Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

दातांच्या साधारण समस्यांमध्ये दात किडणं, दात दुखणं, दात पिवळे होणं आणि हिरड्यांच्या समस्या याचा समावेश होतो. या समस्यांमध्ये वाढ झाल्याने दात कमकुवत होऊ शकतात. अशातच दात मजबुत करण्यासाठी तुम्हाला दातांच्या स्वच्छतेवर लक्ष द्यावं लागेल. याचबरोबर काही पदार्थांचा डाएटमध्ये समावेश केल्याने दात मजबुत होण्यास मदत होते. जाणून घेऊया कोणत्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करणं ठरतं फायदेशीर...

कॅल्शिअम आणि फॉस्फरस आहे आवश्यक...

कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचा समावेश असणारं डाएट दातांसाठी उत्तम ठरतं. कारण ही दोन तत्व तोंडामध्ये अनहेल्दी अॅसिड तयार होण्यापासून रोखण्याचं काम करतात. अॅसिडिक फूड्स आणि लिक्विड दातांच्या एनामलचं नुकसान करतात. सध्या लोक सर्वात जास्त अॅसिडिक पदार्थ आणि याचा समावेश असणारे कोल्ड ड्रिंक्स यांचं सेवन करतात. ज्यामुळे दात आणि हिरड्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत होते. पनीर, दही, दूध आणि पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. फॉस्फरससाठी मांस, अंडी आणि मासे खाणं उत्तम ठरतं. हे सर्व पदार्थ एनामलच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरतात.

या पदार्थांच्या सेवनाने दात आणि हिरड्यांच्या समस्यांवर करता येतील उपचार :

अंडी

अंडी दातांचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं आणि ही दोन्ही तत्व दातांसाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असतं. जे कॅल्शिअम अब्जॉर्ब करण्यासाठी मदत करतात.

अवोकाडो

अवोकाडो दात हेल्दी ठेवण्यासाठी उत्तम आहार आहे. अवोकाडो प्रोबायोटिक्स फायबरने परिपूर्ण असतं. जे आरोग्याची पाचनक्षमता वाढवण्यासाठी मदत करतात.

लसूण

लसूण शरीर आणि दातांसाठी फायदेशीर ठरतं. लसणामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामध्ये एलिसिन नावाचं तत्व असतं. जे अ‍ॅन्टीफंगल आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणांनी परिपूर्ण असतं. एलिसिन ओरल फ्लोरा इम्बॅलेन्सशी लढण्यासाठी मदत करतात. तसेच हे खराब बॅक्टेरिया नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. तोंडामध्ये खराब बॅक्टेरिया कॅविटी आणि हिरड्यांचया समस्यांमुळे तयार होतात.

पालक

पालकमध्ये व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्व मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अ‍ॅसिड असतं. हे व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्व दातांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. दात हेल्दी आणि मजबुत करण्यासाठी पालकचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन व्यतिरिक्त पालकमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जे शरीरातील ऑक्सीकरण एजंट्स हटवण्याचं कार्य करतात. अ‍ॅन्टीऑक्सिडंट दात आणि हिरड्यांसाठी उत्तम मानलं जातं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

राष्ट्रीय दंतचिकित्सक दिवस
हेलोडॉक्स हे सर्व दंतचिकित्सकांना, राष्ट्रीय दंतचिकित्सक दिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देत आहे "हॅपी नॅशनल डेन्टिस्ट डे". हा दिवस भारतातील दंत स्वास्थ्याविषयी जागरुकता वाढविण्यासाठी दरवर्षी 6 मार्चला साजरा करण्यात येतो. हा एक असा दिवस आहे जेव्हा आपण दंतपणाच्या चांगल्या सवयी आणि स्वच्छतेसाठी वचनबद्ध होऊ शकतो. आपल्यापैकी बहुतेक लोक दंतवैद्याला भेटण्यास नकार देतात. तथापि, आपली तपासणी पूर्ण झाल्यानंतर, आपले दात स्वच्छ होतात, पोकळी भरली जातात, तुटलेला दात परत बसविला जातो आणि आपण दातदुखीपासून मुक्त होतो, तेव्हा आपल्या आयुष्यात दंतचिकित्सक एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो हे लक्षात येते. हेलोडॉक्सला आपल्या आरोग्य मंचावर अनेक दंतचिकित्सकांसह सहयोग करण्याचा अभिमान वाटतो आहे. मागील बऱ्याच कालावधी पासून अनेक दंतचिकित्सकांनी आम्हाला आरोग्य शिबिरांमध्ये समर्थिन केले आहे. आमच्या संपूर्ण हेलोडॉक्स संघाच्या वतीने आम्ही सर्व दंतचिकित्सकांना "धन्यवाद" देतो आणि समाजासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक करतो.

जेव्हा दातांचा प्रश्न येतो तेव्हा आपण म्हणतो की दात हा शरिराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण दातांशिवाय तुम्ही जेवण करु शकणार नाहीत. अनेक गोष्टींना तुम्हाला नाही म्हणावं लागेल. अनेकांना दात दुखण्याची समस्या असते. अशावेळी काही घरगुती उपाय करुन देखील तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

1. लवंग : लवंग एक अशी नैसर्गिक वस्तू आहे. जी आपल्या दातांसाठी खूप लाभदायक आहे. लवंगमध्ये अनेक औषधी गुण असतात. जे दातांमधील बॅक्टेरिया आणि जर्म्सला संपवतात आणि दातांना मजबूत करतात. तुमची दाढ जर दुखत असेल कर लवंग यावर गुणकारी उपाय आहे. लवंगमुळे दातांचं दुखणं कमी होतं. पण याचा वापर तुम्ही नियमित केला पाहिजे.

2. मीठ : मीठ देखील तुमच्या दातांमधील दुखणं कमी करतं. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या पाहिजे. यामुळे तुमच्या दातांचं दुखणं कमी होतं.

हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतात. जिंजीवायटिस हा हिरड्यांसंबंधी एक प्रमुख विकार आहे. या आजारात हिरड्यांना सूज येते. बरचदा खाद्यकण अडकतात आणि हिरड्यांमध्ये साचून राहतात.

दररोज व्यवस्थित स्वच्छता न झाल्यास तोंडामध्ये संसर्ग उत्पन्न होतो आणि जिंजीवायटिसचा धोका बळावतो. गमलाईनच्या खाली हिरड्यांमधील पेशींना इजा होते आणि हिरड्या सूजतात. ही सूज प्राथमिक अवस्थेत असताना उपचार न झाल्यास प्रोडोन्टिटिस नामक गंभीर आजार उद्‌भवू शकतो. यामध्ये दात आणि जबड्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होते.

हिरड्या लाल होणे, सुजणे, ब्रश करताना रक्त येणे या लक्षणांवरुन जिंजीवायटिसचे निदान होऊ शकते. उपचारांना विलंब झाल्यास दात आणि हिरड्यांमध्ये एक पोकळी निर्माण होते. हिरडीची दातावरील पकड कमी होते. निर्माण झालेल्या या पोकळीत संसर्ग उत्पन्न झाल्यास मुखदुर्गंधीची समस्या उद्‌भवते. त्याचबरोबर जिभेची चव जाते.

ब्रश करताना दातांचीच नव्हे तर हिरड्यांचीही निगुतीने स्वच्छता व्हायला हवी. आहारात कॅल्शियमयु्क्त अन्नघटकांचे प्रमाण वाढवावे. दूध, पनीर यांच्या सेवनाने शरीराला कॅल्शियमचा योग्य पुरवठा होतो आणि दातांबरोबरच हिरड्या सुदृढ राहतात.

वेदना कोणत्याही असोत त्या सहन करणं त्रासदायकच असतं. त्यात दातांची समस्या असेल आणि वेदना होत असतील तर विचारायलाच नको. दाताची समस्या असेल आणि वेदना होत असतील तर व्यक्ती काही विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता गमावून बसतो.

अशावेळी तुमच्या टूथपेस्टमध्ये मिठ असो वा नसो पण मोहरीचं तेल असायला हवं. कारण दातांच्या दुखण्यासाठी मोहरीचं तेल फारच फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ मोहरीच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे.

मोहरीच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि बीटा कॅरोटीन आढळतात. त्यासोबतच यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न आणि फॅटी अॅसिड आढळतं. हे तेल आरोग्यासाठी फारच उपयुक्त मानलं जातं. चला जाणून घेऊ आता याचा दातांची वेदना दूर करण्यासाठी कसा उपयोग होतो.

दातांमध्ये वेदना होत असतील तर ज्या ठिकाणी वेदना होत आहे त्या ठिकाणी मोहरीचं तेल लावल्यास वेदना कमी होतात. ज्या पावडरने तुम्ही रोज दात स्वच्छ करता त्यात थोडं मोहरीचं तेल घातल्यास वेदना कमी होतील.

त्यासोबतच कधी कानात अचानक वेदना झाल्या तर अशावेळी मोहरीचं तेल कानात टाकल्यास आराम मिळतो. त्यासोबतच मोहरीचं तेल लसूण टाकून गरम करुन कानात टाकू शकता. यानेही आराम मिळतो.

तसेच मोहरीच्या तेलातील व्हिटॅमिनमुळे त्वचेचीही काळजी घेतली जाऊ शकते. सूर्याच्या किरणांपासून त्वचेचं रक्षण करतं. त्यामुळे घराबाहेर निघण्याआधी मोहरीचं तेल त्वचेवर लावल्यास फायदा होतो.

Dr. Akash Kadam
Dr. Akash Kadam
BDS, Dentist Oral Medicine Specialist, 4 yrs, Pune
Dr. Neha Sawant
Dr. Neha Sawant
BPTh, Orthopedic Physiotherapist Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Abhay Singh
Dr. Abhay Singh
MBBS, Family Physician, 2 yrs, South Delhi
Dr. Sachin Hundekari
Dr. Sachin Hundekari
MBBS, Cardiologist, 4 yrs, Pune
Dr. Brinda Dave
Dr. Brinda Dave
MPTh, Neuro Physiotherapist Physiotherapist, 4 yrs, Pune
Hellodox
x