Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

नियमित ध्यान केल्याने उतारवयात सचेत राहण्याच्या आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत सुधारणा होत असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे.

हा अभ्यास ‘जर्नल ऑफ कागनेटिव्ह एनहान्समेन्ट’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

यात तीन महिने नियमित ध्यान केल्याने लोकांना काय फायदा झाला याचा अभ्यास करण्यात आला, त्याचप्रमाणे सात वर्षे नियमित ध्यान धारणेनंतरही लोकांमध्ये झालेल्या सुधारणेचे मूल्यांकन करण्यात आले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी नियमित ध्यान करणाऱ्या ३० व्यक्तींच्या संज्ञानात्मक क्षमतेचे मूल्यमापन केले.

मन शांत करणे आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढविण्यासाठी ध्यानाचे प्रकार या लोकांना शिकविण्यात आले होते. यानंतर केवळ ३० दिवसांच्या शिबिरादरम्यान ध्यान करणाऱ्या लोकांच्या गटाचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासाचा भाग म्हणून सहा महिने, अठरा महिने आणि सात वर्षांच्या कालावधीनंतर पाठपुरावा मूल्यांकन करण्यात आले. यावेळी अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना त्यांनी दैंनदिन आयुष्यात ध्यान करणे सुरू ठेवले की नाही याबाबत विचारणा करण्यात आली.

यातील ४० लोकांनी नियमित ध्यान केल्याची माहिती दिली. यातील ८५ टक्के लोकांनी सात वर्षांमध्ये नियमितपणे दिवसातून एक तास ध्यान केले. यानंतर पुन्हा त्यांच्या प्रतिक्रियेचा वेळ आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता याचे मूल्यांकन करण्यात आले.

यावेळी सात वर्षे नियमित ध्यान करणाऱ्या वृद्धांमध्ये वाढत्या वयानुसार लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत येणाऱ्या अडचणींची लक्षणे दिसून आली नाहीत.

ध्यान केल्याने लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि प्रतिक्रियात्मक क्षमतेमध्ये सुधारणा होत असल्याचे पुरावे या अभ्यासातून समोर आले आहेत, असे अमेरिकेतील मायामी विद्यापीठाच्या अ‍ॅन्थनी झेनेस्को यांनी म्हटले.

Dr. Nitesh
Dr. Nitesh
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Amar Kamble
Dr. Amar Kamble
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Anushree Bhonde
Dr. Anushree Bhonde
BPTh, Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Nandkumar  G. Patil
Dr. Nandkumar G. Patil
BAMS, Ayurveda, 35 yrs, Pune
Dr. Archana Bhilare
Dr. Archana Bhilare
BDS, Dentist Endodontist, 8 yrs, Pune
Hellodox
x