Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

आजकाल लाईफस्टाईलमध्ये इतके बदल झाले आहेत की त्याचा कळत नकळत आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशामधूनच तरूणांमध्ये वाढणारी एक समस्या म्हणजे 'निद्रानाश'. निद्रानाशाची समस्या अनेकांना क्षुल्लक वाटते. निद्रानाशेवर वेळीच उपचार न केल्यास त्यामधून अनेक आजार वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच औषधगोळ्यांऐवजी काही घरगुती उपायांनी निद्रानाशेच्या समस्येवर उपाय करणं शक्य आहे.

केळं फायदेशीर
निद्रानाशेचा त्रास दूर करण्यासाठी केळं हे अत्यंत फायदेशीर आहे. केळं बारमाही उपलब्ध असल्याने त्याचा आहारात समावेश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. केळ्याच्या सेवनाने शरीराला तात्काळ उर्जा मिळते. वाफवलेलं केळं निद्रानाशाची समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत करते.

आरोग्याला फायदेशीर
रात्री झोप येत नसल्यास केळं खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. केळ्यातून कॅल्शियम घटक मिळतात यामुळे हाडं मजबूत होतात.


निद्रानाशेची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी केळ्याचा सालीसकट आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे शांत झोप मिळणयस मदत मिळते.

कसा बनवाल केळ्याचा काढा ?
कपभर पाणी उकळा. त्यामध्ये दालचिनीची पावडर मिसळा. उकळी आल्यानंतर त्यामध्ये पिकलेल्या केळ्याचे लहान लहान तुकडे टाका. काही वेळाने हे मिश्रण गाळून थंड करून प्या. प्रामुख्याने रात्री झोप न येणार्‍यांमध्ये हा काढा अत्यंत फायदेशीर आहे. केळ्याच्या सालीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते.

Published  
Dr.
Dr. Bhagyashri Madake- Kuber
MS/MD - Ayurveda Ayurveda Family Physician 4 Years Experience, Pune
Consult

आपल्यापैकी ब-याच जणाांना रात्री काही केल्या झोप येत नाही.
दिवसभराच्या कामाने मन-शरीर थकलां असलां तरी झोप मात्र लागत नाही, मग whats app, fb, you tube असतांच साथीला.....झोप येईपयंत किंवा वा सकाळपर्य़ंत...! झोप लागली नाही की मग दुसरा दिवस डोकां जड होणां, चिडचिड होणां, कामात लक्ष न लागणां यात जातो. रात्र झाली की मग पुन्हा आपण, घड्याळ आणि mobile/ laptop.

खरां तर निद्रा अर्थात झोप हा आयुष्याच्या तीन महत्वाच्या आधाराच्या खांबाांपैकी एक. झोप पुरेशी घेतली जाणां- न जाणां यावर आरोग्य, बुद्धि, आकलन होणे, शक्ती, पुनरुत्पादन क्षमता या गोष्टी अवलांबून आहेत. त्यामुळे झोप न लागणे या गोष्टीकडे पुरेशा गाांभीयााने लक्ष दिले पाहीजे.
वेळेवर झोप यावी यासाठी पुढील उपाय अवश्य करावेत -

१) रात्री म्हशीचे दूध तूप घालून प्यावे. ( रात्रीचे जेवण आणि दूध यात कमीत कमी तासदीड्तासाचे अंतर हवे.)

२) जेवणात दही, तूप यांचा आवर्जून समावेश करावा. (दही रात्री खाऊ नये. दुपारच्या जेवणात, नाश्त्याला दह्याचा समवेश केल्यास त्याबरोबर खडीसाखर, तूप, मुगाचे वरण, आवळा याांपैकी काहीतरी असावे.)

३) सवा शरीराला नियमित मसाज करावा. यासाठी चंदनबलालाक्षादि तेल, बला तेल इ. वापरावे. उपलब्धता नसल्यास तीळाचे तेलही चालेल.

४) डोक्याला आवर्जून तेल लावून मसाज करावा. पाण्याचा तळवयांनाही मसाज करावा.

५) आवडीचे सुगंध , अत्तरे वापरावीत.

६) झोपण्याची जागा प्रसन्न, शांत असावी. गादी-उशी पुरेशी आरामदायी असावी.

७) ठराविक वेळी TV, mobile, tab, laptop बंध करुन कामाच्या- ताणाच्या विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे.

हे सर्व उपाय नियमित करूनही महिन्याभरात उपयोग न झाल्यास वैद्यांचा सल्ल्याने शिरोधारा , शिरोपिचु, नेत्रतर्पण व गरजेनुसार औषधोपचार करावे.

मुंबई : दिवसभर धावपळ आणि काम केल्यानंतर रात्री बिछान्यात पडल्यावर शांत झोपावे असे अनेकांना वाटते. परंतू दिवसभरातील काही चूकीच्या सवयी किंवा खाण्या-पिण्याच्या सवयींमूळे रात्री थकूनही झोप येत नाही. यामुळे अनेकांना मध्यरात्री अचानक जाग येणे, झोप न येणं अशा समस्या वाढतात.

निद्रानाशाच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन हे त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बिछान्यावर पडून कुशी बदलत राहण्यापेक्षा काही श्वसनाचे व्यायाम करावेत. यामुळे झोपेला चालना देणार्‍या हार्मोन्सचा शरीरात प्रवाह सुधारतो. असा सल्ला आहारतज्ञ स्वाती दवे देतात.

श्वासावर नियंत्रण कसे ठरते झोपेसाठी फायदेशीर ?
योगा केल्याने ताण हलका होण्यास मदत होते हे सार्‍यांंनाच ठाऊक आहे. त्यामुळे शरीरातील तसेच मानसिक ताणतणाव कमी झाल्यास झोप येणे सुकर होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही हलकी योगासनं करा. यासोबतच श्वसनावर नियंत्रण मिळवल्यानेदेखील झोप येण्यास मदत होते. यामुळे शरीरात कार्बनडायऑक्साईड साचून राहतो आणि ताण हलका होण्यास मदत होते.

तुम्ही कसा कराल हा व्यायाम ?

पडल्या-पडल्या झोपण्यासाठी हा श्वसनाचा व्यायाम स्टेप बाय स्टेप अशाप्रकारे करा

Step 1:
उजव्या कुशीवर झोपा.

Step 2:
डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या.

Step 3:
शक्य तितका वेळ श्वास रोखून ठेवा. सुरवातीच्या काळात श्वास काही सेंकंदच रोखणे शक्य होईल. हळूहळू तुम्ही 10-15 सेकंद श्वास रोखणे शक्य होईल.

Step 4:
हा प्रयोग नियमित रात्री झोपण्यापूर्वी 5-6 वेळेस करा. हळूहळू तुमच्या निद्रानाशेच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.

Dr. Pradnya  Gurav
Dr. Pradnya Gurav
MD - Homeopathy, Adolescent And Child Psychiatrist Homeopath, 8 yrs, Pune
Dr. Tushar D Tarwate
Dr. Tushar D Tarwate
BDS, 11 yrs, Pune
Dr. Yogeshwar Sanap
Dr. Yogeshwar Sanap
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Shivdas Patil
Dr. Shivdas Patil
BAMS, Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Shweta Muley
Dr. Shweta Muley
BHMS, Homeopath, 6 yrs, Pune
Hellodox
x