Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consultकिडनीविकार

मानवी शरिरातून टाकाऊ घटक बाहेर टाकण्याचे प्रमुख काम मुत्रसंस्था (किडनी) करते.
मूत्रपिंडात असलेल्या असंख्य सूक्ष्म गाळण्यांमधून पाणी व टाकाऊ घट्क गाळल्यानंतर शरिरात मुत्राची निर्मिती होते. वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालू राहत असल्याने अंदाजे वयाच्या तिशी ते चाळीशीनंतर नैसर्गिकरित्या किडनीचे कार्य मंदावते. तिशीनंतर दर दहा वर्षांनी किडनीचे कार्य 10% नी मंदावत जाते. मात्र वयाच्या सुरवातीच्या ट्प्प्यातच किडनीवर अतिरिक्त ताण दिला जात असेल , तर शरिरात किडनीविकार लवकर बळावण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच वेळीच किडनीची काळजी घेण्यासाठी हे ’10’ उपाय नक्की करून पहा.

1) मधुमेह , उच्च रक्तदाब व ह्र्दयरोग काबुत ठेवा :
मधुमेह , उच्च रक्तदाब व ह्र्दयरोग यासारख्या आजारांतून ‘किडनीविकार’ बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच योग्य आहार , व्यायाम व योगसाधनेने तुम्ही रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपोआपच किडनीविकार दूर राहण्यास मदत होईल.

2) अतिप्रमाणात मीठ खाऊ नका :
मीठाच्या सेवनाने शरिरात सोडियमचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तदाबाची समस्या तर वाढतेच , पण त्या सोबतच मुतखडा होण्याचीही शक्यता अधिक असते.

3) रोज भरपूर पाणी प्या:
नियमित भरपूर पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य रहते व विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासही मदत करते. पाण्यामुळे शरिरात रक्त योग्यप्रकारे प्रवाहित राहते. तसेच पचनक्रिया व शरिराचे तापमान योग्य राखण्यास पाणी मदत करते. म्हणूनच नियमित 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

4) लघवी अडवू नका :
शरिरातील विविध गाळण्यांमधून रक्त गाळल्यानंतर त्यातील टाकाऊ घटक शरीराबाहेर टाकण्याचे प्रमुख काम किडनी करते. हे शरीरातील टाकाऊ घटक व अतिरिक्त पाणी मुत्राशयात साठून राहतात. अंदाजे १२०- १३०मिली मुत्र मुत्राशयात साचल्यानंतर शरीर हे लघवीची इच्छा निर्माण करून ते मुत्रमार्गे शरिरातून बाहेर टाकते. अशावेळेस लघवी अडवून ठेवू नका याचा त्राण मुत्राशयावर होऊन तुमच्या रक्त गाळल्याच्या प्रक्रियेत बिघाड होऊ शकतो.

5) योग्य आहार घ्या :
तुम्ही काय आहार घेता , यावर तुमचे आरोग्य अवलंबून आहे. जर तुम्ही फ़ास्ट्फ़ूड, जंकफूड यासारखे अपायकारी अन्नपदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम किडनीवर निश्चितच दिसून येतो. म्हणुनच योग्य व सकस आहार निवडा. तुमच्या आहारात कलिंगड, संत्र,लिंबू यासरखी फळं व शतावरी,मासे, लसुण यांचा समावेश ठेवा. यामुळे तुमच्या किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

6) धुम्रपान व मद्यपान टाळा :
अतिरिक्त प्रमाणात मद्यपान केल्यास शरीरात किडनीचे कार्य सुरळीत करणार्‍या हार्मोन्सवर त्याचा दुष्परिणाम होतो. धुम्रपानामुळे थेट किडनीवर परिणाम होत नसला तरीही त्यामुळे हृद्यरोग बळावण्याची शक्यता अधिक असते ,व त्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होतो.

7) योग्य व्यायाम करा :
संशोधकांच्या मते, लठ्ठ्पणाचा थेट परिणाम किडनीवर होत असतो. वजन नियंत्रणात नसल्यास किडनीविकार होण्याची शक्यता दुप्पटीने वाढते. योग्य व्यायाम , आहार व नियंत्रणात असलेले वजन यांमुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. तसेच नियमित व्यायाम केल्याने तुम्ही प्रसन्न रहता.

8) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे टाळा :
तुम्ही घेतलेले कोणतेही औषध हे किडनीतून गाळले जाते. जर तुम्ही स्वतःच औषधांची मात्रा वाढवली किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अन्य औषधे घेतल्यास त्यातील विषारी घटकांचा भार किडनीवर पडतो. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांची मात्रा घ्या व स्वतःच स्वतःची औषधं ठरवणे टाळा.

9)supplements व हर्बल औषधं घेण्यापुर्वी विचार करा :
जर तुम्ही पुरक (supplements ) व्हिटामिन किंवा हर्बल औषधं घेत असाल तर त्याच्या मात्रांचा जरूर विचार करा. अतिरिक्त प्रमाणात घेतलेल्या व्हिटामिन व काही वनस्पतींच्या अर्कांचा किडनीवर विपरित परिणाम होतो. म्हणूनच अशी औषधं घेण्यापुर्वी डॉक्टरांशी त्यातून किडनीविकार उद्भवण्याच्या शक्यतेबाबत जरूर सल्ला घ्या.

10) आरोग्यदायी पेयं घ्या:
ताजा रस घेणे हे किडनीचे आरोग्य सुधारण्याचा व शरीरात अधिकाधिक द्रव्याचा समावेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. यामुळे पचनसंस्थेला त्यामधून अधिकाधिक पाणी मिळेल व त्यामुळे टाकाऊ घटक शरिराबाहेर टाकण्यास मदत होईल. ‘चहा’ व ‘कॉफी’ घेणे टाळा. यातील ‘कॅफिन’च्या घटकामुळे शरिरातील द्रव्याचे प्रमाण कमी होते.

जर तुम्हाला किडनीविकार असेल तर बीट व पालक या भाज्यांचा रस घेणे टाळा. या भाज्यांमुळे ‘ऑझॅलिक’ अ‍ॅसिडची निर्मिती वाढते व त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता वाढते. पण तुम्ही शहाळ्याचे पाणी अवश्य पिऊ शकता.‘किडनीविकार’ हे सायलंट किलर असल्याने बर्‍याचदा अंतिम रुपात पोहचल्यानंतर त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने दिसून येतात म्हणूनच किडनीविकाराच्या या लक्षणांना दुर्लक्षित करू नका.

मानवी शरीरातून टाकाऊ घटक बाहेर टाकण्याचे मुख्य काम मूत्रसंस्था (किडनी) करते, हे आपण पाहिले.मूत्रपिंडात असलेल्या असंख्य सूक्ष्म गाळण्यांमधून पाणी व टाकाऊ घटक गाळल्यानंतर शरीरात मूत्राची निर्मिती होते. वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालू राहत असल्याने अंदाजे वयाच्या तिशी-चाळीशीनंतर नैसर्गिकरित्या किडनीचे कार्य मंदावते. तिशीनंतर दर दहा वर्षांनी किडनीचे कार्य दहा टक्‍क्‍यांनी मंदावतजाते, असे दिसते. मात्र त्या आधीच्या टप्प्यातच किडनीवर अतिरिक्त ताण दिला जात असेल, तर किडनीविकार लवकर बळावण्याची दाट शक्‍यता असते. म्हणूनच शाळांमध्ये अधिक प्रमाणात व स्वच्छ अशी स्वच्छतागृहे असावीत आणि मुलांना मधल्या सुटीत लघवीला आवर्जून पाठवावे, असा आग्रह असतो.

अभ्यासाच्या किंवा कामाच्या ताणाखाली, चित्रपट-नाटक पाहताना, पुस्तक वाचताना लघवीचा आवेग रोखला जातो. असे वारंवार घडत असेल तरी त्याचा किडनीवर ताण येतो. किडनीची काळजी घेण्यासाठी दहा उपाय नक्की करून पाहा.
१) रोज भरपूर पाणी प्या - नियमित भरपूर पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहते व विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासही मदत होते. पाण्यामुळे शरीरात रक्त योग्य प्रकारे प्रवाहित राहते. तसेच पचनक्रिया व शरीराचे तापमान योग्य राखण्यास पाणी सहायकारी ठरते. म्हणूनच नियमित दीड ते दोन लिटर पाणी दिवसभरात पिणे आवश्‍यक आहे. अधिक काटेकोर सांगायचे तर साधारणतः तुम्हाला जेवढी लघवी होते, त्याहून अर्धा लिटर पाणी अधिक प्या.

२) योग्य आहार घ्या - तुम्ही काय आहार घेता, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. जर फ़ास्टफूड, जंकफूड यासारखे अपायकारी अन्नपदार्थ अधिक प्रमाणात व वारंवारखाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम किडनीवर निश्‍चितच दिसून येतो.म्हणूनच योग्य व सकस आहार निवडा. आहारात कलिंगड, संत्रे, लिंबू यासारखी फळे आणि शतावरी, लसूण, मासे यांचा समावेश असावा. रोजचा दिवस लिंबाचा रस घातलेले कोमट पाणी पिऊन सुरू झाला तर तुमच्या किडनीचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत होईल.

३) मूत्राचा आवेग रोखू नका - रक्त गाळून त्यातील टाकाऊ घटक शरीराबाहेर टाकण्याचे काम किडनी करीत असते. हे शरीरातील टाकाऊ घटक व अतिरिक्त पाणी मूत्राशयात साठून राहतात. अंदाजे दीडशे-दोनशे मिलिलिटर मूत्र मूत्राशयात साचल्यानंतर लघवीची इच्छा निर्माण होते. अशा वेळेस लघवी अडवून ठेवू नका. लघवीचा आवेग वारंवार रोखल्याचा ताण मूत्राशयावर येऊन रक्त गाळण्याच्या प्रक्रियेत बिघाड होऊ शकतो.

४) मीठ अतिप्रमाणात खाऊ नका - मिठाच्या सेवनाने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. सोडियम वाढल्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढतेच, पण त्या सोबतच मुतखडा होण्याचाही संभव अधिक असतो.

५) आरोग्यदायी पेय घ्या - फळांचा ताजा रस घेणे हे किडनीचे आरोग्य सुधारण्याचा व शरीरात अधिकाधिक द्रवाचा समावेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. यामुळे पचनसंस्थेला अधिकाधिक पाणी मिळेल व त्यामुळे टाकाऊ घटक शरीराबाहेर टाकण्यास मदत होईल. ‘चहा’ व ‘कॉफी’ घेणे टाळा. यातील ‘कॅफिन’च्या घटकामुळे शरीरातील द्रवाचे प्रमाण कमी होते. जर तुम्हाला किडनीविकार असेल तर बीट व पालक या भाज्यांचा रस घेणे टाळा. या भाज्यांमुळे ‘ऑझॅलिक’ या आम्लाची (ॲसिडची) निर्मिती वाढते व त्यामुळे मुतखडा होण्याची शक्‍यता वाढते. आणि हो, तुम्ही शहाळ्याचे पाणी अवश्‍य पिऊ शकता.

६) योग्य व नियमित व्यायाम करा - लठ्ठपणाचा थेट परिणाम किडनीवर होत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. वजन नियंत्रणात नसल्यास किडनीविकार होण्याची शक्‍यता दुप्पटीने वाढते. योग्य व्यायाम, आहार व नियंत्रणात असलेले वजन यांमुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच नियमित व्यायाम केल्याने तुम्ही प्रसन्न राहता.

७) मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग काबूत ठेवा - मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग यासारख्या आजारांतून ‘किडनीविकार’ बळावण्याची शक्‍यता अधिक असते. म्हणूनच योग्य आहार, व्यायाम व योगसाधनेने तुम्ही रक्तातील साखर,कोलेस्टेरॉल व रक्तदाब नियंत्रणातठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपोआपच किडनीविकार दूर राहण्यास मदत होईल.

८) डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा - तुम्ही घेतलेले कोणतेही औषध हे किडनीतून गाळले जाते. जर तुम्ही स्वतःच औषधांची मात्रा वाढवली किंवा डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय अन्य औषधे घेतली तर त्यातील विषारी घटकांचा भार किडनीवर पडतो. म्हणूनचडॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसारऔषधांची मात्रा घ्या वस्वतःच स्वतःची औषधे ठरवणे टाळा.

९) पूरक (सप्लिमेंटस्‌)व हर्बल औषधे घेण्यापूर्वी विचार करा - जर तुम्ही पूरक (सप्लिमेंटस्‌ ) व्हिटामिन किंवाहर्बल औषधेंघेतअसाल तर त्याच्या मात्रांचा जरूर विचार करा. अतिरिक्त प्रमाणात घेतलेल्याव्हिटामिन व काही वनस्पतींच्या अर्कांचा किडनीवर विपरित परिणाम होतो. म्हणूनच अशी औषधें घेण्यापूर्वीडॉक्‍टरांशी त्यातून किडनीविकार उद्भवण्याच्या शक्‍यतेबाबत जरूर सल्ला घ्या.

१०) धूम्रपान व मद्यपान टाळा - अतिरिक्त प्रमाणात मद्यपान केल्यास शरीरात किडनीचे कार्य सुरळीत करणाऱ्या संप्रेरकांवर (हार्मोन्सवर) दुष्परिणाम होतो. धूम्रपानामुळे थेट किडनीवर परिणाम होत नसला तरीही त्यामुळे हृदयरोग बळावण्याची शक्‍यता अधिक असते व त्याचा अप्रत्यक्ष परिणाम किडनीच्या कार्यावर होतो.

Dr. Kunal Janrao
Dr. Kunal Janrao
MDS, Dentist Periodontist, 6 yrs, Pune
Dr. Vijay Satav
Dr. Vijay Satav
MD - Allopathy, Clinical Pathologist, 23 yrs, Pune
Dr. Vijay E Chaudhari
Dr. Vijay E Chaudhari
BHMS, Homeopath, 25 yrs, Pune
Dr. Vijay Mane
Dr. Vijay Mane
BHMS, Homeopath Family Physician, 22 yrs, Pune
Dr. Tejaswini Bidve
Dr. Tejaswini Bidve
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Hellodox
x