Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : आपल्याला भूक कमी अधिक लागण्याचा संबंध पचनशक्तीशी असतो. योग ही अशी साधना आहे ज्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते. त्यामुळे भूक कमी लागण्याच्या समस्येवरही परिणाम करते. म्हणून जर तुम्हाला कमी भूक लागत असेल तर ही योगासने नक्की करा.

पवनमुक्तासन
हे आसन भूक वाढवण्यासाठी आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. या आसनात ४०-५० सेकंद रहा आणि ४-५ वेळा याची आवर्तने करा.

वज्रासन
रक्तप्रवाह, भूक आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी हे उपयुक्त आसन आहे. या आसनात कमीत कमी मिनिटभर रहा आणि रोज करताना हळूहळू वेळ वाढवत न्या.

बद्धकोणासन
भूक न लागण्याची समस्या असेल तर हे आसन करणे फायद्याचे ठरेल. या आसनामुळे बद्धकोष्ठता, अपचन यावर आराम मिळतो. पण हे आसन आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच करा. नियमित केल्याने त्यावर पकड येईल.

शशांकासन
या आसनामुळे पोट आणि पोट्याच्या स्नायूंना उत्तम मसाज मिळतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

चिन्मय मुद्रा
या मुद्रेमुळे शरीरात रक्तसंचार उत्तमरीत्या होतो. पचनतंत्र सुधारुन भूक वाढवण्यास ही मुद्रा उपयुक्त ठरते. चिन्मय मुद्रा करताना २-३ मिनिटे श्वास घ्या आणि आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या.

आठवड्याचे पाच किंवा सहा दिवस काम करणे म्हणजे अनेकांसाठी कंटाळवाणेच. कित्येक जण तर शुक्रवार किंवा शनिवार कधी येतो याचीच आठवडाभर वाट पाहत असतात. वय वाढेल तसे तुमचे कामाचे दिवस कमी झाले तर किती मज्जा येईल ना? ऐकायला बरी वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात झाली तर…आता तुम्ही म्हणाल असे कसे शक्य आहे? पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ४० वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांनी आठवड्यातील तीनच दिवस काम करावे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इन्स्टीट्यूटमधील तज्ज्ञांनी याबाबत अभ्यास केला आहे. ४० वर्षाच्या वरील लोक आठवड्यातील ३ दिवस काम केले तरच सर्वोत्तम कामगिरी करु शकतात.

या अभ्यासासाठी ४० वर्षावरील ३५०० महिला आणि ३००० पुरुष यांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासकांनी यामध्ये सहभागी झालेल्यांच्या अॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग, मेमरी, एक्सिक्युटीव्ह रिझनिंग यांसारख्या गोष्टींच्या चाचण्या घेतल्या. तसेच या अभ्यासकांनी सहभागींची आकलनविषयक कामगिरीचीही तपासणी केली. या लोकांनी आठवड्यातील २५ तास काम केल्यावर त्यांची कामगिरी ५५ तास काम केल्यावर असणाऱ्या कामगिरीपेक्षा अतिशय चांगली होती असा निर्ष्कर्षही यातून निघाला. यातील एका वरिष्ठ अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार, तुमची बौद्धिक क्षमता ही तुम्ही किती वेळ काम करता यावर अवलंबून असते. जास्त ताण आणि थकवा आल्यास शरीर आणि बुद्धी एका मर्यादेपलिकडे तितकी चांगली कामगिरी करु शकत नाही.

कामाचे तास हे थेट तुमच्या कार्यक्षमतेशी निगडीत असल्याने वयाने मोठ्या व्यक्तींची कार्यक्षमता जास्त तास काम केल्यास कमी होत जाते. आठवड्याला ३० तासांहून जास्त काम करण्याचा मध्यमवयीनांच्या मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामध्ये तुमच्या कामाचे स्वरुपही तुमची कार्यक्षमता ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असेही या अभ्यासकांनी नोंदवले आहे. मात्र सरकारच्या म्हणण्यानुसार वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत कार्यरत राहणे हे नक्कीच फायदेशीर नसते. त्याचबरोबर तुम्हाला आवडणारे काम करणे आणि पुरेशा सुट्ट्या घेणे आवश्यक असल्याचे मतही या अभ्यासात नोंदविण्यात आले आहे.

सध्याचे दिवस म्हणजे वैशाख वणव्याचे दिवस. या काळात शरीराची किंवा त्वचेची कितीही काळजी घेतली तरी अनेक समस्यांना सामोरे जावेच लागते. खरे पाहता सध्याच्या घडीला झाडांची संख्या कमी झाली असून वाहनांची, इमारतींची संख्या वाढली आहे. त्यातच वाहनांमुळे होणा-या प्रदूषणामुळे माणसाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकतर उन्हाची तीव्रता आणि त्यातच वायू प्रदूषण या सा-याचा परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसून येतो. यामध्येच आता शाळांना सुट्टी लागल्यामुळे लहान मुलेही सतत उन्हामध्ये खेळताना दिसून येतात. लहान मुलांना आपण खेळण्यापासून अडवू शकत नाही. मात्र त्यांच्या आहारात काही ठराविक बदल करुन त्यांना होणा-या आजारापासून वाचवू शकतो.

बाह्य परिस्थितीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. या बाह्यपरिस्थितीशी लढा देण्यासाठी आपल्याला शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. जर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण कोणत्याही ऋतूशी सामना करण्यासाठी तयार राहू शकतो. मुख्यत: उन्हाळ्यामध्ये शरारातील पाण्याची पातळी खालावलेली असते. ही पातळी भरुन काढण्यासाठी आहारात काही पेयांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यातही असे काही पेयपदार्थ आहेत जे रोगप्रतिकारशक्ती वाढवून होणा-या आजारांपासून आपले संरक्षण करु शकते.

१. जिंजर लेमन टी : जिंजर लेमन टी हा एकप्रकारे अँटीऑक्सि़डंटचे काम करतो. यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे शराराला तरतरी येऊ काम करण्याचा उत्साह वाढवितो. जिंजर लेमन टी दररोज एक कप प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.

२. वॉटरमेलन अॅण्ड मिंट स्मुदी : कलिंगडाचे काही तुकडे आणि पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये बारीक करुन हा ज्युस तयार केला जातो. कलिंगडामध्ये पाण्याची क्षमता जास्त असून पुदिन्याची पाने शरीराला थंडावा देण्याचे काम करतात. हा ज्युस चवीबरोबरच आरोग्यासाठीही लाभदायक असतो.
३. आरेंज ज्युस : आंबट-गोड अशी संत्री चवीबरोबरच आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी पुरवत असतात. सध्या उन्हाळा असल्यामुळे बाजारपेठेमध्ये सर्वत्र संत्री दिसून येतात. काही हॉटेलमध्ये वैगरे तर संत्र्यांपासून नवनवीन पदार्थ देखील उपलब्ध असतात. मात्र उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असल्यामुळे शरीराची झीज भरुन काढण्यासाठी ऑरेंज ज्युस महत्वाचे कार्य करते. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेड व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातील रक्ताला क्षारमय करते. त्याचा चांगलाच फायदा होतो.

४. हनी अॅण्ड वॉटर : मध हा शरीरासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. बाह्य त्वचेच्या रक्षणाबरोबरच मध शरीराच्या अंतर्गत स्वच्छता करण्याचेही काम करतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मध फायदेशीर ठरत असून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचे कामही मध करते. यासाठी गरम पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून प्यायल्यास शरीरातील चरबी कमी होते.

५. ग्रीन टी : ग्रीन टी मध्ये सर्वात जास्त अॅटीक्सिडंटस असतात. चहाची ही लहान लहान पाने शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणण्याचे काम करतात. तसेच ग्रीन टी थायरॉईडसारख्या आजारांनाही आपल्यापासून दूर ठेवतो.

म्हणून उन्हाळ्यामध्ये शरीराला उर्जा देण्याबरोबरच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर या पेयांचा समावेश दिवसातून एकदा आपल्या आहारात समावेश करायला हवा. तसेच उन्हाळ्याव्यतिरिक्तही अन्य ऋतूमध्ये या पेयांचे सेवन केल्यास शरीराला फायदाच होणार आहे.

एडिबल फ्लावर्स म्हणजे ज्या फुलांचे आपण सेवन करू शकतो. एडिबल फुलांना कच्चे किंवा शिजवून कुठल्याही प्रकारे सॉस किंवा डिश सोबत खाऊ शकतो.
गुलाब
गुलाबाची सर्वच प्रजाती खाण्यायोग्य असते. याच्या पानांचा प्रयोग सलाड, आइसक्रीम आइसक्रीम , मिठाई, गुलाब-जल, जॅम-जेली, सरबत किंवा जेवणात गार्निशिंग करण्यात केला जातो.

मेरी गोल्ड
याला कॅडेंडुलासुद्धा म्हणतात. गोल्डन-ऑरेंज रंगाचे पान असलेले ह्या फुलांची चव चटपटी , थोडी तिखट आणि केसर प्रमाणे असते. याला तुम्ही सूप, पास्ता, भाताच्या डिशेज, सलाड इत्यादीच्या गार्निशिंगसाठी प्रयोग करू शकता.

जेस्मीन (मोगरा)
याचा पारंपरिक उपयोग चहाला सुंगधित करण्यासाठी व इत्र इत्यादीत केला जातो.

चमेली
चवीला गोड असणारे हे फूल दिसायला फारच सुंदर असतात. याचा प्रयोग शॅपेन, चॉकलेट, केक, कस्टर्ड, सरबत आणि जेली इत्यादीत केला जातो.

गुलदाउदी
लाल, पिवळे, सफेद आणि नारंगी रंगांच्या या फुलांचा प्रयोग सलाड आणि सिरक्यात फ्लेवर वाढवण्यासाठी केला जातो.

एडिबल फुलांचा प्रयोग करताना खाली दिलेल्या गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे-

कुठल्याही फुलांचा जेवणात तेव्हाच वापर करावा जेव्हा तुम्हाला याबद्दल पूर्ण खात्री झाली असेल की ते फुलं वापरायला काहीच हरकत नाही आहे.

भोजनामध्ये प्रयोग करण्यासाठी फुलांना अशा कुठल्याही दुकानातून खरेदी नाही करावी जेथे कीटनाशक औषधांचा वापर केला गेला असेल.

जर फुलांचे सेवन पहिल्यांदाच करत असाल तर एकाच प्रकारचे फुल घ्यावे, कारण जास्त प्रकारचे फुलं घेतले तर त्याचा परिणाम तुमच्या पचन क्रियेवर होतो.

गुलाब, ट्यूलिप, इंग्लिश डेजी, मेरी गोल्ड इत्यादी फुलांच्या पानांचा पांढरा भाग कडवट असतो, म्हणून प्रयोग करण्या अगोदर त्याला काढून द्यावे.

आंबा, फणस, काजू, खरबूज, कलिंगड बरोबरच या काळात रानमेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. वर्षांतून एकदा मिळणाऱ्या या फळांचं उन्हाळ्यात आवर्जून सेवन करावं. ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे फळ आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. करवंद ही नैसर्गिकरीत्या जंगलात वाढलेली असतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात म्हणूनच ती वेगवेगळ्या विकारांवर गुणकारी मानली जातात.

करवंदामध्ये असणारे औषधी गुणधर्म
– करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो.
– करवंद हा रानमेवा आहे, तो नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेला असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच. जर रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
– करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
– करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.
– उन्हाचा त्रास होत असेल यामुळे, शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.
– करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
– अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
– आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तर करवंदाचे सरबत थोड्याथोड्या अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.
– करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
– करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असते.

Dr. Hema Chandrashekhar
Dr. Hema Chandrashekhar
BAMS, Ayurveda Family Physician, 28 yrs, Pune
Dr. Dr.Monica Rathod
Dr. Dr.Monica Rathod
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, Thane
Dr. Vinod Shingade
Dr. Vinod Shingade
BHMS, General Physician Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Surbhi Agrawal
Dr. Surbhi Agrawal
Specialist, Diabetologist General Physician, 8 yrs, Nagpur
Hellodox
x