Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

नेहमीच मिल्क चॉकलेट जिभेवर ठेवण्याऐवजी डार्क चॉकलेट खाल्लं तर आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतं. पण मर्यादित प्रमाणातच, कारण हे मजेदार खाद्य म्हणजे रोजचा आहार आणि व्यायाम यांना पर्याय नाही हे विसरुन चालणार नाही.

चॉकलेट हवं का, म्हणताच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच माना होकारार्थी हलतात. चॉकलेट म्हणजे तरुण मुलींची खास पसंती. वाढदिवस असो किंवा प्रेमानं एखाद्या मित्रमैत्रिणीला काही द्यावंसं वाटलं, तर भेटवस्तूत पहिला मान चॉकलेटचा असतो. एकेकाळी फक्त एखाददुसऱ्या स्वादामध्ये मिळणारं हे चटपटीत खाद्य आज हजारो दिलखेचक चवीत आणि आकारात मिळतं, की नाही म्हटलात, तरी तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा मॉलमध्ये जा, पानपट्टीच्या दुकानात आणि चक्क वह्या-पुस्तके विकणाऱ्या स्टेशनरीच्या दुकानातही चॉकलेट आपल्याला खुणावतात. लालसर, तपकिरी, काळसर अशा रंगात आणि टॉफी, कँडी, बार, मिल्क चॉकलेट, ब्लॅक चॉकलेट अशा प्रकारात मिळणाऱ्या या अद्भुत खाद्यप्रकारात साखर, दुधाची पावडर, कोको पावडर, कोको बटर असे विविध घटक असतात.

सतत चॉकलेट खाल्ल्यानं दात किडतात, वजन वाढतं, कोलेस्टेरॉल वाढतं अशी टीका नेहमीच केली जाते. त्यात साखर जास्त असते म्हणून मधुमेहींनी खाऊ नये, भरपूर कॅलरी असतात म्हणून स्थूल व्यक्तींनी आणि चरबीयुक्त घटक असल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या, हृदयविकारांच्या रुग्णांनी ते निश्चितच टाळावं. मात्र, 'डार्क चॉकलेट' या नावानं वर्णिल्या जाणाऱ्या वर्गाचा माफक प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो असं आता लक्षात येऊ लागलंय. या डार्क चॉकलेटमध्ये साखरेचं प्रमाण अगदी नगण्य असतं आणि कोकोची मात्रा भरपूर असते. कोको हे वनस्पतीजन्य फळ असतं आणि त्याच्या बियांपासून कोको पावडर बनते. त्यात ११ टक्के फायबर तर असतंच; पण लोह, तांबे. मॅग्नेशियम, मँगेनीज, जस्त, सेलेनियम, फॉस्फरस अशी खनिजे, पोटॅशियमसारखे क्षार मुबलक प्रमाणात असतात. साधारणतः १० ग्रॅमच्या डार्क चॉकलेटमध्ये ६० कॅलरी असतात. साहजिकच ते पौष्टिक समजायला हरकत नाही.

आपल्या शरीरातील दैनंदिन चयापचय क्रियेमध्ये अनेक प्रकारचे दूषित आणि विषारी रासायनिक कण निर्माण होतात. यांना 'फ्री रॅडिकल्स' म्हणतात. आरोग्याला अपायकारक असलेल्या फ्री रॅडिकल्सना आहारातले काही विशेष घटक निर्विष करतात. या पदार्थांना 'अँटी ऑक्सिडंट' म्हणतात. डार्क चॉकलेटमध्ये असे 'अँटी-ऑक्सिडंट्स' मोठ्या प्रमाणात असतात. साहजिकच त्यांचा आरोग्यावर आपल्या शरीरातील क्रियांवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणजे, शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत राहतो, रक्तातील कोलेस्टेरॉलमधील एचडीएल हा उपयुक्त घटक वाढतो आणि एलडीएल हा अपायकारक घटक कमी होतो. याचा परिणाम रक्तदाब नियंत्रित राहण्यात, रक्तवाहिन्यांमध्ये अॅथेरोस्क्लेरॉसिस न होण्यात आणि पर्यायानं हृदयविकार टळण्यात होतो.

डार्क चॉकलेटमधील अँटी-ऑक्सिडंटमुळे होणाऱ्या परिणामात मेंदूतील रक्ताभिसरण सुविहित राहतं. यामुळे मानसिक थकवा दूर होऊन मनाला ताजेतवानं आणि रीलॅक्स वाटतं. परिणामतः आजच्या जीवनपद्धतीत सतत सामोरे येणारे ताणतणाव, नैराश्य ताब्यात ठेवता येतं. विद्यार्थ्यांची शाळेतील आणि अभ्यासातील एकाग्रता सुधारते आणि अधिक गोष्टी स्मरणात राहू लागतात. अँटी ऑक्सिडंट भरपूर असल्यानं त्वचेतील रक्ताभिसरण सुधारतं आणि चेहरा टवटवीत, प्रफुल्लीत दिसू लागतो. यामुळे सतत नावीन्याच्या शोधात असलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत आजकाल चॉकलेट बाथ, चॉकलेट फेशियल पॅक, चॉकलेट वॅक्सिंगही वापरलं जाऊ लागले आहेत. नियमितपणे एखादं डार्क चॉकलेट खाल्लं, तर मन शांत राहतं, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वयाच्या खुणा दूर राहतात. एवढंच नव्हे, तर केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे डार्क चॉकलेट हे अँटी-एजिंग मानलं जाऊ लागलंय. साधं चॉकलेट खाऊन वजन वाढत असलं, तरी डार्क चॉकलेटमुळे वजनही नियंत्रित राहतं.

जर्मनीमधील माइन्झ इथल्या 'इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड डाएट' यांच्यातर्फे झालेल्या एका वैद्यकीय चाचणीत हे सिद्ध करण्यात आलं. त्यांनी एका गटाला अतिशय कमी पिष्टमय पदार्थ असलेला आहार रोज दिला. दुसऱ्या गटाला त्याच आहारासमवेत १.५ औंस (४२.५ ग्रॅम) वजनाचं डार्क चॉकलेट देण्यात आलं. तीन आठवड्यानंतर पहिल्या गटाचं वजन अपेक्षेप्रमाणे कमी झालंच, शिवाय डार्क चॉकलेट खाणाऱ्या दुसऱ्या गटातील व्यक्तींचं वजन पहिल्या गटाच्या तुलनेत चक्क १० ते १५ टक्क्यांनी कमी झालेलं आढळलं, शिवाय त्यांची झोप सुधारली आणि कोलेस्टेरॉलही कमी झालं.


आजच्या रुक्ष जीवनात रंगत वाढवणारे जे काही उपाय आहेत, त्यात चॉकलेटचा नंबर नक्कीच वर लागतो. नेहमीचं तपकिरी चॉकलेट किंवा मिल्क चॉकलेट जिभेवर ठेवण्याऐवजी काळे घट्ट डार्क चॉकलेट खाल्लं, तर मौजेसोबत काही आरोग्यमय फायदेही मिळतात; पण मर्यादित प्रमाणातच, कारण हे मजेदार खाद्य म्हणजे रोजचा आहार आणि व्यायाम यांना पर्याय नाही हे विसरून चालणार नाही.

दही रोज खावे की नाही हा प्रश्न अनेक लोकांना पडत असतो तर येथे आम्ही आपल्या सांगत आहोत की दर रोज दही भात खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरु शकेल:


रात्री दह्याचे सेवन टाळावे. याने कफ होण्याची शक्यता असते. रात्री दह्याचे सेवन करायचे असल्यास यात साखर आणि मिरपूड टाकावी.
दररोज दुपारच्या जेवण्यानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं. ताण जाणवतं असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

का खास आहे दही-भात

याने ताण कमी होतं. तसेच तिखट खाण्याचे शौकिन असल्यास कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही. याचे अल्कलाइन प्रभावामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. अॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.

वजन कमी होईल
स्नेक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल. साध्या दही-भातात, पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल. खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दह्याचे सेवन केलं जाऊ शकतं.

कारण

कारण दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते. एका शोधाप्रमाणे दररोज 300 ग्रॅम दही खायला पाहिजे. तसेतर हे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अधिक सेवन केल्या जाणार्‍या आहारात सामील आहे तरी पोट गडबड असल्यास, अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दह्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारतं. याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतं.

मुंबई : कडक उन्हाळा सुरु झालाय. उन्हाच्या या काहिलीपासून वाचण्यासाठी थंडगार सरबात पिणे सर्वच पसंत करतात. या ऋतूत स्वत:ला ताजेतवाने आणि फिट ठेवण्यासाठी विविध प्रकारचे ज्यूस आणि थंड पेयांचे सेवन तुम्ही करत असाल मात्र यातच बेलाचा तुमच्या शरीरासाठी उपयुक्त ठरु शकतो. बेलाच्या प्रयोगाने सौदर्य तर उजळतेच मात्र आरोग्यही चांगले राहते. बेलाचा रस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसाचा दररोज एक ग्लास बेलाचा रस प्यायल्यास त्याचा परिणाम काही दिवसांतच तुम्हाला शरीरावर दिसू लागेल.

उन्हाळ्यात लघवीचा त्रास होत असेल तर बेलाचा रस प्यावा.

बदलत्या जीवनशैली आणि ऑफिसमध्ये अनेक तास बसून राहिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. कमी वयात लोकांना ही समस्या सतावतेय. यावर जर दररोज बेलाचा रस प्यायल्यास गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास दूर होतो.

जर एखाद्याला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर बेलाच्या रसाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते.

ज्यांना हृदयासंबंधित रोगांचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दररोज बेलाचा रस प्यावा. या रसात एक ते दोन थेंब तूप मिसळावे.

तोंड आल्यास बेलाचा रस प्यावा.

रक्त साफ नसल्यास अनेक समस्या निर्माण होतात. यावर बेलाचा रस प्यावा याने अनेक फायदे होतात.

मुंबई : आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. मसाले फक्त स्वाद वाढवत नाहीत तर ते स्वास्थ्यपूर्ण देखील आहेत. तुम्ही जिरा राईस आवडीने खात असाल पण त्यातील जिऱ्याचे महत्त्व तुम्हाला माहित आहेत का? जिऱ्यात असलेल्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे स्वास्थ्यासंबंधिच्या अनेक समस्या दूर होतील. जिरे शरीराच्या सर्व अवयवांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज आहारात जिऱ्याचा समावेश केल्यास त्याचे अनेक लाभ मिळतील. १० दिवस रोज जिरे खाल्याने अनेक फायदे होतील. याचा परिणामही लगेचच जाणवू लागेल.

-पचनतंत्र सुधारते. पोटांच्या समस्या दूर होतात.
-गॅस, वात या समस्या नष्ट होतात. बद्धकोष्ठतेवर हे अत्यंत लाभदायक आहे.
-पिंपल्स, काळे डाग यावर लाभदायी ठरते.
-जिऱ्यात व्हिटॉमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य राखले जाते.
-व्हिटॉमिन ई मुळे त्वचेवरील एजिंगचा परिणाम कमी होतो.
-जिऱ्यात त्वचेसंबंधित आजार एग्जिमा ठीक करण्याचे गुणधर्म असतात.
-हाताला घाम येत असल्यास जीरं पाण्यात उकळवा आणि पाणी थंड करा. तहान लागल्यावर पाणी प्यायल्याने आराम मिळेल.
-३ ग्रॅम जिरे आणि १५ मि. ग्रॅम फटकी फटक्यात बांधून गुलाबपाण्यात भिजत ठेवा. डोळे दुखी लागल्यास किंवा लाल झाल्यास त्यावर हे फडके ठेवा.
-दह्यात भाजलेल्या जिऱ्याचे चुर्ण घालून खाल्यास डायरियावर आराम मिळतो.
-जिऱ्यात लिंबाचा रस आणि मीठ घाला. त्यामुळे उलटीसारखे वाटणे, मळमळणे यावर आराम मिळेल.
-जिऱ्यात थोडे व्हिनेगर घालून खाल्यास उचकी बंद होते.
-जिऱ्यात गुळ घालून त्याच्या गोळ्या बनवा. त्या मलेरियावर लाभदायी ठरतात.
-एक चिमुटभर कच्चे जिरे खाल्याने अॅसिडीटीपासून सुटका होते.
-मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी एक छोटा चमचा जिरे दिवसातून दोनदा पाण्यासोबत घ्या. नक्कीच फायदा होईल.

Dr. Jitendar Choudhary
Dr. Jitendar Choudhary
BHMS, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. Vasudha Pande
Dr. Vasudha Pande
MBBS, Ophthalmologist, 16 yrs, Pune
Dr. Hema Chandrashekhar
Dr. Hema Chandrashekhar
BAMS, Ayurveda Family Physician, 28 yrs, Pune
Dr. Amarsinha Nikam
Dr. Amarsinha Nikam
MD - Homeopathy, Homeopath, 33 yrs, Pune
Dr. Rajesh Jagdale
Dr. Rajesh Jagdale
BAMS, Pune
Hellodox
x