Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

एकीकडे फिटनेसबाबत किंवा आहाराबाबत जागरूकता वाढत असली तरी बदलत्या लाइफस्टाइलमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. लोकांच्या शारीरिक क्रिया कमी झाल्याने त्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागताना दिसतोय. अशात एका रिपोर्टनुसार, देशातील ५३ टक्के महिलांची शारीरिक अ‍ॅक्टीविटी गरजेपेक्षा कमी आहे. पुरुषांची स्थितीही फारशी चांगली नाहीये. तब्बल ४८ टक्के पुरुषांची शारीरिक क्रिया कमी आहे. बंगळुरुच्या एका फिटनेस अ‍ॅपने नुकताच एक सर्व्हे केला होता. त्यातून हा खुलासा झालाय. या सर्व्हेनुसार, बंगळुरु, गुरुग्राम येथील लोक त्यांच्या आरोग्याबाबत सर्वात जास्त सतर्क आहेत. तर कोलकाता, लखनौ आणि अहमदाबादचे लोक आरोग्याकडे सर्वात कमी लक्ष देतात.

HealthifyMe या फिटनेस अॅपने २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास १० लाख भारतीयांच्या आरोग्यासंबंधी सवयींवर सर्व्हे केला. आणि त्या आधारावर 'फिजिकल अ‍ॅक्टिविटी लेव्हल ऑफ इंडियंस' नावाचा रिपोर्ट तयार केला. यातून असं आढळून आलं की, फिजिकल अ‍ॅक्टिविटीसोबतच महिला कॅलरी बर्न करण्यातही पुरुषांच्या मागे आहेत.

महिलांनी एका दिवसात सरासरी जितक्या कॅलरी बर्न करायला हव्यात, त्याच्या केवळ ४४ टक्के कॅलरी त्या बर्न करू शकतात. तेच पुरुष एका दिवसात साधारण ५५ टक्के कॅलरी बर्न करण्यात यशस्वी ठरतात. रिपोर्टनुसार, महिलांनी एका दिवसात सरासरी ३७४ कॅलरी बर्न करायला हव्यात. पण यातील त्या केवळ १६५ कॅलरीच बर्न करु शकतात. तर पुरूषांनी एका दिवसात सरासरी ४७६ कॅलरी बर्न करायला हव्यात. पण ते त्यातील जवळपास २६२ कॅलरी बर्न करतात.

कॅलरींचा थेट संबंध हा शारीरिक क्रियेंशी असतो. सर्व्हे करणाऱ्या अ‍ॅपचे अधिकारी तुषार वशिष्ठ यांनी सांगितले की, 'ही फार चिंतेची बाब आहे की, देशातील अर्धी लोकसंख्या गरजेच्या फिजिलक अ‍ॅक्टिविटीच करत नाहीत. जर आपण देशातील महिला आणि पुरुषांना मिळून सांगितलं जर प्रत्येक व्यक्ती गरजेच्या फिजिकल अ‍ॅक्टिविटीचं केवळ ५० टक्केच लक्ष्य मिळवू शकतात.

याच सर्वात मोठं कारण आहे रोजच्या वाईट सवयी आणि आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश नसणे, याच सवयींमुळे जाडपणा, हायपरटेंशन, डायबिटीजसारखे आजार होतात. सर्व्हेमधून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. फिजिकल अ‍ॅक्टिविटीचा ३० वयोगटाच्या आसपास असलेल्या लोकांमध्ये फारच खराब स्तर आहे.

सर्व्हे करणाऱ्या अ‍ॅपने वेगवेगळ्या शहरातील लोकांचे फिटनेस बॅंड किंवा फोनमधील फिटनेस अ‍ॅपचा डेटा गोळा करून त्या आधारे निष्कर्ष काढले. यातून हेही समोर आलं की, मोठ्या शहरातील लोक एक दिवसात सरासरी ४०७ कॅलरी बर्न करतात. तेच लहान शहरातील लोक एक दिवसात सरासरी ३७१ कॅलरी बर्न करू शकतात. म्हणजे मोठ्या शहरातील लोक छोट्या शहरातील लोकांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव आहेत.

धुम्रपानामुळे कर्करोगासारखा जीवघेणा आजार होतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासोबतच याने इतरही काही गंभीर आजार होतात. त्यात आयुष्य कमी होणे ही सुद्धा एक समस्या आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, धुम्रपानामुळे केवळ आयुष्यच कमी होत असं नाही तर याने व्यक्ती २० वर्ष लवकर वृद्ध होतो. म्हणजे धुम्रपान करणाऱ्या तरुणाचं वय २० वर्षे असेल तर त्याचं क्रानलॉजिकल वय एखाद्या ४० वर्षाच्या व्यक्ती इतकं होऊ शकतं.

काय आहे क्रानलॉजिकल आणि बायलॉजिकल वय?

मानवी शरीराचं दोन प्रकारचं वय असतं, पहिलं क्रानलॉजिकल आणि दुसरं बायलॉजिकल. क्रानलॉजिकल हे व्यक्तीच्या जन्मापासून मोजलं जातं. तेच एखादी व्यकती कोणत्या वयाचा दिसतो, हे बायलॉजिकल वयाने मोजलं जातं.

रिसर्चमधून काय समोर आलं?

या रिसर्चनुसार, धुम्रपानाचे नुकसान जाणून घेण्यासाठी १४९, ००० तरुणांची ब्लड टेस्ट करण्यात आली. यातून हे समोर आलं की, धुम्रपान करणाऱ्या तरुणांचं क्रानलॉजिकल वय त्यांच्या पेक्षा वयाने दुप्पट असलेल्या व्यक्तींच्या बरोबर आहे. या रिसर्चमध्ये १० पैकी ७ असे धुम्रपान करणारे ज्यांचं वय ३० पेक्षा कमी होतं, त्याचं क्रानलॉजिकल वय ३१ ते ४० किंवा ४१ ते ५० दरम्यान आढळलं. या रिसर्चमध्ये सहभागी एकूण लोकांपैकी ४९,००० लोक स्मोकर्स होते आणि त्यांचं सरासरी वय हे ५३ आढळलं, जी चिंतेची बाब आहे.

या रिसर्चचे लेखन पोलिना मॉमोशिना म्हणाले की, 'स्मोकिंग आरोग्य बिघवण्यास आणि वयाआधीच निधन होण्याचं मोठं कारण आहे. याने वेगवेगळे आजारा होतात. तसेच या रिसर्चमध्ये नॉन स्मोकर्सच्या तुलनेत स्मोकिंग करणाऱ्यांचं वय वाढण्याच्या प्रक्रियेत वेग बघायला मिळाला. ही प्रक्रिया महिला आणि पुरुषांमध्ये समान होती.

या रिसर्चमधून हे समोर आलं की, स्मोकिंगच्या सवयीमुळे शरीराचं आतील होणाऱ्या नुकसानाचे आतापर्यंत जे अंदाज लावले जात होते, प्रत्यक्षात नुकसान त्याहूनही जास्त होतं. यातून हेही स्पष्ट झालं की, स्मोकिंगने केवळ बायलॉजिकलच नाही तर क्रानलॉजिकल वयही प्रभावित होतं.

७ हजारापेक्षा जास्त रसायने

अमेरिकन लंग असोसिएशनतर्फे नुकताच करण्यात आलेल्या संशोधनानुसार सिगारेट जळाल्यानंतर त्यातून ७ हजारापेक्षा जास्त रसायने निघतात. त्यापैकी ६९ तर एवढे हानिकारक रसायने असतात जे कॅन्सरची शक्यता वाढवितात. ही रसायने शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करुन आरोग्याला हानी पोहोचवतात. छातीच्या आजारांच्या तज्ज्ञांनुसार धुम्रपानामुळे शरीरावर आठ प्रकारे नुकसान होत असते.

सिगारेटच्या धुराचा शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होऊन ही प्रक्रिया मंदावते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सुमारे ५१ टक्के वाढते. संशोधनानुसार सिगारेट ओढल्याने मेंदुतील कॉर्टेक्सचा भाग पातळ होतो. यामुळे मेंदूची क्षमता कमी होऊ लागते. तसेच नियमित सिगरेट ओढल्याने उच्च रक्तदाब वाढतो, ज्यामुळे स्ट्रोक आणि ह्रदय विकाराचा धोका निर्माण होतो. नियमित सिगरेट ओढल्याने यकृत मध्ये टार जमा होतो, त्यामुळे यकृतचा कॅन्सर वाढण्याची ९० टक्के शक्यता वाढते.

जगात वेळेपूर्वीच जन्माला येणाऱ्या बालकांचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. अशा बालकांच्या मृत्यूचं प्रमाणही अधिक आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच इतरही अनेक कारणांमुळे अकाली बाळ जन्मदराच्या प्रमाणात वाढ होत आहे.

मिरा रोडमध्ये राहणाऱ्या इशरत नवाज यांचं बाळ जन्माला आल्यापासून म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून वाडिया रूग्णालयाच्या एन.आय.सी.यूमध्ये उपचार घेत आहे. २४ व्या आठवड्यातच म्हणजे अवघ्या साडे पाच महिन्यांतच इशरत यांच्या बाळानं जन्म घेतला. जन्मावेळी या बाळाचं वजन अवघं ७०० ग्रॅम इतकंच होतं. आता त्याचं वजन चौदाशे ग्रॅम झालं आहे. तरीही डॉक्टरांबरोबरच आईची त्याच्यावरची २४ तासांची देखरेख काही सुटलेली नाही.

२४ ते ३७ आठवडे म्हणजेच साडे पाच महिने ते साडे आठ महिन्यांच्या कालावधी दरम्यान जन्मलेलं बाळाला वेळेआधी जन्मलेलं बाळ किंवा 'प्री-मॅच्युअर बेबी' म्हटलं जातं. जगात दरवर्षी दीड कोटी बालकांचा जन्म वेळेआधी होतो. वर्षाला यातील २० लाख बालकांचा मृत्यू होतो. कारण ५ वर्षांपर्यंत त्यांच्या जीवाला धोका संभवत असतो.


जगात वेळेआधी जन्म घेतलेल्या बालकांची सर्वाधिक संख्या भारतात असून ती वर्षाला ३५ लाख इतकी आहे. लहान वयात लग्न होणं, खूप उशिरा मूल जन्माला घालण्याचं नियोजन करणं, बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव, जंतुसंसर्ग, आयव्हीएफ तंत्रज्ञान, अशा विविध कारणांमुळे वेळेआधी मूल जन्माला येण्याचं प्रमाण वाढलंय.

अशी बालकं जगवण्यासाठी रुग्णालयांमधील एन.आय.सी.यूची गरज भासते. मात्र, तेवढ्या प्रमाणात खास करून ग्रामीण भागात एन.आय.सी.यू उपलब्ध नसल्यानं मूल दगावण्याचं प्रमाण अधिक आहे.

गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात ते खरेच, युगांडातील एका व्यक्तीला मलेरिया झाला असताना निदान होण्यास विलंब लागत होता त्यामुळे ब्रायन गिट्टा या रुग्णानेच कुठलीही सुई वगैरे न टोचता करता येईल, अशी मलेरियाची रोगनिदान चाचणी शोधली आहे. तो रुग्ण २५ वर्षीय संगणक अभियंता असून त्याला या शोधासाठी पुरस्कारही मिळाला आहे. मातीबाबू हे या चाचणी संचाचे नाव असून गिट्टा याला त्यासाठी ब्रिटनच्या रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग संस्थेने २५ हजार युरोचा पुरस्कार जाहीर केला. आफ्रिकेत मलेरियाचे प्रमाण खूपच जास्त आहे. २०१६ मध्ये २१६ दशलक्ष रुग्ण होते. २०१५ मध्ये हे प्रमाण २११ दशलक्ष होते. मृतांची संख्याही २०१६ मध्ये एक हजाराने कमी होऊन ४४,५०० झाली आहे. स्वाहिली भाषेत उपचार या शब्दाला मातीबाबू हा प्रतिशब्द आहे. त्यावरून या निदान संचाचे नाव तसे ठेवले आहे.

पोर्तुगालमधील एक संस्था आता या संचाचे व्यावसायिक उत्पादन करणार असल्याचे परीक्षक रिबेका एनॉनचोंग यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या मलेरियाची चाचणी करण्यासाठी २०० संच उपलब्ध असून त्यात आता हा नवीन संच जास्त सोपा ठरणार आहे. गिट्टा याने या चाचणी संचाची अचूकता ९० टक्क्य़ांपर्यंत नेण्याचे ठरवले आहे. या संचाची किंमत १०० डॉलर असेल.

हा संच वापरण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही, शिवाय ग्रामीण भागात तो फार उपयोगी पडणार आहे, कारण तेथे सुविधा नसतात. या पद्धतीत एक लाल रंगाचा किरण हाताच्या बोटावर टाकला जातो, त्यामुळे लाल रक्तपेशींचा आकार, संख्या व रंग यातील फरक कळतो. तो एका मिनिटात मोबाइल किंवा संगणकावर घेऊन मलेरियाचे निदान करता येते.

Dr. Neha Sawant
Dr. Neha Sawant
BPTh, Orthopedic Physiotherapist Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Shubham Hukkeri
Dr. Shubham Hukkeri
BPTh, 1 yrs, Mumbai
Dr. Vinay Shankar Gupta
Dr. Vinay Shankar Gupta
MS - Allopathy, Dermatologist Family Physician, 40 yrs, Shimla
Dr. Pratima Kokate-Ghode
Dr. Pratima Kokate-Ghode
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diet Therapeutic Yoga, 9 yrs, Pune
Dr. Tejaswini Bidve
Dr. Tejaswini Bidve
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Hellodox
x