Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मधुमेह- आपल्या परिवारात कोणालाही डायबिटीज असल्यास आपण साखर कमी करावी. कारण की अनुवांशिक रूपात याचे सेवन मधुमेहाचे कारण बनू शकतं.

खाज- साखरेची अतिरिक्त मात्रा सेवन केल्याने गुप्तंगामध्ये खाज सुटण्याची तक्रार होते. याने गुप्तांगाहून अत्यधिक तरल स्त्राव आणि संक्रमण होण्याची शक्यताही असते.

हृदय रोग- अधिक साखरेमुळे हृदय नलिकेत चरबी जमा होऊन ती ब्लॉक होण्याची शक्यता असते. याने हार्ट अटॅकची शक्यता वाढते.

इसब- त्वचेवर अधिक साखर सेवन केल्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. एका संशोधनाप्रमाणे साखरेमुळे इसब होण्याची शक्यता वाढते.

कमजोर हाडं- साखरेमुळे हाडं कमजोर होतात आणि ऑस्टिओपोरोसिस रोग होण्याची शक्यता असते.

कपाळावर आठ्याअसलेल्या व्यक्तींचा हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका अधिक असल्याचे एका ताज्या संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे कपाळावर आठ्या असलेल्या व्यक्तींनी हृदयाची तपासणी करून घेत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे, असा सल्ला आता दिला जात आहे. एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर त्याच्या कपाळावरील आठ्या सहजपणे दिसतात. त्यामुळे आठ्यांचा हृदयविकाराशी सहसंबंध तपासण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे फ्रान्समधील वैद्यकीय विापीठातील सहायक प्राध्यापक योलांडे इस्क्वीरोल म्हणाले. यादरम्यान त्यांनी 3200 जणांचा 20 वर्षांसाठी अभ्यास केला. कपाळावरील आठ्यांनुसार त्यांचे शून्य, एक, दोन, तीन असे वर्गीकरण करण्यात आले. कपाळावर आठ्या नसलेल्यांना शून्य या गटात तर आठ्यांच्या प्रमाणानुसार एक, दोन, तीन या गटात टाकण्यात आले. 20 वर्षांच्या कालावधीत यापैकी 233 जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. यापैकी हृदयविकाराने मृत्यू झालेल्यांमध्ये दोन व तीन गटातील लोकांची संख्या अधिक होती. यावरून कपाळावर थोड्या प्रमाणात आठ्या असलेल्यांना (एक गटातील) आठ्या नसलेल्यांपेक्षा हृदयविकाराचा धोका थोडा जास्त असतो. तर कपाळावर जास्त आठ्या असलेल्यांना आठ्यानसलेल्यांपेक्षा हृदयविकाराचा धोका दहापट जास्त असतो. असा निष्कर्ष संशोधकांनी काढला. त्यामुळे कपाळावर आठ्या असलेल्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा. कपाळावर जितक्या जास्त आठ्या तितका हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचेही ते म्हणाले.

हृदयरोग निदानाची अत्यंत वेगवान आणि सुरक्षित पद्धत विकसित करण्यात आली आहे. हृदयरोगाची लक्षणे दिसताच अतिदक्षता विभागात दाखल होणार्‍या रुग्णाचे निदान करण्यास ती अत्यंत उपयुक्‍त ठरणार आहे.

कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये (सीएमएजे) नव्या हृदयरोग निदान पद्धतीचा निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णाला हृदयघाताचा कितपत धोका संभवतो, याचाही अंदाज साधे लॅब स्कोअर घेणार आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जर्मनी या चार देशांच्या संशोधकांच्या आंतररराष्ट्रीय चमूने ही पद्धत विकसित केली आहे.

कॅनडाच्या ओन्टॅरिओ येथील मॅकमास्टर विद्यापीठातील संशोधक डॉ. पीटर कावसाक यांनी म्हटले आहे की, प्रचलित हृदयरोग निदान पद्धतीपेक्षा नव्याने विकसित करण्यात आलेली साधे लॅब स्कोअर पद्धत अत्यंत उपयुक्‍त असून, अतिदक्षता विभागात भरती हृदयरोग्याच्या रक्‍तचाचण्या अत्यल्प वेळामध्ये घेण्यास मदत करते

लसणाचा अभ्यास केल्यानंतर यावरचा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आलाय. जर्नल ऑफ अँग्रीकल्चरल अँण्ड फूड केमिस्ट्री या शोधनिबंधामध्ये अंकुरीत लसणाची अँण्टीऑक्साईडची क्रिया वाढवण्याचा उपाय असू शकतो, असे कीम टीमने सांगितले.लसणाला आयुर्वेदामध्येही महत्त्व आहे.

लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी आणि गुणकारी आहे. हृदयरोगावर लसूण रामबाण उपाय करते, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मात्र, ही लसूण मोड आलेली किंवा अंकुरलेली हवी. हृदयरोग तज्ज्ञ सांगतात, रोज आहारात एक तरी लसणाची पाकळी हवी. ताज्या लसणापेक्षा साठवून ठेवलेल्या लसणाला आलेले अंकुर किंवा अंकुरीत लसण यामध्ये अँण्टीऑक्साईडची क्रिया जलद गतीने होते. त्यामुळे अंकुरीत लसूण हृदयासाठी खूप लाभदायक होऊ शकते, असे अमेरिकातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ लोव’चे मुख्य संशोधनकर्ता जॉग किम यांचे म्हणणे आहे.

लसूण असलेले पदार्थ कोलेस्ट्रॉल, रक्तदाब कमी करण्यास मदत करतात, असे कीम टीमचे म्हणणे आहे. जेव्हा लसणाच्या बीमधून निघालेल्या अंकुराबरोबर अनेक संयुगे बनतात. अंकुरीत फळे आणि धान्य यामध्ये अँण्टीऑक्साईडची क्रिया जलद गतीने वाढत जाते.


ही क्रिया साठवून ठेवलेल्या लसणामध्ये पण होऊ शकते. 5 दिवसांनी अंकुरीत झालेल्या लसणात अँण्टीऑक्साईडची क्रिया जेवढी जलद होते, तेवढी ताज्या लसणात होत नाही.

आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठ्पणाची समस्या वाढत आहे. वाढत्या लठ्ठपणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र स्त्रियांमध्ये वाढणारी लठ्ठपणाची समस्या काही गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते. 90,000 हून अधिक महिलांवर करण्यात आलेल्या प्रयोगानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

संशोधकांचा दावा -

' द लॅसेट डायबिटीज आणि इंडोक्राइनोलॉजी'च्या अहवालानुसार महिलांमधील लठ्ठपणा हृद्याशी निगडीत काही आजारांना कारणीभूत ठरत आहे. मेटॅबॉलिझमशी निगडीत काही त्रास असला किंवा नसला तरीही त्याचा परिणाम हृद्याच्या आरोग्यावर होतो.

मेटॅबॉलिक सिंड्रोम असणार्‍यांमध्ये हृद्यविकाराचा धोका संबंधित आजार जडण्याची शक्यता दुप्पटीने अधिक असते. यामध्ये हृद्यविकाराचा झटका, स्त्रोकचा त्रास बळावण्याचीही शक्यता असते. यासोबतच उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात नसणं, असमान्य ब्लड फॅट्स यांचा समावेश असतो.

मेटॅबॉलिझमशी निगडीत नसलेल्या महिलांमध्येही हृद्याशी निगडीत आजाराचा धोका असल्याने स्वतःच्या आरोग्याबाबत महिलांनी दक्ष राहणं गरजेचे आहे.

Dr. Prashant Wankhede
Dr. Prashant Wankhede
MS/MD - Ayurveda, Pune
Dr. Sachin Patil
Dr. Sachin Patil
BHMS, Family Physician Homeopath, 11 yrs, Pune
Dr. Rupali Sawarkar
Dr. Rupali Sawarkar
BAMS, Family Physician Physician, 11 yrs, Pune
Dr. Shyamsundar Jagtap
Dr. Shyamsundar Jagtap
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Nirnjn P.
Dr. Nirnjn P.
MD - Allopathy, Diabetologist Physician, 9 yrs, Pune
Hellodox
x