोन वेळा हे मिश्रण घ्या.

गूळ
आयुर्वेदात गुळाला महत्त्वाचे स्थान आहे. पाण्यात काळी मिरी टाकून पाणी उकळवा. यात थोडे जिरे टाका. त्यानंतर गुळाचा खडा टाका. जेव्हा गूळ पाण्यात विरघळून जाईल तेव्हा गॅस बंद करा. घश्यात खवखव होत असल्यास हे पाणी प्या.

Dr. Rekha Pohani
Dr. Rekha Pohani
Specialist, Dietitian dietetics, 13 yrs, Pune
Dr. Gopal Samdani
Dr. Gopal Samdani
MBBS, Pediatrician, 30 yrs, Pune
Dr. Dr.Sandip Narkhede
Dr. Dr.Sandip Narkhede
MS/MD - Ayurveda, Infertility Specialist Lactation Consultant, 10 yrs, Pune
Dr. Sneha Jain
Dr. Sneha Jain
MD - Homeopathy, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. Hemant Chavan
Dr. Hemant Chavan
BAMS, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Hellodox
x