Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

साधारणपणे थकल्यानंतर किंवा कंटाळा आला की आपण जांभई देतो. मात्र काही लोकांमध्ये पुरेशी झोप घेतल्यानंतरही वारंवार जांभाई देण्याची सवय असते. जांभई केवळ कंटाळा आल्याचे संकेत देत नाहीत तर यामागे काही आरोग्याशी निगडीत समस्यांचा धोकाही असतो. शरीरात वाढणार्‍या काही आजारांच्या धोक्याचे संकेत 'जांभई'मधून मिळतात. म्हणूनच तुम्हांलाही वारंवार जांभाई येत असल्यास 'या' आजारांचा धोका वाढतोय का? हे नक्की तपासून पहा.

कोणत्या आजारांचा असू शकतो धोका ?
1. एखाद्या व्यक्तीचं लिव्हर ( यकृत) बिघडले की त्यांना सतत थकवा जाणवतो. थकव्यामुळे जांभई येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे संबंधित त्रासाबद्दल वेळीच डॉक्टरांशी बोला.

2. तज्ञांच्या सल्ल्यानुसार, हृद्य आणि फुफ्फुसाच्या आजारामध्येही जांभई येण्याचं प्रमाण अधिक असते. हृद्य आणि फुफ्फुसाचं काम नीट होत नसल्यास यामुळे अस्थमाचा त्रास वाढू शकतो.


3. एका संशोधनानुसार, वारंवार जांभई येणं हे ब्रेन ट्युमरचेही संकेत देतात. ब्रेन ट्युमरमध्ये पिट्युटरी ग्लॅन्डवर ताण येतो परिणामी जांभई येण्याचं प्रमाण वाढतं.

4. ताणतणावामुळे रक्तदाबाचा त्रासही वाढतो. हृद्याची धडधड मंदावते. अशावेळेस मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही. जांभई द्वारा तोंडाद्वारा श्वास घेतला जातो. यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

खूप मेहनत घेऊन आणि घाम फुटल्यानंतरही जर आपलं वजन कमी होत नसेल तर आम्ही येथे असे काही उपाय सांगत आहोत ज्याने आपली कॅलरीज जलद बर्न होऊ लागेल.

नो इलेक्ट्रॉनिक्स

जर आपल्याला झोपण्यापूर्वी निरंतर फोन चेक करण्याची सवय असेल किंवा रात्री नाइट शो बघण्याची किंवा नेट सर्फ करण्याची तो हे तर काम बंद करावे. कारण यातून निघणार्‍या शॉर्ट वेवलेंथ ब्लु लाइट्स आपल्या बॉडीचे चयापचय क्रिया कमी होते. याने आपल्या मेटाबॉलिझममध्ये बदल होतो म्हणून इलेक्ट्रॉनिक्स बंद ठेवा.

नो दारू

रात्री झोपण्याच्या किमान 3 तासापूर्वी दारूचे सेवन करणे टाळावे. झोपताना अधिक कॅलरीज बर्न होती. म्हणून दारू पिऊन लगेच झोपल्यावर आपलं चयापचय क्रिया कमी होईल.

नो हेव्ही फूड

रात्री मसालेदार आणि भरपूर आहार घेतल्याने शरीराला ते पचविण्यासाठी जड जातं, याने चयापचय क्रिया कमी होते. झोपण्यापूर्वी जेवण पचले नाही त्याचं फॅट्समध्ये रूपांतरण होतं.

नो लाइट

पूर्ण पणे अंधारात झोपल्याने आपले शरीर अधिक मेलाटोनिन तयार करू पाईल. याने फॅट्स बर्न होण्यात मदत मिळते. लवकरच चांगली झोप येते.

कुलिंग

कूलिंगमध्ये झोपणारे 7 टक्के जलद गतीने कॅलरीज बर्न करतात. कारण थंड वातावरणातून सामान्य तापमान करण्यासाठी शरीर अधिक मेहनत घेतं ज्याने जलद गतीने कॅलरीज बर्न होऊ लागतात.

झोपण्याची वेळ

कमी झोप घेणार्‍यांचे वजनदेखील जलद गतीने वाढत जातं. म्हणून किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.

Dr. Ajaykumar Kumawat
Dr. Ajaykumar Kumawat
BHMS, Family Physician, 14 yrs, Pune
Dr. Vinay Shankar Gupta
Dr. Vinay Shankar Gupta
MS - Allopathy, Dermatologist Family Physician, 40 yrs, Shimla
Dr. Sucheta  Mokashi
Dr. Sucheta Mokashi
BDS, Dentist, 3 yrs, Pune
Dr. Nishant Vyavahare
Dr. Nishant Vyavahare
MDS, Dentist, 13 yrs, Pune
Dr. Manisha Garud
Dr. Manisha Garud
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Hellodox
x