Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

लहान बाळं जेवत नाही, हट्ट करतं म्हणून त्याच्यासमोर मोबाईल ठेवला जातो. जवळजवळ सर्वच घरांमध्ये ही परिस्थीती पाहायला मिळते. पण आपल्या लहानग्यांना मोबाईल हाताळण्यास देणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी ऐकून तरी तुम्ही आपल्या चिमुरड्यांजवळ मोबाईल देताना दहा वेळा विचार कराल.

डोळे 'आळशी'

महाराष्ट्रातील जवळपास सव्वा लाख लहान मुलांचे डोळे 'आळशी' बनलेत... या मुलांना ‘अम्ब्लोपिया’ नावाचा डोळ्यांचा आजार झालाय... मोबाईल, टीव्ही आणि टॅबच्या प्रकाशामुळं लहान मुलांमध्ये हा दृष्टीदोष वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

सकाळी उठल्यावर अनेक लोकांचे डोळे सुजलेले, फुगलेले दिसतात. त्यास पफी आईज असे म्हणतात. त्यामुळे तुमचा लूक बदलतो. सौंदर्यात बाधा निर्माण होते. पफी आईजची समस्या रात्री उशिरा झोपल्याने, ताण तणावामुळे, चुकीच्या आहारामुळे, तासंतास कॅम्प्युटर, मोबाईलसमोर बसल्याने होते. या समस्येने तुम्हीही त्रासलेले आहात का? मग या घरगुती उपायांनी तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकता.

# पफी आईजची समस्या असल्यास सकाळी उठून चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोड्यात एक चमचा थंड पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून ५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर चेहऱ्याला ऑईल फ्रि क्रिम लावा.

# पफी आईजपासून सुटका मिळवण्यासाठी चिमूटभर काळीमिरी पावडर, एक चमचा कॉफी, अर्धा चमचा खोबरेल तेल आणि थोडेसे पाणी घालून मास्क तयार करा. हा मास्क डोळ्यांच्या खाली लावा. १० मिनिटांनंतर कपड्याने किंवा टिशूने नीट पुसून घ्या. पफी आईजसोबतच डार्क सर्कल्सची समस्याही दूर होण्यास मदत होईल.

आजकल जेवताना, बोलताना आणि अगदी चालता फिरताही हातात सतत लक्ष स्मार्टफोनवर खिळलेलं असतं. सतत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या संपर्कात असल्याने डोळ्यांवर त्याचा ताण येतो. कळत नअकळत आपण डोळ्यांचं आरोग्य धोक्यात आणत असतो. अशावेळेस डोळे मिचवणं हा डोळ्यावरील नकळत वाढणारा ताण हलका करण्याचा एक उपाय आहे.

डोळे मिचकवण्याचे फायदे -
1. मॉईश्चरायझर -
डोळे मिचकवल्याने डोळ्यांना नव्याने मॉईश्चर मिळण्यास मदत होते. यामुळे डोळ्यांमध्ये शुष्कपणा वाढण्याचा धोका कमी होतो.

2. डोळ्यांचं आरोग्य सुधारते -
डोळ्यांमध्ये बाहेरील एखादा घटक, धूळ जाऊ नये म्हणून आपण डोळे मिचकवतो. डोळ्यात काही गेल्यास आपोआपच आपण डोळे मिचकवायला सुरूवात करतो. यामुळे डोळ्यात गेलेला एखादा त्रासदायक घटक बाहेर पडतो.


3. बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो -
डोळे मिचकवल्याने धूळ, बॅक्टेरिया बाहेर पडण्यास मदत होते. अनेकदा डोळ्यातून पाणी बाहेर पडतं, त्यातूनच हे बॅक्टेरियाही बाहेर पडतात. यामुळे डोळे लाल होणं, इंफेक्शनचा धोका बळावतो.

4. डोळे स्वच्छ होतात -
डोळे मिचकवल्याने डोळे स्वच्छ होण्यास मदत होते. दृष्टी सुधारते.

5. डोळ्यांना ऑक्सिजन -
डोळे मिचकवल्याने ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. यामधून डोळ्यांना मॉईश्चरायझर मिळण्यासही मदत होते.

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. परिणामी व्हायरल इंफेक्शन, सर्दी, खोकला, ताप अशा लहान सहान आजारपणं डोकं वर काढतात. पावसाळ्यात अस्वच्छता अधिक प्रमाणात वाढत असल्याने व्हायरल इंफेक्शन डोळ्यातही पसरू शकते.

व्हायरल आय इंफेक्शनची नेमकी लक्षणं कोणती ?
डोळ्यात टोचल्यासारखे वाटणं – डोळ्यात सतत काही खुपल्यासारखे वाटत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हा त्रास खूप दिवस जाणवत असल्यास हे आय इंफेक्शनचे लक्षण आहे.

पापण्यांवर सूज जाणवणं – व्हायरल आय इंफेक्शनचे अजून एक लक्षण म्हणजे पापण्यांवरील सूज. डोळ्यांमध्ये सतत दाह जाणवत असल्यास परिणामी पापण्यांवर सूज येण्याचे प्रमाण वाढते. पापण्यांवरील सूज कमी करण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेसचा वापर करा. पण एक दोन दिवसांमध्ये त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांकडून योग्य निदान करा.


डोळ्यात खाज येणे – डोळ्याच्या व्हायरल इंफेक्शनचा त्रास होत असल्यास सतत डोळ्यात खाज येणं, जळजळ जाणवणं हा त्रास जाणवतो. यामुळे एका डोळ्यातून किंवा दोन्ही डोळ्यातूनही चिकट, पांढरा स्त्राव वाहतो. जळजळ जाणवण्यासोबतच ताप, स्कीन रॅश, थकवा जाणवत असल्यास फ्लूच्या त्रासाचे संकेत देतात.

कॉर्नियाजवळ ब्लड क्लॉट / रक्त साखळल्यासारखे वाटते – कॉर्नियाजवळ रक्त साकळल्याने तो भाग काळसर वाटतो. असे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. या लक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास इन्फेक्शन डोळ्याभर पसरू शकते.

कोणती काळजी घ्याल ?
1. पावसाळ्याच्या दिवसात स्वच्छतेकडे जरूर लक्ष द्या. यामुळे इंफेक्शनचा धोका कमी होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने औषधं घेऊ नका.

2. आय इंफेक्शन असलेल्या व्यक्तीपासून दूर रहा. हे इंफेक्शन संसर्गजन्य असल्याने तुम्हांलाही त्याचा धोका वाढू शकतो.

3. नियमित हात साबणाने स्वच्छ करा. सतत डोळ्यांना हात लावणं, डोळे चोळणं टाळा.

4. तुम्हांला फ्लू किंवा आय इंफेक्शनचा त्रास होत असेल तर ते कमी करण्यासाठी मुबलक पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

गुलाबपाणी आहरात जसं फायदेशीर आहे तसेच त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही गुलाबपाणी फायदेशीर आहे. त्वचा मुलायम करण्यासाठी गुलाबपाणी अत्यंत फायदेशीर आहे. दाहशामक गुणधर्म असल्याने डोळ्यातील सूज, जळजळ कमी करण्यासाठी त्याचा वापर होतो.

डोळ्यांमध्ये गुलाबपाण्याचे काही थेंब घाला. यासोबतच तुम्ही कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाण्याचे काही थेंब घेऊन तो भिजवा. 15 मिनिटांसाठी हा कापसाचा गोळा ठेवल्याने आराम मिळू शकतो.

टी बॅग्स
डोळ्यांच्या आरोग्यासाठी टी बॅग्सदेखील फायदेशीर आहेत. त्यामुळे टी बॅग्स वापरल्यानंतर फेकून देऊ नका. डोळ्यांचा आरोग्यासाठी ते वापरू शकता. त्यामधील बायो फ्लेवोनाइड्स घटक डोळ्यांचा लालसारपणा कमी करण्यास मदत करतो. वापरण्यापूर्वी 30 मिनिटं बॅग्स फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर डोळ्यावर ठेवा.


काकडी
काकडी नैसर्गिकरित्या थंड असल्याने डोळ्यातील जळजळ कमी करण्यासाठी मदत होते. रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत होते.

कोरफड
चमचाभर कोरफड आणि पाणी एकत्र करा. हे मिश्रण काहीवेळ फ्रीजमध्ये ठेवा. कापसाच्या बोळ्यावर हे मिश्रण ठेवून डोळ्यांवर ठेवा. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते.

पाणी
धूर, धूळ यामुळे डोळ्यांना त्रास होत असल्यास ते चोळू नका. यामुळे त्रास अधिक वाढू शकतो. अशावेळेस डोळ्यावर पाण्याचे हबके मारा.

Dr. Aakash Bora
Dr. Aakash Bora
BHMS, Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Chandrakant Raut
Dr. Chandrakant Raut
BAMS, Family Physician General Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Lalita Gawali
Dr. Lalita Gawali
BAMS, Ayurveda Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Gauri  Nerurkar
Dr. Gauri Nerurkar
BHMS, Dermatologist, 10 yrs, Pune
Dr. Pradnya Bafna
Dr. Pradnya Bafna
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Hellodox
x