Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.



अनेक तरुण आणि किशोरवयीन मुले स्नायू मजबूत करण्याच्या प्रयत्नात असतात. केवळ तरुणपणीच नव्हे तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्नायू मजबूत राहिले पाहिजेत. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आपण बचाव करू शकतो. यासाठी काय करावे लागेल?वयानुसार स्नायू कमजोर होणे अगदी नैसर्गिक आहे, पण आपल्या रोजच्या कामांमध्ये स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. धावपळीच्या आयुष्यात खरे पाहता आरोग्याकडे, शरीराकडे लक्ष दिले जात नाही, शिवाय जीवनशैलीतील बदल, आहारातील बदल, जंक फूडचे वाढलेले प्रमाण, अपुरी झोप, व्यायाम न करणे किंवा अतिव्यग्र आयुष्य जगणे या सर्वांचा परिणाम स्नायू कमजोर होतात. आपल्या आरोग्यासाठी मजबूत स्नायूंचे काय महत्त्व आहे आणि वेळेआधी ते कमजोर होऊ नयेत यासाठी काय प्रयत्न करायला हवे.

तंदुरुस्त स्नायू कशासाठी?
स्नायू आपल्या शरीराची महत्त्वपूर्ण संरचना आहे. त्याच्या शिवाय व्यक्‍ती उभे राहू शकत नाही की बसू शकत नाही. त्यामुळे स्नायूंची योग्य देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे. स्नायू कमजोर झाल्यास थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. कमजोर स्नायूंमुळे काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

स्नायूंमध्ये वेदना होणे
* संवेदना जाणे आणि अचानक सुन्‍नपणा येणे.
* पाय हलवण्यात समस्या निर्माण होणे, चालणे, उभे राहणे किंवा सरळ बसणे हे त्रासदायक होणे.
* चेहर्‍यावर कोणताही भाव न येणे.
* अत्याधिक थकवा.
* बोलण्याची समस्या, भ्रम निर्माण होणे आणि गोष्टी समजून घेण्यात अडचणी येणे.
* छातीचे स्नायू कमजोर झाले तर श्‍वसनास त्रास होतो आणि व्यक्‍ती बेशुद्धही पडू शकतो.

स्नायू दुबळे होण्याची कारणे-
* स्नायू दुबळे होण्याची अनेक कारणे आहेत. गंभीर आजारांपासून ते खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळेही स्नायू दुबळे होतात.
* एडिसन रोग, हायपर थायरॉईडिझम, क्रॉनिक फटिग सिन्ड्रोम, थायरोटॉक्सिकोसिस (हा आजार विशेषतः महिलांमध्ये होणारी डिसऑर्डर आहे ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी अचानक सक्रिय होतात.)
* सेलेब्रल पाल्सी, मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रो सारखे आजार स्नायू दुबळे होण्यास कारणीभूत असतात.
* स्नायू दुबळे होणे, सुरकुतणे, स्नायू सुजणे.
* शरीरात सोडियम किंवा पोटॅशिअमची पातळी कमी होणे.
* क्लॉस्ट्रिडियम बोटुलिज्म बॅक्टेरियामुळे होणारी अन्‍न विषबाधा.
* पोस्ट पोलियो सिंड्रोम.
* अ‍ॅनिमिया.
* खूप अधिक काळ झोपून रहाणे.

मजबूत स्नायूंसाठी-
शरीरातील स्नायू दीर्घकाळ मजबूत रहावे यासाठी काही गोष्टी अमलात आणाव्या लागतील.

* पोषक आहार-
स्नायूंचे आरोग्यावर प्रामुख्याने परिणाम होतो तो आहाराचा. संतुलित आणि पोषक आहाराचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून स्नायूंचे पोषण योग्य वेळी झाले नाही तर स्नायू दुबळे किंवा अशक्‍त होतात. ज्या आहारात उष्मांकाचे प्रमाण अधिक असते त्याने चरबी जास्त प्रमाणात साठते. त्यामुळे स्नायू कमजोर होतात.

* व्यायाम : आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम झाला पाहिजे. नियमित व्यायाम केल्यास स्नायू संकुचित होत नाहीत. व्यायाम केल्यास रक्‍ताभिसरणातही सुधारणा होते आणि स्नायूंना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे स्नायू मजबूत आणि चांगले होतात. नियमित व्यायाम केल्याने स्नायूंवर वयाचा परिणाम कमी प्रमाणात होतो.

* पाणी : स्नायूंचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची गरज पडते. प्रतिदिवस कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यावे. काय टाळावे?स्नायूंचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही गोष्टींपासून दूर रहावे लागेल. त्यामुळे स्नायू दुबळे होऊ शकतात आणि आरोग्य बिघडू शकते.

* धूम्रपान आणि दारू : धूम्रपान ऑक्सिजन स्नायूंपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो. त्यामुळे स्नायूंना इजा होते. ज्या लोकांना धूम्रपानाची सवय नसते त्यांच्या स्नायूंची ठेवण धूम्रपान करणार्‍या व्यक्‍तींपेक्षा चांगली असते. नियमितपणे अत्याधिक प्रमाणात मद्यपान करणार्‍या व्यक्‍तींमध्ये वय वाढते तसे स्नायू कमजोर होतात.

* कॅफिन : थोड्या प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्यास प्रथिनांच्या सिन्थेसिस चा वेग कमी होतो. त्यामुळे स्नायूंच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. कॅफिनचे अत्याधिक प्रमाण लोहाच्या अवशोषणात अडथळा आणते. त्यामुळे अशक्‍तपणा किंवा अ‍ॅनिमिया होतो. त्यामुळे थकवा आणि स्नायूंचा अशक्‍तपणा जाणवतो.

* अनिद्रा : स्नायूंचे आरोग्य चांगले रहावे म्हणून 6-8 तासांची झोप आवश्यक आहे. झोपेमध्ये ऊर्जेचा वापर कमी होतो त्यामुळे दिवसभरात जे पोषक घटक आपण सेवन केलेले असतात त्यांचा वापर रात्री स्नायूंच्या निर्मितीसाठी होतो. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा स्नायू पुन्हा पूर्ववत होत असतात, त्यांची दुरुस्ती होते तसे पुनर्बांधणीही होत असते. झोपेची कमतरता असल्यास स्नायूंचे नुकसान भरून येत नाही.

* अतिक्रियाशीलता : आपल्याला तंदुरुस्त राखण्यासाठी शारीरिक सक्रियता सर्वात महत्त्वाची असते, पण तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ सक्रियता नाही तर तेवढ्याच प्रमाणात आरामाचीही गरज असते. अति व्यायाम, अति श्रम केल्यास स्नायू मजबूत होण्याऐवजी कमजोर होऊ शकतात.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



रस्त्यावरून चालताना किंवा घरी बसलो असताना अचानक हात किंवा पायांमध्ये वेदना जाणवते. म्हणजेच हात किंवा पायात अचाक क्रॅम्प येतात. काही व्यक्तींना झोपेत देखील ही समस्या जाणवू शकते. जेव्हा आपल्या शरीरातील एखाद्या अवयवातील स्नायू अचानकपणे ताणले जातात त्यावेळी त्या व्यक्तीला क्रॅप्म येण्याची समस्या उद्भवते.

जाणून घ्या क्रॅम्प येण्याची कारणं
1) पुरेसं पाणी न पिणं.

2) अनेकदा क्रॅप्म येण्याचं कारण हे डिहायड्रेशन देखील असू शकतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला क्रॅम्प येईल त्यावेळी तुम्ही किती वेळापूर्वी पाणी प्यायला होता हे आठवा. यामध्ये जाणवणारी अजून काही लक्षणं म्हणजे थकवा, डोकेदुखी किंवा बद्धकोष्ठता. त्यामुळे दिवसभरात पाणी पित रहा.

3) शरीराचं तापमान वाढणे.

4) व्यायाम किंवा धावून आल्यानंतर शरीराचं तापमान वाढतं आणि यामध्ये शरीरातील पाणी निघून जातं. अशावेळी तुमच्या शरीराती स्नायूंना पाण्याची गरज असते.

काही औषधं
- शरीरातील कोलेस्ट्रल नियंत्रणात ठेवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्टॅटीन्स आणि ड्युरेटीक्स या औषधांमुळे क्रॅम्प येण्याची शक्यता असते. मुळात या औषधांमुळे शरीरातील पाणी निघून जातं. त्यामुळे जर तुम्ही ही औषधं घेत असाल आणि तुम्हाला क्रॅम्प येण्याची समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांना दाखवूून त्यांचा सल्ला घ्या.

रक्तप्रवाह सुरळीत नसल्यास: जर तुम्हाला चालताना क्रॅम्प येत असतील तर तुमच्या स्नायूंना पुरेश्या प्रमाणात रक्तप्रवाह होत नाही. अशी समस्या वयस्कर व्यक्ती किंवा ज्या व्यक्ती जास्त हालचाल करत नाही त्यांच्यामध्ये जाणवते.

मासिक पाळी :काही महिलांना मासिक पाळीदरम्यान क्रॅम्प येण्याची तक्रार उद्भवते. याला कारण म्हणजे मासिक पाळी दरम्यान महिलांच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारच्या हार्मोनची निर्मिती होते. या हार्मोन्समुळे गर्भाशयाचे स्नायू ताणले जातात आणि क्रॅम्प येतात.

व्यायाम : व्यायाम कऱणं किंवा शारीरिक हालचाल करणं हे फार चांगलं आहे. मात्र जर तुम्ही एकाच वेळी अतिप्रमाणात धावलात किंवा व्यायाम केलात तर ते तुमच्या शरीराला झेपण्यासारखं नसतं. परिणामी तुम्हाला क्रॅम्प येतात. जर तुम्ही नियमितपणे व्यायाम केलात तर तुम्हाला हा त्रास होणार नाही.

Published  
Dr.
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda Ayurveda Panchakarma 10 Years Experience, Pune
Consult

‘’स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम् च’’ या आयुर्वेदाच्या ध्येय प्राप्तीसाठी आपण ऋतुचर्येचे पालन करतो आणि म्हणुनच प्रत्येक सण हा आपण तद्तद् ऋतुचर्येचे द्योतक समजुनच साजरा करतो. हेमंत व शिशिर ऋतुत येणारी रुक्षता हि स्नेह गुणाने दुर करण्यासाठी संक्रांतीच्या सणास आपण स्नेहयुक्त तिळगुळ वाटुन एकमेकांत स्नेहभावाची देवाणघेवाण करतो.
या शीत ऋतुतील रुक्षता कमी करण्यासाठी स्नेहन (औषधीयुक्त तैलाने मालिश) स्वेदन (स्टीम बाथ) करावयास हवे. त्वचा (स्पर्शेंद्रीय) हा शरीरीतील सर्वांत मोठा अवयव असुन या ठिकाणी वायु (वातदोष) अधिक असतो. तेल वातनाशक असल्याने स्नेहन हितकारी ठरते . तसेच स्नेहन-स्वेदनाचे अनेक फायदे आहेत जसे, वर्ण-कांति उजळणे, जठराग्नी वर्धन, निद्रा प्राकृत होणे, मानसिक ताण कमी होणे, उत्साहवर्धन तारुण्य टिकवणे..
चला तर मग ऋतुचर्येचे नियम पाळुय़ात...
स्नेहभावने आरोग्याचे वाण स्विकारु या.....

Dr. Devyani S. Ahire
Dr. Devyani S. Ahire
BDS, Dentist, 4 yrs, Pune
Dr. Vivek  Sahu
Dr. Vivek Sahu
MD - Homeopathy, 17 yrs, Pune
Dr. Pooja Hemnani
Dr. Pooja Hemnani
MPTh, Cardiovascular And Pulmonary Physiotherapist Neuro Physiotherapist, 1 yrs, Pune
Dr. Supriya Jagtap
Dr. Supriya Jagtap
BHMS, Family Physician Homeopath, Pune
Dr. Akash Kadam
Dr. Akash Kadam
BDS, Dentist Oral Medicine Specialist, 4 yrs, Pune
Hellodox
x