Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.



ओटीटीस मीडिया -

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपली जीवनशैली अलीकडच्या काळात आमूलाग्र बदलली आहे. ध्वनिप्रदूषण वाढल्यामुळे कानाचे आरोग्य बिघडू लागले आहे. जगात तब्बल ३६० दशलक्ष लोक कानाच्या कुठल्या ना कुठल्या तरी समस्येने ग्रस्त आहेत. थोडक्यात ५.३ टक्के लोकसंख्येला कानाच्या समस्या आहेत. मात्र, या समस्या टाळणे किंवा यावर प्रतिबंध करणे शक्य आहे. म्हणून कानाच्या समस्या व जोखमीच्या घटकांवर लक्ष देणे गरजेचे आहे.

वयाशी निगडित ऐकण्याच्या समस्या या पन्नाशीनंतर काही अंशी सुरू होतात. यावर हिअरींग एड उपकरणे उपयुक्त ठरतात. मात्र, बरीच लोक याचा वापर करत नाहीत आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाशी किंवा स्नेहींशी संवाद साधताना याचा परिणाम होतो. ऐकण्याच्या समस्या या कधी-कधी अनुवंशिकदेखील असू शकतात आणि याचे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार होऊ शकतात.

कानाच्या समस्या उद्धभवण्यास कारणीभूत घटक -
गरोदरपणामध्ये होणारा संसर्ग, सतत नाकात-घशात होणारा संसर्ग, कान साफ करण्याकरिता विविध वस्तूंच्या वापराने होणा‍ऱ्या जखमा, कानात होणारा संसर्ग, मेंदूला झालेली दुखापत, खोलवर समुद्रात (डीप सी डायव्हिंग) उडी मारल्याने कानातील दाबामध्ये आलेले अचानक बदल, विविध वैद्यकीय स्थिती जसे मधुमेह, व्हायरल इन्फेक्शन, मूत्रपिंडाच्या समस्या, थायरॉईड, टीबी व ध्वनी प्रदूषण हे जोखमीचे घटक आहेत. उपचार पद्धती व शस्त्रक्रियांमध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणांमुळे अनेक समस्यांवर मात करता येते.

आपले कान हे नाकाच्या मागील भागास जोडलेले असतात आणि त्यामुळे कानाला होणाऱ्या समस्यांचा प्रभाव नाकावर देखील पडू शकतो. विविध परिस्थितींचा कानाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

ओटीटीस मीडिया -
भारतात सर्वसामान्यपणे कानाच्या बाबतीत आढळणारी समस्या म्हणजे ओटीटीस मीडिया हा एक प्रकारचा संसर्ग असतो. याची सुरुवात नाक व घशाच्या संसर्गाने होते. यामुळे कानाच्या पडद्यात खड्डा पडून त्याला निकामी करतात. याच्यावर उपचार केले नाहीत, तर प्राणघातक ठरू शकते. मात्र, औषध किंवा गरज भासल्यास शस्त्रक्रियेद्वारे या समस्येवर पूर्णपणे मात करता येते.

लहान मुलांच्या कानाच्या समस्या -
बऱ्याच वेळा मुले ५ ते ६ वर्षांची होऊपर्यंत या समस्या लक्षात येत नाहीत आणि त्यानंतर जरी लक्षात आल्या तरी मुलांच्या बोलण्यावर परिणाम होऊ शकतो. कारण, ऐकण्याचा आणि बोलण्याचा थेट संबंध असतो. व्यवस्थित ऐकू येत असले तरच बोलण्याचा विकास होऊ शकतो. बरेचशा हॉस्पिटलमध्ये आता नवजात शिशुंसाठी हिअरींग स्क्रीनिंग चाचण्या (ओएई) असतात. त्याद्वारे बाळ अगदी २ ते ३ दिवसांचे असतानाच ऐकण्याच्या बाबतीत समस्या असेल, तर कळू शकते. पालकांनी आपली मुले आवाजाला कसा प्रतिसाद देतात, याकडे नीट लक्ष द्यावे. आवाजानंतर त्या दिशेने पाहतात की नाही, याकडे लक्ष द्यावे.

ध्वनिशंखदाह
मध्यकर्णाच्या आजाराने (सूज-पू- दाहाने) कधीकधी अंतर्कर्णात आजार शिरून ध्वनिशंखाला जंतुदोष होतो व सूज येते.

लक्षणे
अंतर्कर्णाला सूज असेल तर चक्कर आणि मधूनमधून उलटया ही मुख्य लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब कान विशेषज्ञकडे पाठवणे आवश्यक आहे.

अंतर्कर्णाच्या अनेक प्रकारच्या आजारांत चक्कर येणे, उलटया होणे, कानात सूक्ष्म गुणगुण होत राहणे, इत्यादी त्रास होतो. अशा आजारात बहिरेपणा असेलच असे नाही. ही लक्षणे दिसली तर रुग्णास तज्ज्ञाकडे पाठवून द्या.

मध्यकर्णाचे आजार
मध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कानदुखी व कानसूज. हा आजार पुष्कळ आढळतो.

आकस्मिक कान सुजणे – कारणे
मध्यकर्णसूज हा आजार बहुतेकदा कान-नाक-घसा नळीतून (कानाघ नळी) येणा-या दूषित स्त्रावामुळे होतो. सर्दीपडसे किंवा घसादुखी यानंतर दोन-चार दिवसांनी कान दुखायला लागणे हे या आजाराचे नेहमीचे चित्र आहे. (मात्र दर वेळेस सर्दीपडशानंतर कान सुजतोच असे नाही). लहान वयात कानाघ नळी जास्त सरळ व कमी लांबीची असते. त्यामुळे मुलांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात येतात. मध्यकर्णाचा जंतुदोष बहुधा ‘पू’ निर्माण करणा-या जंतूंमुळे होतो. सुरुवातीस कान गच्च होणे, जड होणे, मंद दुखणे, त्यानंतर ठणकणे, पडदा फुटून पू येणे व ठणका बंद होणे या क्रमाने हा आजार चालतो.

लक्षणे
काही वेळा ठणका लागून पडदा फुटण्याची पाळी न येता आपोआपही हा आजार थांबतो. कान फुटल्यावर चार-पाच दिवस पू वाहून कान कोरडा होतो. यानंतर कानाचा पडदा पूर्वीसारखा भरून येईपर्यंत 2-3 आठवडे त्या कानाने कमी ऐकू येते. लवकर बरा न झाल्यास कानात सूज व पू कायम राहतात. याने कान खराब होतो. लहान बालकांमध्ये या आजारात ताप, उलटया व कधीकधी जुलाब होतात. कान दुखल्याने मूल कानाकडे हात नेते.

उपचार
काही वेळा कानदुखी ही विषाणूंमुळे येते. पण ती वेगळी ओळखता येत नाही, म्हणून
- 5 दिवस कोझाल व मेझोल जंतुविरोधी गोळया द्याव्यात.
- ऍस्पिरिन किंवा पॅमाल द्या.
- दिवसातून 4-5 वेळा कानात जंतुनाशक थेंब टाका.
- कोरडया स्वच्छ कापसाने कानातला पू दर दोन-तीन तासांनी टिपून घेण्यास नातेवाईकांना शिकवा. कापसाचा बोळा ठेवून तो भिजला की काढून नवा बसवणे हा सोपा मार्ग आहे. नळीने पू शोषून घेता आले तर जास्त चांगले. यासाठी सलाईनच्या नळीचा टोकाचा भाग कापून वापर करता येईल.
- चार-पाच दिवसांत पाणी/पू येणे न थांबल्यास किंवा दुखणे कायम राहिल्यास किंवा मेंदूसुजेची चिन्हे दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा.

होमिओपथी निवड
आर्सेनिकम, बेलाडोना,चामोमिला, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

Dr. Ashwini Hirekar
Dr. Ashwini Hirekar
BHMS, Homeopath Family Physician, 4 yrs, Mumbai Suburban
Dr. Amit Gupte
Dr. Amit Gupte
BDS, Dentist, 18 yrs, Pune
Dr. Snehal Deshmukh
Dr. Snehal Deshmukh
BDS, Dentist, 3 yrs, Pune
Dr. Surbhi Agrawal
Dr. Surbhi Agrawal
Specialist, Diabetologist General Physician, 8 yrs, Nagpur
Dr. Pavan Prakash Pargaonkar
Dr. Pavan Prakash Pargaonkar
BHMS, Family Physician, 6 yrs, Pune
Hellodox
x