Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

A beautiful mane with a healthy scalp and shiny hair is something each one of us desire. However, given the multiple factors that affect its health including diet, lifestyle and environment, this desire remains a dream for many. There are good and bad sides to it. The bad thing is that hair problems, dandruff, itching, graying and hair loss are here to stay. The good news is that there are simple, easily available ways and methods that can be effectively used to control these problems.

Homeopathy believes that most health issues have an underlying, deep seated issue and treating that can help in getting rid of the symptoms:

Alopecia (Hair loss): Some people can have generalized hair loss, while some could have patches of balding areas develop on the head. Where other remedies have failed, some people have had successful hair regrowth with homeopathic medications like silicea, kalium carbonicum, lycopodium, Natrum muriaticum, Pulsatilla pratensis, Borax, Cinchona officinalis, and various other products are used effectively to improve hair growth.

Dandruff: There is flaking of the scalp, and people with oily skin have a higher incidence of having dandruff. Other reasons include hormonal imbalance, poor scalp/hair health, emotional stress and poor quality hair products. Kali sulphuricum is used for profusely oily, white scaly dandruff. Thuja is used in people with white scaly flaking. If there is associated hair loss, phosphorus is used. Natrum muriaticum, Sulphur, Carboneum sulphuratum, Lycopodium, Mezereum, Ammonium muriaticum, Arsenic album, Calcarea, Medorrhinum, Heracleum sphondylium and Kali carbonicum are also used based on associated symptoms.

Graying of hair: Various reasons for graying include stress, environmental exposure, hair products, poor diet and of course genetic. Gray hair can be treated using various homeopathic preparations depending on the associated symptoms, which might point to the likely root of the problem. Phosphoric acid is used when there is associated grief. Lycopodium is used when there is only partial graying in some areas. In anaemic or weak patients, Natrum mur is used. If digestive symptoms are also present, silicea is used.

Scalp psoriasis (know more about Psoriasis problem): If there is a burning sensation associated with the infection, Sulphur is used. In people with excessive scratching, calcarea is used. Graphites provide relief where there is significant dryness and itching. In people with associated gastric or urinary symptoms, lycopodium is effective. If the psoriasis is worsening in cold weather, sepia is an option. (learn more about Infection on Scalp)

As is evident, these hair problems and interlinked and the agents used in treatment can be used in more than one condition. Self-medication should best be avoided. The presenting symptoms have an underlying cause, and it is best that a detailed discussion with the doctor on the symptoms is done before getting these medicines prescribed.



केसांतील खाज

डोक्यात येणारी खाज अगदी हैराण करुन सोडते. त्यामुळे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. उन्हाळ्यात घाम, चिकचिकीतपणा यामुळे ही समस्या अधिक वाढते. तर पावसाळ्यातही पावसाच्या पाण्यामुळे उद्भवणारी कोंड्याची समस्या डोक्यातील खाजेला आमंत्रण देते. डोक्यात खाज येण्याची अनेक कारणे असली तरी केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळे ही समस्या अधिक वाढते. केसांची मुळे कोरडी राहील्याने खाज तर येतेच त्याचबरोबर कोंड्याची समस्याही उद्भवते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण कोंड्याची समस्या वाढल्यास मायक्रोबियल इंफेक्शन होऊ शकते. म्हणून स्काल्प कोरडे राहू देऊ नका.
तर जाणून घेऊया त्यावरील घरगुती उपाय.
टी ट्री ऑईल
सुंदरता वाढवण्यासाठी जगभरात टी ट्री ऑईलचा वापर केला जातो. याच्यात टरपीन्स नावाचे घटक असते. त्यामुळे अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल गुण असतात. त्यामुळे केसातील खाजेपासून सुटका मिळते. २ चमचे टी ट्री ऑईलमध्ये चमचाभर ऑलिव्ह ऑईल घालून ते मिश्रण कापसाच्या बोळ्याने केसांच्या मुळाशी लावून मसाज करा. आठवड्याभरात याचा परिणाम दिसून येईल.

कोरफड
कोरफड बहुगुणी आहे. केसांच्या, त्वचेच्या सौंदर्यासाठी कोरफड अतिशय उत्तम ठरते. कोरफडीचा वापर केस सुंदर, मजबूत आणि डॅंड्रफ फ्री होण्यासाठी होतो. कोरफड जेलने केसांच्या मुळाशी मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा. असे नियमित केल्याने केसातील खाज दूर होईल.

अॅपल व्हिनेगर
डोक्यातील घाग साफ करण्यासाठी याचा खूप वर्षांपासून उपयोग होत आहे. पाऊण कप पाण्यात पाव कप अॅपल व्हिनेगर घालून केसांना मालिश केल्यास खाजेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

लिंबू आणि मध
लिंबात अॅँटीबॅक्टेरिअल, अॅंटी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे लिंबाच्या रसात मध मिसळून केसांच्या मुळांना मसाज करा आणि १५ मिनिटांनी केस धुवा. कोंडा, खाजेच्या समस्येपासून सुटका होईल.

पावसाळ्यात डोक्याला येणारी खाज कमी करण्याचे ‘6’घरगुती उपाय !
बदलत्या ऋतूमानानुसार त्वचेची,केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीमुळे, हिवाळ्यात त्वचेच्या शुष्कतेमुळे तर पावसाळ्यात टाळूला खाज येणे, पायांना वास येणे, त्वचेला खाज येण्याची समस्या वाढते. पावसाळ्यात डोक्याला खाज येण्याची समस्या अधिक तीव्रतेने जाणवण्यामागे सूर्यप्र्काशाभावी केसांमध्ये ओलसरपणा वाढतो. त्यामुळे फंगल वाढ अधिक होते.

पावसाळयात डोक्याला खाज का येते ?

1. कोंडा : केसात ओलसरपणा राहण्याचे प्रमाण वाढण्यास फंगसची वाढ होते. यामुळे केसात कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. त्यावर या उपायांनी मात करा.

2. सेबरेरिक डार्माटायटीस: टाळूवर अतिप्रमाण तेल निर्माण झाल्यास हा त्रास होतो. यामध्ये टाळूवरील त्वचा लालसर होणे, खाज सुटणे, कोंडा पडणे अशा समस्या दिसून येतात.

3. पॅरॅसिटीक कंडीशन्स : यामध्ये केसात उवा, लिका होण्याचे प्रमाण वाढते. लहान मुलांप्रमाणेच प्रौढांमध्येही हा त्रास आढळतो. म्हणूनच इतरांची फणी,ब्रश वापरणे टाळा. यामुळे त्याचा प्रसार रोखण्यास मदत होते.

4. अपुरा आहार : शरीराला पोषक आहार न मिळाल्यास, पोषणद्रव्यांच्या कमतरतेमुळे डोक्याला खाज सुटते.

5. केसांची पुरेशी काळजी न घेणे – केस विशिष्ट दिवसांच्या फरकांनी स्वच्छ धुणे आवश्यक आहे. तसेच केसांची काळजी घेतल्यास त्याचे आरोग्य आणि चमक राखण्यास मदत होते.

घरगुती उपायांनी कशी कमी कराल टाळूवरील खाज ?
1.खोबरेल तेलाने केसांना मसाज करा. काही वेळाने केस पाण्याने स्वच्छ धुवा.
2. केसांना मधाला हेअर पॅक लावा. मधातील नैसर्गिक मॉईश्चरायझर आणि अ‍ॅन्टी मायक्रोबायल क्षमता केसांचे आरोग्य सुधारतात.
3. बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण टाळूवर लावा. त्यानंतर काही वेळाने केस पाण्याने स्वच्छ धुवावेत.
4. कोरफडीचा गर देखील टाळूवरील खाज कमी करण्यासाठी मदत करते.
5. केस धुण्यासाठी योग्य शाम्पू आणि कंडीशनरचा वापर करा. दर आठवड्याला केसांच्या पोतानुसार योग्य हेअर पॅक लावा.
6. आहारात पुरेसे पाणी, फळं, हिरव्या भाज्या यांचा समावेश करा.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



कोंडा (dandruff) होण्याची कारणे व उपाय

आपण सर्वच आपल्या केसांची निगा ठेवतो, पण तरी देखील केसांमध्ये काही ना काही समस्या होतात. केसात कोंडा होणे, केसांचे गळणे, केस सफेद होणे इत्यादी. सगळ्यात जास्त जी समस्या होते ती म्हणजे केसात कोंडा होणे. कोंडा म्हणजेच dandruff. कोंडा आपल्या केसांसाठी हानिकारक असतो. आपले केस काळे, लांब, दाट असावेत यासाठी केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील वेग वेगळे उपाय करत असतात. सगळ्यात आधी जाणून घेवूयात केसांमध्ये कोंडा का होतो व त्याची कारणे. केसांची योग्य प्रकारे निगा न ठेवल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. सगळ्यात जास्त केसात कोंडा थंडीच्या दिवसांमध्ये होतो कारण थंडीमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो.

संक्रमणामुळे देखील केसात कोंडा होतो. कारण आपल्या डोक्याच्या त्वचे मध्ये मृत कोशिका असतात. ज्यांना डेड स्कीन सेल्स देखील म्हणतात. कान, नाक, चेहरा, पोट, पाठन येथे देखील हि समस्या होऊ शकते. आपल्या डोक्यात जर कोरडेपणा व खाज होत असेल तर याचा अर्थ असा होतो कि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रकारे काम करत नाही आणि एनीमा हा रोग झाल्यामुळे देखील त्वचेत कोरडेपणा येऊन आपल्या केसांमध्ये कोंडा होतो.

केसांना पर्याप्त मात्रेत पोषण न मिळाल्यामुळे देखील कोंडा होतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट व कमी पाणी प्यायल्यामुळे देखील कोंडा होतो. तसेच आपण केसांना झटपट सुंदर करण्यासाठी केमिकल युक्त कॉस्मेटीक प्रोडक्टस चा वापर करतो, यांच्या परिणामांमुळेमुळे देखील कोंडा होऊ शकतो.

जर आपल्या केसात कोंडा होत असेल आणि सारखी सारखी केसात कोंड्यामुळे खाज सुटत असेल तर हि एक गंभीर समस्या होऊ शकते. आपल्या केसात अजून इतर समस्या होऊ लागतात. जर आपल्याला या समस्यां मुळापासून नष्ट करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय करून पहा. यामुळे आपल्या केसातील कोंडा व कोरडेपणा दूर होईल. तसेच आपले केस जाड, मोठे, दाट आणि सुंदर होतील.


१. लिंबू आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. ३ ते ४ लिंबू घ्या व त्यांची साले काढून त्यांना जवळ जवळ अर्धा लिटर पाण्यात १५ ते २० मिनटासाठी उकळवा व नंतर पाणी थंड झाल्यावर हा पाणी आठवड्यातून २ वेळा आपल्या केसां मध्ये लावा. असे केल्याने आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील.

२. मेथी मुळे आपले अनेक रोग बरे होण्यास मदत होते. जर आपल्याला आपले केस मजबूत करायचे असतील व कोंडा घालवायचा असेल तर २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवा व सकाळी हि मेथी वाटून घ्या व याची पेस्ट बनवा आणि हि पेस्ट कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्या केसांमध्ये व डोक्यात लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर आपले केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या. असे महिन्यातून कमीत कमी ३ ते ४ वेळा करा असे केल्याने आपल्या केसातील कोंडा नाहीसा होईल. अंघोळ करायच्या आधी जर आपण केसांमध्ये लिंबाच्या रसाने मालिश करत असाल तर यामुळे आपल्या केसातील चिकटपणा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील. विनेगर (सिरका) व पाणी समान मात्रेत एकत्र मिळवा आणि हा मिश्रण आपल्या केसांमध्ये रात्रभर लावून ठेवा व सकाळी आपले केस स्वच्छ धुवा असे केल्याने आपल्या केसातील कोंडा दूर होईल.

३. दही आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे. आपल्या केसात थोडा दही कमीत कमी एका तासासाठी लावून ठेवा व नंतर केस नीट धुवून घ्या, असे केल्याने आपल्याला फरक जाणवेल. आपल्याला हि प्रक्रिया आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यानें फायदा होईल.

४. अंडा आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी असतो, अंडा खाल्याने आपल्या शरीरातील पोषक तत्वांची कमी दूर होते. तसेच अंडा आपल्या केसांसाठी देखील फायदेमंद आहे. अंड्याची पेस्ट बनवून आपल्या केसांमध्ये लावा यामुळे आपल्या केसातील कोंडा दूर होईल. आणि आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल. तसेच आपले केस चमकदार व दाट होतात यामुळे आपल्या केसांचे गळणे थांबते.

५. केसांमध्ये बदामाचा तेल किंवा नारळाचा तेल किंवा जैतून चा तेल गरम करून आपल्या केसांमध्ये मालिश करत असाल तर आपल्या केसातील कोंडा दूर होईल. मालिश केल्यावर आपले केस तसेच ठेवावेत. असे केल्याने आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल. केस लांब व घनदाट होतील. तसेच ५ चमचे नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिळवा आणि हा मिश्रण आपल्या केसांमध्ये लावा. सफरचंद व संत्रे बरोबर मात्रेत घेवून याचा लेप बनवा आणि आपल्या डोक्याला लावा आणि हा लेप २० ते ३० मिनिटांसाठी तसाच लावून ठेवा आणि नंतर केस स्वच्छ धुवून घ्या आपले केस मुलायम व कोंडामुक्त होतील.

६. कडुलिंब मध्ये खूप सारे औषधी गुण असतात ज्यामुळे आपले अनेक रोग बरे होतात. कडुलिंब ची पाने बारीक वाटून घेवून त्याची पेस्ट बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा आपल्या केसातील कोरडेपणा, पांढरे केस यासारखी समस्या दूर होईल आणि आपले केस लांब, दाट व कोंडामुक्त होतील.

७. तुळस देखील आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. तुळशीची पाने व आवळ्याची पावडर पाण्यामध्ये मिळवा आणि याचा लेप बनवा आणि या लेपाने आपल्या केसांची मालिश करा. अर्ध्या तासासाठी असेच ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या. आपल्याला फायदा होईल.

आपल्या केसातील कोंडा दूर करण्यासाठी २ चमचे लसून पावडर, एक चमचा लिंबाच्या रसात मिळवा आणि त्याचा लेप बनवा आणि हा लेप आपल्या डोक्यात लावा. जवळ जवळ ४० मिनिटांसाठी लावून ठेवा व नंतर केस स्वच्छ धुवून घ्या असे केल्याने आपले केस लांब, दाट होतील आणि आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल.

८. केसांसाठी रीठ्या पासून बनलेला साबण खूप उपयोगी असतो. रिठा पावडर घ्या व लेप बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल. तसेच कांद्याचा रसामध्ये आल्याच्या रस मिळवा व यात बीट मिळवा आणि तिघांना चांगल्या प्रकारे वाटून घ्या आणि लेप बनवा आणि हा लेप आपल्या केसांमध्ये रात्रभर लावून ठेवा. सकाळी आपले केस स्वच्छ धुवून घ्या जर आपण असे ४ ते ५ रात्र करत असाल तर आपल्या केसातून कोंडा दूर होईल. बेसन ला दही सोबत मिळवा व लेप बनवा आणि हा लेप आपल्या केसांमध्ये २० मिनिटांसाठी लावून ठेवा व नंतर केस चंगल्या प्रकारे धुवून घ्या आपल्या केसातील कोंडा दूर होईल.

९. बेकिंग सोडा देखील आपल्या केसांसाठी उपयोगी आहे. केस धुताना केसांमध्ये चिमुटभर बेकिंग सोडा मिळवा, बेकिंग सोड्यामुळे कोंडा दूर होतो. रोजमेरी ची पाने विनेगर सोबत पिळून घ्या व आपल्या केसांमध्ये १५ ते २० मिनीटान साठी लावा आणि नंतर केस धुवून घ्या असे केल्याने आपल्या केसांसाठी फायदेमंद ठरेल. तसेच रोजमेरी चा तेल व नारळाचा तेलाच मिश्रण देखील लावू शकतो व आपले केस धुवून घ्या हे काही घरगुती उपाय आहेत ते करून पहा.

काळेभोर, लांबसडक केस सगळ्यांना हवेहवेसे असतात. पण सध्या वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस केसांच्या वाढीत अनेक अडचणी येत आहेत. रुक्ष, गळणारे केस आणि त्याला फुटणारे फाटे यामुळे केस वाढवायलाही भीती वाटत असल्याचे मत अनेकदा व्यक्त केले जाते. मात्र प्रत्येकवेळी यासाठी गोळ्या किंवा औषधे घेण्यापेक्षा घरगुती उपायांनीही फरक पडल्याचे दिसून येते. रोजच्या स्वयंपाकात फोडणीमध्ये वापरण्यात येणारा कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम असल्याचे अनेकदा सांगितले जाते. चला तर बघूया कसा वापरायचा हा कढीपत्ता

असा उपयोगी आहे कढीपत्ता :

कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी१, बी३, बी९ आणि सी असतात. याशिवाय आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळतं. याचं दररोज सेवन केल्यानं आपले केस काळे, लांबसडक होतात आणि कोंड्याची समस्याही दूर होते.

कढीपत्त्याची पावडर :

कढीपत्ता वाळवून त्या पानांना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. साधारण २०० मिली तेलात ५ चमचे कढीपत्त्याचं पावडर मिक्स करून उकळून घ्यावं. हे मिश्रण थंड झाल्यावर हवाबंद बाटलीत भरून ठेवावे. शाम्पू करण्यापूर्वी रात्री हे तेल केसांना लावून ठेवा.सकाळी शक्यतो नैसर्गिक शाम्पूने केस धुवून टाका.

कढीपत्त्याचा मास्क :

कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनीटं तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि घनदाट होतात.

कढीपत्ता चहा :

कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. साखरेऐवजी गूळही वापरू शकता. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवतो.

जास्त करून लोक लिंबाचा वापर भोजन स्वादिष्ट करणे किंवा ज्यूस पिण्यासाठी करतात. पण जर आम्ही याचा वापर वेग वेगळ्या पद्धतीने केला तर बरेच हेल्थ प्रॉब्लम्स देखील कंट्रोलमध्ये करू शकता. येथे आम्ही तुम्हाला अर्ध्या लिंबाचे काही उपयोग सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही स्वस्थ राहू शकता.


डैंड्रफ दूर करा
अर्ध्या लिंबाचा रस आणि नारळाचे तेल मिक्स करून केसांना आणि स्कल्पवर मसाज करा. यामुळे डैंड्रफ कंट्रोलमध्ये येईल.


पिंपल्स हटवेल
रोज अर्ध्या लिंबाचा रस आणि मध घालून चेहर्‍यावर लावा. यामुळे पिंपल्स दूर होण्यास मदत मिळेल.


हेअर फॉल कंट्रोल करेल

अर्ध्या लिंबाचा रस आणि कांद्याचा रस एकत्र मिसळून स्कल्पवर मसाज करा. ही क्रिया आठवड्यातून 3 ते 4 वेळा करा. हेअर फॉलची समस्या नक्कीच दूर होईल.

सुरकुत्या मिटवेल
अर्ध्या लिंबाचा रस आणि कडू लिंबाच्या पानांचा रस एकत्र करून चेहर्‍यावर लावा. यामुळे सुरकुत्या झुर्रियों दूर होण्यास मदत मिळेल.


सर्दी पडसं दूर करेल
एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून त्याचे सेवन करावे. यामुळे सर्दी खोकल्याची समस्या दूर होईल.

Dr. Renu Vatkar
Dr. Renu Vatkar
MDS, Pune
Dr. Ganesh  Jangam
Dr. Ganesh Jangam
BHMS, Homeopath Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Mahesh Gupta
Dr. Mahesh Gupta
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Tushar Dorage
Dr. Tushar Dorage
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 5 yrs, Pune
Dr. Ankita Bora
Dr. Ankita Bora
BHMS, Homeopath, 5 yrs, Pune
Hellodox
x