Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.



नेफ्रोटिक सिन्ड्रोम :

किडनीच्या या रोगानुके कोणत्याही वयात रुग्णाच्या शरीरावर सूज येऊ शकते, परंतु मुख्यत्वेकरून हा रोग छोट्या मुलांत आढळून येतो. योग्य उपचाराने रोगावर संपूर्ण नियंत्रण मिळविल्यानंतरही पुन्हा सूज दिसणे आणि ती वर्षानुवर्ष चालू राहणे हे या रोगाचे वैशिष्ट आहे. बऱ्याच वेळा पुन्हा पुन्हा सूज येण्यामुळे हा रोग,रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांच्याकरिता चिंतेचा विषय होतो.

नेफ्रोटिक सिन्ड्रोममध्ये किडनीवर काय परिणाम होतो?
सोप्या भाषेत सांगायचे तर,किडणी शरीरात चाळणीचे काम करते. किडणीमुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ व अतिरिक्त पाणी लघवीद्वारे बाहेर फेकले जाते.
नेफ्रोटिक सिड्रोममध्ये किडनीची चाळणीसारखी असलेली भोके मोठी होतात , ज्यामुळे अतिरिक्त पाणी व उत्सर्जी पदार्थाबरोबर शरीराला आवश्यक प्रोटीन्सहि लघवीवाटे बाहेर पडतात,त्यामुळे शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते व शरीराला सूज यायला लागते. लघवीवाटे बाहेर जाणाऱ्या प्रोटीनच्या प्रमाणावर रुग्णांच्या शरीरावरील सुजेचे प्रमाण कमी जास्त होते. नेफ्रोटिक सिन्ड्रोममध्ये सूज असताना सुद्धा, अनावश्यक पदार्थ बाहेर फेकण्याची किडनीची कार्यक्षमता शाबूत राहते.अर्थातच किडणी खराब होण्याची शक्यता खूपच कमी असते.

नेफ्रोटिक सिंड्रोम कोणत्या कारणांमुळे होतो?
नेफ्रोटिक सिन्ड्रोम होण्याचे निश्चित कारण अजून सापडलेले नाही. श्वेतकणांमध्ये लिम्फोसाइटसच्या कार्याच्या अभावाने हा रोग होतो असे मानले जाते. आहारात बदल किंवा औषधांना यासाठी जबाबदार धरणे हे अत्यंत चुकीचे आहे.

नेफ्रोटिक सिन्ड्रोमची लक्षणे
- हा रोग मुख्यतः २ ते ६ वर्षाच्या मुलांमध्ये दिसून येतो. इतर वयाच्या व्यक्तींमध्ये ह्या रोगाची संख्या मुलांच्या तुलनेत कमी आढळून येते.
- सर्वसामान्य या रोगाची सुरुवात ताप व खोकल्याने होते.
- रोगाच्या सुरुवातीची खास लक्षणे म्हणजे डोळ्याखाली व चेहऱ्यावर सूज दिसणे. डोळ्यांच्या आजूबाजूला सूज दिसू लागल्यामुळे कित्येक वेळा रुग्ण प्रथम डोळ्यांच्या डॉक्टरांकडे तपासणीकरिता जातात.
- हि सूज जेव्हा रुग्ण सकाळी उठतो तेव्हा जास्त दिसते.ह्या रोगाची हि जणू ओळखच आहे. दिवस वर येतो तशी सूज हळूहळू कमी होऊ लागते आणि संध्याकाळी अगदीच कमी होते.
- रोग वाढल्यावर पोट फुगते,लघवीचे प्रमाण कमी होते, पूर्ण शरीराला सूज येते आणि वजन वाढते.
- कित्येक वेळा लघवीला फेस येणे, ज्या जागेवर लघवी झाली असते तिथे पांढरे डाग दिसणे अशी लक्षणे दिसून येतात.
- या रोगात लघवी लाल रंगाची होणे, धाप लागणे किंवा रक्तदाब वाढणे अशी लक्षणे आढळून येत नाहीत.

नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये कोणते गंभीर धोके उत्पन्न होऊ शकतात?
नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये असामान्यरित्या दिसणारे गंभीर धोके म्हणजे पोटात जंतुसंसर्ग (Peritonits),मोठ्या शिरेत (मुख्यतः पायाची) रक्त साकाळने (Venous Thrombosis ) इ.
नेफ्रोटिक सिंड्रोमचे निदान

1 . लघवीची तपासणी
- लघवीतून अधिक प्रमाणातून प्रोटीन जाणे नेफ्रोटिक सिंड्रोमच्या निदानाचा सर्वात महत्वाचा संकेत आहे.
- लघवीतून रक्तकण,श्वेतकण किंवा रक्त न जाणे हाही ह्या रोगाच्या निदानाचा महत्वपूर्ण संकेत आहे.
- २४ तासात लघवीतून जाणाऱ्या प्रोटीनची एकूण मात्रा ३ ग्रँमपेक्षा अधिक असते.
- लघवीची तपासणी केवळ रोगाच्या निदानासाठी नव्हे तर रोग्याची उपचारपद्धती ठरवण्याकरिताही महत्वाची असते. लघवीतून जाणारे प्रोटीन जर बंद झाले तर उपचार यशस्वी झाला असे सिद्ध होते.

2 . रक्ताची तपासणी
सामान्य तपासणी: बऱ्याचशा रुग्णांत हिमोग्लोबिन , श्वेतकणांची मात्रा इ.ची तपासणी आवश्यकतेनुसार केली जाते.

निदानाकरता आवश्यक तपासणी: नेफ्रोटिक सिंड्रोमच्या निदानासाठी रक्त तपासणीत प्रोटीन (अल्बूमीन) कमी असणे व कोलेस्टॉल वाढलेले असणे आवश्यक आहे.सामान्यतः रक्त तपासणीत क्रिअँटीनिनचे प्रमाण सर्वसाधारण असल्याचे आढळते.

अन्य विशिष्ट तपासणी: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेप्रमाणे बऱ्याच वेळा कराव्या लागणाऱ्या रक्ताच्या विशेष तपासन्यांमध्ये कॉम्प्लिमेंट ,ए.एस,ओ.टाइटर ,ए,एन .ए.टेस्ट ,एड्सची तपासणी,हिपेटाइटीस ची तपासणी यांचा समावेश असतो.

3 . रेडीओलॉजिकल तपासणी

या तपासणीत पोटाची ,किडनीची सोनोग्राफी , छातीचा एक्सरे यांचा समावेश असतो.

नेफ्रोटिक सिंड्रोमसाठी उपचार: नेफ्रोटिक सिंड्रोमच्या उपचारांत आहाराचे पथ्य,विशेष काळजी आणि आवश्यक औषधे घेणे अत्यंत महत्वपूर्ण आहे.

1. आहारात पथ्य पाळणे :
शरीरावर सूज असल्यास व लघवीचे प्रमाण कमी असल्यास रुग्णाला पाणी व मीठ कमी घेण्याचा सल्ला दिला जातो. बहुतेक मुलांना प्रोटीन सामान्य प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो.

२. संसर्गावर उपचार व संसर्गापासून बचाव :
- नेफ्रोटिक सिंड्रोमचे विशेष उपचार सुरु करण्याच्या आधी मुलांच्यात जर कोणता संसर्ग झाला असेल,तर अशा संसर्गावर प्रथम नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. नेफ्रोटिक सिंड्रोमने पिडीत मुलांमध्ये सर्दी ,ताप वगैरे प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. उपचार चालू असताना संसर्ग झाल्यास रोग बळावू शकतो,म्हणूनच उपचार चालू असतात संसर्ग होऊ न देणे याची विशेष खबरदारी घेणे व संसर्ग झाल्यास त्वरित व ठाम उपचार करणे आवश्यक आहे.

3 . औषधांद्वारे उपचार
सामान्य उपचार :
- सुजेवर लवकरात नियंत्रण मिळवण्याकरता लघवी जास्त प्रमाणात होईल अशी औषधे (डाययुरेटिक्स) थोड्या काळाकरता देण्यात येतात .


विशिष्ट उपचार :
- नेफ्रोटिक सिंड्रोमला काबूत आणण्यासाठी सर्वात जास्त प्रचलित व परिणामकारक औषधे आहे प्रेडनिसोलॉन ! हे स्टेरॉइड वर्गातील औषध आहे. जर या औषधाने परिणाम झाला नाही तर इतर औषधांचा वापर केला जातो.
- प्रेड्नीसोलॉन लघवीतून जाणाऱ्या प्रोटीनवर नियंत्रण ठेवणारे परिणामकारक औषधे आहे.हे औषधे किती द्यायचे हे मुलाचे वजन व रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर निश्चित करतात.
- हे औषधे किती काळाकरिता आणि कशा प्रकारे घ्यायचे हे तज्ञ डॉक्टर ठरवितात . या औषधाच्या सेवनाने बहुतांशी रुग्णांमध्ये एक ते चार आठवड्यात लघवीतून प्रोटीन जाने बंद होते.
- प्रेडनिसोलॉन औषधाचे दुष्परिणाम ( Side effects) काय असतात? प्रेडनिसोलॉन नेफ्रोटिक सिंड्रोमच्या उपचाराचे मुख्य औषध आहे.

1. परंतु या औषधाचे साइड इफेक्ट्सहि आहेत. या दुष्परिणामांचा प्रभाव कमी करण्यासाठी हे औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने व त्यांच्या देखरेखीखाली घेणेच योग्य आहे.
2. प्रेडनीसोलॉनमुळे थोड्याच काळात दिसणारे दुष्परिणाम :
अधिक भूक लागणे,वजन वाढणे, अँसीडीटी होणे,पोटात व छातीत जळजळने ,स्वभाव चिडचिडा होणे, संसर्ग होण्याची शक्यता वाढणे,रक्तदाब वाढणे इत्यादी .

प्रेडनीसोलॉनमुळे बऱ्याच काळानंतर दिसणारे दुष्परिणाम :
मुलांचा विकास कमी होणे (उंची न वाढणे) , हाडे कमजोर होणे,चामडी सैल पडल्याने मांड्या व पोटाच्या खालील भागावर गुलाबी चट्टे पडणे,मोतीबिंदू होण्याची भीती असणे.

- इतक्या विपरीत परिणामांना जबाबदार असलेले प्रेडनीसॉल औषधे घेणे मुलांसाठी फायदेशीर असते का?
1. होय. सर्वसाधारण हे औषधे जास्त प्रमाणात , बराच काळ घेतल्यानंतर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात आणि कमी कालावधीकरीता हे औषधे घेतले,तर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कमी व कमी काळ असते.

2. औषधे जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीखाली घेतले जाते. तेव्हा गंभीर व विपरीत परिणामांच्या लक्षणांचे निदान त्वरित होते व त्वरित उपचारही करून त्या परिणामांना कमी केले जाते किंवा थांबवताही येते.

3. तरीही रोगामुळे होणारा त्रास आणि धोक्याच्या तुलनेत , औषधाचे विपरीत परिणाम कमी हानिकारक असतात. म्हणूनच जास्त फायद्यासाठी थोडे विपरीत परिणाम स्वीकारण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. बऱ्याच मुलांमध्ये उपचारांच्या दरम्यान तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात , लघवीतून प्रोटीन जाणे बंद झाल्यावरसुद्धा सूज राहते. असे का?

4. प्रेडणीसोलॉनच्या सेवनाने भूक वाढते. जास्त खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जमा होते, ज्यामुळे तीन-चार आठवड्यात परत सूज आली असे वाटते.

- रोगामुळे येणारी सूज आणि चरबी जमा झाल्यामुळे सूज आल्यासारखे वाटणे या दोन्हीतील फरक कसा ओळखनार?
नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये रोग बळावला कि, साधारणतः डोळ्यांखाली चेहऱ्यावर सूज दिसते.ती सूज सकाळी जास्त व संध्याकाळी कमी होते. त्याचबरोबर पायावरपण सूज येते. औषध घेतल्यामुळे नेहमी चेहरा , खाद्ये आणि पोटावर चरबी जमा होते, ज्यामुळे तिथे सूज असल्यासारखे दिसते. हि सूज दिवसभर समान प्रमाणात दिसते.

डोळे व पायाची सूज न्स्मे,चेहऱ्याची सूज सकाळी जास्त व संध्याकाळी कमी न होणे ,हि सुजेची लक्षणे नेफ्रोटीक सिंड्रोममुळे नाही हे दर्शवतात.

- नेफ्रोटिक सिंड्रोममुळे येणारी सूज आणि औषधाने चरबी जमा होऊन सूज आल्यासारखे वाटणे यातील फरक जाणून घेणे आवश्यक का आहे?
रुग्णाला योग्य उपचार ठरवण्याकरिता सूज येणे व सूज आल्यासारखे वाटणे यातील फरक जाणून घेणे आवश्यक आहे.

1 - नेफ्रोटिक सिंड्रोममुळे जर सूज आली असेल , तर औषधाच्या मात्रेत वाढ किंवा बदलाबरोबरच लघवीचे प्रमाण वाढविणाऱ्या औषधांची आवश्यकता असते.
2 - प्रेडणीसोलॉन ह्या औषधाच्या नियमित सेवनाने ,चरबी जमा झाल्यामुळे सूज असल्यासारखी वाटते, ज्यामुळे रोग आटोक्यात नाही किंवा रोग वाढलाय अशी काळजी करण्याचे कारण नाही . काही काळानंतर प्रेडणीसोलॉन औषधाचे प्रमाण कमी झाल्यावर , सूज काही आठवड्यात हळूहळू कमी होऊन पूर्णपणे जाते. अशा औषधांमुळे आलेल्या सुजेवर त्वरित सूज कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे औषध घेतले तर ते रुग्णाला हानिकारक होऊ शकते.

- प्रेडणीसोलॉन औषधाने फरक न पडल्यास ,इतर कोणती औषध उपयोगी पडतात?
नेफ्रोटिक सिंड्रोममुळे वापरण्यात येणाऱ्या अन्य औषधांमध्ये लीव्हामीझॉल मिथाइल प्रेडणीसोलॉन औषधाने ,सायक्लोफॉस्फेसाइड ,सायक्लोस्पोरीन , एम.एम.एफ.इ. औषधांचा समावेश आहे.

- नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये मुलांच्या किडनीची बायोप्सी केव्हा केली जाते?
खालील परिस्थितीत बायोप्सी केली जाते.

1. रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्त प्रमाणात आणि जास्त काळ प्रेडणीसोलॉन घ्यावे लागत असेल.
2. प्रेडणीसोलॉन घेऊनही रोग नियंत्रणात येत नसेल.
3. खूपशा मुलांमध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम होण्यास ‘मिनिमल चेंज डिसीज’ हा रोग कारणीभूत असतो. परंतु काही मुलांमध्ये हा रोग ‘ मिनिमल चेंज डिसीजमुळे झाला नसेल अशी शंका असेल (लघवीत रक्तकणांची उपस्थिती .रक्तात क्रिअँटिनीनचे प्रमाण जास्त आढळणे , कॉम्प्लिमेंट(c- 3)चे प्रमाण कमी होणे इ . तेव्हा बायोप्सी करणे आवश्यक असते.
4. जेव्हा हा रोग मोठ्यांमध्ये आढळतो, तेव्हा साधारणतः उपचारांपूर्वी किडनीची बायोप्सी करण्यात येते.

- नेफ्रोटिक सिंड्रोमच्या उपचारावर नेफ्रोलॉजिस्ट नियमन कसे करतात?
योग्य नियमनासाठी तज्ज्ञांनियमित तपासणी करून घेणे जरुरी आहे. तपासणीमधील संसर्गाचा परिणाम , रक्तदाब , वजन, लघवीतील प्रोटीनचे प्रमाण आणि आवश्यक असल्यास रक्ताची तपासणी केली जाते.या माहितीच्या आधारे डॉक्टर औषधामध्ये योग्य तो बदल करू शकतात.

- नेफ्रोटिक सिंड्रोम केव्हा बरा होतो?
योग्य उपचारानंतर बहुतांश मुलांमध्ये लघवीतून अल्युमिन जाने बंद होते आणि रोग थोड्याच काळात काबूत येतो. परंतु काही काळानंतर जवळजवळ सगळ्या मुलांमध्ये पुन्हा हा रोग व सूज दिसू लागते आणि अशा वेळी पुन्हा उपचारांची गरज भासते. जसजसे वय वाढते, तसतशी रोग पुन्हा उपचारांची गरज भासते. जसजसे वय वाढते, तसतशी रोग पुन्हा उपटण्याची प्रक्रिया मंदावते. ११ ते १४ वर्षादरम्यान बऱ्याचशा मुलांमध्ये हा रोग पूर्णपणे बरा होतो.



नेफेरिटिस (मूत्रपिंडदाह)

हा रोग तीव्र व दीर्घकालीन अशा दोन स्वरूपांत नजरेस येतो. दोन्ही प्रकारच्या दाहांचीं साधारण लक्षणेंः- लघवींतून आल्ब्यूमिन नांवाचा सात्त्विक पदार्थ जाणें व त्याबरोबर रक्त व मूत्रनळयाच्या खरपुडया जाणें, जलोदर, रक्तशय व रक्तवाहिन्या यांत होणारा बदल, नेत्रांतील विकृति व मूत्रविषशोषण हीं आहेत. या रोगाचा पूर्ण शोध इंग्लंडांतील डॉक्टर ब्राइट यानें लाविला.

तीव्र दाहाचीं लक्षणें:
सर्दीमुळें प्रथम थंडी वाजून मोठा ताप योते, व डोकें दुखतें. चैन पडत नाहीं, घेर्या येतात; आणि उलटया होतात. कुशींत आणि पाठींत मूत्रपिंडाच्या ठिकाणीं वेदना होऊं लागतात. वृषणास सूज येऊन पीडा होते व त्यांतील गोळी कधीं वर चढते. कालचाल केल्यानें दुःख जास्त वाढतें. तहान फार लागते व शौचास अवरोध होतो. पुष्कळ वेळां लघवी करण्याची इच्छा होते परंतु ती अगदीं थोडी आणि अति लाल अगर काळसर लाल रंगाची होते.

रोगकालात पुढील उपद्रव उद्भवण्याची शक्यता असते :
न्यूमोनिया, मूत्रपिंडदाह, मध्यकर्णशोथ (बहिरेपणास कारणीभूत असतो), लालापिंडशोथ, ऊरुरक्तवाहिनीक्लथन(मांडीतील रक्तवाहिन्यांतील रक्ताची गुठळी बनून रक्तप्रवाह बंद पडणे), पायातील बोटांचा कोथ (बोटातील मऊ कोशिका समूहांचा नाश होणे).

निदान :
टिकून राहिलेल्या ज्वरामुळे विशिष्ट पुरळ उठविण्यापूर्वी आंत्रज्वराची शंका येण्याची शक्यता असते. ⇨ मस्तिष्कावरण शोथ, देवी, कांजिण्या, इतर प्रकारचे रिकेट्सियाजन्य रोग, इन्फ्ल्यूएंझा इ. रोगांशी या रोगाचे काहीसे साम्य असते. विशिष्ट रक्तपरीक्षा निदानास उपयुक्त असतात. यांपैकी पूरक-बंधी परीक्षा आणि व्हाइल-फेलिक्स परीक्षा नेहमी उपयोगात आहेत. पूरक बंधन करणारे प्रतिपिंड [प्रतिपिंड] रोग्याच्या रक्तात आजाराच्या सातव्या ते बाराव्या दिवसापासून तयार होतात. बाजारात तयार मिळणाऱ्या विशिष्ट प्रतिजनाबरोबर [ प्रतिजन] यांची प्रतिक्रिया तपासून हे प्रतिपिंड ओळखता येतात व रोगनिदान करता येते.

ऑस्ट्रियन वैद्य ई. व्हाइल आणि प्राग येथील सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ आ. फेलिक्स यांनी १९१५ मध्ये पोलंडमधील या साथीच्या रोगावर संशोधन करून निदानास उपयुक्त ठरलेली परीक्षा शोधली व ती त्यांच्या नावानेच ओळखली जाते. प्रोटियस व्हल्गॅरिस नावाच्या सूक्ष्मजंतूंचे समूहन करू शकणारी विशिष्ट समूहके (प्रतिजन द्रव्ये) या रोगाच्या रुग्णाच्या रक्तद्रवात असतात. या व्हाइल व फेलिक्स यांच्या शोधावर ही परीक्षा आधारलेली आहे. रोगाच्या सातव्या ते अकराव्या दिवसांमधील रक्तद्रव आणि प्रोटियस सूक्ष्मजंतूंचा विशिष्ट प्रकार (प्रलापक सन्निपात ज्वर निदानाकरिता ओ-एक्स १९ प्रकार) यांच्या मिश्रणातील सूक्ष्मजंतू समूहनाची तपासणी करतात.

रोगनिदान
मूत्रपिंडदाह या आजाराची लक्षणे सहज कळून येतात. यात चेहऱ्यावर सूज (विशेषतः सकाळी), लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवी लालसर होणे, धुरकट लालसर लघवी होणे ही प्रमुख लक्षणे आहेत.

अशा मुलांमध्ये चेहऱ्यावर सूज, लघवी कमी होणे या खाणाखुणा दिसतात. त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. तपासणीत अशा रुग्णांचा रक्तदाब वाढलेला दिसतो. लघवीत प्रथिने व रक्तपेशी दिसतात. एकूण लघवीचे 24 तासांतले प्रमाण नेहमीपेक्षा कमी (कधीकधी अर्धा लिटरच्या आसपास) आढळते. याबरोबरच कधीकधी ताप, पोटदुखी, उलटी, डोकेदुखी, इत्यादी त्रास आढळतो. डॉक्टरकडून योग्य उपचारानंतर बहुधा हा आजार आटोक्यात येतो. रोगनिदान होण्यात उशीर झाला तर मात्र धोका संभवतो.

तोंडावर सूज येऊन, पावलावरही सूज आली असल्यास मूत्रप्रवृत्ती होण्यासाठी पातळ औषधे देण्यापेक्षा सुंठ, मिरी, पिंपळी, आले यांचा वापर उपयोगी असतो. पुनर्नवासव दोन चमचे + दोन चमचे पाणी, दोन वेळा, सात ते दहा दिवस देतात. त्रिकटूचूर्ण दीड ग्रॅ. ते दोन ग्रॅम सकाळ-संध्याकाळ तीन दिवस द्यावे; पचनाची शक्ती कमी असल्यास याचा उपयोग होतो. हाताच्या अंगठयाइतके आले व तेवढाच गूळ सकाळी रिकाम्या पोटी घेणे (7 ते 14 दिवस). हे अगदी थोडीथोडी सूज असताना चांगले उपयोगी पडते.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



किडनीविकार

मानवी शरिरातून टाकाऊ घटक बाहेर टाकण्याचे प्रमुख काम मुत्रसंस्था (किडनी) करते.
मूत्रपिंडात असलेल्या असंख्य सूक्ष्म गाळण्यांमधून पाणी व टाकाऊ घट्क गाळल्यानंतर शरिरात मुत्राची निर्मिती होते. वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालू राहत असल्याने अंदाजे वयाच्या तिशी ते चाळीशीनंतर नैसर्गिकरित्या किडनीचे कार्य मंदावते. तिशीनंतर दर दहा वर्षांनी किडनीचे कार्य 10% नी मंदावत जाते. मात्र वयाच्या सुरवातीच्या ट्प्प्यातच किडनीवर अतिरिक्त ताण दिला जात असेल , तर शरिरात किडनीविकार लवकर बळावण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच वेळीच किडनीची काळजी घेण्यासाठी हे ’10’ उपाय नक्की करून पहा.

1) मधुमेह , उच्च रक्तदाब व ह्र्दयरोग काबुत ठेवा :
मधुमेह , उच्च रक्तदाब व ह्र्दयरोग यासारख्या आजारांतून ‘किडनीविकार’ बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच योग्य आहार , व्यायाम व योगसाधनेने तुम्ही रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपोआपच किडनीविकार दूर राहण्यास मदत होईल.

2) अतिप्रमाणात मीठ खाऊ नका :
मीठाच्या सेवनाने शरिरात सोडियमचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तदाबाची समस्या तर वाढतेच , पण त्या सोबतच मुतखडा होण्याचीही शक्यता अधिक असते.

3) रोज भरपूर पाणी प्या:
नियमित भरपूर पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य रहते व विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासही मदत करते. पाण्यामुळे शरिरात रक्त योग्यप्रकारे प्रवाहित राहते. तसेच पचनक्रिया व शरिराचे तापमान योग्य राखण्यास पाणी मदत करते. म्हणूनच नियमित 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

4) लघवी अडवू नका :
शरिरातील विविध गाळण्यांमधून रक्त गाळल्यानंतर त्यातील टाकाऊ घटक शरीराबाहेर टाकण्याचे प्रमुख काम किडनी करते. हे शरीरातील टाकाऊ घटक व अतिरिक्त पाणी मुत्राशयात साठून राहतात. अंदाजे १२०- १३०मिली मुत्र मुत्राशयात साचल्यानंतर शरीर हे लघवीची इच्छा निर्माण करून ते मुत्रमार्गे शरिरातून बाहेर टाकते. अशावेळेस लघवी अडवून ठेवू नका याचा त्राण मुत्राशयावर होऊन तुमच्या रक्त गाळल्याच्या प्रक्रियेत बिघाड होऊ शकतो.

5) योग्य आहार घ्या :
तुम्ही काय आहार घेता , यावर तुमचे आरोग्य अवलंबून आहे. जर तुम्ही फ़ास्ट्फ़ूड, जंकफूड यासारखे अपायकारी अन्नपदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम किडनीवर निश्चितच दिसून येतो. म्हणुनच योग्य व सकस आहार निवडा. तुमच्या आहारात कलिंगड, संत्र,लिंबू यासरखी फळं व शतावरी,मासे, लसुण यांचा समावेश ठेवा. यामुळे तुमच्या किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

6) धुम्रपान व मद्यपान टाळा :
अतिरिक्त प्रमाणात मद्यपान केल्यास शरीरात किडनीचे कार्य सुरळीत करणार्‍या हार्मोन्सवर त्याचा दुष्परिणाम होतो. धुम्रपानामुळे थेट किडनीवर परिणाम होत नसला तरीही त्यामुळे हृद्यरोग बळावण्याची शक्यता अधिक असते ,व त्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होतो.

7) योग्य व्यायाम करा :
संशोधकांच्या मते, लठ्ठ्पणाचा थेट परिणाम किडनीवर होत असतो. वजन नियंत्रणात नसल्यास किडनीविकार होण्याची शक्यता दुप्पटीने वाढते. योग्य व्यायाम , आहार व नियंत्रणात असलेले वजन यांमुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. तसेच नियमित व्यायाम केल्याने तुम्ही प्रसन्न रहता.

8) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे टाळा :
तुम्ही घेतलेले कोणतेही औषध हे किडनीतून गाळले जाते. जर तुम्ही स्वतःच औषधांची मात्रा वाढवली किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अन्य औषधे घेतल्यास त्यातील विषारी घटकांचा भार किडनीवर पडतो. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांची मात्रा घ्या व स्वतःच स्वतःची औषधं ठरवणे टाळा.

9)supplements व हर्बल औषधं घेण्यापुर्वी विचार करा :
जर तुम्ही पुरक (supplements ) व्हिटामिन किंवा हर्बल औषधं घेत असाल तर त्याच्या मात्रांचा जरूर विचार करा. अतिरिक्त प्रमाणात घेतलेल्या व्हिटामिन व काही वनस्पतींच्या अर्कांचा किडनीवर विपरित परिणाम होतो. म्हणूनच अशी औषधं घेण्यापुर्वी डॉक्टरांशी त्यातून किडनीविकार उद्भवण्याच्या शक्यतेबाबत जरूर सल्ला घ्या.

10) आरोग्यदायी पेयं घ्या:
ताजा रस घेणे हे किडनीचे आरोग्य सुधारण्याचा व शरीरात अधिकाधिक द्रव्याचा समावेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. यामुळे पचनसंस्थेला त्यामधून अधिकाधिक पाणी मिळेल व त्यामुळे टाकाऊ घटक शरिराबाहेर टाकण्यास मदत होईल. ‘चहा’ व ‘कॉफी’ घेणे टाळा. यातील ‘कॅफिन’च्या घटकामुळे शरिरातील द्रव्याचे प्रमाण कमी होते.

जर तुम्हाला किडनीविकार असेल तर बीट व पालक या भाज्यांचा रस घेणे टाळा. या भाज्यांमुळे ‘ऑझॅलिक’ अ‍ॅसिडची निर्मिती वाढते व त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता वाढते. पण तुम्ही शहाळ्याचे पाणी अवश्य पिऊ शकता.‘किडनीविकार’ हे सायलंट किलर असल्याने बर्‍याचदा अंतिम रुपात पोहचल्यानंतर त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने दिसून येतात म्हणूनच किडनीविकाराच्या या लक्षणांना दुर्लक्षित करू नका.

किडनी निकामी होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. अनेकांना अचानक जेव्हा या गोष्टीची माहिती तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की असं का झालं. जाणून घ्या काय आहे किडनी खराब होण्यामागची कारणे...

1. जास्त मीठ खाणं
जास्त प्रमाणात मीठ खाल्याने त्याचा किडनीवर परिणाम होतो. मीठमध्ये सोडियम असतं ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. ज्याचा परिणाम किडनीवर होतो.

2. नॉनवेज खाणं
मटणमध्ये मोठ्य़ा प्रमाणात प्रोटीन असतं. पण जास्त प्रमाणात प्रोटीन डाइट घेतल्याने त्याचा परिणाम किडनीवर होतो. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील वाढू शकते.


3. औषधांचं जास्त प्रमाण
छोट्या-छोट्या समस्यांवर अँटीबायोटिक किंवा पेनकिलर घेण्याची सवय किडनीवर परिणाम करतो. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये.

4. मद्यपान करणं
नियमित दारु पिल्याने त्याचा परिणाम किडनीवर होतो. लिवर आणि किडनीवर दारुचा विपरीत परिणाम होतो. कोल्ड ड्रिंक देखील किडनीसाठी हानिकारक आहे.

5. सिगरेट किंवा तंबाखू
सिगरेट किंवा तंबाखू हे देखील शरिरासाठी तितकच हानिकारक आहे. याच्या सेवनाने टॉक्सिंस जमा होतात. ज्यामुळे किडनी डॅमेज होते. याच्यामुळे बीपी देखील वाढतो. ज्यामुळे किडनी फेल होऊ शकते.

6. यूरिन थांबवून ठेवणे
लघवी थांबवून ठेवल्यामुळे ब्लॅडर फुल होतं. यूरिन रिफ्लॅक्सच्या समस्येमुळे किडनीवर जोर येतो. यामुळे बॅक्टेरिया किडनीला इंफेक्शन करतात.

7. पाणी कमी किंवा जास्त पिणे
रोज 8-10 ग्लास पाणी पिणे खूप आवश्यक आहे. यामुळे शरीरातील टॉक्सिंस बाहेर पडतात. टॉक्सिंसचा किडनीच्या क्रियेवर परिणाम होतो. पण जास्त पाणी पिल्याने देखील त्याचा किडनीवर दबाव येतो आणि किडनी खराब होण्याची शक्यता असते.

8. जास्त प्रमाणात खाणे
सामान्य लोकांच्या तुलनेत किडनी खराब होण्याचं प्रमाण जाड व्यक्तींमध्य़े अधिक असतं. पोट भरुन खाणे किंवा मर्यादेपेक्षा अधिक खाणे यामुळे किडनीवर याचा परिणाम होतो.

9. पूर्ण झोप न घेणे
रोज 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक असतं. कमी झोप घेतल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीज सारख्या समस्या उद्भवतात. यामुळे किडनीवर परिणाम होतो.

1. मूत्र विसर्जन टाळणे

2. हाय बीपी उपचारात निष्काळजीपणा

3. अती प्रमाणात मिठाचे सेवन

4. रोज 8 ग्लासापेक्षा कमी पाणी पिणे

5. मधुमेहाचे उपचार योग्यरीत्या न करणे

6. अती प्रमाणात पेनकिलर घेणे

7. अती प्रमाणात मीट खाणे

8. अती प्रमाणात दारू पिणे

9. आराम न करणे

10. अधिक प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा सेवन करणे

Dr. Smita Shah
Dr. Smita Shah
MD - Allopathy, Obstetrics and Gynecologist, 29 yrs, Pune
Dr. Snehal Pharande
Dr. Snehal Pharande
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 12 yrs, Pune
Dr. Meghana Karande
Dr. Meghana Karande
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 1 yrs, Pune
Dr. Neha  Khandelwal
Dr. Neha Khandelwal
BHMS, Homeopath Family Physician, 5 yrs, Pune
Dr. Sonali Chavan
Dr. Sonali Chavan
BHMS, Homeopath, 10 yrs, Pune
Hellodox
x