Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

अनेक महिलांना मासिकपाळीचा त्रास नकोसा वाटतो. या दिवसांमध्ये होणारा पोटदुखीचा त्रास, पोटात क्रॅम्स येणं याच्या सोबतीने अ‍ॅक्ने, पीएमएस आणि होणारा इतर त्रासही डोकेदुखी वाढवणारा असतो. बदलती लाईफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या विचित्र वेळा, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, तणावग्रस्त जीवनशैली यामुळे आरोग्यावर आणि मासिकपाळीवरही परिणाम होतो.
मासिकपाळीच्या दिवसात होणारा त्रास लक्षात घेता पूर्वीच्या काळी स्त्रियांना सक्तीचा आराम देणं शक्य होते. मात्र आजकाल करियर, काम आणि अभ्यास अशा अनेक गोष्टींवर कसरत करत पुढे जावं लागतं. त्यामुळे मासिकपाळीच्या दिवसातही अनेकींना काम करावच लागतं. मग अनियमित मासिकपाळी सुरळीत करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी आहारात फक्त हा बदल करून पाहण्याचा सल्ला सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिल्या आहेत.

वेदनारहित मासिकपाळीच्या दिवसांसाठी खास डाएट टीप्स
1.नाचणीचा आहारात नियमित समावेश करावा. डोसा, भाकरी, खीर अशा विविध स्वरूपात नाचणी आहारात समाविष्ट करता येऊ शकते. नाचणीमुळे क्रम्प्स कमी होणं, मासिकपाळीच्या दिवसात अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठी नाचणी फायदेशीर ठरते.

2. खोबरं, तूप, गूळ, आळीब यांचा आहारात समावेश केल्यानेही मासिकपाळीच्या दिवसातील त्रास कमी होतो. चेहर्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठीदेखील मदत होते. मासिकपाळीपूर्वी चेहर्‍यावर अ‍ॅकनेचं प्रमाण वाढण्यामागे त्वचेवरील अतिप्रमाणातील तेल हे एक कारण आहे.


3. कच्च केळं, सुरण, डाळी यांचा आहारात समावेश केल्याने पीएमएस आणि मासिकपाळीतील मायग्रेनचा त्रासही कमी होतो. पाळीनंतर स्पॉटींग होण्याचा त्रास असल्यास तो आटोक्यात राहण्यास मदत होते.

4. व्यायामदेखील मासिकपाळीतील त्रास कमी करण्यास, मूड हलका करण्यास मदत करतो. व्यायाम किंवा फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीमुळे शरीरात रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. मसल्स टोन सुधारण्यासाठी, हाडांची डेन्सिटी सुधारण्यासाठी वेट ट्रेनिंग मदत करते. वेळेआधीच मेनोपॉज आरोग्याला धोकादायक ! 'या' 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नको

5. सुप्तबद्धकोनासन या योगासनामुळे मासिकपाळीत अतिरक्तस्त्राव होणं, वेदना यांचा त्रास कमी करण्यास मदत करते. प्रसुती सुलभ होण्यासाठीदेखील या योगासनाचा फायदा होऊ शकतो.

6. कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंट यांचा आहारात समावेश करा. मासिकपाळीच्या दिवसातील क्रॅम्प्स, डॉकेदुखी, पाठीचं, कंबरेचं दुखणं कमी करण्यासाठी मदत होते.

महिलांच्या आरोग्यासाठी मासिकपाळी ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. मासिपाळीचे दिवस त्रासदायक असले तरीही ती वयाच्या विशिष्ट टप्प्यावर महिलांसाठी फार आवश्यक असते. या काळात हार्मोन्सच्या पातळीमध्ये चढउतार होतात.

महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या पातळीमध्ये बिघाड होण्यामागे आहारदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडतो. एका अभ्यासानुसार, ज्या महिलांच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं त्यांच्यामध्ये मासिकपाळी वेळेआधी येण्याची शक्यता अधिक असते.

संशोधकांचा दावा
युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स या ब्रिटनमधील एका प्रयोगात 914 महिलांवर प्रयोग करण्यात आला होता. त्यानुसार ज्या महिलांच्या आहारात मासे, बींस यांचे सेवन अधिक असते त्यांच्यामध्ये मासिकपाळी उशिरा येते.


काही तज्ञांच्या माहितीनुसार, मासिकपाळी ही केवळ आहारावर अवलंबून नसते. आहारासोबतच इतर अनेक घटकांचा मासिकपाळीवर परिणाम होत असतो.

आहार आणि मासिकपाळी
स्टडी जर्नल ऑद एपिडिमीलॉजी अ‍ॅन्ड कम्युनिटी हेल्थमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार, महिलांना त्यांच्या आहाराबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यानुसार फळदार भाज्या अधिक खाणार्‍यांमध्ये मासिकपाळी उशिरा आल्याची दिसून येते. हा उशिर सुमारे एक ते दीड वर्षांचा असू शकतो. फळांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक असल्याने मासिकपाळीमध्ये उशीर होऊ शकतो.

कार्बोहायड्रेटयुक्त आहारामुळे मुलींमध्ये एक ते दीड वर्ष आधी मासिकपाळी सुरू होते.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, आहारासोबतच महिलांचं वजन, प्रजनन क्षमता आणि एचआर्टी हार्मोन देखील मासिकपाळीवर प्रभावी ठरतात. अनुवंशिकतेचाही मासिकपाळीवर थेट परिणाम होतो.

हार्मोन्समध्ये चढउतार
माश्याच्या तेलामध्ये प्रामुख्याने ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आढळते. यामुळेही शरीरात अ‍ॅन्टिऑक्सिडंटचे प्रमाण वाढते.

शरीरात सेक्स हार्मोन्सही प्रभावित होतात. यामुळे एस्ट्रोजनची पातळी वाढते. त्यामुळे मासिकपाळी प्रभावित होते. ती वेळेआधी येण्याची शक्यता वाढते.

मासिकपाळी आणि आजाराचा धोका
संशोधकांच्या अभ्यासानुसार ज्या महिलांमध्ये मासिकपाळी वेळेच्या आधी सुरू होते अशांमध्ये हाडांचे विकार, हृद्यविकारांचा धोका बळावतो. तर मासिकपाळी उशिरा सुरू झालेल्यांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरची शक्यता अधिक बळावते.

आपण वास्तविक असू, आपण सर्व कालावधीचा द्वेष करतो; ते वेदनादायक, अनपेक्षित आणि गोंधळलेले आहेत. महिन्याच्या या काळात , भयानक दुखणे आणि असुविधाजनक ब्लोएटिंग बंद ठेवले आहेत. हे सर्व पुरेसे नसले तरी, आपल्या वडिलांनी आम्हाला ठराविक कालावधीत थंड अन्न व पेय घेण्यापासून परावृत्त करण्याचे सल्ला दिले आहे, दुर्दैवाने आपण सर्वात जास्त काय हवे आहे. पण ही सल्ला बरोबर आहे का? ठराविक अन्न आपल्या सिस्टममध्ये अडथळा आणत असल्यास, का? जुन्या चीनी अभ्यासानुसार, कालांतराने थंड पाणी पिणे आपल्या शरीराचे संतुलन खराब करते आणि परिणामी आपल्या त्वचेवर आणि आरोग्यास प्रभावित करते. चला खाली काय आहे ते पाहूया.

खरोखर मासिक धर्म अडथळे काय होतो?

गर्भाशयाच्या आणि पोटाच्या स्नायूंच्या अतिसंवेदनशक्तीमुळे मासिक पाळी बाहेर पडतात कारण मासिक पाळी बाहेर पडतात. हे स्नायू संकुचन विविध रसायनांमुळे होतात ज्यामध्ये प्रोस्टॅग्लॅंडिनचा समावेश असू शकतो, म्हणूनच आम्हाला या रसायनांच्या निर्मितीस उत्तेजन देण्यासाठी जबाबदार असलेल्या काही पदार्थ आणि पेये टाळण्यास सांगितले जाते.

हे एक सामान्य चिनी जुनी पत्न्या म्हणते, की थंड पाणी पिणे आतड्यांमधील कमी तापमानाला कारणीभूत ठरते जे आंतड्यांना आवश्यक पोषक घटकांचे अवशोषण करणे अवघड करते. शिवाय, मुरुम होऊ शकते. बर्फ क्रीम आणि थंड मिठाई सारख्या थंड पदार्थांमुळे गंभीर क्रॅम्प्समुळे स्थिती आणखी बिघडते.

गर्भाशयाच्या अतिसंवेदनशीलतेमुळे मासिक पाळी येते

हेल्थ प्रॅक्टिशनर आणि मॅक्रोबायोटिक हेल्थ कोचच्या मते, शिल्पा अरोरा म्हणाले, "आपण आपल्या काळात असाल तर, आपण थंड पाणी पिणे आणि थंड अन्न खाणे टाळावे कारण ते मासिक पाळीव जळजळ खराब करतात. अंडाशय आणि योनि भिंतींचे स्नायू ताणलेले असतात. हे स्नायू पुढे थांबू शकत नाही म्हणूनच अस्वस्थता येते. रक्त प्रवाह सहजतेने, उबदार पाणी प्यावे आणि जळजळ दूर ठेवण्यासाठी अतिशय थंड आणि साखरयुक्त पदार्थ टाळा. "

हे सर्व, एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असते. प्रत्येक स्त्रीच्या शरीराच्या वेगवेगळ्या दोषांनुसार भिन्न शरीर प्रणाली असते. बर्याचदा थंड वस्तू घेल्यानंतर बर्यापैकी ठीक वाटू शकते, परंतु काही गंभीर क्रॅम्प्सचा अनुभव घेऊ शकतात. आपले शरीर काय वापरले जाते आणि त्यानुसार कार्य कसे करावे हे आमचे सूचना आहे. तथापि, सावधगिरी बाळगणे ही एकतर दुखापत नाही. आपल्या आरोग्याला अडथळा न आणता रक्ताचा प्रवाह होऊ देण्याकरिता शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत करणारी वस्तू खा. आनंदी आणि निरोगी कालावधी सुनिश्चित करण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, काजू, संपूर्ण धान्य आणि हिरव्या चहा समाविष्ट करा.

मासिक पाळी विषयावर आपल्याकडे खुलेपणाने बोललं जात नाही. जो कोणी बोलायचा प्रयत्न करेल त्याच्याकडे साशंकतेने पाहिलं जातं. पण या वेळीच या विषयाची समज देणं गरजेचं आहे. शहरी भागात अकराव्या वर्षापासून मुलींना पिरियड्स येतात. अशावेळी दुसरीकडून चुकीची माहिती मिळण्यापेक्षा तिला योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. तुमची मुलगी वयात येत असेल तर तिच्यासोबत बोलणं गरजेचं आहे.

तिच्या प्रश्नाची उत्तर द्या

मुलगी वयात येतानाच तिच्याशी संवाद वाढवा. 'तुला मासिक पाळी येणार आहे', याची जाणीव करुन द्या. एकदा मासिक पाळी सुरू झाली की ती तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारेल. तिच्या सर्व प्रश्नांची उत्तर तिला समजेल अशा भाषेत द्या. ते शक्य नसल्यास डॉक्टरांची मदत घ्या.

सॅनेटरी नॅपकीनचा वापर

सॅनेटरी नॅपकीनचा वापर कसा करायचा याचं प्रात्यक्षिक तिला द्या. बऱ्याच लहान मुलींना पिरियड्स दरम्यान सॅनेटरी नॅपकीन योग्य पद्धतीनं लावता येतं नाही. तिला तिच्या पिरियड्सची तारीख लक्षात ठेवायला सांगा.


पिरियड्स बॅग

एका छोट्याशी बॅग किंवा पाऊचमध्ये एक सेनॅटरी नॅपकीन आणि एक्स्ट्रा अंडरवेयर ठेवून बॅग तयार करा. ही छोटी बॅग ती आपल्या शाळेच्या बागेत ठेवू शकेल. यामुळे शाळा सुरू असताना जर तिला पिरियड्स आले तरी तिला भिती वाटणार नाही किंवा चिडचिड होणार नाही. महिलांना दर महिन्याला पिरियड्स येणं साधारण बाब आहे हे तिच्या मनात ठसवणं गरजेच आहे.

माहितीचा अतिरेक नको

लहान वयात तिच्यावर खूप साऱ्या माहितीचा मारा करु नका. वयाप्रमाणे आपल्या शरीरात बदल होतात हे खरं आहे पण याची तिला भिती वाटणार नाही याचीही तेवढीच काळजी घ्यायला हवी. पोटात दुखणं, रक्तस्त्राव या गोष्टी मासिक पाळीशी जोडल्या गेल्या आहेत. पण पहिल्यांदाच सर्व एकत्र न सांगता आधी हलक्या पोटदुखी बद्दल सांगू शकता. स्वत: अनूभव घेतल्यानंतर तिला अनेक गोष्टी स्पष्ट होतील.

स्वच्छतेबद्दल माहिती

पिरियड्स दरम्यान सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट कशाप्रकारे लावली जाते?, स्वत:ची स्वच्छता कशाप्रकारे ठेवली जाते ? याची माहिती करुन द्या. स्किन रॅशेस आणि इन्फेक्शनपासून वाचण्याचे उपायही तिला सांगा.

साधारणता गर्भावस्थेत मासिक पाळी येत नाही. पाळी न येणे हे गर्भधारणेचे सूचक आहे. परंतू गर्भवती महिलेला ब्लीडिंग सुरू झाली तर सर्वात पहिली भीती मिसकॅरेजची असते परंतू काही महिलांनी गर्भावस्थेत पाळी येते आणि याने बाळाला धोका नसतो.

तज्ज्ञांप्रमाणे गर्भाशय दोन भागात असणार्‍यांसोबत हे घडू शकतं. याला बायकोर्नुएट यूट्रस असे म्हणतात. ज्यात एका भागात बाळ वाढतं आणि दुसर्‍या भागात पीरियड्स येतात.

गर्भावस्थेत ब्लीडिंग होण्याचे कारण
इम्प्लांटेशन ब्लीडिंग किंवा स्ट्रीकिंग : फर्टिलाइज अंडज गर्भाशयात आल्यावर हलका रक्तस्त्राव होऊ शकतो. या दरम्यान एक किंवा दोन दिवस केवळ स्पॉटिंग होते.


ट्यूबल प्रेग्नेंसी
: अंडज यूट्रसऐवजी फॅलोपियन ट्यूबमध्ये वाढत असल्यास त्याला ट्यूबल प्रेग्नेंसी म्हणतात आणि यात ब्लीडिंग होते.

अधिक रक्तस्त्राव
: चौथ्या, आठव्या किंवा बाराव्या आठवड्यात मासिकचक्राच्या दरम्यानच घडतं. लक्षण मासिक पाळीसारखीच असतात जसे शारीरिक वेदना, गॅस, मूड स्वींग होणे.

संबंधानंतर रक्तस्त्राव
: गर्भावस्थेत शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होऊ शकतो. हे धोकादायक नाही तरी डॉक्टरांना याबद्दल माहिती द्यावी.
मिसकॅरेज

: गर्भाला वाढवण्यात शरीर अक्षम असल्यास ब्लीडिंग होते. परंतू गर्भधारणेचे सोळा आठवडे झाले की हा धोका नसतो.

तर, गर्भावस्थेत ब्लीडिंग होत असेल किंवा स्पॉटिंग होत असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Dr. Dennis David
Dr. Dennis David
MS - Allopathy, General and Laparoscopic Surgeon, 7 yrs, Palakkad
Dr. Swapnil Mantri
Dr. Swapnil Mantri
MBBS, Pediatrician Physician, 7 yrs, Jalna
Dr. Chandrakumar Deshmukh
Dr. Chandrakumar Deshmukh
BAMS, Ayurveda Panchakarma, Pune
Dr. Manohar Wani
Dr. Manohar Wani
MBBS, General Physician, 44 yrs, Pune
Dr. Mahesh Gupta
Dr. Mahesh Gupta
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Hellodox
x