Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.


डीएनए टेस्ट म्हणजे काय?

डीएनए म्हणजे देवोक्सयरीबोनुकलीच ऍसिड,हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या संपूर्ण शरीर व्यवस्थेची माहिती आपल्या डीएनए च्या माध्यमातून काढता येते. डीएनए च्या मदतीने शरीरातील आजारांपासून ते आपल्या वंशावळीपासून ते गुन्हेगारांना पकडण्यापर्यंत सर्वांची माहिती काढता येते. त्यासाठी डीएनए टेस्टिंग केली जाते.

परंतु डीएनए चा आकार हा ३२ बी पी इतकाच असतो म्हणजे अत्यंत सुक्ष्म. मग या एव्हढायशा डीएनए ची टेस्टिंग करून एवढी माहिती कशी मिळवली जाते? तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

डीएनए म्हणजे काय?
- डीएनए टेस्टिंगचा सर्वात मूलभूत अंग म्हणजे डीएनए मोलिकल्स. त्यात व्यक्तीचा संपूर्ण जेनेटिक डेटा असतो,जो जेनेटिक कोडच्या स्वरूपात असतो.
- डोळ्याचा रंगापासून तर शरीर रचनेचा निर्मितीला जेनेटिक कोडच्या वेगवेगळ्या ट्रेटस कारणीभूत असतात. आपल्या शरीरातील पेशींपासून ते अवयवांपर्यंत, हृदयापासून त्वचेपर्यंत सर्वात डीएनए सेट्सच्या रुपात असतो. अगदी केसातून सुध्दा डीएनए व त्यातून एखाद्या माणसाची संपुर्ण माहिती जाणून घेता येत असते.
- डीएनए हे एक डबल हेलिक्स आकृती आहे. जी एका गोल ३६०°वाकवलेल्या शिडीप्रमाणे आहेत. त्यात वेगवेगळे न्यूक्लिओटाईड कण असतात. ज्यातील अडिणीने, थायमिन ह्यांचात एक बॉण्ड असतो आणि सायटोसीन व गुणीने यांचात एक बॉण्ड असतो. आपला जेनेटिक कोड ३ बिलियन बेस पेयर इतका लांब असतो.

डीएनए टेस्टिंग कशासाठी करतात?
- आपल्या डीएनए पैकी ९९. ९ % डीएनए समान असतो. फक्त ०. १ % हा अगदीच नगण्य फरक एका माणसाच्या डीएनए पासून दुसऱ्या माणसाच्या डीएनए पासून वेगळा असतो. ते जे वेगळे सिक्वेन्स एका माणसाला दुसऱ्या माणसा पासून वेगळं बनवतात व स्वतःची अशी एक जेनेटिक आयडेंटी देतात,त्यांना जेनेटिक मार्कर म्हटलं जातं.
- फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून या जेनेटिक मार्करचा उपयोग केला जातो. एखाद्या जोडप्याला जुळे बाळ जन्माला तेव्हाच येतात जेव्हा त्यांचे जेनेटिक मार्कर एकसमान असतात. जेवढे जास्त जवळचे नातेसंबंध तेवढे जास्त एकसमान जेनेटिक मार्कर असतात.
- डीएनए टेस्टिंग चा मूळ सिद्धांत हा ह्याच गोष्टीवर निर्भर करतो की असंख्य अश्या जेनेटिक कोडच्या जाळ्यात एका विशिष्ट जेनेटिक मार्करचा शोध घेणे जो लोकांना एकमेकांपासून वेगळं सिद्ध करतो.

डीएनए टेस्टिंगचा इतिहास-
१९५० साली, अँना अँडरसनने स्वतःला रशियन राजघराण्याची वारस असल्याचा दावा केला होता. तिच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या डीएनए टेस्ट मध्ये तिचा राजघराण्याशी कवडीमोलाचा संबंध नव्हता हे सिद्ध झाले होते.

टिमोथी विल्सन नावाचा एक हत्यारा होता,जो पहिला अमेरिकन कैदी होता ज्याला डीएनए टेस्टच्या बळावर मृत्युदंड सुनावण्यात आला होता. डेव्हिड वास्क्वेज हा पहिला अमेरिकन माणूस होता ज्याला टिमोथी विल्सन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते त्याची निर्दोष मुक्तता डीएनए टेस्टिंगने १९१२ साली करण्यात आली होती.

डीएनए टेस्टिंग कसे काम करते?
पॅरेंटल,फॉरेन्सिक आणि जेनेटिक ह्या तीन प्रकारच्या टेस्टिंग केल्या जातात यात जैविक सॅम्पल्समधून जेनेटिक मार्करचा शोध घेतला जातो. कारण प्रत्येक पेशीत एकसमान डीएनए असतो. जो शरीराच्या कुठल्याही भागातून गोळा केला तरी सारखाच असतो. मग तो रक्तातून करतात अथवा त्वचेतून तो सारखाच असतो.

फॉरेन्सिक संशोधक तर अगदी पीडिताच्या नखात अडकलेल्या मासाच्या थोड्या बारीक तुकड्यातून डीएनए शोधून काढतात. संशयिताच्या रक्तातील डीएनए सुद्धा घेतला जातो. त्या डीएनए च्या हजारो प्रति निर्माण केल्या जातात. त्यासाठी प सी आर तंत्राचा वापर केला जातो. प सी आर म्हणजे पोलीमरसे चैन रिऍक्टिव.

डीएनए कणांना विविध ठिकाणी काटून छाटून त्यातून जेनेटिक मार्कर बाजूला काढले जातात. मग त्यांचे कोडिंग केले जाते. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे एखाद्या मनुष्याची संपूर्ण जेनेटिक प्रोफाइल तयार केली जाते. ती प्रोफाइल ज्या खऱ्या आरोपीच्या जेनेटिक प्रोफाइलशी समानता दाखवेल तो व्यक्ती गुन्हेगार असतो.

ह्याच मदतीने शरीरातील आजार,वंशावळ,होणाऱ्या बाळाचे आरोग्य या सर्व गोष्टींचा शोध घेतला जातो.

डीएनए टेस्ट किती यशस्वी होतात?
डीएनए टेस्टची सफलता ही खूप महत्त्वाची असते. काहीवेळा डीएनए हे एकमेव एखाद्या व्यक्तीच गुन्ह्यातील निर्दोषत्व सिद्ध करण्याचं माध्यम असतं. त्यामुळे डीएनए टेस्ट १०० % सफल होणे अनिवार्य असते कारण त्या माणसाचं भवितव्य त्यावर अवलंबून असतं.

कधी कधी जेनेटिक मार्कर समान असण्याची शक्यता ही असते पण ती फारच अत्यल्प असते. तरी एकदम काटेकोर व सफल टेस्टिंग होणे गरजेचे असते. परंतु ही पद्धत प्रचंड खर्चिक असते.

Dr. Hema Chandrashekhar
Dr. Hema Chandrashekhar
BAMS, Ayurveda Family Physician, 28 yrs, Pune
Dr. Himanshu Verma
Dr. Himanshu Verma
Medical Student, General Physician, 3 yrs, Bhopal
Dr. Udaya Sahoo
Dr. Udaya Sahoo
MBBS, General Medicine Physician General Physician, 49 yrs, Khordha
Dr. Divya Prakash
Dr. Divya Prakash
MDS, Dentist Implantologist, 6 yrs, Pune
Dr. Pratima Kokate-Ghode
Dr. Pratima Kokate-Ghode
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diet Therapeutic Yoga, 9 yrs, Pune
Hellodox
x