Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पोटात जंत होण्याची कारणे व यावर उपचार

कधी कधी लोकांच्या पोटात खूप दुखते आणि याचे काही ना काही दुष्परिणाम असतात. हे पोटात दुखणे ग्यास (आंबटपणा) मुळे होत नाही, कदाचित आपल्या पोटात जंत (किडे) पडले असतील. हे जंत जर शरीरात कुठे ही झाले असतील तर यामुळे आपल्याला इतर रोग होण्याची शक्यता असू शकते. हे जंत उतकान मध्ये किंवा रक्तात होऊ शकतात, आणि हे शरीरात वेगाने पसरतात. पोटात जंत पडण्याचे काय कारण आहे? हे पोटात कसे विकसित होतात? हे परजिवी असतात, फिता कृमी इत्यादी हे परजिवी कोणत्याही आकाराचे असू शकतात या मुळे अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. याच्या वर उपचार ही सोपे आहेत.

पोटात जंत होण्याचे लक्षण खूप सारे आहेत. यात जास्त करून बद्धकोष्ठता होणे, जेवल्यानंतर जेवण चांगल्या प्रकारे न पचणे, सारखे सारखे अतिसार होणे, संडास मध्ये चिकट पणा किंवा रक्त येणे, जेवल्यानंतर लगेच संडासला होणे, पोटात दुखणे व आग होणे, gas (आंबटपणा) आणि सूज चा अनुभव, लवकर थकवा येणे, मुळव्याध होणे, त्वचा रोग एलर्जी, अशक्तपणा ही काही लक्षणे आहेत यामुळे आपल्याला समजेल कि आपल्या पोटात जंत पडले आहेत.

प्रौंढ व्यक्तीने प्रतिदिनी किती आहार घेतला पाहिजे?

काही जंत लाल रक्त कोशिकांना आपला आहार बनवतात यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. काही जंत आपण केलेला आहार खातात. यामुळे पोटात खाज होणे, चिडचिडेपणा आणि अनिद्रा ची समस्या होते. जंत आपल्या त्वचेत खाज निर्माण करतात. यामुळे आपल्या शरीरात खूप खाज सुटते यामुळे इन्फेक्शन चा धोका वाढतो. जेंव्हा या परर्जीवीन मुळे सूज होते तेंव्हा पांढऱ्या रक्तकोशिका शरीराची सुरक्षा करायला सुरवात करतात यामुळे त्वचेवर व्रण पडतात, शरीरावर पुळ्या होतात आणि पिंपल्स सारख्या समस्या होतात. यामुळे आपल्या केसात कोंडा होतो, त्वचा शुष्क पडते. पण काही परजीवी आतड्यांच्या (Mucous membrane) ला नुकसान पोचवतात. आयुर्वेदात हि ह्या समस्येवर उपचार आहेत. आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग करून आपण बरे होऊ शकतो.

पोटात किडे (जंत ) होण्याची लक्षणे
पोटात जंत पडण्याची काही कारणे आहेत. याच्यावर उपचार ही सोपे आहेत. त्वचेच्या खाली हालचाल होणे, दाणेदार घाव, निद्रा नाश, मासपेशी व सांध्यांचे दुखणे, रक्त विकार, यौन व प्रजनन समस्या, नीट श्वास घ्यायला समस्या होणे. याच्यावर उपचारा साठी काही मेडीकल परीक्षण आणि योग्य उपचार जरुरी आहे. याचे परीक्षण करते वेळी परंपरागत अंडाणु आणि परजीवी स्टूल टेस्ट केली जाते जे सगळ्यात महत्वपूर्ण आहे.

परंपरागत मळ परीक्षणा मुळे आपल्या मळात परजीवी किंवा त्यांची अंडी आहेत कि नाही समजते. या परीक्षणात तीन वेगवेगळ्या मळाच्या नमुन्यांची तपासणी आवश्यक आहे. सगळ्या नमुन्यांना सूक्ष्मदर्शी ने तपासण्या साठी चिकित्सका कडे पाठवावे. या परजीविंचा एक विशिष्ट जीवन चक्र असतो, ज्यामुळे हे निष्क्रिय वस्तू मध्ये देखील जिवंत राहतात. या पारंपारिक परीक्षणामुळे आपल्याला समजते कि आपल्या पोटात जंत झालेत कि नाही. या चाचणी मुळे आपण योग्य तो उपचार करू शकतो.

याच्यावर उपाय करण्यासाठी आपल्याला रोज भोपळ्याच्या बिया, अंजीर व तीळा च्या बियांमध्ये एकसाथ मिळवून दिवसातून कमीत कमी २ ते ३ वेळा खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतात. अशावेळी गरम पाणी प्यावा किंवा सील बंद मिनरल पाणी प्यावा, कारण पाण्याद्वारे देखील पोटात जंत होतात. रोज एक अननस खाल्ल्याने पोटासंबंधी विकार बरे होतात.

जेवणाच्या ३० मिनिट आधी किंवा नंतर पपई खा. यावेळी अंतरंग संबंध बनवू नका, आपले कपडे, अंथरूण, गरम पाण्याने धुवा. परजीवी विरोधी आहार करा उदा. मोहरी च्या बिया खा, हात स्वच्छ ठेवा, कॉफी किंवा दारू पिण्याचे टाळा, आल्याची पेस्ट पोटातील जंत मारण्यासाठी एक प्राकृतिक स्त्रोत आहे. आल्याचे तुकडे करा आणि मधात मिळवा, यात थोडासा काळा मीठ टाका. याचे दिवसातून कमीत कमी तीन वेळा सेवन करा. जेंव्हा आपल्या पोटात किडे पडतील तेंव्हा काही पदार्थ खाण्याचे टाळा उदा. साखर, चरबी युक्त पदार्थ, मांस, चिकन, डुक्कर, मेंढी किंवा इतर प्राण्यांचे मांस खाऊ नका कारण या प्राण्यान मध्ये देखील किडे असू शकतात. काही फळांचा आणि भाज्यांचा सेवन केले पाहिजे उदा. लसून, भेंडी, मटर, मुळा, बटाटा, टोमॅटो , शलजम, बीट इत्यादी आणि फळ जांभूळ, चेरी, द्राक्ष, किवी फळ, लिंबू, टरबूज, संत्रा, पपई, अननस, आलू बुखार, डालिंबाचे साल व त्याची पाने खायला पाहिजेत हे आपल्यासाठी खूप फायदेमंद ठरेल. औषधी वनस्पती मध्ये एजेलिका, राख लौकी बीज, सुपारी, अक्रोय हल्स, झुठी गेंडा, गोल्डन सील चे मूळ तसेच ओव्याच्या उपयोग करा. हे काही उपचार आहेत हे करून आपण या समस्येपासून वाचू शकता.

प्रत्येक व्यक्तीने दिवसातून एकदातरी नाश्ता केला पाहिजे आणि नाश्ता न केल्यामुळे एसिडीटी (आंबटपणा) आणि gas च्या समस्या होतात. अनावश्यक वजन वाढणे या सारख्या समस्या होऊ शकतात. नाश्ता केल्याने अनेक फायदे होतात. कारण ७ – ८ तासांच्या झोपेनंतर आपल्याला विविध कामे करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते, हि उर्जा आहारा मुळे मिळते. असे म्हणतात कि नाश्ता हा राजा प्रमाणे करावा, दुपारचे जेवण राजकुमारा प्रमाणे करावे, आणि रात्रीचे जेवण भिक्षु प्रमाणे करावे. प्रत्येक भोजन करताना आहाराची मात्रा नियंत्रित करणे आवश्यक आहे.

प्रौंढ व्यक्तीने प्रतिदिनी किती आहार घेतला पाहिजे आणि कधी घेतला पाहिजे?
अनेक अध्ययना नंतर हे समोर आले आहे कि वजन कमी करण्यासाठी रात्री कमी कॅलरी वाला भोजन करावा. याचा असा अर्थ होत नाही कि फक्त नाश्ता केल्याने आपला वजन कमी होतो. दिवसातून ३ वेळा जास्त आहार घेणे किंवा दिवसातून ६ वेळा थोडा थोडा आहार घेणे गरजेचे आहे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींची सवय केली पाहिजे. आपण प्रतिदिनी सेवन केलेल्या कॅलरी ची मात्रा महत्वपूर्ण असते. जर आपण दिवसातून थोड्या थोड्या वेळाने ६ – ७ वेळा आहार घेणे पसंद करत असाल तर तसे करा. जर असा आहार घेऊन आपल्याला भूक लागत असेल तर दिवसातून तीन वेळा जास्त आहार घेत जा.

आपण रोज किती कॅलारी चे सेवन करत आहात या गोष्टीकडे लक्ष द्या, खूप कमी लोकांना माहित असते कि दररोज किती आहार घेतला पाहिजे, आहारात कोणत्या कोणत्या पदार्थाचा समावेश केला पाहिजे, अनावश्यक कॅलारीस नष्ट करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करण्याच्या आधी व नंतर काय खाता याचा परिणाम आपल्या उर्जा पुनर्प्राप्ती प्रक्रिया तसेच मांसपेशींची बनावट, ताकद याच्यावर पडतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण रोज कॅलारीस, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट चे सेवन योग्य मात्रेत करा, या पोषक तत्वांचा स्त्रोत उच्च गुणवत्तेच्या खाद्य पदार्थांमध्ये असतो. दिवसभरात सहा वेळा थोडा थोडा पोषक आहार घेत जा यामुळे आपली पचन शक्ती चांगली होत जाते. आपल्याला भूक कमी लागते आणि रक्ता तील साखर नियंत्रित राहते तसेच आणखीन काही आजार दूर होतात. अध्ययनातून हे समोर आले आहे कि नाश्ता साठी सकाळी ७ – ८ ची वेळ, दुपारच्या खाण्याची वेळ १२ – १ आणि रात्री च्या जेवणाची वेळ ६:३० ते ७ : ३० ची वेळ योग्य असते.

प्रत्येकाला प्रश्न पडतो कि रोज किती आहार केला पहिजे ? यावेळेत काही नाश्ता केला पाहिजे का? ज्यांना आपला वजन कमी करायचा असेल त्यांनी वर सांगितलेल्या वेळे नुसार आहार घेणे महत्वपूर्ण आहे. मिश्रित आहार घेणे म्हणजे ज्याच्यात सगळे पोषक तत्व असतील असा आहार . भूक कमी करण्यासाठी धूम्रपान किंवा दारू यांचा सहारा घेऊ नये. फळ आणि भाज्यांचा सेवन करा. जर आपल्याला गोड आवडत असेल तर आणि आपल्याला मधुमेह नसेल तर आपण कधी कधी चॉकलेट, केक किंवा आईसक्रीम खाऊ शकता. परंतु हे खाल्यामुळे त्यात असलेल्या अतिरिक्त कॅलरीज मुळे वजन वाढते आणि ज्यामुळे मधुमेह ची संभावना वाढते. आपण जेंव्हा तणावात असतो आपल्याला गोड खाण्याची इच्छा वाढते कारण गोड पदार्थांमध्ये आपला मूड ठीक करण्याचे गुण असतात. ताजी फळ आणि भाज्या सलाड च्या रूपाने खाणे फायदेमंद असते. असे म्हणतात कि फळ हे रीकाम्या पोटी खावे कारण अन्य पदार्थान सोबत खाल्याने ते पोटात कुजतात आणि ज्यामुळे अपचन होते परंतु हे पूर्ण पणे चुकीचे आहे .
रोजच्या आहारात मद्य चा समावेश करने चांगले असते का ? काही लोक असे मानतात कि रोज एक ग्लास वाईन पिणे आरोग्यासाठी चांगले असते. रोज मद्य सेवन केल्याने आपला यकृत खराब होऊ शकतो, विशेष करून महिलांमध्ये रोज मद्यपानाच्या सेवना मुले ब्रेस्ट कॅन्सर होण्याची संभावना जास्त असते. पोलीफेनोल्स हे डार्क चॉकलेट, चहा, डाळिंब आणि ब्लुबेरी मध्ये असतात. आपण सीमित मात्रेत दुध, अंडी आणि मांस मासे यांचे सेवन करू शकता. कोणतेही खाद्य जास्त प्रमाणत खाल्याने ते अति नुकसानदायक ठरते.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या अचानक उद्भवतात. त्यातील एक समस्या म्हणजे पोटदुखी. खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यामुळे पचनतंत्र बिघडते आणि पोटदुखीची समस्या बळावते. त्याचबरोबर इतर अनेक कारणांमुळे पोटदुखी होऊ शकते. पण वारंवार औषधे-गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक ठरते. म्हणून काही घरगुती उपायांनी तुम्ही पोटदुखीपासून सुटका मिळवू शकता.

कोरफड
कोरफडीचा ज्यूस पोटासंबंधिच्या तक्रारी दूर करण्यास फायदेशीर ठरतो. याच्या सेवनाने आतडे साफ होते. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा ज्यूस पाण्यात मिसळून प्या.

काळीमिरी
काळीमिरी आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते. काळीमिरी पावडरमध्ये हिंग, सुंठ आणि काळं मीठ घालून चूर्ण बनवा. पोटांच्या समस्या दूर करण्यासाठी कोमट पाण्यात हे चूर्ण मिसळून प्या.

वेलची
पचनक्रिया सुरळीत करण्याचे काम वेलची करते. यासाठी जेवल्यानंतर वेलची वाटून मधात मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे पोटदुखीवर आराम मिळेल.

मेथी
पोटदुखी दूर करण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरतात. एक छोटा चमचा मेथीचे दाणे हलकेसे भाजून गरम पाण्यासोबत घ्या. यामुळे गॅसेसची समस्या दूर होवून पोटदुखीवर आराम मिळेल.

अपचनामुळे दुखत असेल पोट तर तात्काळ आरामासाठी करून पाहा हे उपाय

अनियमित दिनचर्या आणि खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. यामुळे पोटात गॅस किंवा वाताची समस्या सुरु होते आणि याच गॅस्ट्रिक ट्रबलमुळे शरीरात इतर आजार (ज्यांना आयुर्वेदामध्ये वात रोग असे म्हणतात) निर्माण होतात. ज्या लोकांना ही समस्या असते त्यांना एसिड रिफ्लक्सचा त्रास सुरु होतो. तुम्हालाही वारंवार गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर येथे काही घरगुती सोपे उपाय सांगण्यात येत आहेत. या उपायांमुळे तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळेल.

तुळस - विविध आजारांमध्ये तुळस उपयुक्त औषधीप्रमाणे काम करते. दररोज तुळशीचे पाच पानं खाल्ल्यास पोटातील गॅसची समस्या तसेच इतर पोटाचे आजार ठीक होतील. गॅस समस्येमध्ये तुळशीचा चहा करून पिल्यास आराम मिळेल.

लवंग - हा एक असा मसाला आहे, जो गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या असणार्या लोकांसाठी एक रामबाण औषध आहे. लवंग चंगळल्याने किंवा लवंग मधासोबत खाल्ल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि गॅसची समस्या दूर होते.

जिरे - जिरे खाल्ल्याने पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. तुम्हाला केव्हाही गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरु झाल्यानंतर एक चमचा जिरे पावडर थंड पाण्यातून घेतल्यास आराम मिळेल.

पुदिना - ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक, पाचक व वातानुलोमन करणारी आहे. पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते.


ओटीपोटात सूज
स्त्रियांच्या बाबतीत ओटीपोट म्हणजे गर्भाशय, गर्भनलिका, स्त्रीबीजांडे व आजूबाजूचा भाग (स्नायू, इत्यादी).
ओटीपोटात सूज हा तसा दुर्लक्षित आजार आहे. आपल्या देशात स्त्रियांसाठी चांगल्या वैद्यकीय सेवा नसणे हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. या आजारांमध्ये आकस्मिक म्हणजे नवे जंतुदोष आणि जुने जंतुदोष असे दोन गट पाडता येतील. पहिल्या प्रकारात नीट उपचार न झाल्याने दुसरा प्रकार उद्भवतो.

कारणे
ओटीपोटात सूज येण्याचे मुख्य कारण म्हणजे जंतुदोष. या जंतुदोषाची अनेक कारणे आहेत ती अशी :

- बाळंतपण किंवा गर्भपाताच्या वेळी जंतुदोष होणे :
बाळंतपणापेक्षा गर्भपात हे महत्त्वाचे कारण आहे, विशेषतः चोरूनमारून केलेले सदोष गर्भपात जंतुदोषास हमखास आमंत्रण देतात. पण वैद्यकीय गर्भपातातही जंतुदोषाचा थोडा धोका असतोच. (म्हणूनच गर्भपातापेक्षा संतती प्रतिबंधक जास्त चांगले.)

- ओटीपोटावरच्या शस्त्रक्रिया :
सिझेरियनची शस्त्रक्रिया, स्त्रीनसबंदी, गर्भाशय काढून टाकणे, इत्यादी.

- लिंगसांसर्गिक आजार :
परमा (गोनोरिया) व इतर जंतुदोष.

- क्षयरोग : इतर अवयवांतून आलेला क्षयरोग

- तांबी, लूप, इत्यादी वस्तूंमुळे होणारा जंतुदोष : या वस्तूंच्या गर्भाशयातल्या सतत अस्तित्वाने काही स्त्रियांना सौम्य जंतुदोष होऊ शकतो.

- इतर काही प्रकारचे जंतुदोष यातील अनेकांची कारणे माहीत नाहीत.

लक्षणे, चिन्हे व रोगनिदान
या आजाराचे मुख्य दोन प्रकार पाडता येतील

तीव्र आकस्मिक किंवा नवा जंतुदोष (दाह) व दीर्घ म्हणजे जुना जंतुदोष (दाह)
आकस्मिक तीव्र जंतुदोष दाह (नवी सूज)

हा प्रकार बहुधा बाळंतपण, गर्भपात, शस्त्रक्रिया, लिंगसांसर्गिक आजार या घटनांनंतर येतो. यात अचानक ताप, ओटीपोटात खूप वेदना, दुखरेपणा ही मुख्य लक्षणे असतात. हा प्रकार अगदी त्रासदायक आणि गंभीर असतो. यासाठी वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक असते. रुग्णालयातच यावरचे उपचार करता येतील. अर्धवट उपचार झाल्यास जंतुदोष ओटीपोटात टिकून राहतो. यातून खाली दिलेला दुसरा प्रकार संभवतो.

ओटीपोटात दीर्घ दाह (जुनी सूज)

ह्या आजाराची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात. ओटीपोटात मंद दुखते, दुखरेपणा, म्हणजे आतून तपासताना किंवा लैंगिक संबंधाच्या वेळी दुखते. याबरोबरच, पाळीच्या वेळी दुखणे, कंबरदुखी, अशक्तपणा, बारीक ताप, अंगावरून पाणी जाणे (कधी यास दुर्गंधी असते) इत्यादी लक्षणे आढळतात. वर सांगितल्याप्रमाणे हा प्रकार बहुधा तीव्र जंतुदोषातून सुरु होतो. पण काही वेळा याची सुरुवात नकळत होते. क्षयरोग हेही याचे एक कारण आहे. हा संथपणे चालणारा आजार आहे.
आतून तपासताना किंवा लैंगिक संबंधात दुखरेपणा ही ओटीपोटात सूज असल्याची नक्की खूण आहे. ओटीपोटात सूज आहे ही शंका घेऊन वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे फार महत्त्वाचे आहे.

दुष्परिणाम
सतत दुखरेपणा असणे हा मुख्य त्रास असतो. यामुळे लैंगिक संबंध त्रासदायक होतो. त्याचबरोबर वंध्यत्व व अस्थानी गर्भ राहणे हे महत्त्वाचे दुष्परिणाम आहेत. गर्भनलिका सुजून बंद झाल्यामुळे वंध्यत्व येते. गर्भनलिका अंशतः बंद झाल्यास स्त्रीबीज गर्भनलिकेत अडकून पडते व अस्थानी गर्भ राहतो. हे दोन्ही दुष्परिणाम गंभीर आहेत.

उपचार व प्रतिबंध
ओटीपोटात सूज असण्याचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम पाहून वेळीच रोगनिदान करणे महत्त्वाचे आहे. बाळंतरोग, दूषित गर्भपात व लिंगसांसर्गिक आजारांचा प्रतिबंध केल्यास ओटीपोटात सूज येण्याचे प्रमाण खूप कमी होईल. यासाठी चांगल्या वैद्यकीय सेवा सर्वत्र उपलब्ध होणे आवश्यक आहे.

अंगावरून रक्तस्राव

एक गट म्हणजे पाळीशी संबंधित रक्तस्रावांची कारणे. यात होणारा रक्तस्राव संभाव्य तारखेस जोडून, थोडासा मागेपुढे होतो. यात मुख्यतः पाळीचा रक्तस्राव जास्त दिवस जात राहतो किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणावर रक्तस्राव होतो. साधारणपणे पाळीचा रक्तस्राव दोन ते पाच दिवस टिकतो. सुरुवातीचा व शेवटचा ठिपके येण्याचा भाग सोडल्यास मधले एक-दोन दिवस एक ते दोन घडया रोज भिजेपर्यंत रक्तस्राव होतो. मासिक पाळीसंबंधी रक्तस्रावाचा विचार वेगळया प्रकरणात केला आहे.

रक्तस्रावाचा दुसरा गट आहे-गरोदरपणाशी संबंधित असलेल्या आजारांचा. यात मुख्यतः निरनिराळया प्रकारचे गर्भपात (संभाव्य गर्भपात, अटळ गर्भपात, अपूर्ण गर्भपात, दूषित गर्भपात आणि अस्थानी गर्भ), आणि गर्भाशयातील वारेशी संबधित रक्तस्राव येतात. यांचा विचार गरोदरपणाच्या प्रकरणात केला आहे.

तिसरा गट आहे -गर्भाशयात गाठ किंवा कर्करोगामुळे होणारा रक्तस्राव आणि जखमा

पाळीशिवाय रक्तस्रावाची इतर कारणे
गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग

गर्भाशयाचा कर्करोग बहुधा गर्भाशयाच्या तोंडाशी तयार होतो. हा आजार मध्यम आणि त्यानंतरच्या उतारवयात होतो. याची मुख्य खूण म्हणजे पाळीशी संबंधित नसलेला अधूनमधून होणारा रक्तस्राव. याबरोबर वेदना असेलच असे नाही. पाळी थांबलेली असताना म्हणजे सुमारे ४५-५० वर्षे वयानंतर अधूनमधून होणारा रक्तस्राव म्हणजे कर्करोगाचीच शंका आधी घेतली पाहिजे. कर्करोगासंबंधी नंतर जास्त माहिती दिली आहे. लैंगिक संबंध आल्यानंतर रक्तस्त्राव झाल्यास हमखास ग्रीवेच्या कर्करोगाची शक्यता असते.

गर्भाशयाच्या गाठी
कर्करोग नसलेल्या पण त्यापेक्षा साध्या (म्हणजे न पसरणा-या) गाठी गर्भाशयात होतात. या गाठी मुख्यतः मध्यम वयात येतात. या गाठींमुळे पाळी सोडून अधेमध्ये रक्तस्राव होतो किंवा पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होतो. ‘आतून’ तपासणी आणि सोनोग्राफीने नेमके निदान होऊ शकते.

जखमा
तक्त्यात दिल्याप्रमाणे रक्तस्रावाची आणखी कारणे असू शकतात. संभोगातील जखम, विशेषतः जबरी संभोगातील जखमा, हे रक्तस्रावाचे एक महत्त्वाचे कारण आहे. पहिल्या संभोगाच्या वेळी योनिमार्गावरचा पडदा फाटल्याने रक्तस्राव होतो हे आपण पाहिलेच आहे.

जबरी संभोगातल्या जखमा मुख्यतः योनिमार्गाशी संबंधित असतात. पुढील निदानासाठी आणि उपचारासाठी स्त्रीरोग तज्ज्ञाकडे पाठवावे. याबरोबर अर्थातच न्यायवैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

रक्तस्रावाचा उपचार
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे योग्य निदान करणे आवश्यक आहे. रक्तस्राव पाळीशी संबंधित आहे, की गरोदरपणाशी याचा आधी निर्णय करणे आवश्यक असते. पाळीचा रक्तस्राव सोडल्यास इतर सर्व कारणे तशी गंभीर आहेत. त्यांचे निदानही डॉक्टरकडून होणे आवश्यक आहे. पण रक्तस्रावावरून कारणाचा अंदाज बांधून संबंधित स्त्रीला समजावून सांगणे आवश्यक आहे. पुढच्या उपचारांची थोडीशी कल्पना त्यावरून देता येईल.

अंगावरून रक्तस्राव : गर्भाशय शस्त्रक्रियेऐवजी पर्यायी उपचार

गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया खूप केली जात असली तरी याला बरेच चांगले पर्याय आहेत. शस्त्रक्रिया ही एक मोठी बाब आहे. आरोग्य, खर्च व नंतरचा त्रास या तिन्ही दृष्टिकोनातून ती शक्यतोवर टाळलेली बरी. गेल्या दशकात यासाठी विविध पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
लेझरने (दूर्बीणीच्या सहाय्याने) गर्भाशयातील आतील आवरण जाळणे.

उष्णता, इलेक्ट्रिक कॉटरी किंवा मायक्रोवेव्ह उपचाराने आतील आवरण नष्ट करणे.
गर्भाशयात पाण्याचा फुगा भरून उलट दाबाने रक्तस्राव थांबवणे. यासाठी रबरी फुगा आत ठेवून पाण्याने फुगवला जातो.
गर्भाशयाच्या फक्त रक्तवाहिन्या रक्त गोठवून बंद करणे.
मिरेना लूप टी बसवणे, यात प्रोजेसिन औषध भरलेले असते. हा उपचार पाच वर्षे पुरतो, नंतर काढून परत नवीन साधन बसवावे.
गर्भाशयाचा कर्करोग होण्याची संभावना असते तेव्हा मात्र शस्त्रक्रियेला पर्याय नसतो.

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी केवळ जेवण करणे इतकंच पुरेसं नसतं. तर त्यात पोषक सगळ्या प्रकारची पोषक तत्वे असायला हवेत. शरीराला इतर पोषक तत्वांसोबतच प्रोटीनचीही गरज असते. प्रोटीन कमी झाल्यास वेगवेगळ्या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. शरीरातील प्रोटीन कमी झाल्यास, थकवा, अंगदुखी आणि सतत आजारी पडणे अशा समस्या होऊ लागतात. खालील काही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर तुमच्यात प्रोटीनती कमतरता आहे असे समजा...

1) केसगळती आणि केसांचा पोत बिघडणे

जर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर त्वचा कोरडी पडते. त्यासोबतच केसगळती आणि केसांचा पोत खराब होणे याही समस्या होतात.

2) जखम लवकर न भरणे

तुमच्या शरीरातील स्कीन सेल्सचं प्रमाण वाढवणे किंवा नवीन सेल्स तयार करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. तुम्हाला जखम झाली असेल आणि ती भरण्यात बराच वेळ लागत असेल तर तुम्हाला प्रोटीनची गरज आहे असे समजा.

3) अंगदुखी

जर तुम्हाला सतत अंगदुखी किंवा सांधेदुखी होत असेल तर प्रोटीनची कमतरता हे कारण असू शकतं. त्यामुळे प्रोटीन असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खावेत.

4) तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होणे

जेवणासोबतच जर स्नॅक्स, तेलकट पदार्थ खाण्याची सतत इच्छा होत असेल तर हे प्रोटीन कमी असण्याचे संकेत आहेत. कारण या प्रकारच्या खाण्यामधून प्रोटीन कमी आणि कार्बोहायड्रेट जास्त मिळतात.

5) सतत आजारी पडणे

जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर याचं कारण तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होणे हे असू शकतं. प्रोटीन कमी झाल्यास रोगप्रतिकार शक्तीही कमी होते.


Dr. Akash Grampurohit
Dr. Akash Grampurohit
MS - Allopathy, ENT Specialist, Dharwad
Dr. Vishnu Gawande
Dr. Vishnu Gawande
BHMS, Family Physician, 9 yrs, Pune
Dr. Shrikant Choudhari
Dr. Shrikant Choudhari
MS/MD - Ayurveda, General Surgeon, 6 yrs, Pune
Dr. Sanjeev Parmar
Dr. Sanjeev Parmar
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 16 yrs, Pune
Dr. Kunal Janrao
Dr. Kunal Janrao
MDS, Dentist Periodontist, 6 yrs, Pune
Hellodox
x