Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.



डोळ्यामधील संक्रमणाचे लक्षण जसे डोळ्यामध्ये पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांच्या पापण्या सुजणे, डोळ्यात वेदना, खाज होणे, टोचल्यासारखे वाटणे, इत्यादी आहेत. संक्रमनाचा प्रभाव त्याच्या प्रकारानुसार कमी-अधिक होऊ शकतो. ह्यास दुर्लक्ष कधीच करू नका. साधारणतः हे संक्रमण कायमस्वरूपी इजा करीत नाहीत परंतु यास कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे डोळ्या सारख्या नाजूक अवयवांबाबत सतर्कता बाळगा.
बरेच दिवसांचे संक्रमण डोळ्यांच्या रेटीना, रक्त नलिका आणि कोर्नियास इजा पोहचू शकते.

डोळ्यामधील संक्रमणावर घरगुती उपाय:

जेव्हा कधी तुम्हाला डोळे चालू-बंद करताना काही त्रास व काही वेगळे वाटत असेल तर सर्वप्रथम यास डॉक्टरांना नक्की दाखवा.
डोळ्यांची तपासणी नक्कीच करून घ्यावी. संक्रमण कोणते आहे व कशाप्रकारचे आहे हे जाणून घ्यावे.

डोळ्यांच्या संक्रमणाचे प्रकार

१.नेत्रशोध किंवा गुलाबी डोळे
या संक्रमणात डोळे लाल होतात. हि एक जीवाणूजन्य व्याधी आहे कधी कधी हे विषाणूंच्या प्रभावाने किंवा एलर्जी मुळेहि होते.

२.डोळ्यामध्ये सुजन
हे संक्रमण स्टेफ्लोकोकल ब्याक्टेरियामुळे होते.डोळ्यांच्या पापण्या व त्याची त्वचा सुजते व त्यात बरेचदा फार वेदना असतात.

3.ब्लेफरीटीस
या संक्रमणाची जाणीव तेव्हा होते, जेव्हा पापण्यांच्या टोकाशी तेलकट पदार्थ तयार होतो व तेथे चिटकतो. यामुळे खाज होते. डोळ्यात जळ जळ होणे तसेच डोळ्यातून पाणी येणे सोबतच डोळे गरम पडणे यासारखे लक्षण दिसू लागतात.

४. नेत्रगुहा संबंधी संक्रमण
सेल्युलीटीस असे ह्या संक्रमणाचे नाव आहे. यामध्ये डोळ्यांच्या आतील खालच्या भागात तरल पदार्थ जमा होतो. हे एक ब्याक्टेरीयल संक्रमण असल्यामुळे डोळ्यांच्या रोगांना आमंत्रित करतो. नेत्रज्योत कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतो.

५.केराटीटीस
हे संक्रमण अपायकारक ब्याक्टेरिया, वायरस, फंगी आणि पराजीवांमुळे होते. ह्यामुळे डोळे सुजून त्यामध्ये वेदना होतात. ह्यामुळे कोर्नियास इजा पोहोचू शकते.

६.डायक्रोसायटीटीस
हे संक्रमण डोळ्यांच्या विविध रक्त वाहिनी व इतर नलीकांमध्ये होऊ शकते. हे संक्रमण शरीर प्रतिरोधक शक्तीमध्ये कमी, मानसिक आघात सर्जरी, हानिकारक केमिकल्स आणि अत्यंत कमजोर आहार विहार पद्धती या सर्वांनी होऊ शकते.

डोळ्यांच्या काही सामान्य संक्रमानासाठी काही घरगुती उपायांचा वापर आपण करू शकतो.

खाली काही डोळ्यांच्या संक्रमणावर उपाय म्हणून घरगुती उपाय दिलेले आहेत.

गरम पट्टी

हे डोळे येणे यावर एक प्रभावशाली उपाय आहे. असे केल्याने डोळ्यांभोवतीचे रक्त संचालन सुरळीत होईल. डोळे अधिक चांगल्या पद्धतीने काम करू लागतील. सुजन आल्यास त्यावरही आराम मिळतो.

१.स्वच्छ आणि नरम सुती कापड गरम पाण्यात भिजवून नंतर बाहेर काढून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.

२.हा कपडा आपल्या हातांनी ५ मिनिटांसाठी डोळ्यावर ठेवा नंतर काढून कपडा पाण्यात टाका.

3.ह्या प्रक्रियेस २-3 वेळा परत करा.

४.डोळ्यामधील पाणी व संक्रमित तैलीय पदार्थास आपण घ्या कपड्यांनी साफ करू शकता.

५.जोपर्यंत तुम्हाला बरे वाटत नाही हि प्रक्रिया दोन तीन वेळा 3-४ दिवस करू शकता.

सलाईन सोलुशन

घरीच बनविलेल्या या सलाईन सोल्युशन द्वारा तुम्ही डोळ्यातील संक्रमित चिकट पदार्थ व घन साफ करू शकता. डोळे साफ करण्यासाठीही वापरू शकता.
सलाईन सोल्युशन बनविण्याची विधी

१.चम्मच मीठ , १ कप गरम करून थंड केलेल्या पाण्यात मिळवा.

२.हे पाणी पुन्हा गरम करा व थंड करा.

3.हे पाणी स्वच्छ व संक्रमणरहित केलेल्या बादलीत भरा.

४.ह्या पाण्याच्या वापरासाठी स्वच्छ कपडा वापरू शकता.

५.पाण्याने डोळ्यामधील संक्रमण व घाण साफ करा.

६.हे पाणी शुद्ध व ताजे असावे.

– कोलोईडल सिल्वर

कोलोईडल सिल्वर याचा वापर डोळ्यातील जळन व सूजानावर केला जातो. हे जीवाणूजन्य व विशानुजन्य संक्रमानास दूर करते. यामुळे अशा संक्रमणावर हे प्रभावी ठरते.

हे द्रावण मुख्यतः शुद्ध व असंक्रमित पाण्यात चांदीचे अनु सोडून तयार केले जाते.

याचा वापर आई-ड्रोप म्हणूनही करता येतो.

-याच्या द्रावणाची २-3 थेंब डोळ्यातील संक्रमनावर टाकल्यास लवकरच आराम होतो.

-हे नेहमी फ्रीजमध्ये ठेवावे

-याचा वापर डोळ्यांचे नरम होणे, खाज सुटणे, व जळ जळ करणे यावर केला जातो.


ग्रीन टी

ग्रीन टी हे टोनिक एसिड संपन्न असते त्यामुळे डोळ्यातील संक्रमण जसे डोळ्यात खाज सुटणे, पाणी येणे जळजळ करणे दूर करता येतात. ग्रीन टी मध्ये अनेक पोषके आणि प्रतिरोधके जे डोळ्यांसाठी लाभदायक आहेत.

ग्रीन टी वापराची विधी

१. १ चम्मच ग्रीन टी ची पत्ती १ कप २ वेळः गरम करून घेतलेल्या कोमट पाण्यात १ मिनिटांसाठी टाका.
२. गाळणीने ते पाणी गळून घ्या.
३. हे द्रावण निर्जंतुक बादलीत भरा व फ्रीज मध्ये ठेवा
४. स्वच्छ कपड्याने ग्रीन टीत बुडवून हळूहळू संक्रमित डोळे साफ करावे.
५. जोपर्यंत संक्रमण जात नाही तोपर्यंत डोळे साफ करीत राहा.

बोरिक एसिड

बोरिक एसिड हे एक महत्वाचे संक्रमण नाशक मानले जाते. डोळ्यांच्या संक्रमनासाठी हे अत्यंत आवश्यक मानले जाते. डोळे लाल होणे, कोरडी दिसणे, डोळ्यांची जळजळ, डोळ्यात पाणी येणे, अशा समस्या याच्या वापराणे दूर होतात.यामध्ये एन्टीब्याक्टेरीयल एन्टी फंगल तत्व जे संक्रमनास दूर करते.

१. १/८ चम्मच मेडिकल ग्रेड बोरिक एसिड १ कप स्वच्छ व गरम करून थंड केलेल्या पाण्यात मिळवा व फ्रीजमध्ये थंड करा.
२. मिश्रण डोळ्यांना साफ करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी करावा.
३. दिवसातून कमीत कमी 3 वेळा हि प्रक्रिया पुन्हा करावी. नेहमी ताजे वापरावे.वापरतांना जळ जळ होत असेल तर हळू हळू लावावे.

एप्पल साईडर विनेगर

डोळे येणे सारख्या समस्यांसाठी एप्पल साईडर विनेगर अत्यंत लाभकारी आहे. यामधील मैलिक एसिड एक एन्टी मायक्रोबियल म्हणून काम करते डोळ्यामधील ब्याक्टेरिया पासून वाचवतो. डोळे साफ करून हानिकारक जैविकांना नष्ट करतो.

१. १ चम्मच एप्पल साईडर विनेगर, १ ग्लास निर्जंतुक पाण्यात मिळवा
२. मिश्रण स्वच्छ कापसाच्या बोळ्याने डोळ्यांच्या संक्रमित भागात लावा.डोळ्यातील घाण साफ करा.
३. याचा वापर डोळ्यातील आतील व बाहेरील संक्रमित घाणीस साफ करण्यासाठी होतो.
४. ह्या प्रक्रियेस दिवसातून २-3 वेळा करावी.

स्तनाचे दूध

हे लहान बालकांच्या डोळ्यांच्या संक्रमनासाठी एक उत्तम उपाय मानले जाते. यामध्ये एन्टीबायोटीक तत्व आणि आणि इम्युनोब्लोबीन E असते. जो लहान बाळांच्या डोळ्याच्या संक्रमणास रोखतो.

वापराची विधी

१. एका कपात ताजे स्तनांचे दूध घ्या
२. साफ आय ड्रोपर च्या मदतीने दुधाची २-3 थेंब संक्रमित डोळ्यांमध्ये टाका.
३. दिवसातून २-3 वेळा हि प्रक्रिया करावी.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी टिप्स

१. संक्रमण रोखण्यासाठी. डोळे रोज स्वच्छ पाण्याने सकाळी व रात्री झोपण्याआधी धुवून घ्यावे.
२. संक्रमण थांबवण्यासाठी डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्यावा.
३. दिवसातून २-3 वेळा बाहेरून आल्यावर स्वच्छ पाण्यात गुलाब जल टाकून चांगल्या प्रकारे स्वच्छ करावे.
४. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कापासून दूर राहावे.
५. आपला टॉवेल व रुमाल दुसरयांना वापरू देवू नये.
६. संक्रमित हातानी डोळ्यांना नेहमी नेहमी स्पर्श करू नये.
७. संक्रमण झाल्यास चेहऱ्यावर मेकअप करू नये.
८. २-3 दिवस हे सर्व उपाय केल्यावरही संक्रमण जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपल्यापैकी अनेकजण चष्म्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. अनेकदा हा चश्मा नंबरचा असतो किंवा फॅशन म्हणून वापरतात. साधारणतः चष्मा वापरणारी लोकं लेन्सवर आलेले स्क्रॅच इग्नोर करतात आणि तोच चश्मा वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का? असं करून तुम्ही तुमच्या डोळ्यांचं आरोग्य आणखी बिघडवतं आहात. एक छोटासा स्क्रॅचही तुमच्य डोळ्यांचं आरोग्य बिघडवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.

स्क्रॅच असणारा चष्मा डोळ्यांसाठी नुकसानदायक
स्क्रॅच असणाऱ्या लेन्सचा वापर केल्याने डोळ्यांच्या दृष्टीवर थेट परिणाम होत नाही. परंतु अशा प्रकारचे ग्लासेस सतत वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो. ज्यामुळे काही वेळाने आयसाइट्सवर परिणाम होतो.

डोकेदुखीचं कारण
चष्म्याच्या ग्लासवर स्क्रॅचमुळे होणारे आयस्ट्रेन डोकेदुखीचं कारण ठरू शकतात. यामुळे डोकेदुखी वाढूही शकते आणि तुम्हाला औषधांचा आधार घ्यावा लागू शकतो.

एकाग्रतेवर परिणाम
या सर्व समस्यांमुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना त्रास होऊ शकतो. खासकरून जर तुम्हाला कम्प्युटरवर काम करायचं असेल तर या स्क्रॅचेसमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

काय कराल?
चष्म्याची काच नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच काच स्वच्छ करताना काही खास गोष्टी लक्षात घ्या. जसं एखाद्या रफ कपड्याने काच स्वच्छ करू नका. बाजारातून एखादं ग्लास क्लिनर खरेदी करा आणि मुलायम कपड्याने चश्मा स्वच्छ करा.

काच बदली करा
जर काचेवर जास्त स्क्रॅचेस आले असतील तर तुम्ही ग्लास बदली करा. यामुळे डोळ्यांना त्रास होणार नाही.

बदलली जीवनशैली आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत काम करणे भाग पडते. तसेच अभ्यासाचे प्रेशर असल्यामुळे अनेक विद्यार्थीही बराचवेळ पुस्तकांमध्ये डोकं घालून बसतात. यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. डोळे लाल होणं, जळजळ होणं, डोळ्यांतून सतत पाणी येणं, धुरकट दिसणं यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच काही सोप्या आणि घरगुती उपयांमुळे डोळ्यांच्या या समस्या तुम्ही सहज दूर करू शकता.

जर तुमच्या डोळ्यांवर ताण येत असेल आणि त्याचबरोबर डोळ्यांवर सूजदेखील असेल तर डोळे थंड पाण्याने धुवावेत अथवा बर्फाने डोळ्यांवर शेक द्यावा. यासाठी एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये बर्फाचे काही तुकडे गुंडाळा आणि त्यांना तुमच्या डोळ्यांवर काही वेळासाठी ठेवा. असं १५ ते २० मिनिटं केल्यानं तुमच्या डोळ्यांवरील सूज निघून जाईल आणि डोळ्यांना जाणवत असलेला थकवाही दूर होण्यास मदत होईल.

गुलाब पाणी थकलेल्या डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी उत्तम उपाय आहे. तसेच याच्या वापरामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळेही दूर होतात आणि त्वचा आकर्षक आणि मुलायम होते. गुलाब पाण्याच्या दररोजच्या वापरामुळे डोळ्यांमधील ओलावा टिकून राहतो.

काकडीचे तुकडे काही काळ डोळ्यांवर ठेवल्यानेही त्यांचा थकवा दूर होतो. काकडीमध्ये असलेल्या थंडाव्यामुळे डोळ्यांजवळील थकलेल्या पेशी शांत होतात. यासाठी एक मध्यम आकाराचा काकडीचा तुकडा २० ते ३० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर तो तुकडा कापून डोळ्यांच्या खाली ठेवा. काकडीसारखाच बटाट्याच्या फोडींचाही वापर करता येऊ शकतो.

डोळ्यांचा व्यायाम केल्याने ब्लड सर्क्युलेशन नीट होते. त्यामुळे डोळ्यांना थकवा जाणवत नाही आणि कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. डोळ्यांचा व्यायाम करण्यासाठी एक पेन किंवा पेन्सिल घ्या आणि डोळ्यांपासून थोडं लांब पकडा. हळूहळू ते तुमच्या डोळ्यांजवळ घेऊन या. जोवर ते तुम्हाला दिसतंय, तोवर त्याच्यावर लक्ष केंद्रीत करा. त्यानंतर तसंच हळूहळू ते मागे घेऊन जा. असं 10 ते 15 वेळा करा. दुसऱ्या व्यायामाच्या प्रकारात तुमच्या डोळ्यांना क्लॉकवाईज आणि अॅन्टीक्लॉकवाईज फिरवावे आणि थोडा वेळ थांबून त्यानंतर पापण्या मिटाव्यात. असे दिवसातून 4 ते 5 वेळा करावे. त्याने डोळ्यांना आराम मिळतो.

रडल्यामुळे डोळ्यांच्या आसपास तरल पदार्थ एकत्र होतात त्यामुळे डोळे सुजतात. वास्तविक सातत्याने रडणे आरोग्यासाठी चांगले नसते. कारण त्यामुळे तणाव वाढतो. डोळ्यातील लेक्रिमल ग्लँडस्‌ अश्रूंची निर्मिती करतात. याचे मुख्य कार्य म्हणजे अश्रूंच्या मदतीने डोळ्यांना होणार्‍या संसर्गापासून संरक्षण करणे. पण जेव्हा आपण रडतो तेव्हा या ग्रंथी अतिकार्यशील होतात त्यामुळे सतत अश्रू येतात. हळूहळू डोळ्यांच्या भोवती तरल पदार्थ जमा होतो. त्यामुळे सूज येते. डोळे लाल होऊन डोळ्यांची जळजळ होते. अशात घरगुती उपायांनी डोळ्यांची सूज कमी होऊ शकते.

हलका मसाज केल्यानेडोळ्याची सूज कमी होते. त्यासाठी हाताला नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह तेल यांचे काही थेंब घ्या आणि हलक्या हाताने मसाज करावा. मालिश केल्यानंतर थोडा वेळ झोपावे आणि डोळे बंद ठेवावेत. दोन तीन वेळा असे केल्यास डोळ्याची सूज कमी होते.

थंड शेक घ्या : डोळ्यांना आराम मिळावा यासाठी सर्वात सोपा आणि चांगला उपाय म्हणजे कोल्ड कॉम्प्रेस किंवा थंड शेक घेणे. थंड शेक घेतल्याने डोळ्यांच्या आसपासची त्वचा घट्ट होते त्यामुळे सूज दूर होते. त्यामुळे खूप आराम मिळतो. यासाठी एक सुती रुमाल किंवा सुती कपडा घेऊन पाण्यात भिजवावा आणि पिळून डोळ्यांवर ठेवावा. पाच पाच मिनिटांच्या अंतराने डोळ्यावरून काढावे आणि पुन्हा पाण्यात भिजवून आणि पिळून ठेवावे. जवळपास 10 ते 12 मिनिटांपर्यंत हा प्रयोग केल्यास डोळ्यांना खूप आराम मिळतो. दिवसातून दोन तीन वेळा असा शेक घ्यावा.

काकडीचे फायदे : सूज आणि जळजळ होत असेल तर काकडी हा उत्तम उपाय. काकडीचा रस डोळ्यांना थंडावा देतो. त्यातील अ‍ॅस्ट्रीजंट गुणधर्म सूज घटवण्याचे काम करतात. त्यासाठी काकडीच्या चकत्या डोळ्यावर ठेवा. काकडीचा थंडपणा कमी होतो आहे असे लक्षात आले की त्या काढून दुसर्‍या चकत्या ठेवा. डोळ्यांसाठी वापरत असल्याने काकडी कापण्यापूर्वी ती धुवून घ्यावी. नंतर कोमट पाण्याने डोळे धुवून टाकावे.

* साध्या पाण्याने डोळे धुतल्यास आराम मिळू शकतो. * सूज दूर करण्यासाठी टी बॅगचा वापर करता येईल. ब्लॅक टी बॅग मध्ये टॅनिन नावाचा घटक असतो. त्यामुळे डोळ्यांच्या त्वचेत प्रवेश करून सूज दूर करण्यास मदत होते. यासाठी दोन टी बॅग गरम पाण्यात उकळवा आणि थंड होऊ द्या. नंतर त्या डोळ्यांवर ठेवाव्या आणि 10 मिनिटे आराम करावा. दिवसातून दोन वेळा असे केल्यास फायदा होतो. * सूज दूर करण्यासाठी मिठाच पाणी फायदेशीर ठरते. डोळ्याच्या आसपास साठणारा तरल पदार्थ शोषून घेण्यात या मिठाची मदत होते. यासाठी कोमट पाण्यात 2 चमचे मीठ मिसळावे. मीठ पूर्णपणे विरघळले की त्या पाण्याने डोळे धुवावेत.

खेळण्याबरोबरच धनुष्यबाणाचा वापर, दिवाळीच्या वेळी उडवले जाणारे फटाके, बॅडमिंटन खेळताना डोळ्याला बसलेला शटलचा जोराचा फटका यांसारख्या गोष्टींमुळे डोळ्याला इजा होण्याची शक्यता वाढते. या अपघातांप्रमाणेच कारखान्यातील कामगार, वेल्डिंग करताना योग्य चष्मा न वापरणे यामुळेही डोळ्याला इजा होते.

डोळ्याला होणाऱ्या इजा या अपघाती स्वरुपाच्या असल्या, तरी त्या काही वेळा अतिशय किरकोळ तर काही वेळा डोळ्याची संपूर्ण दृष्टी गमावून बसण्याइतक्या गंभीर स्वरुपाच्या असू शकतात. लहान मुले खेळताना खेळातील धनुष्यबाणाचा वापर करतात. अशा वेळी असा बाण डोळ्याला लागून डोळा फुटून कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते. विटी दांडू, क्रिकेट खेळताना डोळ्याला विटी किंवा चेंडू लागणे या काही नेहमीच घडणाऱ्या घटना नाहीत; पण काही वेळा अशा अपघाताने डोळ्याला दुखापत होऊ शकते. दिवाळीच्या वेळी उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे डोळ्याला कायमस्वरुपाची इजा होऊ शकते. दिवाळीत फोडणाऱ्या बॉम्बवर डबा किंवा खोके ठेवल्यामुळे स्फोटानंतर पत्र्याचे तुकडे लागून आजूबाजूच्या लोकांनाही डोळ्याला इजा झाल्याची उदाहरणे आहेत. वरील गोष्टींवर पालकांनी देखरेख ठेवल्यास होणारे डोळ्याचे अपघात टळू शकतात. बॅडमिंटन खेळतानाही डोळ्याला शटलचा जोराचा फटका बसून काही प्रसंगी खूप गंभीर स्वरुपाची इजा पोहोचू शकते.

कारखान्यात लेथवर काम करणाऱ्या कामगारांनी तर विशेष काळजीपूर्वक वागले पाहिजे. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या कारखान्यांतून अशा ठिकाणी काम करताना रोज कमीत कमी १५ ते २० कामगारांच्या डोळ्यात 'बर' जात असतील. हा 'बर' काढल्यानतंर डोळ्याला पट्टी लावल्यामुळे कामगारांना दोन-तीन दिवस कामाला मुकावे लागते; पण याहीपेक्षा वेगाने आणि धातूचे मोठे कण जर बुबुळ छेदून आत गेले, तर बुबुळ फाटणे, त्यातून बाहुली बाहेर येणे, मोतीबिंदू होऊन तो आतल्या आत फुटणे, डोळ्याच्या आतील भागात तीव्र स्वरुपाचा रक्तस्राव होणे किंवा पडद्याला इजा होऊन तो सरकणे इ. गोष्टी संभवतात. अशा वेळी डोळ्याचा एक्स रे अथवा अल्ट्रा साउंड चाचणी करून डोळ्याला किती गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे, हे पाहता येते. फाटलेले बुबुळ शिवून झालेला मोतीबिंदू काढून टाकून आतील धातूचा कण व्हिट्रॅक्टोमी या शस्त्रक्रियेमार्फत काढून टाकून तो सरकलेला पडदा म्हणजे रेटिना परत जागी बसवणे हे एक आव्हान आहे. तीन-चार तासांच्या अतिशय कठीण शस्त्रक्रियेनंतर अशा तऱ्हेने गंभीर दुखापत झालेला डोळा वाचेलच अशी खात्रीही देता येत नाही. कित्येक वेळा अशा डोळ्यांमध्ये सेप्टीक होऊन दृष्टी तर जातेच; पण डोळा अतिशय बारीक होऊन पांढरा पडतो.

वेल्डिंग करताना योग्य तऱ्हेचा चष्मा न वापरल्यामुळे बुबुळाला छोट्याशा जखमा होतात. अशा वेळी रात्री झोपताना प्रचंड वेदना जाणवतात. झोप येणे अशक्य होते. स्वच्छ कापसाच्या घड्या गार पाण्यात घालून डोळ्यावर ठेवल्या असता बराचसा आराम वाटतो. वेदना खूप होत असल्यामुळे वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. साधारणपणे १०-१२ तासांतच डोळ्याला आराम पडून डोळा पूर्ववत होतो. ज्या ठिकाणी असे अपघात होऊन डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी इंडस्ट्रियल प्रोटेक्शन ग्लासेस वापरण्यामुळे वरील अपघात टळू शकतात.

Dr. Abhijit Shirude
Dr. Abhijit Shirude
MS - Allopathy, ENT Specialist, 5 yrs, Pune
Dr. Sanjay  Salve
Dr. Sanjay Salve
MBBS, Orthopaedics, 16 yrs, Pune
Dr. Abhinandan J
Dr. Abhinandan J
BAMS, Ayurveda Family Physician, 1 yrs, Pune
Dr. Brinda Dave
Dr. Brinda Dave
MPTh, Neuro Physiotherapist Physiotherapist, 4 yrs, Pune
Dr. Manish Jawale
Dr. Manish Jawale
MD - Homeopathy, Homeopath, 17 yrs, Pune
Hellodox
x