Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

According to a journal-entry by Mary Shelly, haunting tendency of her nightmares derived her to write a book. She said, “When I placed my head upon the pillow I did not sleep, nor could I be said to think. My imagination, unbidden, possessed and guided me, gifting the successive images that arose in my mind with a vividness far beyond the usual bounds of reverie.” Are you also one of those who often experience nightmares? If your answer is yes, then your scary dreams are indicating towards an important aspect of your personality. According to science, people who see nightmares during sleep are more creative than those who are happy dreamers.

THE STUDY: A study was conducted by researchers where they asked nightmare sufferers and happy dreamers to respond to certain emotionally charged words. The researchers also believe that people with creative minds don’t follow common thinking pattern. In the study, they found out that those who suffered nightmares made more creative associations with these words. On the other hand, happy dreamers reacted with common words like ‘joy’ for ‘happy’ and ‘mad’ for ‘angry’. Bad-dreamers responded differently. For ‘angry’ they used words like ‘red’ and 'face'.

THE LINK BETWEEN NIGHTMARES AND CREATIVITY: First of all, know that what we imply by nightmares are not terror dreams where you are being chased by a lion or falling into an endless abyss. Nightmares are vivid, intense and mostly, imaginative. It should be noted that vivid dreams are not bad. It’s just when you’re stressed, these vivid dreams turn negative. It is also believed that the frequency of nightmares fuel creativity.

HOW EXACTLY DOES IT HAPPEN? Researchers are of the opinion that when you frequently experience nightmares, you derive artistic and creative ideas from them. Nightmares tend to haunt you and remain in your memory for a longer duration. This helps a nightmare sufferer to remember it and create artistic and imaginative ideas out of them.

ARTISTIC VIEW AND EMPATHY: It was also revealed that nightmare sufferers are more empathetic. They are more sensitive to people and their surroundings. This also indicates that a high empathy level in people who suffer nightmares plays a great role in boosting their creativity.

Published  
Dr. HelloDox Support #
HelloDox Care
Consult

Sleep problems can be caused by various factors. Although causes may differ, the end result of all sleep disorders is that the body's natural cycle of slumber and daytime wakefulness is disrupted or exaggerated.

Factors that can cause sleep problems iclude:
• Physical disturbances (for example, pain from ulcers)
• Medical issues (for example, asthma)
• Psychiatric disorders (for example, depression and anxiety disorders)
• Environmental issues (for example, alcohol use)

Short-term or acute insomnia can be caused by life stresses (such as job loss or change, death of a loved one, or moving), illness, or environmental factors, such as light, noise, or extreme temperatures.

Long-term or chronic insomnia (insomnia that occurs at least three nights a week for a month or longer) can be caused by factors such as depression, chronic stress, and pain or discomfort at night.

Other factors that can interfere with sleep include:

• Genetics: Researchers have found a genetic basis for narcolepsy, a neurological disorder of sleep regulation that affects the control of sleep and wakefulness.

• Night shift work: People who work at night often experience sleep disorders, because they cannot sleep when they start to feel drowsy. Their activities run contrary to their biological clocks.

• Medications: Many drugs can interfere with sleep, such as certain antidepressants, blood pressuremedication, and over-the-counter cold medicine.

• Aging: About half of all adults over the age of 65 have some sort of sleep disorder. It is not clear if it is a normal part of aging or a result of medications that older people commonly use.



स्लीप अॅप्नीया

स्लीप अॅप्निया असलेली व्यक्ती साधारण सहा तास आडवी पडून व्यवस्थित झोपू शकत नाहीत. अधूनमधून उठायला लागणे, खूपदा कूस बदलावी लागणे, श्वास बंद पडल्यासारखा वाटणे,उठून श्वास घ्यावा लागणे, या गोष्टी वारंवार घडत असतील, तर काही तपासण्या केल्या जातात. हा आजार एका ठराविक पातळीवर पोहोचला असेल, तर रुग्णाला सी-पॅप मशिन वापरावे लागू शकते. ही वेळ आली, तर रुग्णाला ते मशिन आणि ऑक्सिजनचा सिलिंडर घेऊनही फिरावे लागते. यामुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर, त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुदैवाने लठ्ठपणावर उपचार केल्यानंतर हा विकार पूर्णपणे बरा होऊ शकतो. अशा रुग्णाच्या लठ्ठपणामध्ये १५ ते २० टक्के परिणाम झाला, तरी ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियामध्ये जवळजवळ ८० टक्के फरक पडतो.

आहार नियंत्रण आणि नियमित व्यायम यांच्यामुळे काही प्रमाणात वजन कमी होऊ शकते. वजन जेव्हा अतिलठ्ठ या प्रकारात मोडते, तेव्हा ते या प्रकारांनी कमी होऊ शकत नाही. काही वेळा या लोकांमध्ये आहारावर नियंत्रण आणणे आणि खूप शारीरिक श्रम करणे शक्त नसते, तेव्हा बॅरिस्टिक सर्जरी हा चांगला वैज्ञानिक उपचार उपलब्ध आहे. या उपचार पद्धतीमध्ये जठर आणि लहान आतडे म्हणजे पचनसंस्था यांची रचना काही प्रमाणात बदलली जाते. विविध हार्मोन्स वेगवेगळ्या पातळ्यांवर सतर्क केले जातात. चरबी तयार होण्याची जी पद्धत असते, ती वेगळ्या पद्धतीने वळवली जाते. यामुळे रुग्णाचे वजन वर्षभराच्या कालावधीत ६० ते ७० टक्क्यांनी कमी होऊ शकते आणि ते दीर्घ काळ टिकून राहू शकते. अतिलठ्ठ लोकांमध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया असल्यास तो बॅरिअॅट्रिक सर्जरीमुळे बरा होऊ शकतो. त्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असते. घोरणे ही साधी गोष्ट नसून ते एका जीवघेण्या व्याधीचे लक्षण असू शकते, हे समजून घ्यायला हवे.

अनेक लोकांना झोपेत श्वास थांबण्याचा त्रास होतो. सर्दी-पडशामुळे त्रास होत असेल, असा अनेकांचा समज होतो. पण वैद्यकीय भाषेत त्याला स्लीप अप्निया म्हणतात. अनेकांना झोपेत दहा ते वीस सेकंदांसाठी श्वास थांबतो. सलग अनेक रात्री हा प्रकार सुरू असतो. झोपेत उद‍्भवणाऱ्या या आजाराने दिवसा झोप लागते. त्यामुळे एकाग्रता कमी होते. झोप कमी झाल्यावर अनेक विकार जडण्याची भीती असते. त्यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात व अनेकदा आपोआप वजन वाढण्याचा त्रास होतो. पण योग्य उपचारांच्या बळावर यावर मात करता येते. तुम्हाला झोप सुरळीत लागते. तसेच, दररोज ताजेतवाने राहू शकतात.

स्लीप अप्नियाची लक्षणे झोपेत काही काळ श्वास थांबत असेल तर किंवा नाक चोंदत असेल तर तुम्हाला स्लीप अप्नियाचा त्रास आहे, असे समजावे. सकाळी डोकेदुखी, स्मरणशक्ती किंवा काही शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळे येणे, मन एकाग्र होण्यात अडथळे येणे, नैराश्याची भावना येणे, व्यक्तिमत्त्वात बदल होणे, वारंवार लघवी करण्यास उठणे, सकाळी उठल्यावर तोंड, घसा कोरडा पडणे

उपचार वजन कमी करणे हा त्यावरील चांगला उपचार आहे. जे लोक अतिलठ्ठ असतात, त्यांच्या घशाच्या मागील बाजूस अतिरिक्त पेशी असतात. त्या श्वसनमार्गात येतात. झोपेत असताना फुफ्फुसाकडे जाणारा हवेचा प्रवाह रोखून धरतात. केवळ दहा टक्के वजन कमी केल्याने लक्षणे कमी होतात. धूम्रमान बंद करणे आवश्यक आहे. मद्यपान, झोपेच्या गोळ्या टाळणे, वेदनाशामक गोळ्या टाळणे, झोपण्यापूर्वी जड जेवण टाळावे, कॉफी घेऊ नये. झोपेचे तास नियमित करावेत. हे उपचार केल्यानंतरही हा त्रास कमी न झाल्यास बॅरिअॅट्रिक सर्जरी हा एक उपाय आहे. वास्तविक, शस्त्रक्रियेचा निर्णय घेणे सोपे नाही. आणि स्लीप अप्नियाशी लढत देणाऱ्या प्रत्येकाला हा उपाय लागू पडत नाही. मुळात हा आजार मधुमेह, उच्चरक्तदाब या सारख्या आजाराशी निगडित असल्याने त्यावर आधी मात करणे हे सर्वांत चांगले आहे.

स्लीप अॅप्नीया ही एक दुर्लक्षित आरोग्य समस्यांपैकी एक समस्या आहे.अनेकांना या आरोग्य समस्येबाबत काहीच माहिती नसते पण ज्यांना या झोपेच्या विकाराबाबत थोडीफार माहिती असते त्यांना या विकारामुळे होणा-या गंभीर परिणामांची जाणिव नसते.२००९ मध्ये AIIMS द्वारे घेण्यात आलेल्या एका अभ्यासानूसार भारतीय लोकसंख्येतील १३ टक्के लोकांना OSA ही समस्या असल्याचे आढळून आले आहे.त्यापैकी ४ टक्के लोकांनी डॉक्टरकडे जाऊन याची तपासणी केलेली आहे.तसेच या विकाराचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये तीनपट अधिक असल्याचे देखील आढळले आहे.

स्लीप अॅप्नीया मुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य समस्येवर होणा-या परिणामांचे पुरावे दिवसेंदिवस वाढतच आहेत. OSA मुळे ह्रदयाचे ठोके वाढतात व रक्तदाब देखील वाढतो त्यामुळे सहाजिकच ह्रदयावरचा दाब वाढू लागतो. याचे आणखी एक कारण असे की यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते ज्यामुळे ह्रदयाची कार्यक्षमता वाढविणा-या मज्जासंस्थेच्या विशिष्ट भागावर प्रभाव पडतो. शिवाय OSA मुळे हायपरटेंशन,मधूमेह होण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे फुफ्फुसे,ह्रदय व मेंदूच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होतो.

त्यामुळे घोरण्यासोबत श्वसनाची समस्या असल्यास ती ओबस्ट्रक्टिव्ह स्लीप अप्ने (OSA) ही गंभीर आरोग्य समस्या असू शकते.तसेच या स्लीप अॅप्नीया समस्येवर वेळीच उपचार न केल्यास गंभीर आरोग्य समस्या होऊन मृत्यू देखील होऊ शकतो.जे लोक स्लीप अॅप्नीयावर वेळीच उपचार करीत नाहीत त्यांना स्ट्रोक येण्याचा चारपट अधिक व ह्रदयविकारांचा तीनपट अधिक धोका असतो.या झोपेच्या विकाराचा मधूमेह, मेटाबॉलिक विकार, वजन वाढणे, हार्ट अटॅक, ह्रदय बंद पडणे, स्मरणशक्ती कमजोर होणे, लवकर वृद्धत्व येणे व अकाली मृत्यू यांच्याशी सबंध असू शकतो.

रस्त्यावरील सुरक्षेसाठी देखील स्लीप अॅप्नीयावर उपचार करणे फार गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनच्या मते स्लीप अॅप्नीयामुळे अपुरी झोप व एकाग्रता कमी झाल्यामुळे दरवर्षी १ लाख कार अॅक्सिडंट, चाळीस हजार जखमी व १५५० लोक मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले आहे. याच्या परिणामांमुळे कामाच्या ठिकाणी होणा-या दुखापती वाढणे, कामाची गुणवत्ता घसरणे, जगण्यातील मौज कमी होणे व आरोग्य सेवांमुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार अशा गोष्टी वाढत आहेत.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



आढावा
नारकोलेप्सी हा एक तीव्र झोपेचा विकार असून दिवसाच्या उष्णतेमुळे आणि झोपेच्या अचानक हल्ल्यांद्वारे लक्ष दिले जाते. नार्कोलेप्सी असलेल्या लोकांना परिस्थिती कितीही असो, बर्याच काळापासून जागृत राहणे कठीण जाते. नारकोलेप्सीमुळे आपल्या दैनंदिन नियमानुसार गंभीर व्यत्यय येऊ शकतो.

कधीकधी नार्कोलेप्सीला अचानक स्नायू टोन (कॅटॅप्लेक्सी) हानी येते, जी तीव्र भावनांनी प्रेरित होऊ शकते. कॅटॅप्लेक्सी असलेल्या नारकोलेप्सीला टाईप 1 नारकोलेप्सी म्हणतात. कॅटलॅप्लेसीशिवाय उद्भवणार्या नारकोलेप्सीला टाइप 2 नार्कोलेप्सी म्हणून ओळखले जाते.

नारकोलेप्सी ही एक दीर्घकालीन स्थिती आहे ज्यासाठी कोणताही उपाय नाही. तथापि, औषधे आणि जीवनशैलीतील बदल लक्षणे व्यवस्थापित करण्यात आपली मदत करू शकतात. इतरांकडून मदत - कुटुंब, मित्र, नियोक्ता, शिक्षक - नार्कोलेप्सीचा सामना करण्यात आपल्याला मदत करू शकतात.

लक्षणे
पहिल्या काही वर्षांपासून नार्ककोप्सीच्या चिन्हे आणि लक्षणे खराब होऊ शकतात आणि नंतर जीवनासाठी पुढे जाऊ शकतात. त्यात समाविष्ट आहेः

जास्त दिवस झोपेतपणा. नाकोलेप्सी असलेले लोक कोणत्याही वेळी कधीही, कोणत्याही चेतावणीशिवाय झोपतात. उदाहरणार्थ, आपण कदाचित मित्रांसह कार्य करीत असाल किंवा बोलत असाल आणि अचानक आपण अर्ध्या तासापर्यंत काही मिनिटे झोपलात. जेव्हा आपण जागे होते तेव्हा आपल्याला ताजेतवाने वाटते, परंतु शेवटी आपण पुन्हा झोपेत असता.

आपण दिवसभरात कमी सावधगिरी आणि लक्ष केंद्रित देखील अनुभवू शकता. बर्याचदा दिवसातील झोप येणे ही सामान्यतः दिसून येणारी पहिली लक्षणे आहे आणि बर्याचदा त्रासदायक असते, यामुळे आपल्यास लक्ष केंद्रित करणे आणि पूर्ण कार्य करणे कठीण होते.

स्नायू टोन अचानक अचानक. कॅटॅलेक्झी (केएटी-यू-पक्के-व्यू) नावाची ही अट, बर्याच शारीरिक बदलांमुळे, स्लुरड भाषणांपासून बहुतेक स्नायूंमधील कमजोरी पूर्ण करण्यासाठी, आणि काही मिनिटे टिकू शकते.

कॅटॅलेक्झी अनियंत्रित आहे आणि तीव्र भावना, सहसा हसणे किंवा उत्साह जसे सकारात्मक, पण कधीकधी भय, आश्चर्य किंवा क्रोध द्वारे ट्रिगरिंग आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण हसता तेव्हा आपले डोके अनियंत्रितपणे टाळू शकते किंवा आपले गुडघे अचानक अडकतात.

नाकोलोप्सी असलेल्या काही लोकांना दरवर्षी कॅटॅलेक्झीच्या केवळ एक किंवा दोन भागांचा अनुभव येतो तर इतरांना दररोज असंख्य भाग असतात. नाकोलेप्सी असलेल्या प्रत्येकास कॅटॅप्लेसीचा अनुभव नाही.

झोपेचा पक्षाघात नारकोप्सी असलेल्या लोकांस झोपेत असताना किंवा जागेवर जाताना किंवा हलविण्यास किंवा तात्काळ बोलण्याची तात्पुरती अक्षमता जाणवते. हे भाग सामान्यत: संक्षिप्त असतात - काही सेकंदात किंवा मिनिटे टिकतात - परंतु भितीदायक असू शकतात. आपल्याला या स्थितीबद्दल जाणीव असू शकते आणि त्यानंतर काय घडत आहे यावर आपले काही नियंत्रण नसले तरी देखील नंतर त्यास परत करणे कठीण होणार नाही.

हे झोप पक्षाघात सामान्यतः झोपेच्या वेळेच्या दरम्यान होते जे तात्पुरते डोळ्यांच्या हालचाली (आरईएम) झोपतात. आरईएम झोपेच्या दरम्यान ही तात्पुरती अखंडता आपल्या शरीराला स्वप्न क्रियाकलाप करण्याचे टाळू शकते.

तथापि, झोपेच्या पक्षाघात असलेल्या प्रत्येकास नाजूकपणा नसतो. नारकोलीशिवाय बरेच लोक झोपेच्या पक्षाघातच्या काही भागांचा अनुभव घेतात.

वेगवान डोळा हालचाली (आरईएम) मध्ये बदल. बहुतेक स्वप्न पाहताना आरईएमची झोप असते. नायकोलेप्सी असलेल्या लोकांमध्ये दिवसाच्या कोणत्याही वेळी आरईएम झोपू शकतो. नार्कोलेप्सी असलेले लोक नेहमी झोपण्याच्या झोपेच्या 15 मिनिटांच्या आत, त्वरीत आरईएम झोपतात.
भ्रामकपणा आणि भ्रम जर हे झोपेच्या वेळी घडले असतील तर झोप आणि हायपोनोमिक हेलुसिनेज झाल्यास ते घडल्यास हे भेदभाव हाग्नागोगिक हेलुसिनेशन असे म्हणतात. आपल्या शयनगृहात अनोळखी व्यक्ती असल्यासारखे वाटत आहे. हे भेदभाव विशेषत: ज्वलंत आणि भयावह असू शकतात कारण आपण स्वप्नांना प्रारंभ करताना झोपू शकत नाही आणि वास्तविकता म्हणून आपले स्वप्न अनुभवत आहात.
इतर वैशिष्ट्ये
नार्कोलेप्सी असलेल्या लोकांमध्ये इतर स्लीप डिसऑर्डर असू शकतात जसे की अडथ्रक्टिव्ह स्लीप ऍपने - एक अट ज्यामध्ये श्वास प्रारंभ होतो आणि संपूर्ण रात्रभर थांबतो - अस्वस्थ पाय सिंड्रोम आणि अगदी अनिद्रा.

नार्कोलेप्सी असलेल्या काही लोकांना नार्कॉल्सीच्या संक्षिप्त भागांमध्ये स्वयंचलित वर्तन अनुभवतो. उदाहरणार्थ, आपण सामान्यपणे कार्य करत असताना आपण झोपू शकता, जसे की लेखन, टाइपिंग किंवा ड्रायव्हिंग, आणि झोपताना आपण ते कार्य सुरू ठेवता. आपण जागृत असता तेव्हा, आपण जे केले ते आपल्याला आठवत नाही आणि आपण कदाचित ते चांगले केले नाही.

डॉक्टर कधी भेटावे
आपल्या डॉक्टरांकडे पहा, जर आपल्याला खूप दिवसभर झोप येत असेल तर ती आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात व्यत्यय आणते.

कारणे
नार्कोलेप्सीचे अचूक कारण अज्ञात आहे. टाइप 1 नार्कोलिप्सी असलेल्या लोकांमध्ये रासायनिक हायपोक्रेटिन (हाय-पो-क्रि-टिन) कमी प्रमाणात असतात. हायपोक्रेटिन हे आपल्या मेंदूतील एक महत्वाचे न्यूरोकेमिकल आहे जे जागृतपणा आणि आरईएम झोप नियंत्रित करण्यास मदत करते.

कॅटॅप्लेसीचा अनुभव घेणार्या लोकांमध्ये हायपोक्रेटिनचे स्तर विशेषतः कमी असतात. मस्तिष्कमध्ये हायपोक्रेटिन-निर्मिती करणार्या पेशींची हानी झाल्यास नक्कीच काय माहित नाही, परंतु तज्ञांना असे वाटते की हे ऑटोमिम्यून प्रतिक्रियामुळे झाले आहे.

असेही होऊ शकते की जेनेटिक्स नार्कोलेप्सीच्या विकासात भूमिका बजावतात. परंतु, या विकारांकडे मुलाकडे जाण्याचा पालकांचा धोका खूपच कमी आहे - केवळ 1 टक्के.

संशोधन हे स्वाइन फ्लू (एच 1 एन 1 फ्लू) विषाणू आणि विशिष्ट गोष्टींच्या प्रदर्शनासह संभाव्य संघटना दर्शवितात

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



अतिझोप (Hypersomnia)
झोप ही आपल्या आरोग्यासाठीची अत्यावश्यक क्रिया आहे; पण कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा अतिरेकही घातकच असतो. झोपेच्या बाबतीतही असेच होते. बर्‍याच जणांना खूप जास्तवेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. झोपेच्या या समस्या, त्यांची कारणे व त्यांचे दुष्परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असणे व त्याबद्दल आपण जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराला व मेंदूलाही विश्रांती मिळावी यासाठी झोप अत्यावश्यक आहे. रात्री पुरेशी झोप झाल्यास शरीर दुसर्‍या दिवशी काम करण्यासाठी ताजेतवाने होते. याशिवाय आपले हृदय, डोळे यांच्यासहित आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठीही झोप आवश्यक असते. समान्यपणे एका लहान मुलाला 8 ते 10 तासांची झोप आवश्यक असते, तर प्रौढांना 6 ते 7 तासांची झोप पुरेशी असते; पण अलीकडे प्रौढांमध्ये अतिझोपेचे प्रमाण वाढते आहे. 6 तासांऐवजी 8 ते 10 तास किंवा अनेकजण 11 तासही झोपतात, तर काहीजणांना धड 4 तासांची झोपही मिळत नाही; पण या कमी झोपेचे किंवा अतिझोपेचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात.

झोपेच्या योग्य सवयी, वेळ इत्यादी गोष्टी मागे पडून आपल्याला वाटेल त्यावेळी वाटेल तेवढा वेळ झोपण्याचे प्रमाण वाढते आहे. नोकरदार असतील आणि सकाळी लवकर ऑफिसला जायचे असेल, तर अशा व्यक्‍ती लवकर उठतातच; पण काहीवेळा पार्टी किंवा काही कामानिमित्त त्यांना रात्री उशिरापर्यंत जागावे लागते व त्यानंतर झोपल्यावरही सकाळी ऑफिस असल्यामुळे त्यांना पुन्हा लवकर उठून ऑफिसला जावे लागते. दुसरीकडे स्वतःचा व्यवसाय असलेल्या व्यक्‍ती मात्र आपल्या वेळेप्रमाणे उठू शकतात व कामाच्या ठिकाणी जाऊ शकतात. अशा व्यक्‍तींमध्ये अतिझोपेचे प्रमाण जास्त असते. झोपेच्या कमतरतेमुळे किंवा अतिरेकामुळेही आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. काही दुष्परिणाम पुढील प्रमाणे आहेत.

झोपेच्या समस्यांचे दुष्परिणाम :

- कमी झोपेमुळे किंवा अतिझोपेमुळे आळस येतो व त्यामुळे सुस्ती येते. त्यामुळे आपल्या कामांचा वेग मंदावतो व परिणामी आधी काही मिनिटांत होणारे आपले काम काही तासांवर जाऊन पर्यायाने आपल्या प्रगतीचा वेग मंदावतो. आपल्या सहकार्‍यांसमोर आपला प्रभावही फिका पडतो व बाहेरच्या जगातही आपली मंद अशी प्रतिमा तयार होते.

- अतिझोपेचा किंवा कमी झोपेचा आपल्या बुद्धिमत्तेवरही परिणाम होतो. शिकणे व विचार करणे या प्रक्रियांमध्ये झोपेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपली एकाग्रता, सावधपणा, समस्या सोडवण्याची क्षमता इत्यादी गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी आपल्या मेंदूत एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेचे आरोग्य हे झोपेवर अवलंबून असते. अतिझोप झाल्यास या व्यवस्थेच्या कार्यावर परिणाम होतात व पर्यायाने आपल्या बुद्धिमत्तेवरही त्याचा परिणाम होतो.

- याशिवाय आपली स्मरणशक्‍ती मजबूत करण्यासाठीही झोप गरजेची असते. झोप अति झाल्यास आपल्या स्मरणशक्‍तीवरही त्याचा परिणाम होतो.

- झोप अति झाल्याने कामात लक्ष न लागणे, कामाचा वेग मंदावणे इत्यादी गोष्टी घडतात. त्यामुळे काम करताना अपघातही होतात. यामुळे आपण आपल्यासहित इतरांनाही हानी पोहोचवू शकतो. एका संशोधनानुसार कामाच्या ठिकाणी अपघात होऊन आग लागणे किंवा रस्त्यावरही भीषण अपघात होण्याचे कारण कामगारांच्या व त्या त्या व्यक्‍तींच्या झोपेच्या तक्रारी हे होते.

- याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे किंवा अतिझोपेमुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका येणे, हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता, उच्च रक्‍तदाब, मधुमेह इत्यादी समस्या निर्माण होतात.

- गरजेपेक्षा कमी झोप झाल्यास आपल्या त्वचेवरही त्याचा दुष्परिणाम होतो. एक रात्र झोप पूर्ण न झाल्यास डोळ्यांखाली काळे डाग पडणे, डोळ्यांखालील त्वचा सुजणे इत्यादी समस्या निर्माण होतात. हीच गोष्ट सातत्याने होत राहिल्यास हे निशाण कायमचे चेहर्‍यावर बसतात.

- झोपेच्या कमतरतेमुळे लैंगिक क्षमतेवरही दुष्परिणाम होतो. संपूर्ण शरीरात ताण व आळस असल्यामुळे लैंगिक संबंधांसाठीचा उत्साह हरवून जातो.

झोपेच्या समस्यांची कारणे :

अतिझोप : अतिझोपेची कारणे अनेक असू शकतात. यापैकी एक कारण म्हणजे, नीट झोप न लागणे. आपल्याला गाढ किंवा नीट झोप न लागल्यास आपण रात्रभर कूस बदलत राहतो व मध्ये कधीतरी झोप लागते, पण आपल्याला उशिरापर्यंत जागच येत नाही. याशिवाय नैराश्य किंवा उत्साहाचा अभाव हेही अतिझोपेचे कारण असू शकते. सकाळी उठताना आपल्याला दिवसातील एकही काम करण्याचा उत्साह नसेल, तर आपल्याला उठावेसेच वाटत नाही. किंवा आपल्याला किती दिवसांमध्ये कुठली गोष्ट करायची आहे याचे काही नियोजन नसल्यामुळे आपण झोपून राहतो. शिवाय आयुष्याचा कंटाळा आला असेल किंवा नैराश्य आले असेल, तर आपण उठून कामाला सुरुवात करण्याऐवजी झोपून राहणे पसंत करतो.

उपाय :
झोपेच्या समस्या निर्माण होऊ नयेत व पर्यायाने त्यामुळे होणारे दुष्परिणामही होऊ नयेत यासाठी अनेक उपाय करता येतात. सर्वप्रथम अतिझोपेच्या समस्येवर मात करण्यासाठी काय करता येईल ते पाहू. अतिझोपेच्या समस्येवर मात करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सकाळी किती वाजता उठण्याची वेळ नक्‍की करावयाची आहे हे ठरवावे व आपल्या झोपण्याची वेळ टप्प्याटप्प्याने कमी करीत त्यावेळेपर्यंत पोहचावे. म्हणजेच आपण सध्या 9 वाजता उठत असू आणि आपल्याला 6 वाजता उठण्याची सवय लावून घ्यायची असेल, तर थेट 6 वाजता उठण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या शरीरांतर्गत व्यवस्थेला धक्‍का बसतो. त्यामुळे क्रमाक्रमाने वेळ कमी करीत आणावी. 9 वाजता उठण्याची सवय असल्यास आधी 8.30 चा अलार्म लावावा. ही वेळ दर आठवड्याला अर्धा अर्धा तास अशी कमी करीत आणावी व नंतर आपल्या अपेक्षित वेळेवर यावे.

कमी झोप किंवा जागरणाच्या समस्येवरचा उपाय आपल्या निश्‍चयात आहे. रात्री होणारे जागरण संपूर्णपणे टाळावे व रात्री झोपण्याची वेळ निश्‍चित करावी. आपला कॉम्प्युटर, टीव्ही व मोबाईल झोपण्याच्या अर्धा तास आधी बाजूला ठेवून द्यावा. कारण झोपण्यापूर्वी मन शांत असणे खूप महत्त्वाचे आहे. मोबाईल, टीव्ही इत्यादी बंद केल्यावर लगेच झोपायचा प्रयत्न केल्यास झोप येत नाही. कारण आपले मन शांत झालेले नसते. याशिवाय खोलीत लाईट किंवा चमकणारी वस्तू ठेवणे टाळावे. यामुळे आपल्या झोपेत अडथळे येतात. याशिवाय झोपण्यापूर्वी अनुलोमविलोम इत्यादी दीर्घ व सावकाश असे श्‍वसनाचे व्यायाम करावेत. त्यामुळेही शांत झोप लागते. विश्रांती व त्यासाठी झोप ही माणसाला श्रमपरिहारासाठी मिळालेली सर्वात मोठी नैसर्गिक सोय आहे. त्यामुळे या सोयीचा आदर करून आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक तेवढी आणि तेवढीच झोप घ्यावी. याचा आपल्या बुद्धिमत्तेसहित आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो व आपल्याला आपल्या कामात अधिकाधिक प्रगती करता येते.

Dr. Bhushan Khedkar
Dr. Bhushan Khedkar
Specialist, Dietitian dietetics, 8 yrs, Pune
Dr. Shyamsundar Jagtap
Dr. Shyamsundar Jagtap
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Pallavi Joshi
Dr. Pallavi Joshi
BHMS, Family Physician Homeopath, 1 yrs, Pune
Dr. Reshma P. Ransing
Dr. Reshma P. Ransing
BHMS, Family Physician, Pune
Dr. Sachin Sutar
Dr. Sachin Sutar
BAMS, Family Physician Physician, 8 yrs, Pune
Hellodox
x