Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

माणसाला मरण कधी येणार हे कुणीही सांगू शकत नाही. असंही अनेकदा सहज बोललं जातं की, चालता चालता देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, आता व्यक्तीचा मृत्यू कधी होणार याचा अंदाज घेतला जाऊ शकतो, असा दावा काही वैज्ञानिकांनी केला आहे. न्यूयॉर्कच्या वैज्ञानिकांनी एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पावर्ड टूल डेव्हलप केलं आहे. याने चेस्ट एक्स-रे (Chest Radiograph) मधील माहितीचा वापर करून दीर्घकालीन मृत्युचा अंदाज लावला जाऊ शकतो.

जर्नल जामा नेटवर्क ओपनमध्ये या रिसर्चबाबतची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. ज्यात त्या रूग्णांबाबत माहिती मिळवली आहे, जे स्क्रीनिंग किंवा एक्स-रे चा सर्वात जास्त आरोग्य लाभ घेऊ शकतात. हृदयरोग, लंग कॅन्सर किंवा इतरही आजारांच्या स्क्रीनिंगमध्ये लक्षणे आढळली तर सुरूवातीच्या स्टेजमध्ये औषधे घेऊन व्यक्तीची स्थिती गंभीर होण्यापासून रोखली जाऊ शकते.

हॉर्वर्ड मेडिकल स्कूलच्या मॅसचूसट्स जनरल हॉस्पिटलमध्ये कार्यरत मायकल लू जो हे या रिसर्च वैज्ञानिंकापैकी एक आहेत. त्यांच्यानुसार, 'ही दररोज होणाऱ्या टेस्टच्या आधारावर अंदाजे माहिती घेण्याची नवीन पद्धत आहे. ही एक अशी माहिती आहे जे आधीच सर्वांसमोर उपलब्ध आहे. ज्या आधारावर व्यक्तीचं आरोग्य सुधारलं जाऊ शकतं. पण या माहितीचा वापर केला जात नाही'.

लू आणि त्यांचे सहयोगींनी ही माहिती मिळवण्यासाठी एक कॉन्वोल्यूशनल न्यूरल नेटवर्क म्हणजे एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूल डेव्हलप केलाय, ज्याचं नाव सीएक्सआर-रिस्क ठेवण्यात आलंय. याच्या ट्रेनिंगसाठी साधारण ४२ हजार सहभागी लोकांचे ८५ हजार पेक्षा अधिक एक्स-रेंचा वापर करण्यात आला. प्रत्येक इमेजला या पॉइंटवर बघण्यात आलं की, टेस्ट करणारा व्यक्ती टेस्ट केल्यानंतर १२ वर्ष जिवंत राहिला का?

या ट्रेनिंगचं हे लक्ष्य होतं की, या एक्स-रे चा अभ्यास करून सीएक्सआर-रिस्क अशा फीचर्स आणि कॉम्बिनेशनचा शोध लावेल, ज्याद्वारे व्यक्तीचं आरोग्य आणि मृत्युबाबत योग्य अंदाज लावला जाऊ शकेल.

यानंतर लू आणि त्यांच्या साथीदारांनी सीएक्सआर-रिस्कचा वापर दोन क्लिनिकल ट्रायलचा भाग राहिलेल्या साधारण १६ हजार रुग्णांच्या चेस्ट एक्स-रेस्टवर केला. यातून त्यांना कळालं की, असे व्यक्ती ज्यांची लक्षणे जाणून घेऊन न्यूरल नेटवर्कने त्यांची स्थिती 'वेरी हाय रिस्क' सांगितली होती, त्यातील ५३ टक्के लोकांचा मृत्यू १२ वर्षात झाला. तर ज्यांना सीएक्सआर-रिस्क ने 'वेरी लोक रिस्क' सांगितले होते, त्यांच्यात हे प्रमाण केवळ ४ टक्के होतं.

या रिसर्चमधून हे समोर आलं की, सीएक्सआर-रिस्कने ती माहिती दिली, ज्याने दीर्घकालीन मृत्यूबाबत माहिती मिळवली जाऊ शकते. वैज्ञानिकांना विश्वास आहे की, नवीन टूल आणखी जास्त चांगले बनवले जाऊ शकतात.

Dr. Sachin Hundekari
Dr. Sachin Hundekari
MBBS, Cardiologist, 4 yrs, Pune
Dr. Sairandhri Shinde
Dr. Sairandhri Shinde
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Sandeep Jagtap
Dr. Sandeep Jagtap
MD - Allopathy, HIV Specialist Pain Management Specialist, 15 yrs, Pune
Dr. Sonal Shendkar
Dr. Sonal Shendkar
MBBS, Dermatologist Medical Cosmetologist, 7 yrs, Pune
Dr. Vijay Jagdale
Dr. Vijay Jagdale
BHMS, Homeopath, 10 yrs, Mumbai
Hellodox
x