Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. हा कोणताही आजार नाही किंवा त्यामध्ये घाबरण्यासारखंही काहीच नाही. महिलांचं मासिक चक्र नियमित असणं त्यांच्या निरोगी असण्याचा संकेत असतो. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही मासिक पाळीच्या चक्राचा परिणाम होत असतो. जर तुम्ही तणावामध्ये असाल तर त्याचा परिणाम तुमच्या पिरियड्सवर होऊ शकतो. पण अनेकदा मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्रावाचाही सामना करावा लागतो. जर तुम्हीही मासिक पाळीमध्ये होणाऱ्या हेव्ही ब्‍लीडिंग किंवा अति रक्तस्रावाने वैतागले असाल तर काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून सुटका करू शकता.

ही असू शकतात हेव्ही ब्लीडिंगची कारणं

जर तुम्ही तणावामध्ये असाल तर असं मानलं जातं की, तुमचे पीरियड्स उशीरा येतील किंवा ब्लीडिंग फार कमी होईल. पण जर जास्त रक्तस्त्राव होत असेल तर असं असू शकतं की, शरीराच्या आतमध्ये काहीतरी समस्या असू शकते. जर यूट्रस किंवा गर्भाशयामध्ये ट्यूमर असेल तर ब्लीडिंग जास्त होतं. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळेही ब्लीडिंग होऊ शकतं. जास्त ब्लीडिंग होण्याच्या अवस्थेला मेनॉर्जिया असंही म्हणतात. म्हणजेच अशी परिस्थिती ज्यामध्ये मासिक पाळी जास्त दिवसांपर्यंत चालते किंवा या दिवसांमध्ये ब्लीडिंग मोठ्या प्रमाणावर होतं. कधी कधी आयर्नची कमतरता असल्यामुळेही ब्लीडिंग जास्त होतं.

जास्त ब्लीडिंग रोखण्यासाठी काही टिप्स :

- जर जास्त ब्लीडिंग होत असेल आणि हे जास्त दिवसांपर्यंत सुरू राहिलं तर शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासू शकते. अशा परिस्थितीमध्ये दररोज 4 ते 6 ग्लास एक्स्ट्रा पाणी पिणं गरजेचं असतं. याव्यतिरिक्त इलेक्ट्रोलाइट सलूशन घ्या.

- व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. हे व्हिटॅमिन शरीरामध्ये आयर्नचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. तुम्ही लिंबू, आवळा, संत्री आणि द्राक्षं यांसारखी आंबट फळं आणि भाज्या खाऊ शकता. कीवी, ब्रोकली, टॉमेटो आणि स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं.

- डाएटमध्ये जास्तीत जास्त आयर्नयुक्त पदार्थाचा समावेश करा. अन्थथा तुम्हाला अनिमिया होऊ शकतो. यासाठी चिकन, बीन्स, पालक यांसारख्या आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करा.

- दररोज एका वेळेचं जेवणं लोखंडाच्या भांड्यामध्ये तयार करून त्याचं सेवन करा. त्यामुळे शरीरामध्ये आर्यन मिळण्यास मदत होते.

टिप : प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगळी असते. वरील सर्व उपायांचा समावेश घरगुती उपायांमध्ये होतो. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

Dr. Kirti Dagor
Dr. Kirti Dagor
BAMS, Ayurveda Panchakarma, 11 yrs, Pune
Dr. Sanjay  Salve
Dr. Sanjay Salve
MBBS, Orthopaedics, 16 yrs, Pune
Dr. Lalit deshmukh
Dr. Lalit deshmukh
BHMS, Family Physician, 14 yrs, Pune
Dr. Niket Lokhande
Dr. Niket Lokhande
MDS, Dentist Root canal Specialist, 14 yrs, Pune
Dr. Nishant Vyavahare
Dr. Nishant Vyavahare
MDS, Dentist, 13 yrs, Pune
Hellodox
x