Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

अधिकतर महिलांना झोपताना केस मोकळे सोडायची सवय असते. यामुळे झोपताना आरामदायी वाटते आणि रक्तप्रवाही सुरळीत होतो. पण एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, झोपताना केस बांधायला हवेत. कारण रात्री केस कोरडे आणि कमजोर होतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर केस विंचरताना केस तुटू लागतात. यामुळे रात्री झोपताना केस बांधणे अधिक फायदेशीर ठरेल.

रात्री केस बांधून झोपण्याचे इतर फायदे...

# केस गुंतू नये असे जर तुम्हाला वाटत असेलतर केस बांधून झोपा. पोनी, वेणी घालून तुम्ही झोपी शकता. केसांना कलर केल्यानंतर १-२ दिवस तरी केस बांधून झोपा.


# केस बांधायचे नसल्यास रात्री झोपताना केसांवर कॉटनचा स्कार्फ किंवा रुमाल बांधा. त्यामुळे चादर, उशीत केस गुंतून तुटणार नाहीत. केसात मॉईश्चर टिकून राहते. परिणामी केस कोरडे होत नाहीत.

# केस मऊ व मुलायम राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केसांना हेअर मास्क लावा आणि शॉवर कॅप घालून झोपा. सकाळी उठून केस धुवा. केस अधिक मुलायम होतील.

# केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कॉटनऐवजी सिल्कचे पिलोकव्हर वापरा. कॉटन पिलोकव्हरमुळे केस कोरडे होऊ शकतात. म्हणूनच केस आणि त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी सिल्क पिलोकव्हर वापरा. सिल्क पिलोकव्हरमुळे केस तुटणे, गुंतणे या समस्या दूर होण्यास मदत होईल.

डोक्यात कोंडा होण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर त्वरित उपाय करणे फार महत्वाचे असते. खूप अधिक प्रमाणात डोक्यात कोंडा होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही घरगुती उपाय करूनही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

डोक्यातील स्किन मृत पावण्याची प्रक्रिया लवकर होत असल्यामुळे ही समस्या उद्भवते. पाणी कमी प्यायल्याने देखील ही समस्या उद्भवते.

साखर आणि कोरफड
डोक्यात कोंडा होत असेल तर साखर आणि कोरफड मधील जेल एकत्र करून डोक्याच्या स्किन वर लावावे. कोरफड आणि आणि साखर डोक्यातील मृतस्किन काढण्यास मदत करते.

साखर बारीक करून ती कोरफडच्या जेलमध्ये मिसळून घ्यावी. दोघांचं मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण डोक्याच्या स्किनवर लावावे. 30 मिनिटे झाल्यानंतर डोकं स्वच्छ धुवावे. केसांची वाढ करण्यासाठी देखील हे मदत करतं.

पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणार्‍या माका, ब्राह्मी, नागरमोथा या सारख्या वनस्पती उकळून तयार केलेले तेल अतिशय उत्तम असते.

केसवर्धक तेल कसे तयार करावे?

माका, ब्राह्मी यांची पानं सम प्रमाणात घेऊन ती बारीक करावी. त्यात त्या लाद्याच्या चारपट पाणी घालून ते जाड बुडाच्या पातेल्यात घालावे. त्या लाद्याच्या समप्रमाणात तेल घालावे. ते मिश्रण गॅसवर ठेवून संपूर्ण पाणी आटून तेल राहीलपर्यंत उकळावे. थंड झाल्यावर गाळून ते केसांना मसाज करण्यासाठी वापरावे. या तेलाने केस वाढतात, गळणे बंद होते, पांढरे होण्याची प्रक्रिया कमी होते.

पौष्टिक आहाराच्या मदतीने केस गळतीच्या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो. पहा त्या पाच भोज्य पदार्थांबद्दल ज्यांचे सेवन केल्याने तुमचे केस गळण्याच्या समस्येवर रोख लागू शकते.


रताळे : व्हिटॅमिन आणि बीटा कॅरोटिनने भरपूर रताळे केसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. बीटा कॅरोटिनचे दुसरे इतर स्रोतांमध्ये गाजर आणि कोहळा हे उत्तम पर्याय आहे.

अंडी : बायोटिन आणि व्हिटॅमिनहून भरपूर अंडी केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. अंड्याचे सेवन केल्याशिवाय याला ऑलिव्ह ऑइल सोबत मिक्स करून केसांना लावू शकता. 2 अंडी आणि 4 चमचे ऑलिव्ह ऑइल याची पातळ पेस्ट तयार करून डोक्याला लावावी.

पालक : आयरन आणि फोलेटचा उत्तम स्रोत असून केसांच्या वाढीसाठी पालक फारच फायदेशीर असतो. त्याच बरोबर फोलेट लाल रक्त कौशिकांचा निर्माण करण्यास मदत करतो, जो केसांपर्यंत जाऊन केसांना ऑक्सिजन पोहोचवतो. जेवणात पालकाला सॅलडच्या रूपात देखील घेऊ शकता.

शिमला मिरची : लाल, पिवळी आणि हिरव्या रंगांमध्ये मिळणार्या शिमला मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं, जे केसांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास केसांमध्ये कोरडेपणा येतो आणि लवकरच ते तुटू लागतात.

मसूर डाळ : मसूर डाळ, टोफू, सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटार शाकाहारी लोकांसाठी आयरनाने भरपूर प्रोटिनाचे महत्त्वपूर्ण स्रोत आहे. ये सर्व पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी फारच गरजेचे आहे.

- झेंडूचे फुल बारीक करून त्‍याचा रस काढा. हा रस नारळाच्‍या तेलात टाकून उकळून घ्‍या. हे तेल थंड झाल्‍यानंतर बाटलीत भरून ठेवा. हे

तेल रोज केसाला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.

- जटामांसी या वनस्पतीला नारळाच्‍या तेलामध्‍ये उकळून हे तेल थंड झाल्‍यानंतर बॉटलमध्‍ये भरावे. रोज रात्री हे तेल डोक्‍याला
लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.

- आहारात जास्‍त मीठाचा वापर केला तर टक्कल पडते. मीठ, काळी मिर्ची एक-एक चमचा घ्‍या. या मिश्रणात पाच चमचे नारळाचे तेलटाका. हे मिश्रण टक्कल पडलेल्‍या जागेवर लावल्‍यानंतर केस उगवायला सुरूवात होते.

- आवळ्याचे चुर्ण तयार करुन हे चुर्ण दह्यात मिसळून घ्‍यावे. यानंतर आवळा आणि दह्याची पेस्‍ट तयार करून केसाच्‍या मुळाला लावावी.
एका तासानंतर केस स्‍वच्‍छ धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्‍यानंतर डोक्‍यावर केस यायला लागतील.
- दोन लीटर पाण्‍यामध्‍ये आवळ्याचे चुर्ण, लिंबाची पाने टाका. दोन लीटर पाणी आर्धे होईपर्यंत उकळत ठेवा. या पाण्‍याने आढवड्यातून दोन
वेळा केस स्‍वच्‍छ करा. यामुळे केस गळती थांबते.

- जैतूनच्‍या(ऑलिव्ह ऑइल) तेलामध्‍ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकून पेस्‍ट तयार करावी. स्‍नान
करण्‍याआगोदर ही पेस्‍ट डोक्‍याला लावावी. पंधरा मिनिटा नंतर केस कोमट पाण्‍याने स्‍वच्‍छ करावेत. काही दिवसात केस गळती बंद होईल.
- शिकाकाईच्‍या बीयामध्‍ये थोडे पाणी टाकून बारिक करून घ्‍यावे. रात्रभर पेस्‍ट थंड असेलल्‍या ठिकाणी ठेवावी. सकाळी हे पेस्‍ट केसाला
लावून अर्ध्‍या तासानंतर केस स्‍वच्‍छ करावे. हे पेस्‍ट केसासाठी नॅचरल शॅम्‍पूचे काम करते. याचा वापर वारंवार केल्‍यानंतर केस गळतीची
समस्‍या दूर होते.

- आहारात मेथीच्‍या भाजीचा वापर जास्‍तीत-जास्‍त केल्‍या नंतर आरोग्‍यासाठी लाभदायक ठरतो. मेथीच्‍या बीया रात्रभर पाण्‍यात भिजत ठेवा.सकाळी याचे पेस्‍ट तयार करा. हे पेस्‍ट केसाला लावल्‍यांनतर केस गळती थांबते.

- जास्‍वदांच्‍या फुलाचा रस काढून घ्‍या. या रसाने केसाची मसाज करा. एका तासानंतर केस स्‍वच्छ करावेत. केस दाट होण्‍याबरोबरच काळे
होतात.

Dr. Tushar Dorage
Dr. Tushar Dorage
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 5 yrs, Pune
Dr. Dhananjay Ostawal
Dr. Dhananjay Ostawal
BHMS, General Physician, 34 yrs, Pune
Dr. Ashok Lathi
Dr. Ashok Lathi
MS - Allopathy, General Surgeon, 37 yrs, Pune
Dr. Hemant Chavan
Dr. Hemant Chavan
BAMS, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Pavan Prakash Pargaonkar
Dr. Pavan Prakash Pargaonkar
BHMS, Family Physician, 6 yrs, Pune
Hellodox
x