Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

आजच्या धावपळीच्या जीवनात केसांचं पोषण होणं खूप गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यामुळेच केस मोठ्या प्रमाणात गळतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याच्या आधीही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याआधी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकतात.

१. एरंडेल, ऑलिव्ह किंवा बदाम यापैकी दोन प्रकारचे तेल एकत्र करून लावावे. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल आणि केस गळणे थांबेल.

२. केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नये. गरम पाण्यामुळे तुमचे केस कडक आणि कोरडे होतात.

३. अंघोळीआधी केसांना दही आणि अंडं यांचे मिश्रण लावावे. हे मिश्रण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर मानले जाते. मध आणि दही यांचे मिश्रणही कंडिशनर म्हणून वापरता येईल.

४. काळी डाळ रात्री भिजत ठेवावी. त्यानंतर सकाळी ती व्यवस्थित वाटून त्यात अंडं, लिंबाचा रस आणि दही टाकून ती केसांना लावल्याने फायदा होतो.

५. केस धुण्यापूर्वी केसांना तेला लावून २० मिनिटं मालिश करावी.

सध्या स्ट्रेट हेअरचा ट्रेंड आहे. हेअर स्ट्रेट करण्यासाठी अनेक उपकरने बाजारात उपलब्ध आहेत. परंतू त्या उपकरनांमुळे केसांचे नुकसान देखील होते. त्याचप्रमाणे यासाठी लोकं महागडे ट्रीटमेंट करतात. पण घरातही तुम्ही आता स्ट्रेट करू शकता. हे उपाय केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

व्हिनेगर : केसांना शैम्पू केल्यावर कंडिशनर करा. कंडीशनरनंतर गार पाण्यात व्हिनेगरचे काही थेंब टाकावे त्यानंतर केस धुवावे.

केळी आणि मध : दोन केळी बारीक करून त्यात २ चमचे मध, २ चमचे ऑलिव्ह तेल आणि २ चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट आपल्या पूर्ण केसांवर लावून शॉवर कॅपने केस कव्हर करा. अर्ध्या तासाने केस धुऊन टाका.

एरंडेल तेल : गरम एरंडेल तेल ने मालीश करा. नंतर गरम टॉवेलने केसांना वाफ द्या आणि ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्यात धूवा.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



कोंडा (dandruff) होण्याची कारणे व उपाय

आपण सर्वच आपल्या केसांची निगा ठेवतो, पण तरी देखील केसांमध्ये काही ना काही समस्या होतात. केसात कोंडा होणे, केसांचे गळणे, केस सफेद होणे इत्यादी. सगळ्यात जास्त जी समस्या होते ती म्हणजे केसात कोंडा होणे. कोंडा म्हणजेच dandruff. कोंडा आपल्या केसांसाठी हानिकारक असतो. आपले केस काळे, लांब, दाट असावेत यासाठी केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील वेग वेगळे उपाय करत असतात. सगळ्यात आधी जाणून घेवूयात केसांमध्ये कोंडा का होतो व त्याची कारणे. केसांची योग्य प्रकारे निगा न ठेवल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. सगळ्यात जास्त केसात कोंडा थंडीच्या दिवसांमध्ये होतो कारण थंडीमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो.

संक्रमणामुळे देखील केसात कोंडा होतो. कारण आपल्या डोक्याच्या त्वचे मध्ये मृत कोशिका असतात. ज्यांना डेड स्कीन सेल्स देखील म्हणतात. कान, नाक, चेहरा, पोट, पाठन येथे देखील हि समस्या होऊ शकते. आपल्या डोक्यात जर कोरडेपणा व खाज होत असेल तर याचा अर्थ असा होतो कि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रकारे काम करत नाही आणि एनीमा हा रोग झाल्यामुळे देखील त्वचेत कोरडेपणा येऊन आपल्या केसांमध्ये कोंडा होतो.

केसांना पर्याप्त मात्रेत पोषण न मिळाल्यामुळे देखील कोंडा होतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट व कमी पाणी प्यायल्यामुळे देखील कोंडा होतो. तसेच आपण केसांना झटपट सुंदर करण्यासाठी केमिकल युक्त कॉस्मेटीक प्रोडक्टस चा वापर करतो, यांच्या परिणामांमुळेमुळे देखील कोंडा होऊ शकतो.

जर आपल्या केसात कोंडा होत असेल आणि सारखी सारखी केसात कोंड्यामुळे खाज सुटत असेल तर हि एक गंभीर समस्या होऊ शकते. आपल्या केसात अजून इतर समस्या होऊ लागतात. जर आपल्याला या समस्यां मुळापासून नष्ट करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय करून पहा. यामुळे आपल्या केसातील कोंडा व कोरडेपणा दूर होईल. तसेच आपले केस जाड, मोठे, दाट आणि सुंदर होतील.


१. लिंबू आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. ३ ते ४ लिंबू घ्या व त्यांची साले काढून त्यांना जवळ जवळ अर्धा लिटर पाण्यात १५ ते २० मिनटासाठी उकळवा व नंतर पाणी थंड झाल्यावर हा पाणी आठवड्यातून २ वेळा आपल्या केसां मध्ये लावा. असे केल्याने आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील.

२. मेथी मुळे आपले अनेक रोग बरे होण्यास मदत होते. जर आपल्याला आपले केस मजबूत करायचे असतील व कोंडा घालवायचा असेल तर २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवा व सकाळी हि मेथी वाटून घ्या व याची पेस्ट बनवा आणि हि पेस्ट कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्या केसांमध्ये व डोक्यात लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर आपले केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या. असे महिन्यातून कमीत कमी ३ ते ४ वेळा करा असे केल्याने आपल्या केसातील कोंडा नाहीसा होईल. अंघोळ करायच्या आधी जर आपण केसांमध्ये लिंबाच्या रसाने मालिश करत असाल तर यामुळे आपल्या केसातील चिकटपणा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील. विनेगर (सिरका) व पाणी समान मात्रेत एकत्र मिळवा आणि हा मिश्रण आपल्या केसांमध्ये रात्रभर लावून ठेवा व सकाळी आपले केस स्वच्छ धुवा असे केल्याने आपल्या केसातील कोंडा दूर होईल.

३. दही आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे. आपल्या केसात थोडा दही कमीत कमी एका तासासाठी लावून ठेवा व नंतर केस नीट धुवून घ्या, असे केल्याने आपल्याला फरक जाणवेल. आपल्याला हि प्रक्रिया आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यानें फायदा होईल.

४. अंडा आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी असतो, अंडा खाल्याने आपल्या शरीरातील पोषक तत्वांची कमी दूर होते. तसेच अंडा आपल्या केसांसाठी देखील फायदेमंद आहे. अंड्याची पेस्ट बनवून आपल्या केसांमध्ये लावा यामुळे आपल्या केसातील कोंडा दूर होईल. आणि आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल. तसेच आपले केस चमकदार व दाट होतात यामुळे आपल्या केसांचे गळणे थांबते.

५. केसांमध्ये बदामाचा तेल किंवा नारळाचा तेल किंवा जैतून चा तेल गरम करून आपल्या केसांमध्ये मालिश करत असाल तर आपल्या केसातील कोंडा दूर होईल. मालिश केल्यावर आपले केस तसेच ठेवावेत. असे केल्याने आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल. केस लांब व घनदाट होतील. तसेच ५ चमचे नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिळवा आणि हा मिश्रण आपल्या केसांमध्ये लावा. सफरचंद व संत्रे बरोबर मात्रेत घेवून याचा लेप बनवा आणि आपल्या डोक्याला लावा आणि हा लेप २० ते ३० मिनिटांसाठी तसाच लावून ठेवा आणि नंतर केस स्वच्छ धुवून घ्या आपले केस मुलायम व कोंडामुक्त होतील.

६. कडुलिंब मध्ये खूप सारे औषधी गुण असतात ज्यामुळे आपले अनेक रोग बरे होतात. कडुलिंब ची पाने बारीक वाटून घेवून त्याची पेस्ट बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा आपल्या केसातील कोरडेपणा, पांढरे केस यासारखी समस्या दूर होईल आणि आपले केस लांब, दाट व कोंडामुक्त होतील.

७. तुळस देखील आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. तुळशीची पाने व आवळ्याची पावडर पाण्यामध्ये मिळवा आणि याचा लेप बनवा आणि या लेपाने आपल्या केसांची मालिश करा. अर्ध्या तासासाठी असेच ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या. आपल्याला फायदा होईल.

आपल्या केसातील कोंडा दूर करण्यासाठी २ चमचे लसून पावडर, एक चमचा लिंबाच्या रसात मिळवा आणि त्याचा लेप बनवा आणि हा लेप आपल्या डोक्यात लावा. जवळ जवळ ४० मिनिटांसाठी लावून ठेवा व नंतर केस स्वच्छ धुवून घ्या असे केल्याने आपले केस लांब, दाट होतील आणि आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल.

८. केसांसाठी रीठ्या पासून बनलेला साबण खूप उपयोगी असतो. रिठा पावडर घ्या व लेप बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल. तसेच कांद्याचा रसामध्ये आल्याच्या रस मिळवा व यात बीट मिळवा आणि तिघांना चांगल्या प्रकारे वाटून घ्या आणि लेप बनवा आणि हा लेप आपल्या केसांमध्ये रात्रभर लावून ठेवा. सकाळी आपले केस स्वच्छ धुवून घ्या जर आपण असे ४ ते ५ रात्र करत असाल तर आपल्या केसातून कोंडा दूर होईल. बेसन ला दही सोबत मिळवा व लेप बनवा आणि हा लेप आपल्या केसांमध्ये २० मिनिटांसाठी लावून ठेवा व नंतर केस चंगल्या प्रकारे धुवून घ्या आपल्या केसातील कोंडा दूर होईल.

९. बेकिंग सोडा देखील आपल्या केसांसाठी उपयोगी आहे. केस धुताना केसांमध्ये चिमुटभर बेकिंग सोडा मिळवा, बेकिंग सोड्यामुळे कोंडा दूर होतो. रोजमेरी ची पाने विनेगर सोबत पिळून घ्या व आपल्या केसांमध्ये १५ ते २० मिनीटान साठी लावा आणि नंतर केस धुवून घ्या असे केल्याने आपल्या केसांसाठी फायदेमंद ठरेल. तसेच रोजमेरी चा तेल व नारळाचा तेलाच मिश्रण देखील लावू शकतो व आपले केस धुवून घ्या हे काही घरगुती उपाय आहेत ते करून पहा.

काळेभोर, लांबसडक केस सगळ्यांना हवेहवेसे असतात. पण सध्या वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस केसांच्या वाढीत अनेक अडचणी येत आहेत. रुक्ष, गळणारे केस आणि त्याला फुटणारे फाटे यामुळे केस वाढवायलाही भीती वाटत असल्याचे मत अनेकदा व्यक्त केले जाते. मात्र प्रत्येकवेळी यासाठी गोळ्या किंवा औषधे घेण्यापेक्षा घरगुती उपायांनीही फरक पडल्याचे दिसून येते. रोजच्या स्वयंपाकात फोडणीमध्ये वापरण्यात येणारा कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम असल्याचे अनेकदा सांगितले जाते. चला तर बघूया कसा वापरायचा हा कढीपत्ता

असा उपयोगी आहे कढीपत्ता :

कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी१, बी३, बी९ आणि सी असतात. याशिवाय आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळतं. याचं दररोज सेवन केल्यानं आपले केस काळे, लांबसडक होतात आणि कोंड्याची समस्याही दूर होते.

कढीपत्त्याची पावडर :

कढीपत्ता वाळवून त्या पानांना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. साधारण २०० मिली तेलात ५ चमचे कढीपत्त्याचं पावडर मिक्स करून उकळून घ्यावं. हे मिश्रण थंड झाल्यावर हवाबंद बाटलीत भरून ठेवावे. शाम्पू करण्यापूर्वी रात्री हे तेल केसांना लावून ठेवा.सकाळी शक्यतो नैसर्गिक शाम्पूने केस धुवून टाका.

कढीपत्त्याचा मास्क :

कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनीटं तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि घनदाट होतात.

कढीपत्ता चहा :

कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. साखरेऐवजी गूळही वापरू शकता. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवतो.

आजकाल केस पांढरे होण्यासाठी वयाची मर्यादा राहिलेली नाही. प्रदूषण, बदललेली जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि वेळा यामुळे केस वेळेआधीच पांढरे होतात. पण सफेद केस लपवण्यासाठी लोक अनेक केमिकल्स आणि ट्रीटमेंटची मदत घेतात. पण पैसे खर्च न करता सफेद केस काळे करण्याचा हा सोपा उपाय माहित आहे का? मग जाणून घ्या...

सोपा उपाय
केस काळे करण्यासाठी एका गोष्टीची गरज असते आणि ती आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होते. आपल्या सर्वांच्या घरात चहापावडर असतेच. यात टॅनिक अॅसिड असते त्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. यासाठी ६ चमचे चहापावडर ३० मिनिटे पाण्यात उकळवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यावर केसांना लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात कॉफीही मिसळू शकता.

केस काळे करण्याबरोबरच चहापावडरच्या पाण्याचे इतर अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया...

-केसगळती कमी होण्यास मदत होते.

-केसांची वाढ उत्तम होते.

-केसांचा कोरडेपणा, रफनेस दूर होतो.

-निस्तजे केस चमकदार, मुलायम होण्यास मदत होते.

Dr. Vrushali Garde
Dr. Vrushali Garde
MBBS, Psychiatrist, 11 yrs, Pune
Dr. Pramod Bharambe
Dr. Pramod Bharambe
DHMS, Family Physician Homeopath, 30 yrs, Pune
Dr. Akshay Biyani
Dr. Akshay Biyani
BDS, Dentist Root canal Specialist, 10 yrs, Pune
Dr. Jyoti Kumari
Dr. Jyoti Kumari
BDS, Chest Physician Child Abuse Pediatrician, Ranchi
Dr. Dr.Sandip Narkhede
Dr. Dr.Sandip Narkhede
MS/MD - Ayurveda, Infertility Specialist Lactation Consultant, 10 yrs, Pune
Hellodox
x