Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

दूध पिणे आरोग्य तसेच ब्युटीसाठी देखील फायदेशीर आहे. पण दूध पिण्याअगोदर जर तुम्ही या 5 गोष्टींचे सेवन करत असाल तर हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. जाणून घ्या कोणत्या 5 वस्तूंनंतर दुधाचे सेवन करू नये...

दूधाला पूर्णअन्न समजले जाते. आरोग्यासाठी दूध हे आवश्यक आहे. दूधात कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी दूध आवश्यक आहे. त्यामुळे लहानमुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रकृतीनुसार दूधाचे सेवन फायदेशीर ठरते.

क्वचित तुमची जेवणाची किंवा नाश्त्याची वेळ टळली तर तुम्ही आहारात दूधाचा समावेश करू शकता. मात्र दूधासोबत काही पदार्थ खाणं हे आरोग्याला त्रासदायक ठरू शकत असल्याने नेमक्या कोणत्या वेळी आणि कसा दूधाचा आहारात समावेश करावा याबाबतचा हा एक्सपर्ट सल्ल नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. दूध गरम प्यावे की थंडगार कधी आणि कसं प्याल दूध ?

1. पालक अनेकदा मुलांना आंघोळ किंवा प्रातः विधीच्या पूर्वीच दूध प्यायला देतात. यामुळे दूध पचायला त्रास होऊ शकतो. प्रयत्न असा करा की दूध हे आंघोळीनंतरच प्यावे.

2. उन्हाळ्याव्यतिरिक्त रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं टाळा. थंड दूध पिण्याचे हे आहेत फायदे

3.दूधासोबत कोणतेही आंबट फळ मिसळू नका. यामुळे त्रास होऊ शकतो. गॅसचा त्रास होतो. संत्र, पपई, स्ट्रॉबेरीचं दूधासोबत सेवन टाळा.

4. खोकला, सर्दी, कफाचा त्रास असल्यास रात्रीच्या वेळेस किंवा थंड दूध पिणं टाळा. दुधात गूळ मिसळून पिण्याचे जादुई फायदे

5. ज्यांना दूध पिण्याचा त्रास असतो, पचायला त्रास होत असेल तर अशांनी डॉकटरांच्या सल्ल्यानेच दूध प्यावे. दूधात सुंठ मिसळून प्यावे. यामुळे त्रास कमी होईल.

6. रात्रीच्या वेळेस जेवण थोडं कमी जेवून त्यानंतर दीड ते दोन तासांनी ग्लासभर दूध प्यावे.

7. सकाळी आंघोळीनंतर आणि संध्याकाळच्या वेळेस दूध पिणं अधिक आरोग्यदायी आहे. त्यामुळे संध्याकाळी मुलं खेळून आल्यानंतर अभ्यासाला बसण्यापूर्वी त्यांना ग्लासभर दूध द्या.

8. रात्रीच्या वेळेस दूध प्यायचे असेल तर जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ याचं गणित सांभाळा. रात्रीच्या जेवणानंतर 2 तासांनी दूध प्या.

ज्यांच्या घरात साधारण दहा-बारा महिन्यांची बाळं असतात, अशी मंडळी आजकाल डॉक्टरांना हा प्रश्न विचारतात. प्रश्न ऐकून डॉक्टरांना खरंच खूप भरून येतं. २१व्या शतकातील आरोग्यशैलीत या पालकांनी बाळाला चक्क दूध पाजायचा निर्णय घेतला, हेच खरं डॉक्टरांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. गायीचं दूध, म्हशीचं दूध, डबाबंद पावडरचं दूध, पॅकेज्ड दूध, सोया दूध, बदामाचं दूध असे अनेक पर्याय त्यांच्यासमोर असतात. आपल्या या प्रश्नाचं उत्तर संगणकावर न शोधता डॉक्टरांना विचारल्यानंतर त्या गोष्टीचं अप्रूप डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही, तर नवलच.


तसं पहिलं, तर दूध हे पूर्णान्न समजलं जातं. एक वर्षापर्यंत मुलांना आईचं दूध मिळणं आवश्यक असतं. त्यानंतर मुलांना सर्व स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, कर्बोदकं असे सर्व अन्नघटक, जीवनसत्वं आणि कॅल्शियमसारखी खनिजं पुरवणारे दूध हे शारीरिक वाढीसाठी आवश्यक असतं. त्यामुळे मुलांचे स्नायू, हाडं आणि मज्जासंस्था उत्तम बनते. त्यातही आपल्या देशात फार पूर्वीपासून गायीचंच दूध मुलांसाठी उत्तम समजलं जातं.
या समजुतीला पुष्टी देणारं एक संशोधन नुकतंच ‘अमेरिकन जर्नल ऑफ न्युट्रिशन’च्या अंकात प्रसिद्ध झालं आहे. कॅनडामधील सेंट मायकेल्स हॉस्पिटलमधील डॉ. जोनाथन मॅग्वायर यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या संशोधनानुसार, जी मुलं गायीचं दूध अगदी लहानपणापासून नियमितपणानं घेतात, त्यांची उंची इतर प्रकारचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा जास्त वाढते.


या संशोधनामध्ये २ वर्षं ते ६ वर्षं वयाच्या ५,०३४ मुलांची वर्षभर पाहणी करण्यात आली. या मुलांना रोज १ ते ३ कप दूध देण्यात आलं. यातील ८७ टक्के मुलांना फक्त गायीचं, १३ टक्के मुलांना इतर प्रकारचं आणि ५ टक्के मुलांना दोन्ही पद्धतीचं दूध रोज देण्यात आलं.
या सर्वेक्षणाच्या अखेरीस काही महत्त्वाच्या आणि चित्तवेधक गोष्टी नजरेस आल्या :

जी मुलं गायीचं दूध घेत नव्हती, त्यांची उंची त्यांच्या वयाला किमान अपेक्षित उंचीपेक्षा कमी भरली. आकडेवारीनुसार दर कप (२५० मिलीलिटर) दुधामागे ०.४ सेंटीमीटरनं ती खुजी भरली.

ज्या मुलांना फक्त गायीचं दूध दिलं जात होतं, त्यांची उंची त्यांच्या वयाच्या किमान अपेक्षित उंचीप्रमाणे ०.२ सेंटीमीटरनं अधिक वाढली.

३ वर्षांच्या मुलांमध्ये रोज ७५० मिलीलिटर गायीचं दूध घेणारी मुलं, त्याच वयाच्या इतर प्रकारचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा १.५ सेंटीमीटरनं उंच भरली.

जी मुलं गायीचं आणि इतर असं दोन्ही प्रकारचं दूध घेत होती, त्यांची उंचीदेखील फक्त गायीचं दूध घेणाऱ्या मुलांपेक्षा कमी भरली.

या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला, की ५०० मिलीलिटर गायीच्या दुधात सर्वसाधारणपणे १६ ग्रॅम प्रथिनं असतात. म्हशीच्या दुधात ती तितक्याच प्रमाणात असतात; पण सोया मिल्क, बदामाचं दूध आणि इतर पॅकेज्ड दुधात ती खूपच कमी असतात. गायीच्या दुधातील प्रथिनं बाळाच्या पचनास सोपी असतात. त्यामुळे त्यांचा परिणाम उत्तम होतो. म्हशीच्या दुधात स्निग्धांश खूप जास्त असतो. त्यामुळे मुख्यत्वे मुलांच्या चरबीत वाढ होते. दोन्ही प्रकारच्या दुधातजीवनसत्व आणि कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिजं भरपूर असतात; त्यामुळे उंची वाढायला मदत होते. या संशोधकांच्या मते उंची वाढण्याच्या क्रियेला गायीच्या दुधाची जास्त मदत होते.


या संशोधनाचा मुख्य भर हा कृत्रिम आणि फॅन्सी दुधांवर जास्त आहे. एकविसाव्या शतकातल्या पालकांनी हे लक्षात घ्यावं, की नैसर्गिक दूध मग ते गायीचं असो, की म्हशीचं, कुठल्याही जाहिरातबाजी करणाऱ्या दुधाच्या ब्रँडपेक्षा जास्त सकस असतं. त्याचबरोबर, दुधात टाकून त्याची चव बदलणाऱ्या आणि मुलांची उंची आणि स्टॅमिना वाढवण्याची अशास्त्रीय जाहिरात करणाऱ्या बाजारू चॉकलेटी पावडरींपेक्षा गायीचं दूध लक्षपट आरोग्यदायी असतं.

मुंबई : हळदीचे दूध अत्यंत आरोग्यदायी आहे. हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. रोगप्रतिकारकशक्ती सुधारते, पचनक्रिया सुरळीत होते, असे इतर अनेक फायदे होतात. तर आज वर्ल्ड मिल्क डे निमित्त जाणून घेऊया का प्यावे हळदीचे दूध...

रोगप्रतिकारकशक्ती सुधारते
हळदीच्या दुधामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. त्याचबरोबर सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर हळदीचे दूध अवश्य प्या. शारीरिक व्यायाम करणाऱ्यांसाठी हळदीचे दूध फायदेशीर ठरते.

पचनविकार दूर होण्यास मदत
हळदीच्या दूधामुळे पचनक्रिया सुधारते. छातीतील जळजळ, ब्लोटिंग, गॅसेस या समस्या दूर होण्यास मदत होते. तसंच भूक न लागणे, अपचन या समस्या दूर होतात.

आरोग्याच्या इतर समस्यांवर
रोगप्रतिकारकशक्ती कमकूवत असल्याने होणारे आजार दूर करण्यास हळदीचे दूध उपयुक्त ठरते. सांधेदुखी, पचनासंबंधित समस्या, त्वचेच्या समस्या दूर करण्यास हळदीचे दूध फायदेशीर आहे.

शांत झोप येण्यासाठी
निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी हळद घातलेले कोमट दूध झोपण्यापूर्वी प्या. साध्या दूधापेक्षा हळदीचे दूध पिणे अधिक फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे शरीरातील अमिनो अॅसिडची निर्मिती वाढते. हळदीमुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरात अमिनो अॅसिड घेण्याचे प्रमाण वाढते. परिणामी शरीर रिलॉक्स होते, मूड शांत होतो आणि शांत झोप लागते.

रक्त शुद्ध होते
हळद डिटॉक्सिफिकेशनचे काम अत्यंत उत्तमरित्या करते. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये दूर होतात. कारण ही विषद्रव्ये रक्तवाहिन्यात जमा होऊन इतर आजारांना आमंत्रण देतात. हळदीमुळे रक्तातील लिव्हरचे कार्य सुरळीत होऊन रक्तातील टॉक्सिन्स दूर होतात.

मुंबई : दह्याचे सेवन नेहमीच शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. पचनासाठी दही अतिशय उपयोगी आहे. पचनक्रिया योग्य नसेल तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. यावेळी दह्याचे सेवन केल्यास खूप फायदा होतो. अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. दह्यामध्ये पाचनशक्ती सुधारणारे घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो. दह्याचे सेवन दात आणि हांडांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

१. दही-काळे मीठ आणि भाजलेले जिरे एकत्रित करुन सेवन केल्यास भूक वाढण्यास मदत होते. पाचनशक्ती सुधारते.

२. दही आणि मध एकत्रित करुन खाल्ल्यास अँटी बायोटिकप्रमाणे काम करते. हे खाल्ल्याने अल्सरचा त्रास दूर होतो.

३. दही, काळे मीठ, मिरी आणि जिरे हे मिश्रण वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे. यामुळे अधिकचे फॅट बर्न होते.

४. दही, साखर आणि ड्रायफ्रुट्स एकत्रित खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. वजन वाढण्यास मदत मिळते.

५. दही आणि ओवा मिसळून खाल्ल्याने पाईल्सचा त्रास दूर होतो.

६. दही आणि भात एकत्रित खाल्ल्याने अर्ध डोकेदुखी बरी होते.

७. दह्यात बडिशेप आणि साखर मिसळून खाल्ल्याने पोटातील जळजळ दूर होते. निद्रानाशेचा त्रास कमी होतो.

Dr. sandeep shivekar
Dr. sandeep shivekar
BHMS, Diabetologist, 10 yrs, Pune
Dr. Anand Karale
Dr. Anand Karale
MS - Allopathy, Gynaecologist Obstetrician, 5 yrs, Pune
Dr. Sairandhri Shinde
Dr. Sairandhri Shinde
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Brinda Dave
Dr. Brinda Dave
MPTh, Neuro Physiotherapist Physiotherapist, 4 yrs, Pune
Dr. Varghese Jibi
Dr. Varghese Jibi
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Hellodox
x