Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मूड चांगला असेल तर चॉकलेट आणि चांगला नसेल तरी चॉकलेट. प्रेमापासून ते प्रपोज करण्यापर्यंतचा प्रवास चॉकलेटनेच सुरु होतो. हेच कॉफीबाबत सांगता येईल. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत कॉफी पिण्याचं कोणतं ना कोणतं कारण असतंच. पण तुम्हाला माहीत आहे का की, चॉकलेट, कॉफी आणि अ‍ॅसिडीटचा खोलवर संबंध आहे. तुम्हालाही या दोन गोष्टींची सवय लागली असेल तर अ‍ॅसिडिटीपासून तुमची सुटका होऊ शकत नाही.

चॉकलेट

चॉकलेटची टेस्ट पसंत नसणारा क्वचितच कुणी सापडेल. पण हे आपल्या पोटासाठी फारच नुकसानदायक ठरु शकतं. ज्या लोकांनी नेहमी अ‍ॅसिडची समस्या असते त्यांच्यासाठी चॉकलेट घातकच मानलं जातं. यात कॅफीन आणि थियोब्रोमाइनसारखे पदार्थ असतात, जे अ‍ॅसिडचं कारण ठरतात. तसेच यात भरपूर फॅट असतात, ज्यामुळे अ‍ॅसिड तयार होतं. त्यासोबतच यातील कोकोमुळेही समस्या होते. याने रिफ्लक्स वाढतं. चॉकलेट खाणं बंद करणं गरजेचं नाहीये, पण जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर कमी प्रमाणात चॉकलेट खावं.

कॉफी

काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या कॉफी पिण्याची सवय असते. तेच काही लोक ऑफिस पोहोचून कॉफीचं सेवन करतात. मित्रांसोबत गप्पा करताना, अभ्यास करताना आणि रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पितात. जर तुम्ही किती कॉफी सेवन करता याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही आरोग्यावर किती अन्याय करत आहात. दिवसभरात एक कप कॉफी किंवा चहा पिणे पुरेसं आहे. पण याचं अधिक सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या डोकं वर काढते. कारण यात कॅफीनचं प्रमाण अधिक असतं. कॅफीन सेवनामुळे पोटात गॅस्ट्रिक अ‍ॅसिडचा स्त्राव होतो. ज्यामुळे अ‍ॅसिडिटी होते. त्यामुळे कधीही रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी सेवन करुन नये.

अ‍ॅसिडिटी

आपण खाल्लेलं अन्न योग्यप्रकारे पचन न झाल्यास पोटात गॅस आणि जळजळ होऊ लागते. यहा शरीराचा डिहायड्रेट होण्याचाही संकेत आहे. त्यामुळे योग्य ठरेल की, चहा, कॉफी आणि चॉकलेटचं सेवन कमी प्रमाणात करावं. सोबतच याकडेही लक्ष द्या की, तुम्ही किती प्रमाणात चहा सेवन करत आहात. जास्तीत जास्त पाणी प्यावं. म्हणजे एक कप एक्स्ट्रा कॉफी प्यायल्यास दोन कप एक्स्ट्रा पाणी प्यावे.

अनेकदा तळकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो. पचनसंस्थेवर परिणाम झाल्याने पोटात गॅस होणं, छातीत जळजळणे, हार्टबर्नचा त्रास होतो. अशावेळेस उठता बसतानाही त्रास होतो. त्यामुळे सुरूवातीला लहान वाटणार्‍या पण कालांतराने गंभीर ठरणार्‍या या समस्यांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.

पचनाचा हा त्रास तीव्र स्वरूपाचे होत नाही तोपर्यंत अनेकजण त्याकडे लक्षही देत नाहीत. शरीरात पित्त वाढल्यानंतर छातीत जळजळ, वेदना, आंबट ढेकर, गळ्याजवळ, तोंडात सूज, उचकी, अचानक वजन कमी होणं, उलट्यांचा त्रास होणं हे सारेच वाढते.

पित्ताच्या त्रासामुळे वाढणारा हा त्रास तुम्ही सुरूवातीच्या टप्प्यावर ओळखू शकल्यास त्यावर औषधोपचारांपेक्षा आहारातील काही बदलांद्वारा उपाय करता येऊ शकतात.


1. पपई
पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी पपई फायदेशीर आहे. त्यामधील पॅपेन घटक पचन सुधारायला मदत करतात. तर फायबर घटक पोटातील घातक घटक बाहेर टाकतात. पित्ताचा त्रास असणार्‍यांनी नाश्त्याला आहारात पपई नियमित खाणंही फायदेशीर आहे.

2. औषधी वनस्पती
पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी कोरफडीचा रस फायदेशीर आहे. यामुळे पोटाच्या नाजूक लाईनिंगचं रक्षण होते. पुदीना पोटातील गॅस कमी करण्यास मदत करतात.

3. आंबट फळ
संत्र, मोसंबी, लिंबू यासारखी आंबट फळ अल्कलाईन घटकांमुळे पोटातील अ‍ॅसिड कमी होते.

4. नारळपाणी
नारळपाण्यातील फायबर घटक शरीराला डिटॉक्सिफाय करायला मदत करतात. यामुळे पोटातील गॅसचा त्रास, हार्टबर्नचा त्रास कमी होतो.

5. दही
दह्यातील चांगले बॅक्टेरिया पोटाला थंडावा देण्यास मदत करतात. पित्ताचा त्रास कमी करण्यास सोबतच हार्टबर्न कमी करण्यास वाटीबह्र दही खाणं फायदेशीर आहे.

6. केळं
पोटाच्या आरोग्यासाठी केळ फायदेशीर आहे. यामुळे आतड्यांचा दाह कमी होतो. केळ्यातील फायबर घटक आतड्यांना होणारा त्रास कमी करण्यास मदत करते.

7. आलं
आलं पाचक असल्याने पोटातील गॅसचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.

पित्ताचा त्रास हा अपचन, अवेळी खाणं, झोपणं अशा सवयींमुळे अधिक वाढतो. पित्ताच्या त्रासामध्ये काहीजणांना चक्कर येणे, उलट्या होणं असा त्रास होतो. त्यामुळे शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी नेमकं काय खावं? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. उलटीच्या भीतीने अनेकजण काहीच न खाण्याची चूक करतात. प्रामुख्याने फळांच्या बाबतीत अनेकांच्या मनात हे समज गैरसमज आहेत. त्यामुळे तुमच्या मनातील या गोष्टी दूर करण्यासाठी हा सल्ला नक्की वाचा.

पित्त आणि आंबट फळं
पित्ताचा त्रास होत असल्यास अनेकजण आंबट फळं टाळतात. तुम्हांला थेट फळ खाणं शक्य नसल्यास त्याचा रस प्यावा. फ्रूटज्यूसमधील साखर शरीराला उर्जा देते. सकाळी दिवसाची सुरूवात अशा फळांच्या रसाने करणं फायदेशीर ठरू शकतं. मात्र आंबट फळांचा रस रिकाम्यापोटी घेऊ नका. दोन जेवणाच्या दरम्यान भूक लागल्यास तुम्ही ज्यूस पिऊ शकता.

आंबट फळांचे आरोग्यदायी फायदे -
आंबट फळं आरोग्यदायी आहेत. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.


गरोदर स्त्रीयांमध्ये गर्भाच्या वाढीसाठी त्याची मदत होते.

लिंबू, संत्र, मोसंबीसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

आंबट फळांमध्ये फॉलिक अ‍ॅसिड अधिक असल्याने गर्भाचा विकास होण्यास मदत होते. व्हिटॅमिन सीमध्ये उत्तम प्रतीचे अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक असतात. यामुळे फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होण्यास मदत होते.

त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी आंबट फळांचा आहारात समावेश करणं अधिक फायदेशीर आहे.

व्हिटॅमिन सी घटक शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारतात. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात फ्लू, सर्दीसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

गरोदरपणाच्या काळात किवी, संत्र, लिंबू खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे गरोदर स्त्रियांमध्ये अ‍ॅलर्जी कमी होण्यास मदत होते.

नको अॅसिडिटीला आमंत्रण!

'दिवसभराच्या धावपळीमुळे मी खूप दमतो', 'सतत मला एक प्रकारचा थकवा जाणावतो', 'मला अजिबात उत्साही वाटत नाही. असं का होतंय आणि या साऱ्यातून बाहेर येण्यासाठी मी काय करू?', असं माझ्याकडे येणारा प्रत्येकजण विचारत असतो. मी अगदी शांतपणे त्यांना त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचारते आणि आपोआपच उत्तर समोर येतं. 'माझी जेवणाची वेळ कधीच ठरलेली नसते', 'कामाच्या धावपळीत दुपारी पटकन काही तरी खातो आणि रात्रीचं जेवण हे टीव्ही समोर होतं. मधल्यावेळेत भूक लागली की मग काहीही अरबटसरबट खाल्लं जातं', असे अनेकजण आपल्या खाण्याच्या सवयींबद्दल बोलतात आणि याच सवयी अनेक समस्यांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. या वेगवान अनियमित आणि अनिश्चित जीवनशैलीमुळे अॅसिडिटी नावाच्या राक्षसानं आपलं डोकं वर काढलं आहे. आजच्या घडीला शहरातील सत्तर टक्के लोकांना अॅसिडिटीचा त्रास होतो.

अॅसिडिटी म्हणजे नेमकं काय?

पचनक्रिया सुरळीतपणे पार पडत नाही. अपचनामुळे अनेक रसायनांची निर्मिती होते आणि ही अॅसिड्स शरीराला हानी पोहोचवू शकतात. आपल्या खाण्याच्या सवयी आणि आरोग्यदायी जीवन यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे खाणं हा एक आनंददायी अनुभव असायला हवा. बाकी सगळं बाजूला ठेवून जेवताना संपूर्ण लक्ष खाण्यावर केंद्रित करा. चवीनं खा. तुम्हाला सकारात्मक फरक जाणवू लागेल आणि तुमचं शरीर, मन आणि आत्मा एकाचवेळी तृप्त होईल.

अॅसिडिटीची लक्षणं कोणती?

अपचनाचा त्रास

पोटात गॅस होणं

छातीत दुखणं

हृदयाजवळ जळजळ जाणवणं

काहीही खावंसं न वाटणं

टीप-टॉप राहण्यासाठी विशेष टीप्स :

- वजन खूप जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वजन नियंत्रणात असणं खूप महत्त्वाचं आहे.

- शांत वातावरणात जेवणाचा मनसोक्त आस्वाद घ्या. कंटाळत किंवा रागात जेवू नका.

- सावकाश आणि नीट चावून खा. तुमचं पूर्ण लक्ष खाण्याकडे असू द्या.

- अतिप्रमाणात तिखट किंवा तेलकट पदार्थांचं सेवन केल्यानं शरीराला हानी पोहोचू शकते.

- तळलेले पदार्थ, मसालेदार जिन्नस, मिरच्या, पापड, दुग्धपदार्थ जिभेचे चोचले पुरवत असले तरीसुद्धा आरोग्यासाठी चांगले नसतात, हे लक्षात असू द्या.

- भूक लागल्यावर खाल्लं पाहिजे आणि त्याचप्रमाणे पोट भरल्यावर थांबलंही पाहिजे.

- एकदम पोटभर जेवू नका. पोटातली थोडी जागा रिकामी ठेवा.

- जेवण झाल्यावर थोडा वेळ शांत बसा. हा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा.

- काहीही खाल्ल्यावर लगेचच झोपणं पूर्णपणे चुकीचं आहे.

- दिवसभरात दोन कप चहा किंवा कॉफी घ्यायला काहीच हरकत नाही. या कॅफेनयुक्त पेयांचं अति प्रमाणात सेवन करत असाल तर मग होणाऱ्या परिणामांची जबाबदारी घ्यायलाही तयार राहा.

- कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत असेल तर स्वतः डॉक्टर बनण्याच्या भानगडीत पडू नका. वेळीचं वैद्यकीय सल्ला घ्या.

शब्दांकन - गौरी आंबेडकर, रुईया कॉलेज

Dr. Bharat Oza
Dr. Bharat Oza
BAMS, General Surgeon Proctologist, 9 yrs, Pune
Dr. Pramod Bharambe
Dr. Pramod Bharambe
DHMS, Family Physician Homeopath, 30 yrs, Pune
Dr. Jetin Anand
Dr. Jetin Anand
BAMS, Ayurveda Clinic, 12 yrs, Mumbai Suburban
Dr.  Kishor Selukar
Dr. Kishor Selukar
BDS, Dentist, 9 yrs, Pune
Dr. Vijay Mane
Dr. Vijay Mane
BHMS, Homeopath Family Physician, 22 yrs, Pune
Hellodox
x