Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

प्रत्येक ऋतूचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो. उन्हाळ्यात अतिघामामुळे शरीराला दुर्गंधी येते, हिवाळ्यात शुष्कता वाढते तर पावसाळ्यातही त्वचेवर खाज येणं, पायांना दुर्गंधी येणं, टाळूला खाज येण हा त्रास जाणवतो. पुरेशी स्वच्छता न पाळल्यास टाळूला खाज येते. पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात दमटपणा असतो, सूर्यकिरणांचा अभाव असतो यामुळे फंगल इंफेक्शन वाढते.

पावसाळ्यात का येते टाळूला खाज -
कोंडा - दमट वातावरणामुळे फंगसचे प्रमाण वाढते. सोबतच पावसाळ्याच्या दिवसात तेल शोषून घेण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे खाज, त्वचा लालसर होणं हा प्रकार वाढतो.

केसांची पुरेशी स्वच्छता न पाळल्यास, यामुळे केसांत उवा, लिका होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे केसांमध्ये खाज वाढू शकते. पोषक आहाराचा अभाव असल्यास टाळूवर खाज वाढू शकते.

कोणत्या उपायांनी कराल मात ?
नियमित केसांना नारळाच्या तेलाने मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावा किंवा आंघोळीपूर्वी किमान अर्धा तास आधी केसांना तेल लावा.

केसांच्या समस्या टाळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात मधाचे हेअर पॅक्स केसांना लावा. मधामध्ये नैसर्गिकरित्या मॉईश्चराईज घटक असतात. सोबतच अ‍ॅन्टी मायक्रोबियल गुणधर्म असल्याने केसांच्या समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

कोरफडीच्या गराचा टाळूवर मसाज केल्याने खाज कमी होण्यास मदत होते.

टाळूवर शुष्कता असल्यास शाम्पू आणि कंडिशनरची निवड योग्यरित्या करा. आठवड्यातून एकदा हेअर स्लाप मास्कचा वापर करा.

पावसाळ्याच्या दिवसातही आहारात योग्य प्रमाणात पाणी, हिरव्या भाज्या, फळं यांचा मुबलक प्रमाणात समावेश करा.

पोषक आहाराच्या अभावामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या वाढते. काहिरा युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, अकाली केस पांढरे होण्याची समस्या हृद्याच्या आरोग्याशी निगडीत आहे. संशोधकाच्या दाव्यानुसार अकाली केस पांढरे होणे हे हृद्यविकाराचे संकेत देतात.
पुरूषांमध्ये अकाली केस पांढरे होण्याची समस्या असल्यास त्यांना हृद्यरोगाचा धोका अधिक असतो. मग अकाली केस पांढरे होण्याची समस्या आटोक्यात ठेवायची असल्यास या घरगुती आणि सुरक्षित उपायांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

आवळा - केसांच्या आरोग्यासाठी आवळा हा अत्यंत उपयुक्त आहे. नियमित आवळ्याचा आहारात समावेश करणंही हितकारी आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिसळा. किंवा आवळ्याचा रस गरम नारळाच्या तेलात मिसळून डोक्याला लावणं हितकारी आहे.

काळामिरी - काळामिरीचे दाणे किंवा काळामिरी पावडर पाण्यात उकळा. शाम्पूनंतर केस या पाण्याने धुवावेत. नियमित हा उपाय केल्याने केसांचे आरोग्य सुधारेल.

दूध पिणं हाडांना बळकटी देते. सोबत केसांच्या आरोग्यासाठीदेखील हे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा गाईचं दूध केसांना लावा. यामुळे केस काळे होण्यास मदत होते.

कढी पत्ता आहाराचा स्वाद वाढवतो, त्यासोबतच केसांच्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. पाण्यात तास - दोन तास कढीपत्त्याची पानं मिसळा. या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. नारळाच्या तेलात कढीपत्त्याच्या पानांचा रस मिसळून लावल्याने फायदा होतो.

कोरफड - त्वचेसोबतच केसांच्या आरोग्यासाठीदेखील कोरफड फायदेशीर आहे. नियमित कोरफडीचा वापर केल्याने केस काळे होण्यास मदत होते. केसगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास केसांचे आरोग्य सुधारते.

कांदादेखील केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केस धुण्यापूर्वी काही वेळ कांद्याचा रस केसांना लावा. यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या आटोक्यात राहते. सोबतच केसगळतीचा त्रास कमी होतो.

पावसाळा सुरु होताच सर्वच झाडांना नवा बहार येतो. सगळीकडे हिरवाई दिसू लागते. इतर झाडांप्रमाणे मेहंदीच्या पानांनाही पावसाळ्यात बहर येतो. सणवार, लग्नसराई मेंहदी आर्वजून काढली जाते. सौंदर्य खुलवण्यात मेंहदीचे महत्त्वाचे स्थान आहे. पण मेहंदीमुळे फक्त सौंदर्यातच भर पडत नाही तर मेहंदी इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया मेहंदीचे इतर फायदे...

नैसर्गिक कंडीशनर
मेहंदीत दही, आवळा, मेथी पावडर घालून मिक्स करा आणि केसांना लावा. १-२ तास केसांवर राहू द्या. त्यामुळे केस काळेभोर, घनदाट आणि चमकदार होतील.

हिट बस्टर
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी मेहंदीचा वापर केला जातो. हाता-पायांच्या तळव्यांना मेहंदी लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते.

नैसर्गिक कुलेंट
डोकेदुखी किंवा मायग्रेनसारखे त्रास कमी करण्यासाठी मेहंदी एक उत्तम उपाय आहे. मेहंदी वाटून डोक्याला लावल्याने खूप फायदा होतो.

पेन किलर
गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी मेहंदी आणि एरेंडलची पाने समान प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण हलकेसे गरम करुन गुडघ्यांवर लावा. नक्कीच फायदा होईल.

भाजल्यास उपयुक्त
शरीरावर कोठेही भाजल्यास मेहंदीची पाने वाटून त्याचा लेप तयार करा. हा लेप भाजलेल्या जागी लावा. जखम लवकर बरी होईल.

बर्‍याच वेळा अस होत की जास्त केमिकल आणि शॅम्पूचा वापर केल्याने केसांचे बरेच आजार होण्याची शक्यता असते. जास्तकरून महिलांचे कोरडे केस, कोंडा आणि
केसांची ग्रोथ थांबल्या सारखे वाटते. महागडे केमिकल युक्‍त हेयर प्रॉडक्ट सोडून तुम्ही नॅचरल उपायांच्या मदतीने केसांच्या सर्व समस्येला दूर करू शकता. बटाटा एक अशी वस्तू आहे ज्याचे सेवन केल्याने तुम्ही केसांच्या सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता.

तुम्ही बटाट्यात मध, दही आणि लिंबाचा रस मिसळून तुमच्या केसांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.

1. दाट आणि सॉफ्ट केसांसाठी

दोन ते तीन बटाटे घ्या, याला सोलून याचे पेस्ट तयार करा. यानंतर या पेस्टमध्ये अंड्याचा पिवळा भाग आणि मध मिसळा. त्यानंतर या पेस्टला केसांवर लावा. याला काही वेळ वाळू द्या. जेव्हा हा पॅक वाळून जाईल तेव्हा चांगल्या माइल्ड शँपूने केस धुऊन घ्या. दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने तुम्हाला केसांमध्ये फरक दिसू लागेल.

2. लांब केसांसाठी

दोन बटाटे घ्या आणि याचा रस काढा. यात दोन चमचे एलोवेरा जेल मिसळा. या मिश्रणाला केसांच्या मुळांना लावा. याला 30 ते 40 मिनिटापर्यंत केसांमध्ये राहू द्या. यानंतर पाण्याने केस धुऊन घ्या. लगेचच शँपू लावायची गरज नसते.

3. कोंडा असलेल्या केसांसाठी

एक किंवा दोन बटाटे घेऊन त्यांचा रस काढून घ्या. या रसात लिंबू आणि दही मिसळून त्या पेस्टला केसांना लावून थोड्यावेळेसाठी राहू द्या. नंतर एखाद्या चांगल्या शँपूने केस धुऊन घ्या.

जाणून घ्या: तेल लावताना केस का गळतात?

केसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे यांसारख्या समस्या कमी होतात. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण यापासून केसांचे संरक्षण होते, असे आपण आई-आजीकडून ऐकत आलो आहोत. परंतु, जेव्हा तुम्ही तेल लावता तेव्हा प्रत्येक वेळी केस गळतात. असे का होते? हे जाणून घेण्यासाठी आम्ही Marvie Ann Beck Academy च्या हेयर आणि ब्युटी एक्स्पर्ट नंदिनी अग्रवाल यांच्याशी संवाद साधला.

तेलामुळे केस मजबूत होतात. त्यांचा फ्रिझीनेस कमी होतो आणि केस तुटण्याला आळा बसतो. पण यामुळे केस गळू देखील लागतात. एका हेयर फॉलिकलमधून १-६ वर्ष केस वाढू शकतात. म्हणून जुने केस गाळून नवीन येणे ही सातत्याने होणारी प्रक्रीया आहे.

म्हणून जेव्हा तुम्ही केसांना तेल लावाल तेव्हा काही वेळ केसांना मसाज करा. अशावेळी केस गळले काहीसे स्वाभाविक असते. परंतु, केस गळण्याचे प्रमाण अधिक असल्यास हे काळजीचे कारण ठरेल. केसातील अतिरिक्त तेल व्यवस्थित निघून जाईपर्यंत केस स्वच्छ धुणे गरजेचे आहे. कारण केसात तेल राहिल्याने धूळ, धूर, इतर प्रदूषणजन्य घटक केसात चिकटून राहण्याची शक्यता असते. तसंच त्यामुळे स्काल्फजवळील पोर्स बुजतात आणि हेयर फॉलिकल्स ब्लॉक होतात. परिणामी केस गळू लागतात.

तेलकट स्काल्फमुळे केसांत कोंडा होतो व केस गळू लागतात. तसंच खूप तेल लावल्याने स्काल्फमधील नैसर्गिक तेलाशी त्याचे संतुलन साधले जात नाही. त्यामुळे केस कमकुवत होऊन अधिक खराब होऊ लागतात.

टीप: केसांना मसाज करताना स्काल्फला हळुवार मसाज करा. कारण खूप जोरजोरात मसाज केल्याने केस गळू लागतील. त्याचबरोबर अधिक प्रमाणात तेल लावू नका आणि केसातील तेल निघून जाईल अशापद्धतीने स्वच्छ केस धुवा.

Dr. Priyanka Awale
Dr. Priyanka Awale
MD - Homeopathy, Homeopath Dietitian, 11 yrs, Pune
Dr. Pawan Sarda
Dr. Pawan Sarda
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Amit Patil
Dr. Amit Patil
MD - Allopathy, Gynaecological Endoscopy Specialist Gynaecologist, 11 yrs, Pune
Dr. Pradnya Deshmukh
Dr. Pradnya Deshmukh
BAMS, Ayurveda, 18 yrs, Pune
Dr. Manisha Dandekar
Dr. Manisha Dandekar
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Hellodox
x