Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

महिलांच्या आरोग्यासाठी मासिकपाळी ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. मासिपाळीचे दिवस त्रासदायक असले तरीही ती वयाच्या विशिष्ट टप्प्यावर महिलांसाठी फार आवश्यक असते. या काळात हार्मोन्सच्या पातळीमध्ये चढउतार होतात.

महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या पातळीमध्ये बिघाड होण्यामागे आहारदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडतो. एका अभ्यासानुसार, ज्या महिलांच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं त्यांच्यामध्ये मासिकपाळी वेळेआधी येण्याची शक्यता अधिक असते.

संशोधकांचा दावा
युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स या ब्रिटनमधील एका प्रयोगात 914 महिलांवर प्रयोग करण्यात आला होता. त्यानुसार ज्या महिलांच्या आहारात मासे, बींस यांचे सेवन अधिक असते त्यांच्यामध्ये मासिकपाळी उशिरा येते.


काही तज्ञांच्या माहितीनुसार, मासिकपाळी ही केवळ आहारावर अवलंबून नसते. आहारासोबतच इतर अनेक घटकांचा मासिकपाळीवर परिणाम होत असतो.

आहार आणि मासिकपाळी
स्टडी जर्नल ऑद एपिडिमीलॉजी अ‍ॅन्ड कम्युनिटी हेल्थमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार, महिलांना त्यांच्या आहाराबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यानुसार फळदार भाज्या अधिक खाणार्‍यांमध्ये मासिकपाळी उशिरा आल्याची दिसून येते. हा उशिर सुमारे एक ते दीड वर्षांचा असू शकतो. फळांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक असल्याने मासिकपाळीमध्ये उशीर होऊ शकतो.

कार्बोहायड्रेटयुक्त आहारामुळे मुलींमध्ये एक ते दीड वर्ष आधी मासिकपाळी सुरू होते.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, आहारासोबतच महिलांचं वजन, प्रजनन क्षमता आणि एचआर्टी हार्मोन देखील मासिकपाळीवर प्रभावी ठरतात. अनुवंशिकतेचाही मासिकपाळीवर थेट परिणाम होतो.

हार्मोन्समध्ये चढउतार
माश्याच्या तेलामध्ये प्रामुख्याने ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आढळते. यामुळेही शरीरात अ‍ॅन्टिऑक्सिडंटचे प्रमाण वाढते.

शरीरात सेक्स हार्मोन्सही प्रभावित होतात. यामुळे एस्ट्रोजनची पातळी वाढते. त्यामुळे मासिकपाळी प्रभावित होते. ती वेळेआधी येण्याची शक्यता वाढते.

मासिकपाळी आणि आजाराचा धोका
संशोधकांच्या अभ्यासानुसार ज्या महिलांमध्ये मासिकपाळी वेळेच्या आधी सुरू होते अशांमध्ये हाडांचे विकार, हृद्यविकारांचा धोका बळावतो. तर मासिकपाळी उशिरा सुरू झालेल्यांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरची शक्यता अधिक बळावते.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा मातृत्वाच्या वाटेवर आहे. मीराची ही गुड न्यूज शाहिदने सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली. तेव्हापासून मीरा राजपूत सतत चर्चेत आहे. ऑक्टोबरमध्ये ती तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. प्रेग्नेंसीदरम्यान मीरा बीटाचा चहा पित असल्याचे तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. पण बीटाच्या चहाचा नेमका फायदा काय? आणि प्रेग्नेंसीमध्ये हा चहा पिणे का फायदेशीर ठरते? जाणून घेऊया...

# प्रेग्नेंसीच्या पहिल्या तीन महिन्यात बीटाच्या चहाचा आहारात समावेश करायला हवा. कारण त्यातील फॉलिक अॅसिड गर्भाच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं.

# बीटात भरपूर प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. त्यामुळे प्रेग्नेंसीदरम्यान रक्ताची कमतरता जाणवल्यास ताबडतोब बीटाचे सेवन सुरु करा.


# बीटाच्या चहात व्हिटॉमिन सी असतं. यामुळे प्रसूती सहज होण्यास मदत होते. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

# बीटात असलेल्या betaine मुळे पचनतंत्र सुधारते. त्याचबरोबर पोटातील अॅसिड (stomach acid)ची निर्मिती होण्यास मदत होते.

# त्वचेवर नैसर्गिक तजेला टिकून राहण्यास बीटाचा चहा अतिशय उपयुक्त ठरतो. कारण बीटामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. बीटात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा नितळ होते.

# बीटात नायट्रेड्स असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. मेंदू, स्नायू आणि हृदयाला ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा होतो.

नोट- बीटाच्या चहाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तरी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा आहारात समावेश करावा.

आपली शरीरयष्टी चांगली दिसावी यासाठी अनेक तरुण व्यायामशाळेत घाम गाळत असतात. नियमित व्यायाम, व्यवस्थित झोप, योग्य आहार यामुळे ते काही महिन्यात चांगली शरीरयष्टी कमावतात पण यावरच त्यांचं समाधान होत नाही. आपल्या शरीरातील नसा दिसायला हव्या अशी काहींची इच्छा असते.

आहाराकडे लक्ष

बॉडीतील नसं दिसतायत का ? यावरूनही चर्चा करणारे अनेकजण असतात. सिनेमांमध्येही हिरोने टी शर्ट काढल्यावर त्याच्या शरीरावरील नसं दिसतात. त्यामुळे या तरुणांची इच्छाशक्ती अधिक दृढ होते. अस शरीर कमावण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं गरजेच आहे. याबद्दल आपण जाणून घेवूया...

सोडियम सेवन वर्ज्य

सोडियमचे सेवन शरीरात वॉटर रिटेंशनच कारण बनतं. वॉटर रिटेशनमुळे आपल्या नसं अस्पष्ट दिसतात. त्यामुळे जेवणातही कमी मीठाचा उपयोग करणं गरजेच आहे.

स्नायू बनवा

शरीरयष्टी कमावताना तुमच्या आहारासोबतच तुम्हाला स्नायूंकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्नायू हे प्रोट्युडिंग वेन्स तयार करतात.

खूप पाणी प्या

शरीरात मुबलक पाणी गेल्यास स्नायू हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहिल्याचा खूप फायदा होतो. शरीरातील पाणी टॉक्सिंसला फ्लश करते यामुळे बाइसेप्सच्या नस स्पष्टपणे दिसतात.

अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीरात जाणाऱ्या फॅट्सकडे हल्ली इतक्या बारीक नजरेनं पाहिलं जातं की, साध्या 'रेडी टू इट' पदार्थांच्या पाकिटावर देण्यात आलेल्या माहितीमध्येही त्या पदार्थात असणाऱ्या फॅट्सचा वारंवार विचार केला जातो. फॅट्सचं प्रमाण वाढल्यामुळे स्थुलता वाढते असाच अनेकांचा समज असतो आणि मग याच समजापोटी सुरुवात होते ती म्हणजे कमीत कमी फॅट्सचं सेवन कसं करता येईल याचे उपाय शोधण्याची. परिणामी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल आणि पुढे येणारी आव्हानं.

मुळात फॅट्सचं प्रमाण कमी करण्यापेक्षा अन्नपदार्थांच्या माध्यमातून त्यांच्या सेवनावर नियंत्रण असणं महत्त्वाचं. कारण शरीराला अन्नावाटे मिळणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच उपयोगाची असते. हो... अगदी फॅट्सही.
चला तर मग आहारतज्ज्ञ आणि काही जाणकार मंडळींच्या मते शरीरासाठी आवश्यक असणारे हे चांगले फॅट कोणत्या पदार्थांपासून मिळतात यावर नजर टाकूया....

अंड-
आहाराच्या सवयींमध्ये आणि डाएटमध्ये अंड्यांना फार महत्त्वं दिलं जातं. प्रथिनयुक्त पदार्थ म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. अंड्यामध्ये असणारे फॅट आणि त्यातील इतर तत्व शरीरात असणाऱ्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतं, त्यासोबतच डोळ्याच्या आरोग्यासाठीही त्याचा वापर होतो.

डार्क चॉकलेट-
चॉकलेट हे फक्त त्याच्या चवीसाठीच खाल्लं जातं असं नाही. तर, त्यात अ आणि ब जीवनसत्त्वही असतात. कॅल्शियम, लोह, पोटॅशियमचे घटकही त्यात आढळतात. कमी रक्तदाबावर उपाय म्हणूनही चॉकलेटचं सेवन केलं जातं.

ओटमिल-
इतर पदार्थांच्या तुलनेत ओटमिलच्या माध्यमातून मिळणाऱ्या फॅटचं प्रमाण हे जास्त असतं. सहसा अनेकजण ब्रेकफास्टमध्ये ओटमिल खाण्याला प्राधान्य देतात. ज्यामध्ये उपयुक्त अशा पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. रोजच्या आहाराच्या सवयींमध्ये आणि डाएट प्लॅनमध्ये ओट्सचा वापर केल्यास त्यातून मिळणारी अमिनो अॅसिड, क्षार, लोह, प्रथिनं आणि जीवनसत्वंही शरीरास उपयुक्त ठरतात.

सुकामेवा-
सुकामेवा अनेकांनाच आवडतो. मुळात तो खाण्यासाठी कोणाचाच सहसा नकार पाहायला मिळत नाही. सुकामेवा हा ओमेगा फॅटी अॅसिड, अल्फा लिनोहोलिक अॅसिड यांनी परिपूर्ण असतो.

चीझ-
चीझ... नुसतं नाव जरी घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. विविध पदार्थांमध्येही हल्ली चीझचा सर्रास वापर केला जातो. अशा या चीझची डाएटमध्येही महत्त्वाची भूमिका असते. स्नायूंच्या बळकटीसाठी त्यात असणाऱ्या फॅट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

झणझणीत खाणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात? तर मग, तुमच्यासाठी एक फायद्याची गोष्ट आहे. ही गोष्ट अर्थातच तुमच्या खाण्याच्या सवयींशीच निगडीत आहे. सहसा आपल्या आहारात, रोजच्या जेवणात मिरची आली की लगेचच ती बाजूला काढली जाते. पण, काहीजण ही तिखट मिरचीही तितक्याच आवडीने खातात. मुख्य म्हणजे भल्याभल्यांना घाम फोडणारी हीच मिरची डाएटमध्ये समाविष्ट केल्यास त्याचे बरेच फायदेही होतात. चला तर मग जाणून घेऊया या तिखट, हिरव्या मिरचीच्या फायद्यांवर...

वजन घटवण्यासाठी उपयुक्त-
हिरव्या मिरच्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचं जास्त प्रमाण असून त्यात कॅलरीचं प्रमाण शून्य असल्यामुळे वजन घटवण्यासाठी या घटकांची मदत होते.

हाडांची बळकटी-
हाडांच्या बळकटीसाठी हिरव्या मिरचीतील अ जीवनसत्वं उपयोगी ठरतात. इतकच नव्हे, तर त्यामुळे दातही मजबूत होतात.

रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण-
मधुमेह झालेल्या अनेकांसाठी हिरव्या मिरचीचं सेवन करणं खूपच फायद्याचं ठरतं. हिरव्या मिरच्यांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

मूड स्विंग-
हिरव्या मिरच्यांच्या सेवनामुळे एंडोर्फिन नावाचं रसायन तयार होतं. ज्यामुळे वेळोवेळी बदलणाऱ्या मानसिक स्थिती किंवा मूड स्विंगवर अधिकाधिक प्रमाणात नियंत्रण ठेवता येतं.

रक्तस्त्राव थांबवण्यास उपयुक्त-
एखादी जखम झाल्यास आणि त्यातून खूप रक्तस्त्राव होत असल्यास तिखट पदार्थ किंवा हिरव्या मिरच्यांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटामिन के चं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तस्त्राव थांबवण्यास त्याची मदत होते.

Dr. Vikas Kumar
Dr. Vikas Kumar
Specialist, Gastroenterologist, Pune
Dr. Akash Kadam
Dr. Akash Kadam
BDS, Dentist Oral Medicine Specialist, 4 yrs, Pune
Dr. Shivangi Patil
Dr. Shivangi Patil
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. C  L Garg
Dr. C L Garg
MBBS, Family Physician General Medicine Physician, 46 yrs, Pune
Dr. Shubham Hukkeri
Dr. Shubham Hukkeri
BPTh, 1 yrs, Mumbai
Hellodox
x