Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  

हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी खास 'डाएट टीप्स'

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते. मासिकपाळीचा त्रास, प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्यास स्त्रियांच्या शरीरात रक्ताची, आयर्नची कमतरता जाणवते. त्याचा परिणाम हिमोग्लोबिनच्या पातळीवरही होतो. अशावेळेस औषधोपचारासोबतच आहाराच्या पथ्यपाण्यामध्ये काही बदल केल्यास तुम्हाला हिमोग्लोबीन आणि रक्ताची पातळी वाढायला मदत होते.

हिरव्या भाज्या
पालक, मेथी, शतावरीचा आहारात समावेश केल्यास हिमोग्लोबीनचं प्रमाण सुधारायला मदत होते. या पदार्थांमध्ये आयर्न घटक मुबलक असतात. सिमला मिरची, ब्रोकोली, कोबी, टोमेटो यांचाही समावेश वाढवा.

डाळी -
बारली, तांदूळ, रवा, बाजरी, मका यांचा आहारात समावेश केल्यानेही हिमोग्लोबीनची पातळी सुधारायला मदत होते. सोबतच मूग डाळ, मसूर, उडीद, छोले, राजमा यांमधील आयर्न घटक, फॉलिक अ‍ॅसिड लाल रक्तपेशींना वाढवण्यास मदत करतात.


मांसाहार -
शाकाहारी पदार्थांसोबत मासे, मीट, मांस अशा मांसाहारी पदार्थांचा आहारात समावेश वाढवल्यानेही हिमोग्लोबीनचं प्रमाण सुधारण्यास मदत होते.

सुकामेवा
बदाम, अंजीर, मनुका अशा सुकामेव्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. यामध्ये मुबलक आयर्न घटक असतात.

व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ
आहारात केवळ आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणे पुरेसे नाही. आहारातील आयर्न घटक रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करणं अत्यावश्यक आहे. याकरिता किवी, पपई, संत्र, स्ट्रॉबेरी, लिंबू, पेरू अशा पदार्थांचा मुबलक समावेश करणं आवश्यक आहे.

फॉलिक अ‍ॅसिड
पुरेशा लाल रक्त पेशी नसल्याने हिमोग्लोबीन पातळी कमी असल्यास आहारात काही बदल करणं फायदेशीर ठरतं. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, फॉलिक अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं मदत करते.

मसाल्याचे पदार्थ
मसाल्यातील काही सुके पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास आयर्नचं रक्तामध्ये शोषण होण्यास मदत होते. याकरिता कोथिंबीर, चवळी सोबत तुळस, तेजपत्ता देखील मदत करते.

Published  

भुक्कड लोकांंनो ! या पदार्थांवर ताव मारल्याने हाडं होतील ठिसुळ

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

आपण फीटनेसचा विचार करताना डाएट आणि व्यायामाकडे लक्ष देतो. अनेकदा याच्या मदतीने तुमचं वजन, शरीरातील चरबी, रकताचं प्रमाण किंवा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळतो. पण तुम्ही कधी हाडांच्या आरोग्याबाबत विचार केला आहे का ?

हाडाच्या आरोग्यासाठी शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी यांचं प्रमाण योग्य असणं आवश्यक आहे. अन्यथा जसजसं वय वाढतं तशी हाडं कमजोर होतात. हाडं ठिसुळ झाल्याने अनेक आजार वाढतात. तुमच्या आहारातील काही पदार्थांमुळेही हाडं कमजोर होण्याचा धोका असतो. मग तुम्हीही भुक्कड असाल ? कोणत्याही पदार्थांवर विचार न करता थेट ताव मारत असाल, तर या पदार्थांमुळे तुमची हाडं ठिसुळ होण्याची शक्यता आहे.

या पदार्थांवर ताव माराल तर हाडं होतील ठिसुळ
मीठ -
मीठाचे अतिप्रमाणात आहारात समावेश करत असाल तर हाडं ठिसुळ होण्याचं प्रमाण वाढेल. मीठातील सोडियम घटक मूत्राद्वारा कॅल्शियम घटक बाहेर टाकण्यास कारणीभूत ठरतात.


चॉकलेट -
अतिप्रमाणात चॉकलेट खात असाल तर त्याचा प्रमाण हाडांवर होतो. यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण आणि ऑक्सलेट प्रमाण वाढते. यामुळे कॅल्शियम शरीराबाहेर पडतात.

मद्यपान -
मद्यसेवनाची सवय असणार्‍यांमध्ये शरीरात कॅल्शियमचं प्रमाण खालावते. यामुळे हाडं कमजोर होतात.

कोल्ड ड्रिंक्स -
कोल्ड ड्रिंक्सचं अतिसेवनदेखील आरोग्याला धोकादायक आहे. यामधील कार्बन डाय ऑक्साईड आणि फॉस्फरस घटक हाडांना ठिसुळ करतात.

चहा, कॉफी
चहा आणि कॉफीच्या अतिसेवनामुळे हाडं कमजोर होतात. त्यामुळे तुम्हांला सतत चहा, कॉफी पिण्याची सवय असेल तर वेळीच सावश व्हा. कारण यामधील कॅफिन घटक हाडांना नुकसानकारक ठरतात.

Published  

हार्टबर्नच्या समस्येवर फायदेशीर डाएट टीप्स

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

अनेकदा तळकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो. पचनसंस्थेवर परिणाम झाल्याने पोटात गॅस होणं, छातीत जळजळणे, हार्टबर्नचा त्रास होतो. अशावेळेस उठता बसतानाही त्रास होतो. त्यामुळे सुरूवातीला लहान वाटणार्‍या पण कालांतराने गंभीर ठरणार्‍या या समस्यांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.

पचनाचा हा त्रास तीव्र स्वरूपाचे होत नाही तोपर्यंत अनेकजण त्याकडे लक्षही देत नाहीत. शरीरात पित्त वाढल्यानंतर छातीत जळजळ, वेदना, आंबट ढेकर, गळ्याजवळ, तोंडात सूज, उचकी, अचानक वजन कमी होणं, उलट्यांचा त्रास होणं हे सारेच वाढते.

पित्ताच्या त्रासामुळे वाढणारा हा त्रास तुम्ही सुरूवातीच्या टप्प्यावर ओळखू शकल्यास त्यावर औषधोपचारांपेक्षा आहारातील काही बदलांद्वारा उपाय करता येऊ शकतात.


1. पपई
पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी पपई फायदेशीर आहे. त्यामधील पॅपेन घटक पचन सुधारायला मदत करतात. तर फायबर घटक पोटातील घातक घटक बाहेर टाकतात. पित्ताचा त्रास असणार्‍यांनी नाश्त्याला आहारात पपई नियमित खाणंही फायदेशीर आहे.

2. औषधी वनस्पती
पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी कोरफडीचा रस फायदेशीर आहे. यामुळे पोटाच्या नाजूक लाईनिंगचं रक्षण होते. पुदीना पोटातील गॅस कमी करण्यास मदत करतात.

3. आंबट फळ
संत्र, मोसंबी, लिंबू यासारखी आंबट फळ अल्कलाईन घटकांमुळे पोटातील अ‍ॅसिड कमी होते.

4. नारळपाणी
नारळपाण्यातील फायबर घटक शरीराला डिटॉक्सिफाय करायला मदत करतात. यामुळे पोटातील गॅसचा त्रास, हार्टबर्नचा त्रास कमी होतो.

5. दही
दह्यातील चांगले बॅक्टेरिया पोटाला थंडावा देण्यास मदत करतात. पित्ताचा त्रास कमी करण्यास सोबतच हार्टबर्न कमी करण्यास वाटीबह्र दही खाणं फायदेशीर आहे.

6. केळं
पोटाच्या आरोग्यासाठी केळ फायदेशीर आहे. यामुळे आतड्यांचा दाह कमी होतो. केळ्यातील फायबर घटक आतड्यांना होणारा त्रास कमी करण्यास मदत करते.

7. आलं
आलं पाचक असल्याने पोटातील गॅसचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.

Published  

मासिकपाळीचे दिवस वेदनारहित करतील 'या' डाएट टीप्स

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

अनेक महिलांना मासिकपाळीचा त्रास नकोसा वाटतो. या दिवसांमध्ये होणारा पोटदुखीचा त्रास, पोटात क्रॅम्स येणं याच्या सोबतीने अ‍ॅक्ने, पीएमएस आणि होणारा इतर त्रासही डोकेदुखी वाढवणारा असतो. बदलती लाईफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या विचित्र वेळा, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, तणावग्रस्त जीवनशैली यामुळे आरोग्यावर आणि मासिकपाळीवरही परिणाम होतो.
मासिकपाळीच्या दिवसात होणारा त्रास लक्षात घेता पूर्वीच्या काळी स्त्रियांना सक्तीचा आराम देणं शक्य होते. मात्र आजकाल करियर, काम आणि अभ्यास अशा अनेक गोष्टींवर कसरत करत पुढे जावं लागतं. त्यामुळे मासिकपाळीच्या दिवसातही अनेकींना काम करावच लागतं. मग अनियमित मासिकपाळी सुरळीत करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी आहारात फक्त हा बदल करून पाहण्याचा सल्ला सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिल्या आहेत.

वेदनारहित मासिकपाळीच्या दिवसांसाठी खास डाएट टीप्स
1.नाचणीचा आहारात नियमित समावेश करावा. डोसा, भाकरी, खीर अशा विविध स्वरूपात नाचणी आहारात समाविष्ट करता येऊ शकते. नाचणीमुळे क्रम्प्स कमी होणं, मासिकपाळीच्या दिवसात अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठी नाचणी फायदेशीर ठरते.

2. खोबरं, तूप, गूळ, आळीब यांचा आहारात समावेश केल्यानेही मासिकपाळीच्या दिवसातील त्रास कमी होतो. चेहर्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठीदेखील मदत होते. मासिकपाळीपूर्वी चेहर्‍यावर अ‍ॅकनेचं प्रमाण वाढण्यामागे त्वचेवरील अतिप्रमाणातील तेल हे एक कारण आहे.


3. कच्च केळं, सुरण, डाळी यांचा आहारात समावेश केल्याने पीएमएस आणि मासिकपाळीतील मायग्रेनचा त्रासही कमी होतो. पाळीनंतर स्पॉटींग होण्याचा त्रास असल्यास तो आटोक्यात राहण्यास मदत होते.

4. व्यायामदेखील मासिकपाळीतील त्रास कमी करण्यास, मूड हलका करण्यास मदत करतो. व्यायाम किंवा फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीमुळे शरीरात रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. मसल्स टोन सुधारण्यासाठी, हाडांची डेन्सिटी सुधारण्यासाठी वेट ट्रेनिंग मदत करते. वेळेआधीच मेनोपॉज आरोग्याला धोकादायक ! 'या' 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नको

5. सुप्तबद्धकोनासन या योगासनामुळे मासिकपाळीत अतिरक्तस्त्राव होणं, वेदना यांचा त्रास कमी करण्यास मदत करते. प्रसुती सुलभ होण्यासाठीदेखील या योगासनाचा फायदा होऊ शकतो.

6. कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंट यांचा आहारात समावेश करा. मासिकपाळीच्या दिवसातील क्रॅम्प्स, डॉकेदुखी, पाठीचं, कंबरेचं दुखणं कमी करण्यासाठी मदत होते.

Published  

गरोदरपणात आहारात साबुदाण्याचा समावेश करण्याचे फायदे

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

उपवासाचे दिवस सुरू झाले की हमखास घराघरामध्ये साबुदाण्याचे पदार्थ बनवले जातात. साबुदाण्याच्या पदार्थांपासून बनवलेले पदार्थ केवळ पोटभरीसाठी नव्हे तर आरोग्यालाही फायदेशीर आहेत. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे महिलांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. प्रामुख्याने गरोदर महिलांच्या आहारात साबुदाण्याच्या समावेशामुळे बाळाच्या हाडांना मजबुती मिळण्यास मदत होते.

उर्जेचा स्रोत
साबुदाण्याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते. साबुदाण्यातील कार्बोहायड्रेट घटक गरोदरपणातील थकवा कमी करण्यास मदत करतो.

वजन वाढवणं
100 ग्राम सुक्या साबुदाण्यातूनही शरीराला सुमारे 355 कॅलरीज उर्जा मिळते. यामध्ये 94 ग्राम कार्बोहायड्रेट्स आढळतात. गरोदरपणात वजन कमी असणार्‍यांमध्ये साबुदाण्याचे सेवन फायदेशीर आहे. यामुळे जन्माच्या वेळेस बाळाचं वजन योग्य राहण्यास मदत होते.


हाडांना मजबुती
गरोदरपणाच्या काळात महिलांना संतुलित आहार घेणं आवश्यक असते. साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात.यामुळे हाडं मजबुत होतात.

गरोदरपणात फायदेशीर
साबुदाण्यात फॉळिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. सोबतच व्हिटॅमिन बी मुबलक असते. यामुळे गर्भाची वाढ होण्यास मदत होते. बाळाच्या गर्भातील विकासासाठी आवश्यक घटक मिळतात.

रक्तदाब
साबुदाण्यामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामधील पोटॅशियम घटक रक्ताभिसरण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबाचा, हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

Dr. Shivdas Patil
Dr. Shivdas Patil
BAMS, Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Sandeep Mengade
Dr. Sandeep Mengade
BAMS, Family Physician General Physician, 17 yrs, Pune
Dr. Hemant Chavan
Dr. Hemant Chavan
BAMS, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Snehal Toke
Dr. Snehal Toke
BDS, 2 yrs, Pune
Dr. Pujitha Chowdary
Dr. Pujitha Chowdary
MD - Allopathy, General Medicine Physician Diabetologist, 6 yrs, Chennai
Hellodox
x