Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु झाला आहे..भर दुपारच्या वेळेत तर घराबाहेर पडूच नये अशा ऊन्हाच्या झळा मारत असतात. कालपासून तर सूर्य विषुववृत्तावर पृथ्वीच्या माथ्यावर असल्याने थेट सरळ किरणे पडत आहेत, ज्यामुळे कधी नव्हे असे ४० अंशाहून अधिक तापमान मुंबईमध्ये आहे.या ऊष्ण व दमट वातावरणामध्ये उष्णतेचे विकार बळावणे, हे निसर्गाच्या नियमाला धरुनच म्हटले पाहिजे. त्यातही ज्यांना उन्हाचा प्रत्यक्ष सामना करावा लागतो अशा मंडळींना, ज्यांना ऊन बाधते, अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना आणि कडक उन्हाळा असूनही उष्ण गुणांचा आहार घेणार्‍यांना उन्हाळा फार बाधतो. त्यामुळे विविध उष्णताजन्य तक्रारी या दिवसांमध्ये त्रस्त करतात. जसे- मूत्रविसर्जन वा मलविसर्जन करताना दाह वा वेदना होणेअंगावर पित्त उठणे, तोंड येणे, त्वचेवर उष्णतेच्या पिटीका येणे, नाकातून वा गुदावाटे रक्त पडणे वगैरे. या सर्व तक्रारींना प्रतिबंध म्हणून आणि तक्रारी फार गंभीर नसताना घरच्याघरी करण्याजोगा सुरक्षित उपचार म्हणजे ’सब्जा’.

सब्जा हे तुळशीसारखेच एक लहानसे क्षुप असते, जे सर्वत्र उगवते. त्यातही पंजाब राज्यामध्ये सब्जाची रोपटी अधिक पाहायला मिळतात. या सब्जाच्या झाडाचे बी हे तुळशीच्या बीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचे व काळसर-करड्या रंगाचे असते. हे बी पाण्यामध्ये भिजवल्यावर ते फुगते व पाणी शोषून पांढरट रंगाचे व बुळबुळीत बनते. भिजून फुगल्यानंतर हे बी पाण्यामधून, दुधातून वा सरबतातून घेतल्यास ते उष्णताजन्य वरील विकारांवर अतिशय गुणकारी ठरते.

सब्जाचे बी हे चवीला गोड असून शरीरातला थंडावा वाढवून ऊष्मा कमी करण्याचा अलौकिक गुण त्यांमध्ये आहे. सब्जा बीमुळे मूत्र सहज सुटते व मूत्रविसर्जन करताना होणारा दाह व वेदना दूर होते. या दिवसांमध्ये काही जणांना वारंवार मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचा (युरिन इन्फेक्शनचा) त्रास होतो. अशा लोकांनी सब्जाचे बी सकाळ-सायंकाळ घेतल्यास चांगला आराम पडतो. विशेष म्हणजे वरील आजार झाल्यानंतर औषध घेतात, तसे न घेता त्या तक्रारी होऊच नयेत म्हणून घेण्यासारखे सब्जा हे सुरक्षित औषध आहे. सब्जाचा शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचा गुण तर इतका प्रभावी आहे की, दिवसातून तीन-चार वेळा सब्जा घेतल्यास शरीरामध्ये एसी ठेवल्यासारखा परिणाम होतो. या तळपत्या उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे येणार्‍या पाहुण्याचे स्वागत सब्जा बी देऊनच केले पाहिजे…म्हणजे येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाला सरबतही मिळेल आणि औषधही !

तुम्ही पाणी बसून पिता की उभं राहून? जर तुमचे उत्तर उभं राहून असे असेल तर वेळीच सावध व्हा. कारण अशाप्रकारे उभं राहून पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात अनेकजण उभ्यानेच पाणी पितात मग ते ऑफीस असो घर असो किंवा प्रवासात पाणी पिणे ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र वेळीच ही सवय मोडणे आरोग्यासाठी योग्य ठरेल… उभ्याने पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला कोणकोणते धोके आहेत जाणून घेऊयात…

सांधेदुखी:

उभ्यानेच आणि घाईघाईने पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा म्हणजेच आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. शरीराच्या सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे अचानक क्रॅम्प येणे किंवा सांधे दुखणे यासारख्या लक्षणांपासून या आजाराची सुरुवात होते आणि मग हा सांधेदुखीचा त्रास आयुष्यभराचा सोबती होतो.

पचनाचे विकार:

जेव्हा तुम्ही उभ्याने पाणी पिता तेव्हा ते थेट अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.

तहान भागत नाही:
उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळेच निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते.
पचनाला कठीण:

उभं राहून पाणी प्यायलास शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याऐवजी बसून पाणी प्यायल्यास तुमचे स्नायू आणि मज्जासंस्थेवर जास्त ताण नसल्याने पाण्याबरोबर शरीरातील इतर पदार्थही पचण्यास मदत होते.

किडनीचे आजार:

उभे राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते आणि त्याचा शरीराला विशेष फायदा होत नाही. पाणी वेगाने वाहून किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. आणि हा संसर्गामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा करू शकते.

लेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी भेंडी , भाज्यांमध्ये बर्‍याच लोकांना पसंत येते, तर त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. पण भेंडीच्या या फायद्यांना जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच याचे सेवन कराल. जाणून घ्या भेंडीचे 8 अनमोल फायदे...

1) कँसर - भेंडीला आपल्या ताटात सामील करून तुम्ही कँसरला पळवू शकता. खास करून कोलन कँसरला दूर करण्यासाठी भेंडी फारच फायदेशीर असते. ही आतड्यांमध्ये उपस्थित विषारी तत्त्वांना बाहेर काढण्यास मदत करते, ज्याने तुमच्या आतड्या स्वस्थ राहतात आणि उत्तम प्रकारे काम करतात.

2) हृदय - भेंडी तुमच्या हृदयाला देखील स्वस्थ ठेवते. यात उपस्थित पॅक्टिन कोलेस्टरॉलला कमी करण्यास मदत करतो. तसेच यात असणारे विरघळणारे फायबर, रक्तात कोलेस्टरॉलला नियंत्रित करतो, ज्याने हृदय रोगाचा धोका कमी राहतो.

3) डायबिटीज - यात असणारा यूगेनॉल, डायबिटीजसाठी फारच फायदेशीर असतो. हा शरीरात ग्लोकोजच्या स्तराला वाढवण्यापासून बचाव करतो, ज्याने डायबिटीज होण्याचा धोका कमी असतो.

4) अॅनिमिया - भेंडी ऍनिमियामध्ये फारच लाभदायक असते. यात उपस्थित आयरन हिमोग्लोबिनचे निर्माण करण्यास सहायक असतो आणि विटामिन- के, रक्तस्त्रावाला रोखण्याचे काम करतो.

5) पचन तंत्र - भेंडी भरपूर फायबर असणारी भाजी आहे. यात उपस्थित लसदार फायबर पचन तंत्रासाठी फायदेशीर असतो. यामुळे पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.

6) हाड मजबूत होतात - भेंडीत आढळणारा लसदार पदार्थ आमच्या हाडांसाठी फारच उपयोगी असतो. यात असणारे व्हिटॅमिन-के हाडांना मजबूत ठेवण्यासाठी मददगार असतात.

7)इम्यून सिस्टम - भेंडीत व्हिटॅमिन-सी असल्यामुळे एंटीआक्सिडेंटने भरपूर असते. ज्यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबूत करून शरीराला आजारांपासून लढण्यास मदत करते. याला भोजनात सामील केल्याने बरेच आजारपण जसे खोकला, थंडीचा त्रास कमी होतो.

8) गर्भावस्थेत भेंडीचे सेवन लाभदायक आहे. भेंडीत फोलेट नावाचा एक पोषक तत्त्व असतो जो गर्भाच्या मस्तिष्काचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. त्याशिवाय भेंडीत बर्‍याच प्रकारचे पोषक तत्त्व आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Dr. Vijay Satav
Dr. Vijay Satav
MD - Allopathy, Clinical Pathologist, 23 yrs, Pune
Dr. Sandeep Darunde
Dr. Sandeep Darunde
BAMS, Optician Ophthalmologist, 3 yrs, Pune
Dr. Sujay Patil
Dr. Sujay Patil
MBBS, General Medicine Physician, 5 yrs, Mumbai
Dr. Pradip Pandhare
Dr. Pradip Pandhare
DNYS, 9 yrs, Pune
Dr. Meghana Karande
Dr. Meghana Karande
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 1 yrs, Pune
Hellodox
x