Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

आजकाल तणावग्रस्त आणि धकाधकीच्या होत चाललेल्या लाईफस्टाईलमुळे अनेक आजारांचा धोका बळावला आहे. तरूण मुली आणि स्त्रियांमध्ये वाढणारा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा त्रासही बळावत चालला आहे. या त्रासामुळे केवळ स्त्रियांचे आरोग्य धोक्यात आलेले नाही मात्र सोबतीने बाळाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.

पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम असणार्‍या स्त्रियांच्या बाळांमध्ये ऑटिझम बळावण्याचा धोका अधिक असतो. एका अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, पॉलिसिस्टिक ऑवरी सिंड्रोम हा टेस्टोस्टेरोनच्या वाढलेल्या पातळीमुळे होणारा आजार आहे.

पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोमचा आरोग्यावर होणारा परिणाम
पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोममध्ये सुरूवातीच्या काळात मासिकपाळीत अनियमितता वाढते. अंगावर अनावश्यक केस वाढतात. काही अभ्यासानुसार, ऑटिस्टिक मुलांमध्ये टेस्टोस्टेरोन सोबत सेक्स स्टिरॉईडच्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं.


काय आहे संशोधकांचा दावा
आईच्या शरीरामध्ये हार्मोन्सचं प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅब्रिजच्या अ‍ॅन्ड्रियाना चेरस्कोवने दिलेल्या माहितीनुसार, ऑटिझम हा केवळ जीन्समध्ये संतुलन बिघडल्याने नव्हे तर टेस्टोस्टेरोन सारख्या सेक्स हार्मोनचं संतुलन बिघडल्यानेही होऊ शकतो. संशोधकांनी याकरिता पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोमग्रस्त 8588 महिलांवर अभ्यास केला. हा अहवाल 'ट्रांसलेशनल सायक्रियाट्री'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम असणार्‍या महिलांच्या बाळांमध्ये ऑटिझम बळावण्याची शक्यता अधिक असते असे काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टद्वारा जाहीर करण्यात आले होते. नव्या जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, भारतामध्ये दर पाच पैकी एका महिलेत पीसीओएसचा त्रास बळावल्याचे दिसून आले आहे.

पीसीओएसचा त्रास हा केवळ महिलांच्या मासिकपाळीच्या समस्येपुरता मर्यादीत नाही. मासिकपाळीसोबतच स्त्रियांमध्ये या आजारातून इतरही समस्या वाढण्याचा धोका अधिक आहे.

कोणकोणत्या आजारांचा धोका बळावतोय ?
पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (पीसीओएस) ही एक सार्वजनिक स्वास्थ्य समस्या आहे. त्यामुळे त्याचे वेळीच निदान आणि उपचार होणं गरजेचे आहे. यामधून महिलांमध्ये उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रेरॉलची पातळी वाढणं, नैराश्य वाढणं, स्लिप अ‍ॅप्निया, हृद्यविकार, मधुमेह, एंडोमेट्रियल, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत आहे.


पीसीओएसचा त्रास असणार्‍यांमध्ये इंसुलिनची पातळी आणि कार्य बिघडण्यासही कारणीभूत ठरत आहे. यामधून वजन वाढणं, वंध्यत्त्व, चेहर्‍यावर अ‍ॅक्ने वाढणं, अनावश्यक केस वाढणं, डोकेदुखी, मूड स्विंग, झोपेचे विकार बळावतात.

आहारत करा बदल
महिलांचा आहारात ब्रोकोली, फ्लॉवर, पालक यासरखे फायबरचं प्रमाण अधिक असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. बदाम, अक्रोड, ओमेगा आणि फॅटी अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचा समावेश करा.

दोन वेळेस भरपूर खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने पाच वेळेस खाण्याची सवय लावा. यामुळे मेटॅबॉलिझमचं कार्य उत्तम राहते. नियमित अर्धा तास व्यायाम करा.

धुम्रपान, मद्यपानासारख्या व्यसनांपासून दूर रहा.

Dr. Sheetal Jadhav
Dr. Sheetal Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, Pune
Dr. Pujitha Chowdary
Dr. Pujitha Chowdary
MD - Allopathy, General Medicine Physician Diabetologist, 6 yrs, Chennai
Dr. Zainab Shaikh
Dr. Zainab Shaikh
BAMS, Ayurveda, 2 yrs, Pune
Dr. Harshada Giri
Dr. Harshada Giri
BDS, Dental Surgeon, 13 yrs, Pune
Dr. Amruta Kolte (Chaudhary)
Dr. Amruta Kolte (Chaudhary)
BDS, Dental Surgeon, 5 yrs, Pune
Hellodox
x