Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  

पायाचे हाड मोडणे : अस्थिभंग

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consultपायाचे हाड मोडणे : अस्थिभंग (हाड मोडणे, फ्रॅक्चर)

हाड हा मुळात कठीण आणि मजबूत भाग आहे. उतारवयात काही आजारात आणि कॅलशियम अभावामुळे मात्र हाड नाजूक आणि ठिसूळ होऊन एवढया तेवढया कारणाने मोडते. अपघातामध्ये वेडावाकडा मार लागून हाडे मोडण्याचा संभव असतो. हाड मोडणे म्हणजेच'अस्थिभंग'. अस्थिभंगाचे विविध प्रकार आहेत.

- लहान मुलांची हाडे लवचीक असतात. त्यामुळे ती पूर्ण न मोडता हिरवट फांद्याप्रमाणे केवळ एक बाजूला मोडतात. पूर्ण ताटातूट न झाल्यामुळे तुकडे एकमेकांबरोबर राहतात. असा अस्थिभंग केवळ क्ष-किरणांनी दिसतो व लवकर जुळून येतो. नंतरच्या वयात मात्र हाडे कडक असतात आणि वाळलेल्या काठीप्रमाणे काडकन तुकडे होतात.

- काहीवेळा ज्या अस्थिभंगामध्ये त्वचेला जखम न होता अस्थिभंग आतल्या आत राहतो. याला केवळ अस्थिभंग असे म्हणावे. ज्यामध्ये हाड तर मोडतेच पण वरच्या त्वचेला व मऊ भागांनाही जखम होते अशा अस्थिभंगास अवघड किंवावाईट अस्थिभंग असे म्हणावे. हा अवघड अशासाठी, की जखमेत सूक्ष्मजंतू मिसळून पू होणे, सूज येणे, ताप येणे, जखम चरत जाणे वगैरे समस्या निर्माण होतात.

- ज्या अस्थिभंगात हाडाचे तुकडे खूप होतात त्याला चुरा अस्थिभंग म्हणावे.

अस्थिभंगाची लक्षणे व निदान
1. वेदना : अस्थिभंगामुळे असह्य वेदना होते. ही वेदना अस्थिभंगाच्या जागी होते. वेदनेच्या जागेवरून अस्थिभंग कोठे आहे हे शोधता येते. हालचालीने वेदना वाढते.

2. हालचालीवर बंधने : अस्थिभंगामुळे त्या भागाची हालचाल कमी होते किंवा बंद पडते. हाड तुटल्यामुळे पुढची हालचाल होत नाही. हालचालीमुळे वेदना होत असल्याने ती व्यक्ती तो भाग हालवायला तयार नसते.

3. त्या भागाचा आकार नेहमीपेक्षा वेगळा विचित्र दिसणे : अस्थिभंग होऊन हाडाचे तुकडे वेगवेगळे झाले असतील तर त्या भागाचा आकार नेहमीपेक्षा वेगळा दिसतो. सूज जास्त असेल तर मात्र हा विचित्र आकार लपून जातो.

4. सूज : अस्थिभंगाने अंतर्गत रक्तस्राव होतो. त्यामुळे तो भाग सुजतो.

5. आवाज : अस्थिभंगाच्या जागी हाताने थोडे दाबून पाहिल्यास हाडांचे तुकडे एकमेकांवर घासल्याचा (कडकड वाजल्याचा ) अनुभव येईल.

वेदना, सूज, हालचालींवर बंधन, वेगळा आकार व टोके घासल्याचा आवाज यावरून अस्थिभंगाचे निदान बहुतेक वेळा खात्रीने करता येते. क्ष-किरण चित्रात अधिक माहिती मिळते. अस्थिभंगाची जागा, प्रकार, एकूण नुकसान, तुकडे कोठे आहेत हे सर्व क्ष-किरण चित्रात स्पष्ट कळून येतात. विशिष्ट अस्थिभंग (उदा. कवटी, हाताची बोटे, पाऊल, इ.) नुसत्या तपासणीवरून खात्रीपूर्वक सांगता येत नाही, पण क्ष-किरण चित्रात हे स्पष्ट होते. अस्थिभंगावर उपचार केल्यानंतरही क्ष किरण चित्र काढून हाडे नीट बसली आहेत की नाही, ते कळते.

उपचार
प्रथमोपचार:

हाड किंवा सांधा यांना इजा झाल्यावर काही वैदू किंवा हाडवैद्य लोक चोळून देतात. ही पध्दत घातक असून त्यामुळे रक्तस्राव वाढतो व जास्त नुकसान होते. चोळण्यामुळे फायदा काही नसतो. अस्थिभंग झालेला अवयव (हात, पाय किंवा बोटे, इ.) हालचाल न करता स्थिर ठेवणे हे महत्त्वाचे असते. याने खूप फायदे होतात. एक म्हणजे वेदना थांबते. दुसरे म्हणजे हाडांच्या तुकडयांच्या हालचालीने तिथल्या शिरा, नसा,स्नायू किंवा इतर भाग यांचे नुकसान होण्याचे टळते. तिसरे म्हणजे रक्त गोठण्याची प्रक्रिया लवकर होऊन पुढील रक्तस्राव थांबतो. हालचाल थांबवण्याची पध्दत अस्थिभंगाच्या जागेवर अवलंबून असते हे आपण प्रत्येक प्रकारामध्ये वेगळे पाहू या. दुसरा प्रथमोपचार म्हणजे अस्वस्थता, भीती, वेदना कमी करण्यासाठी गुंगीचे औषध देणे. अफूपासून तयार केलेले मॉर्फिनचे इंजेक्शन यावर वेदनाशामक म्हणून चांगले असते. मात्र हे इंजेक्शन डॉक्टरांकडेच उपलब्ध असते. तेथे जाईपर्यंत उशीर लागणार असेल तर वेदनाशामक गोळी द्यावी. रुग्णालयातले उपचार तुटलेले तुकडे एकमेकांशी जुळवून स्थिर ठेवणे हे अस्थिभंगाच्या उपचाराचे मुख्य सूत्र आहे. खिळे, पट्टया, सळया,प्लॅस्टर हे सर्व याचसाठी असते. हाड जुळायला साधारणपणे सहा आठवडे लागतात. रुग्णालयात क्ष-किरण तपासणी करून, तात्पुरती भूल देऊन हाडे बाहेरून किंवा ऑपरेशन करून बसवतात. काही हाडे खिळे व पट्टी मारून बसवता येतात. याला नंतर प्लॅस्टर करावे लागत नाही. काही अस्थिभंगासाठी हाडे जुळवून प्लॅस्टर करतात. प्लॅस्टरमुळे ठेवलेल्या अवस्थेत हाडे स्थिर राहून सांधली जातात. काही ठिकाणी प्लॅस्टर घालणेही शक्य नसते. यासाठी लांब पट्टया किंवा सळया लावून हाडे स्थिर ठेवली जातात. अस्थिभंगामुळे काहीवेळा आत असलेल्या अवयवांनाही धक्का लागतो. उदा. कवटीला मार बसल्यावर मेंदूला इजा होणे, छातीच्या फासळया तुटल्यावर फुप्फुसांना इजा होणे, कंबरेच्या हाडांबरोबर लघवीची पिशवी फुटणे, इ. त्या त्या अवयवाच्या हानीप्रमाणे निदान व इलाज करावा लागतो. अस्थिभंगामुळे झालेल्या तुकडयांमध्ये रक्तवाहिनी किंवा चेतारज्जू (नस) दाबली गेल्यास पुढील संबंधित भागात नाडी न लागणे किंवा बधिरता किंवा लुळेपणा जाणवण्याची शक्यता असते. अशा वेळी ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक असते. दंडाच्या अस्थिभंगासाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात हाडवैद्य आढळतात. काहीजण थोडयाफार माहितीवर उपचार करतात. ब-याच वेळा त्यांचा गुण येतो. काही वेळा नुकसानही होते. ही कला तपासून त्यात काय सुधारणा करता येतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. पण नुसते हाड जुळणे हे महत्त्वाचे नाही. ते नीट जुळणे व अवयवाचे कामकाज ठीक होणे महत्त्वाचे आहे.

निरनिराळे अस्थिभंग:

उतारवयातील मनगटाजवळचा अस्थिभंग, गळपट्टीचा अस्थिभंग,बरगडीचा अस्थिभंग, पायाची बोटे,इत्यादींचे अस्थिभंग उपचार करायला त्या मानाने सोपे असतात. कारण यात हाडांची जुळणी अगदी अचूक झाली नाही तरी चालते. या अस्थिभंगात फार विकृती येत नाही. तरीही अस्थितज्ञास दाखवावे. कोपरापासून मनगटापर्यंत आणि गुडघ्यापासून घोटयापर्यंत दुनळी हाडे असतात. त्यांपैकी नुसते एक तुटले तर दुस-या हाडाच्या बरोबर ते सरळ राहते व तुकडे एकमेकांसमोर नीट राहतात. म्हणून दुनळीपैकी एका हाडाचे अस्थिभंग उपचारास सोपे असतात. दुनळीपैकी दोन्ही हाडे तुटली असतील तर उपचार गुंतागुंतीचे असतात. कवटी, दंड, मांडी, कंबर,मणके, हाताची बोटे, हाताचा तळवा, मनगट, खांदा, खुबा, इत्यादी जागचे अस्थिभंग उपचार करायला अवघड असतात; कारण तुटलेले तुकडे एकत्र ठेवणे अवघड असते. म्हणून या प्रकारांसाठी ताबडतोब तज्ज्ञाकडे जाणे आवश्यक आहे.

काही महत्त्वाचे अस्थिभंग

1. कवटी फुटणे अपघातात किंवा मारामारीत काही वेळा डोक्याला खोच पडते. मात्र कवटी क्वचित फुटते. फुटलेला भाग हाताच्या बोटाने दाबून 'दबल्यामुळे'कळतो. कधीकधी या हाडाचे तुकडे जखमेत पसरतात किंवा आतला मेंदूही दिसतो. कवटीला मार लागला आहे असे वाटत असेल तर ताबडतोब रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. खांद्याचे आडवे हाड तुटणे, पडताना ब-याच वेळा आधारासाठी हात जमिनीवर येतो. या हातावर शरीराचा भार एकदम आल्यामुळे खांद्याचे (गळपट्टीचे) आडवे हाड तुटते. हा अस्थिभंग समजायला व उपचार करायला सर्वात सोपा आहे. ज्या ठिकाणी हाड मोडले आहे तेथे सूज व दुखरेपणा येतो व टोके एकमेकांपासून अलग दिसतात. हात उचलता येत नाही. याला सुमारे तीन-चार आठवडे कडबोळे पध्दतीने पट्टी किंवा कपडा बांधून ताण दिला,

2. जबडयाचे हाड तुटणे खालचा किंवा वरचा जबडा तुटणे हे बहुधा अपघातातच होते. दातांची खालची व वरची ओळ (दंतरेषा) तपासून त्यात काही खाली-वर बदल दिसतो का ते पहा. यातून अस्थिभंग कळून येतो. हे अस्थिभंग त्रासदायक असतात. तारेने हाडाचे तुकडे एकत्र बांधून यावर उपचार केला जातो. यानंतर सहा आठवडे द्रवपदार्थावरच राहावे लागते आणि बोलता येत नाही.

3. दंडाचे हाड
दंडाचे हाड बहुधा खालच्या बाजूला मोडते. हाडाचे दोन तुकडे झाले असतील तर त्यांची टोके वेगवेगळी होतात. यामुळे दंडाचा आकार विचित्र दिसतो. या अस्थिभंगाचा विशेष धोका म्हणजे हाताची मुख्य रक्तवाहिनी कधीकधी यात अडकते. असे झाले तर रक्तप्रवाह बंद पडून अर्ध्या पाऊण तासात संपूर्ण हात कायमचा निर्जीव होतो. म्हणून या अस्थिभंगात मनगटाजवळची नाडी चालू आहे किंवा नाही हे तपासणे आवश्यक आहे. प्रथमोपचार करून पट्टीने गळयात अडकवणे अस्थिरोग तज्ञाकडून दंड व कोपर यांच्यासाठी प्लास्टरची पन्हळ करून पट्टीने गळयात अडकवणे हाच यावर चांगला उपाय आहे.

4. हाताची दुनळी हाडे दुनळीपैकी एक किंवा दोन्ही हाडे मोडू शकतात. दुनळीचे वरचे टोक, खालचे टोक किंवा मध्ये कुठेही अस्थिभंग होऊ शकतो. यांपैकी एक हाड मध्ये मोडले असेल तर दुस-या हाडाचा आयता आधार असल्यामुळे फार अलग होत नाहीत. उपचारात याचा फायदा होतो. दोन्ही हाडे मोडल्यास मात्र उपचार करणे जास्त अवघड होते.

5. खुब्याचा अस्थिभंग वृध्दापकाळात हाडे ठिसूळ झालेली असतात. थोडयाशा मारानेही ती मोडतात. खुबा म्हणजे मांडीचे हाड कमरेच्या हाडात गुंतवलेला उखळी सांधा. यातील मांडीच्या हाडाला एक तिरपे टोक व त्यावर चेंडूसारखा भाग असतो. या सांध्यावर जाड पडदे असतात (सांधेकोश). मांडीच्या हाडाचा हा फांदीसारखा भाग सांध्यात किंवा सांध्याबाहेर तुटतो. अगदी किरकोळ कारण -घसरणे याला पुरते. कधीकधी पुरेसे कारण नसतानाही हा भाग तुटतो. हा अस्थिभंग झाला असेल तर उताण्या अवस्थेत मोडलेल्या बाजूचे पाऊल पूर्ण बाहेर किंवा अर्धवट तिरके पडून राहते. त्या पायाची हालचाल होऊ शकत नाही. यामुळे रुग्ण पूर्णपणे अंथरुणाला खिळून जातो. उठून बसणे, कुशीवर वळणे एवढया साध्या शारीरिक हालचालीही रुग्ण करू शकत नाही. अंथरुणावर टेकलेले भाग सडून तिथे व्रण तयार होतात. हळूहळू त्यातून सर्व शरीरातच जंतुदोषाची लागण होते. पडून राहिल्याने श्वसनसंस्था, पचनसंस्था,इत्यादींमध्ये अनेक आजार निर्माण होतात. विशेष धोका म्हणजे श्वसनसंस्थेत न्यूमोनिया होतो. पूर्वी हा अस्थिभंग झाल्यावर चार-सहा महिन्यांत मृत्यू येण्याची उदाहरणे अगदी सर्रास होती. ग्रामीण भागात अजूनही अशी काही स्थिती आहेच. या अस्थिभंगावर आता मात्र अगदी चांगल्या शस्त्रक्रिया होतात. रुग्णाची शारीरिक परिस्थिती ठीक असेल तर शस्त्रक्रियेने दोन-चार दिवसांतच रुग्ण हालचाल करू शकतो, पायावर भार देऊ शकतो. या शस्त्रक्रियेने रुग्ण जवळजवळ पहिल्यासारखा कार्यक्षम होतो. या शस्त्रक्रियेत अस्थिभंग झाल्यानंतर तो नैसर्गिक पध्दतीने जुळण्याची वाट न पाहता तुटलेला भाग खिळे, पट्टी, इत्यादींच्या साहाय्याने जोडला जातो. आवश्यक तर हाडाचे चेंडूसारखे टोक काढून तिथे कृत्रिम भाग बसवला जातो. यामुळे दोन चार दिवसांत खुब्याचे काम पहिल्यासारखे होते. अगदी ऐंशीतल्या वयाच्या वृध्दांनाही याचा चांगला उपयोग होतो.


Published  

बसून बसून मान, पाठ, कंबर, पायांचं दुखणं वाढलंय? ही एक्सरसाइज दूर करेल समस्या

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

ऑफिस जॉब किंवा खुर्चीवर तासंतास बसून काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. सकाळपासून सायंकाळपर्यंत खुर्चीवर बसून काम करणाऱ्या रोज एक्सरसाइजसाठी वेळ मिळतही नाही आणि ते थकव्यामुळे बरेचजण वेळ काढतही नाही. अनेक रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, सतत बसून काम करणाऱ्यांना हार्ट अटॅक धोका वाढतो. पण तरिही याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही. अशात ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनी कोणती एक्सरसाइज करावी? असा प्रश्नही नेहमी विचारला जातो. त्यामुळे आम्ही एका खास एक्सरसाइजची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जर तुम्ही बसून काम करत असाल आणि एक्सरसाइजसाठी नियमित वेळ काढू शकत नसाल तर एक अशी सोपी एक्सरसाइज आहे, ज्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. या एक्सरसाइजला जॅफर्सन कर्ल एक्सरसाइज असं नाव देण्यात आलं आहे. ही एक स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे. जास्त वेळ एकाच जागी बसून काम करणाऱ्यांचं शरीर आखडलं जातं. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर ठरू शकते.

सतत बसून काम केल्याने व्यक्तीची पाठ आणि मान खाली झुकते. जॅफर्सन कर्ल एक्सरसाइजने या समस्येपासून सुटका मिळू शकते. तसेच ऑफिसमध्ये बसून बसून काम करून गुडघे आणि कंबरही दुखायला लागते. या समस्याही या एक्सरसाइजने दूर होतील.

जॅफर्सन कर्ल एक्सरसाइजचे फायदे

जॅफर्सन कर्ल एक्सरसाइज कमी वेळात शरीराच्या अनेक मांसपेशीना एकाचवेळी आराम देते. ही एक्सरसाइज त्यांच्यासाठी फार फायदेशीर आहे, जे फार जास्तवेळ उभे राहून काम करतात किंवा जास्तवेळ बसून काम करतात. ज्यात जवळपास आपण सगळेच येतो. शरीराच्या मागच्या भागावर जॅफर्सन कर्ल एक्सरसाइज प्रभाव टाकते. ही एक्सरसाइज मानेपासून ते पायांच्या टाचांपर्यंत जाणाऱ्या सगळ्याच मांसपेशींवर दबाव आणते.

कॉम्प्युटरवर तासंतास टाइप करणे किंवा एकाच पोजिशनमध्ये बसल्याने मान आणि खांदे दुखायला लागतात. तसेच पाठ, कंबर आणि मांड्याही दुखायला लागतात. तसेच छातीमध्ये जास्त फॅट जमा होणे, खांदे वाकणे, मानेखाली वेदना होणे या सगळ्या बसून काम करणाऱ्यांना होणाऱ्या समस्या आहेत. यांच्यासाठी एक्सरसाइज अधिक फायदेशीर आहे.

कशी कराल एक्सरसाइज

ही एक्सरसाइज करण्यासाठी एका बेंचवर किंवा बॉक्सच्या काठावर उभे रहा. दोन्ही हातांमध्ये केटलबॉल घ्या. जर वजन नसेल तर केवळ हात हायांवर ठेवून उभे रहा.

सर्वातआधी चेहरा छातीकडे वळवा, या स्थितीत तुमची दाढी तुमच्या छातीला स्पर्श करेल याची काळजी घ्या. नंतर पाठ हळूहळू पुढच्या बाजूने बेन्ड करा आणि हातही बॉक्सच्या खालच्या दिशेने करावे.

या स्थितीत तुमचे दोन्ही हात बॉक्सच्या खाली, डोकं गुडघ्यांसमोर, पाय सरळ, कंबर वाकलेली असावी. तसेच हनुवटी छातीला आणि छाती मांड्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा. नंतर पुन्हा पूर्वस्थितीत यावे.

सुरूवातीला ही एक्सरसाइज चार ते पाच वेळा करावी. नंतर हळूहळू याचा वेळ वाढवावा. तसेच सुरूवातीला छाती मांड्यांना टेकवण्याचा जास्त प्रयत्न करू नका. जेवढं सहजपणे होत असेल तेवढं करा.

काय होईल फायदा?

या एक्सरसाइजच्या माध्यमातून शरीर पुढच्या बाजून आणि मागच्या बाजूने घेण्यास मांसपेशी ताणल्या जातात आणि दबावही पडतो. ज्यामुळे मांसपेशी स्ट्रेच आणि रिलीज या दोन्ही स्थितीतून जाते.

ही एक्सरसाइज केवळ पाठ आणि पायांच्या मसल्सना प्रभावित करते असे नाही तर छोट्या मसल्स, जॉइंट यांनाही आराम देते. तसेच याचा पाठीच्या कण्यावरही प्रभाव पडतो.

दिवसभर बसून राहिल्याने वाकलेली पाठ सरळ करण्यासाठी आणि पाठीच्या कण्याचा लवचिकपणा कायम ठेवण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर ठरते.

(टिप : वरील लेखातील सल्ले हे माहिती म्हणून देण्यात आले आहेत. ही एक्सरसाइज करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही एक्सरसाइज करा. अन्यथा समस्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.)

Published  

पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

सध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत एका जागेवर उभे राहिल्याने पायाला थकवा जाणवू लागतो. या परिस्थितीत घरगुती उपायांनी सुद्धा आराम मिळू शकतो. एखादे वेळी पायाचे दुखणे वाढूनते गुडघ्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे गुडघे दुखू लागतात.
अशा वेळी एक टेबल घेवून ऐक पाय जमिनीवर आणि दुसरा टेबलावर सरळ ठेवावा. पाठीत थोडं वाकून हाताने टेबलावरील पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. ही क्रिया पाच सेकंदांपर्यंत करावी. त्यानंतर पायाची अदला बदल करावी. हात पायाच्या अंगठ्यापर्यंत पोहोचले नाहीत, तरी ते शक्य तेवढे लांबावेत. पायांना नियमितपणे मालिश केल्यानेही पायांचा थकवा दूर होतो. मात्र मालिश करताना चांगल्या प्रकारचे कोल्ड क्रीम किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा. मालिशमुळे रक्तभिसरण उत्तम प्रकारे होवून स्नायूंना आराम मिळतो.

पायांवर अथवा पायांच्या बोटांना सूज आली असेल, तर कोमट पाण्यात थोडे मीठ टाकावे. त्या पाण्यात सुमारे दहा मिनटे पाय ठेवावेत. पायांची सूज आणि थकवा दोन्ही कमी होतात. पायांना थकवा जाणवू नये म्हणून खूप कडक किंवा उंच टाचांच्या चप्पल किंवा सँडल्स वापरणे टाळावे.

Published  

पायाची नस एकमेकांवर चढल्यास तात्काळ करा 'हे' उपाय

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

अनेकांना रात्रीत झोपेत पायाची नस एकमेकांवर चढण्याचा त्रास जाणवतो. एखादी नस एकमेकांवर चढल्यानंतर पायामध्ये असह्य वेदना जाणवतात. 2-5 मिनिटं हा त्रास जाणवत असला तरीही वेदना मात्र खूपवेळ जाणवतात. पायदुखीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी काही खास टीप्स लक्षात ठेवा.

का चढते एकमेकांवर नस ?

डायरिया, डाईयुरेटिक, मधूमेह, डिहायड्रेशन, अल्होहलचे अतिसेवन, थकवा, पार्किनसन्स असे आजार असणार्‍यांमध्ये नस एकमेकांवर चढते. यासोबतच रक्तदाबाचा त्रास किंवा गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही पायांवरील नस एकमेकांवर चढते.

वेदना कमी करण्यासाठी काय कराल?
पायात गोळा आल्यासारखा जाणवल्यास लगेजच हालचा करा. थोडा वेळ फेरफटका मारा.
उभं राहून हळूहळू हलवा.


उभं राहून किंवा बसून खेचल्या गेलेल्या भागाला मोकळं करा.
बसल्या जागी पाऊल घोट्याच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. काहीवेळ या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.
खूप तीव्र वेदना जाणवत असल्यास पायाखाली एखादी मोठी उशी ठेवा.

Dr. Sheetal Jadhav
Dr. Sheetal Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, Pune
Dr. Mayur Patil
Dr. Mayur Patil
BHMS, Family Physician General Physician, 5 yrs, Pune
Dr. Dr Anirudha Vaidya
Dr. Dr Anirudha Vaidya
MPTh, Neuro Physiotherapist Obesity Specialist, 7 yrs, Pune
Dr. Jyoti Kumari
Dr. Jyoti Kumari
BDS, Chest Physician Child Abuse Pediatrician, Ranchi
Dr. Sayali Shinde
Dr. Sayali Shinde
BAMS, Pune
Hellodox
x