Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.



कार्डिअॅक अरेस्ट

कार्डिअॅक अरेस्टचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कार्डिअॅक अरेस्ट हे हार्ट अटॅकपेक्षा वेगळं असतं. हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा नसांमध्ये ब्लॉकेजमुळे रक्तपुरवठा होण्यात अडचण येते. हृदय शरीराच्या इतर भागात रक्तपुरवठा सुरु असतो आणि व्यक्ती देखील शुद्धीत असतो.कार्डिअॅक अरेस्टमध्ये रक्तपुरवठा अचानक बंद होतो. यामध्ये व्यक्ती अचानक बेशुद्ध होतो आणि श्वासोच्छवासही बंद होतो.

कार्डिअॅक अरेस्ट​ म्हणजे काय ?
- इलेक्ट्रिकल सिग्नलच्या अडचणींमुळे शरीरात जेव्हा रक्त नाही पोहोचत. तेव्हा कार्डिअॅक अरेस्टचा धोका वाढतो.


- जेव्हा व्यक्तीचं शरीर रक्त पंप करणं बंद करतो तेव्हा डोक्यात ऑक्सीजनची कमतरता तयार होते.

- यानंतर व्यक्ती बेशुद्ध होतो आणि श्वास घेणं बंद होतं.

- कार्डिअॅक अरेस्ट अचानक होतो. शरीराकडून याबाबत कोणती पूर्णकल्पना देखील नाही मिळत.

- इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये गडबड झाल्याने हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड होतो.

- यामुळे हृद्याची पंप करण्य़ाची क्षमता कमी होते. त्यामुळे मेंदु, हृद्य आणि शरीरातील इतर गोष्टींना रक्त पोहोचणं अशक्य होऊन जातं.

- काही मिनिटात यामध्ये व्यक्ती बेहोश होतो. लगेचच जर उपचार नाही झाले तर कार्डिअॅक अरेस्टध्ये काही मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होतो.

कार्डिअॅक अरेस्टची कारणे :
- कोरोनरी हार्ट डिसीज
- ह्रदयविकाराचा झटका
- कार्डिओमायोपॅथी
- जन्मजात हृदयरोग
- हृदय झडप मध्ये समस्या
- हृदयाच्या स्नायूमध्ये जळजळ
- लाँग क्यू टी सिंड्रोमसारख्या व्याधी
- विद्युत शॉक
- जास्त औषधे घेणे
- रक्तसंक्रमणामुळे होणारे नुकसान
- पाण्यात बुडणे

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणांपासून वयोवृद्धांमध्ये हृद्यविकार जडण्याचे प्रमाण वाढते आहे. गेल्या ४-५ दिवसांमध्ये अशाच हृद्यविकाराच्या झटक्यामुळे महाराष्ट्रातील तीन उमदे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले. अवघ्या 23 वर्षांचा आरजे शुभम केचे असो किंवा भरत नाट्य मंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ कार्यक्रमादरम्यान गिरकी घेऊन कोसळलेली अभिनेत्री अश्विनी एकबोटे असो. ऐन उमेदीच्या काळात हृद्यविकाराने त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे ठरले आहे. हद्यविकार म्हणजे केवळ हार्ट अटॅक नव्हे. तर काही वेळेस कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळेदेखील मृत्यू ओढावू शकतो. पण मग कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे नेमके काय हे नक्की जाणून घ्या .

कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यामध्ये फरक काय ?

कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक स्थिती असते. ज्यामध्ये हृद्याचे पंपिंग होणं आणि रक्ताभिसरणाचे कार्य थांबते. अनेकदा हार्ट अटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट यामध्ये लोकांची गफलत होते. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेसमुळे हृद्याला रक्तपुरवठा करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. परिणामी हार्ट अटॅक येतो.
कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये रक्तप्रवाहादरम्यान शरीरात इतर अवयवांना ऑक्सिजन पुरवण्याच्या कार्यात अडथळा येतो.मेंदूला ऑक्सिजनच्याअभावी त्याच्या कार्यातही अडथळा येतो. अशावेळेस श्वासावरील नियंत्रण सुटते, शुद्ध हरपते. कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक ‘मेडिकल इमरजन्सी’ असून त्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे असते. प्रामुखाने अशावेळेस रुग्णाला Cardio Pulmonary Resuscitation (CPR) सोबतच ठराविक इलेक्ट्रिक शॉक दिला जातो.
हृद्याच्या अनेक विकारांमुळे कार्डिअ‍ॅक अरेस्टचा धोका वाढतो. म्हणूनच हृद्यविकाराचा धोका वाढवणार्‍या या भारतीय खाद्यसंस्कृतीतील काही त्रासदायक सवयी तुम्ही नक्की बदला.

कार्डीअ‍ॅक अरेस्टची काही लक्षण –

अचानक चक्कर येणं,

थकवा जाणवणं,

डोळ्यासमोर अंधारी येणं,

छातीत वेदना जाणवणं,

दम लागणं

कार्डीअ‍ॅक अरेस्ट हा अनेकदा कोणतेही लक्षण किंवा संकेत न देता येऊ शकतो म्हणूनच स्वतःची थोडी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



हृदय मंदता

हृदयात एकदा बिघाड झाला की, तो अगदी शंभर टक्के बरा झाला असे सहसा होत नाही.एकदा हृद्रोग झाल्यावर त्रास होत नसला तरीसुद्धा हृदयाला पोषक औषधे, रसायने, प्रकृतीनुरूप आहार-आचरण याकडे लक्ष द्यायला लागते. यामध्ये पंचकर्मालाही महत्त्वाचे स्थान असते. पंचकर्माने शरीरशुद्धी झाल्यावर हृदयाची कार्यक्षमता वाढायला तर मोठा वाव असतोच, पण पुन्हा पुन्हा हृदयाला धोका उद्भवू नये यासाठीही पंचकर्म मोलाची मदत करते.

या प्रकारच्या हृद्रोगात छातीत दुखणे, दाह होणे, जडपणा जाणवणे, अस्वस्थ वाटणे, तोंड कोरडे पडणे, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे, थोडेही चालले तर दम लागणे, धडधड होणे, मळमळणे वगैरे अनेक प्रकारची लक्षणे असतात. फारच तीव्र लक्षणे असली व वेळेवर योग्य उपचार मिळाले नाहीत, तर प्रसंगी मृत्यू येऊ शकतो. अवरोधजन्य हृद्रोगात बऱ्याचदा आत्ययिक चिकित्सा करण्याची पाळी येते. मात्र लक्षणांची तीव्रता कमी झाल्यावर अवरोध दूर करणारे, पुन्हा पुन्हा नवीन अवरोध तयार होण्यास प्रतिबंध करणारे उपचार करणे शक्‍य असते. प्रकृतीनुरूप उपचारांचे स्वरूप बदलत असले तरी या अवस्थेमध्ये पंचकर्माने शरीरशुद्धी व औषधी घृताची हृद्‌बस्ती यांचा उत्कृष्ट फायदा होऊ शकतो. फक्त हे पंचकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले असावे, फक्त एक-दोन बस्ती, शिरोधारा, मसाज घेण्याला पंचकर्म म्हणता येत नाही. अवरोध झाल्यावरच नव्हे, तर अवरोध होऊ नये, वातदोषादी संतुलित राहावेत, हृदयाला रक्‍ताचा पुरवठा व्यवस्थित होत राहावा यासाठी मुळात आरोग्य-सवयी लावून घेणे आणि वयाच्या पस्तिशीच्या आसपास शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करून शरीरशुद्धी करून घेणे योग्य असते. विशेषतः ज्यांच्या घरात हृद्रोगाची आनुवंशिकता आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम असतो.

हृदयाची सामान्य गती सर्वसाधारणपणे दर मिनिटाला ७२ असते. लहान मुलांमध्ये ही स्वभावतःच जलद असते. उत्कंठा, भीती आदी मानसिक बदलांमुळे हृद्‌गती वाढू शकते किंवा ताप वगैरे रोगातही हृद्‌गतीचा वेग वाढतो. मात्र हे बदल तात्पुरते असतात. उत्कंठा, भीती, ताप यासारखे कोणतेही कारण नसतानाही हृद्‌गती वाढणे किंवा खूप कमी होणे हा हृद्रोगाचाच एक प्रकार समजला जातो. हृद्‌गतीमधील नियमितता कमी-जास्ती होणे, हृदयाचा ठोका मध्येच चुकणे हा सुद्धा एक हृद्रोगच असतो. अशा केसेसमध्ये तज्ज्ञांकरवी योग्य निदान करून, गरज असल्यास तपासण्या करून घेऊन योग्य उपचार करावे लागतात.

हृद्रोगाचा अजून एक प्रकार म्हणजे आमवाताचा परिणाम म्हणून होणारा हृद्रोग. ‘आम’ हा अपचनातून तयार होतो. अग्नी मंद झाला की तो अन्नाचे पचन व्यवस्थित करत नाही, त्यातून आम म्हणजे अर्धा कच्चा, अर्धा पक्का असा आहाररस तयार होतो आणि हा आम शरीराला अतिशय त्रासदायक ठरणारा असतो. पचन योग्य झाले की जो आहाररस तयार होतो तो सर्व शरीराला ताकद देतो, सर्व शरीरात सहजपणे सामावला जातो, मात्र आम शरीरात सामावला जात नाही, उलट वातदोषाच्या गतीला अडथळा आणतो. यातून आमवात तयार होतो. आमवातावर वेळेवर आणि योग्य उपचार झाले तर ठीक असते अन्यथा त्याचा परिणाम म्हणून हृद्रोग होऊ शकतो. बऱ्याचदा असेही दिसते की, लहान वयात आमवातामुळे सांधेदुखीचा त्रास झालेला असतो आणि चाळिशी-पंचेचाळिशीनंतर एकदम हृद्रोग होतो. अशा वेळी पूर्वी झालेला आमवात लक्षात घेऊन उपचार करावे लागतात. या प्रकारच्या हृद्रोगात औषधयोजना करताना हृदयाची ताकद वाढेल, हृदयातील दोष दूर होईल असे उपचार करावे लागतातच, बरोबरीने आमपाचक आणि वातनाशक उपायही योजावे लागतात. यामध्ये वैश्वानर चूर्ण, रास्नापंचक, महारास्नादी काढा, शुण्ठी घृत वगैरे योगांचा समावेश होतो. एका रोगाचा परिणाम म्हणून जेव्हा दुसरा रोग होतो तेव्हा तो बरा करणे अधिक अवघड असते. त्यामुळे आमावातामुळे झालेल्या हृद्रोगावर वेळीच योग्य उपचार करण्याकडे लक्ष द्यायला लागते.

हृद्‌व्यास - म्हणजेच हृदयाचा आकार वाढणे. आयुर्वेदात हे हृद्रोगाचे केवळ एक लक्षण म्हणून दिलेले आहे. आधुनिक परिभाषेत याला ‘हार्ट एन्लार्जमेंट’ किंवा ‘हायपरट्रॉफी’ असे म्हटलेले आढळते. हृदयाचा आकार वाढतो म्हणजे हृदय ज्या पेशींपासून बनलेले आहे त्यांची लवचिकता, दृढता कमी होते व त्या शिथिल होतात. अर्थातच याचा परिणाम म्हणून हृदयाची कार्यक्षमता लक्षणीय रीत्या घटते, रक्‍ताभिसरणाची प्रक्रिया मंदावते.

एओर्टिक ॲन्युरिझम - क्वचित काही व्यक्‍तीमध्ये हृदयातून निघणारी मुख्य धमनी (महाधमनी, एओर्टा) विस्तारित पावते. याला ‘एओर्टिक ॲन्युरिझम’ असे म्हटले जाते. हाही हृदयव्यासाचाच एक प्रकार समजावा लागतो. सर्व प्रकारच्या हृद्‌व्यासांवर हृदयाच्या पेशींची ताकद वाढवणे आणि वाताचे शमन करणे या क्रियासूत्रांचा प्रयोग करावा लागतो. दशमूलादि घृत, शतावरी घृत, ‘सुहृदप्राश’सारखे रसायन, नियमित अभ्यंग, शास्त्रोक्‍त शरीरशुद्धी करून घेऊन वातशामक आणि हृदयपोषक द्रव्यांनी संस्कारित केलेल्या तेला-तुपाची हृदबस्ती यासारखे उपाय योजावे लागतात.

ॲथेरोस्क्‍लेरॉसिस - हृदवाहिनीमध्ये अवरोध तयार झाल्याने हृद्रोग होतो हे आपण पूर्वी पाहिले आहेच. हृदवाहिनी कडक होणे, तिच्यातील लवचिकता कमी होणे, तिची दृढता कमी होणे यामुळेही हृद्रोग होऊ शकतो. तसे पाहता फक्‍त हृदयाच्याच नाही तर शरीरातील कोणत्याही रक्‍तवाहिनीमध्ये या प्रकारचा दोष निर्माण होऊ शकतो आणि त्यातून वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आधुनिक परिभाषेत याला ‘ॲथेरोस्क्‍लेरॉसिस’ असे म्हटले जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या विचार केल्यास हे वातदोषामुळे, शरीरात रुक्षता वाढल्याने, आवश्‍यक ती लवचिकता व ताकद कमी झाल्याने असे होऊ शकते. यावरही रक्‍तवाहिनीला पोषक व वातशामक औषधांची योजना करावी लागते. शास्त्रोक्‍त पंचकर्माचाही उत्कृष्ट उपयोग होऊ शकतो.

हृद्‌ग्रह - म्हणजे हृदय जखडल्यासारखे, हृदयात अडकल्यासारखे वाटणे. हृद्‌ग्रह मुख्यत्वे वातदोषामुळे होतो, यात बरोबरीने छातीत व पाठीत तीव्र वेदना होणे, खोकला येणे, दम लागणे, दातखीळ बसणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे असतात. हृद्‌ग्रहावर तातडीने उपाययोजना करणे खूप आवश्‍यक असते. वाताला कमी करणारे आणि लवकरात लवकर रक्‍ताभिसरण पूर्ववत होण्यास मदत करणारे उपचार करावे लागतात.

हृदय हा एक असा अवयव आहे, ज्याच्यात एकदा बिघाड झाला की तो अगदी शंभर टक्के बरा झाला असे सहसा होत नाही. जसे पंकप्रक्षालन न्यायाप्रमाणे चिखलाने बरबटलेले वस्त्र कितीही धुतले तरी सुद्धा पुन्हा पहिल्यासारखे होऊ शकत नाही, तसेच एकदा हृद्रोग झाल्यावर त्रास होत नसला तरी सुद्धा हृदयाला पोषक औषधे, रसायने, प्रकृतीनुरूप आहार-आचरण याकडे लक्ष द्यायला लागते. यामध्ये पंचकर्मालाही महत्त्वाचे स्थान असते. पंचकर्माने शरीरशुद्धी झाल्यावर हृदयाची कार्यक्षमता वाढायला तर मोठा वाव असतोच, पण पुन्हा पुन्हा हृदयाला धोका उद्भवू नये यासाठीही पंचकर्म मोलाची मदत करते. हृद्रोगामुळे दहा-बारा पावले चालणेही अवघड वाटत असणाऱ्या अनेक व्यक्‍ती पंचकर्मानंतर औषध-रसायनांच्या सेवनानंतर काहीही त्रास न होता चालणे, जिना चढणे वगैरे गोष्टी करू शकतात असा अनुभव आहे. हृद्रोगावर मुळापासून उपचार करताना आणि पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये यासाठी आहार-आचरणात पुढीलप्रमाणे नियम सांभाळता येतात,

आहार पचनाकडे लक्ष देणे, प्रकृतीनुरूप व पचण्यास हलके अन्न खाणे, आहारात आले, सुंठ, मिरी, हिंग, जिरे वगैरे दीपक, पाचक द्रव्यांचा समावेश असू देणे.

आठवड्यातून एक दिवस रात्रीचे लंघन करणे, यामुळे पोटाला विश्रांती मिळते व पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते.

रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज स्थितीत असलेल्या महिलांना जर ब्रेस्ट कॅन्सर झाला तर अशा महिलांमध्ये हृदयरोग होण्याचा धोकाही अनेक पटीने वाढतो. एका रिसर्चमधून अभ्यासकांना ही माहिती मिळाली आहे. या रिसर्चचे निष्कर्ष मेनोपॉज : द जर्नल ऑफ द नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटी नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित करण्यात आलाय.

कीमो आणि रेडिएशनमुळे हृदयरोगांचा धोका

व्हर्जिनिया विश्वविद्यालयातील प्राध्यापक जोआन पिंकर्टन म्हणाले की, 'कीमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि एरोमाटेज इनहिबिटर्सच्या उपयोग केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार घेत असलेल्या महिलांमध्ये हृदयरोग अधिक बघितला जातो. विकिरणांच्या संपर्कात आल्यावर ५ वर्षांनी हा हृदयरोग होऊ शकतो आणि याचा धोका ३० वर्षांपर्यंत कायम राहतो'.

धोका कसा होईल कमी?

पिंकर्टन म्हणाले की, 'जर तुम्हाला तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर हेल्दी लाइफस्टाईल अंगीकारा. कारण हाच एक उपाय आहे, ज्याने ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्यापासून रोखला जाऊ शकतो. सोबतच हृदयरोग होण्याचा धोकाही याने कमी केला जाऊ शकतो'.

रूग्ण आणि सामान्य महिलेत तुलना

ब्रेस्ट कॅन्सरमधून बचावलेल्या महिला आणि ज्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर आहे. जर त्या पोस्ट मेनोपॉजच्या स्टेजमध्ये असतील तर अशा महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका आणि कारणांची तुलना व मुल्यांकन करणे या रिसर्चचा उद्देश होता. या रिसर्चसाठी निवडल्या गेलेल्या सर्व महिला मेनोपॉज पार केलेल्या होत्या. यातील ९० ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हाइवर महिलांची तुलना १९२ सामान्य महिलांशी केली गेली.

हृदयरोगाचे रिस्क फॅक्टर्स

अभ्यासकांना आढळलं की, ज्या महिला ब्रेस्ट कॅन्सर सर्वाइवर होत्या त्यांच्यात मेटाबॉलिक सिंड्रोम, डायबिटीस, एथेरोस्लेरोसिस आणि लठ्ठपणाची अनेक लक्षणे दिसली, तर ते हृदयरोगाशी संबंधित आजार होण्याचा सर्वात मोठा रिस्क फॅक्टर मानले जातात. सोबतच हृदयरोगाने मृत्यू होण्याच्या केसेसही कॅन्सरप्रमाणे अधिक आढळल्या.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

स्तनाच्या आकार बदल जाणवणे, स्तन किंवा बाहूच्या खाली गाठ येणे, स्तन दाबल्यास वेदना होणे, स्तनातून चिकट पदार्थ बाहेर येणे, निप्पलचा पुढील भाग वाकणे किंवा लाल होणे, स्तनांमध्ये सूज येणे ही ब्रेस्ट कॅन्सरचा प्रमुख लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कशी घ्याल काळजी?

- एक्सरसाइज आणि योगा नियमितपणे करावा

- मिठाचं अत्याधिक सेवन करू नये

- लाल मांसाचं अधिक सेवन करू नये

- सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करा

- अधिक प्रमाणात धुम्रपान किंवा मद्यसेवन करू नये

जर तुमचं वजन जास्त असेल तर याचा अर्थ केवळ तुम्ही जाड आहात, असा होत नाही. जास्त वजनासोबत जास्त आजार आणि वेगवेगळ्या समस्या सोबत येतात. जसजशा तुमच्या शरीरात फॅट सेल्स वाढत जातात, तसतशी तुमची श्वास घेण्याची क्षमता कमी होते. मेटाबॉलिज्म स्तर बदलू लागतो, इंन्सुलिन वेगाने वाढू लागतो, हार्मोन्सचं नियंत्रण बिघडतं आणि या सर्व कारणांमुळे तुमचा कॅन्सरचा म्हणजेच कर्करोगाचा धोका दुप्पट वाढतो.

जाडेपणाशी संबंधित कॅन्सरचा धोका ४० टक्के

शरीरात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांचा खासकरून कॅन्सरचा जाडेपणाशी काय संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी एका हेल्थ बोर्डाने अभ्यास केला. ज्याचे निष्कर्ष सांगतात की, जाडेपणाशी संबंधित कॅन्सरचा धोका अलिकडच्या वर्षांमध्ये साधारण ४० टक्के वाढला आहे. इतकेच नाही तर तुम्ही जर जाडेपणाने ग्रस्त असाल, तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला एक नाही तर तब्बल १३ प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका अनेक टक्क्यांनी वाढतो.

६० हजार लोकांच्या तपासणीत १३ प्रकारचा कॅन्सर

यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनच्या एका अभ्यासानुसार, कॅन्सरने पीडित ज्या ६० हजार लोकांची तपासणी करण्यात आली त्यांच्यात जाडेपणा आणि वजनाशी संबंधित समस्या एका समान धाग्यामुळे आढळल्या. या अभ्यासादरम्यान ज्या रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यांच्यात १३ वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आढळून आलेत. ज्यात ब्रेन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर, गॉल ब्लाडर कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, पॅनक्रियाज कॅन्सर, कोलोन कॅन्सर, यूट्र्स कॅन्सर, ओवरीज कॅन्सर यांचा समावेश होता. जाडेपणासोबतच धुम्रपानही कॅन्सर होण्याचं एक मुख्य कारण आहे.

जगाची मोठी लोकसंख्या जाडेपणाची शिकार

यात जराही शंका नाहीये की, जाडेपणा लाइफस्टाइलशी निगडीत एक आजार आहे ज्यामुळे शरीर वेगवेगळ्या आजारांनी वेढलं जातं आणि ज्यात कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचाही समावेश आहे. या अभ्यासात असे दिसून आले की, जगातले दोन तृतियांश लोक जाडेपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत आणि यात वयस्कांसोबतच लहान मुलांचाही समावेश आहे. म्हणजेच काय तर जाडेपणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

वजन कमी केल्याने कॅन्सर होणार नाही?

कॅन्सर हा केवळ जाडेपणामुळेच होतो असे नाही. याला इतरही अनेक कारणे असतात. यात वातावरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच तंबाखूचं सेवन आणि केमिकली प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टचं सेवन यामुळेही कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो. पण जाडेपणा लाइफस्टाइलशी निगडीत एक मोठी समस्या आहे. यामुळेही कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे तुम्ही केवळ चांगले आणि दिसावे म्हणून वजन कमी करणेच महत्त्वाचे नाही तर वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठीही वजन कमी करणे गरजेचे आहे.

जाडेपणाची कारणे

जाडेपणा कमी करण्यासाठी कधी कुणी डाएट करतं, कधी कुणी केवळ फळं खातं, कुणी जिम लावतं तर कुणी धावायला जातं. असे वेगवेगळे उपाय अलिकडे प्रत्येक दुसरा किंवा तिसरा व्यक्ती करताना दिसतो. इतकी ही स्थूल होण्याची समस्या गंभीर झाली आहे. याला कारणेही तितकीच वेगवेगळी आहेत. जंक फूड, जेवणाच्या अनियमीत वेळा, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, शारीरिक हालचाली कमी होणे, व्यायाम न करणे, एकाच जागी बसून काम करणे अशी कितीतरी कारणे सांगता येतील.

भारतात हृदयाच्या आजारामुळे जवळपास 1.7 मिलियन म्हणजे 17 लाख लोकांचा मृत्यू होता. या दरम्यान एक धक्कादायक रिपोर्ट हाती आला आहे. रिपोर्टनुसार 95 टक्के लोक ज्यांच्या कानात घाण असते किंवा ज्यांना कानाचा त्रास असतो त्यांना हृदयाचे रोग अधिक होण्याची शक्यता असते.

मुंबईतील डॉक्टर हिम्मतराव बावस्करने 888 रोग्यांवर याचे संशोधन केले आहे. ज्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे त्यांना याचा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. संशोधनात असे समोर आले की, 95 टक्के म्हणजे 508 रोग्यांच्या कानात घाण होती आणि ते हृदय रोगाने पीडित होते. 60 वर्षे उलटलेल्या व्यक्तीच्या कानात घाण असणे हे स्वाभाविक आहे. त्यांना हृदयाचा आजार सर्वाधिक असतो. ही समस्या इतकी सामान्य आहे की, आज प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती हृदय रोगाने त्रस्त अससते.

हृदय रोगाची ही आहेत लक्षणे

1) अचानक छातीत दुखू लागणे हे हृदयाचा छटका येण्याचे संकेत आहेत. याप्रमाणे आपलं शरीर अनेक संकेत देत असतात.

2) तुम्हाला एक किवां दोन्ही हातांची दुखापत, कंबर , मान, जबडा किंवा पोटात दुखणे आणि बैचेनी होणे हे जाणवू लागतं.

3) श्वासाचा त्रास, घाम येणं आणि त्यामुळे त्याचं शरीर थंड होणं, चक्कर येणे हे हृदय रोगाची लक्षणे आहेत.

4) सतत श्वासाचा त्रास होणे हे हृदयाच्या आजाराची लक्षणे आहेत.

Dr. Rajendra V. Yelwande
Dr. Rajendra V. Yelwande
BAMS, Ayurveda, 38 yrs, Pune
Dr. Niranjan Revadkar
Dr. Niranjan Revadkar
MD - Homeopathy, Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Ganesh  Jangam
Dr. Ganesh Jangam
BHMS, Homeopath Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Nilima  Pawar
Dr. Nilima Pawar
BHMS, General Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Archana Bhilare
Dr. Archana Bhilare
BDS, Dentist Endodontist, 8 yrs, Pune
Hellodox
x