Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये झटपट भूक भागवण्यासाठी आपण अनेकदा जंक फूडचा आधार घेतो. जंक फूड अनेकजणांच्या तर रूटिनचाच भाग झाले आहेत. जंक फूडमधील सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे, बर्गर. लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच बर्गर खायला फार आवडतं. एवढचं नाहीतर काम करताना भूक लागली असेल तर, भूक भागवण्यासाठी सर्वात पहिला पर्याय म्हणजे बर्गरचं असतो. पण आपल्यापैकी अनेक लोकांना बर्गरमुळे होणाऱ्या शरीराच्या समस्यांबाबत अजिबातच माहिती नसते.

झटपट भूक भागवणारा बर्गर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतो. मग तुम्ही दिवसभरात कधीही खा, बर्गरमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतातच. खरं तर बर्गरमध्ये अनेक अशी तत्व असतात जी शरीराला फायदेशीर ठरण्याऐवजी घातक ठरतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याचं काम ही तत्व करत असतात. फास्ट फूडमध्ये साधारणतः ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असतात. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करण्यासाठी कारणीभूत ठरतात.

हाय ब्लड प्रेशर आणि हृदयरोगाचा धोका

आहारात फळांचा समावेश केल्याने अशा आजारांपासून बचाव करणं शक्य असतं. बर्गरमध्ये असे फॅट्स असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. अशा फॅटी पदार्थांचं जास्त आणि सतत सेवन केल्याने शरीरातील धमण्यांवर परिणाम होतो. यामुळे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. परिणामी भविष्यामध्ये हृदयाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बर्गरसारख्या फास्ट फूड पदार्थांमुळे अस्थमा, एग्जिमा, त्वचेच्या समस्या आणि डोळ्यांमध्ये पाणी येणं यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. आहारामध्ये असलेली पोषक तत्वांची कमतरता अ‍ॅलर्जीसारखे आजार वाढण्याचं कारण ठरते.

आजारांचा भंडार आहे बर्गर

बर्गरमध्ये कॅलरी, फॅट्स आणि अतिरिक्त सोडिअमचे प्रमाण अधिक असतं. ही सर्व तत्व आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. एका बर्गरमध्ये 500 कॅलरी, 25 ग्रॅम फॅट्स, 40 ग्रॅम कार्ब्स, 10 ग्रॅम साखर आणि 1,000 मिलीग्राम सोडिअम असतं. ही सर्व तत्व आपल्याला आजारी पाडण्यासाठी पुरेशी असतात.

डायबिटीस

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बर्गरचा पहिला घास खाल्यानंतर 15 मिनिटांनी आपल्या शरीरातील ग्लूकोजची पातळी वाढते. तसेच बर्गरमधील तत्व शरीरातील इन्सुलिन रिलीज करण्यासाठी बढावा देतात. ज्यामुळे तुम्हाला काही वेळातच पुन्हा भूक लागते. त्यामुळे सतत बर्गरचे सेवन केल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. एवढचं नाहीतर एकाच वेळी सर्वाधिक कॅलरी घेतल्याने शरीरातील पेशींवर ऑक्सिडेटिव्ह ताण येतो.

व्हिटॅमिन डी मध्ये कमतरता

तुम्ही जर बर्गरचं अधिक सेवन केलं तर, व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शिअमची कमतरता शरीरातील हाडं कमकुवत करते. एवढचं नाही तर अनेकदा हाडं ठिसूळ होतात. बर्गरमध्ये असलेले फॅट्स, मीठ किंवा साखर यांमुळे पोट भरतं खरं, पण शरीराला आवश्यक असणारे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम किंवा मिनरल्स अजिबात मिळू शकत नाहीत.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

दररोज व्यायाम केल्याने वजन कमी करण्यास मदत होते, असा आपल्या सर्वांचाच समज असतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? व्यायामही वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो. होय... तुम्ही बरोबर ऐकलंत. तुम्ही करत असलेला व्यायामही वजन वाढण्याचं कारण ठरतो.

व्यायाम वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो, हे खरं आहे. पण गरजेपेक्षा जास्त व्यायाम फक्त वजनच वाढवत नाही तर अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्यासाठीही कारण ठरतं. जर तुम्ही दररोज अनेक तास जिममध्ये व्यायाम करत असाल तर याचे साइड इफेक्ट्सबाबत नक्की विचार करा. कारम जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल तर शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो.

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, व्यायामाबाबत अनेक संशोधनांमधून आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यांमधून हेच सिद्ध होतं की, एका व्यक्तीला एका आठवड्यामध्ये 2 ते 5 तासांचा सधा आणि सोपा व्यायाम आणि दीड ते अडिच तासांचा सामान्य व्यायाम करणं गरजेचं आहे.

जेव्हा तुम्ही आठवड्यामध्ये 2 ते 5 तास व्यायाम करता, त्यावेळी तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म व्यवस्थित काम करतं. तसेच यामुळे तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच बॉडिदेखील व्यवस्थित तयार करू शकाल.

शरीरासाठी किती व्यायाम गरजेचा?

एका व्यक्तीला दररोज किती व्यायाम करणं आवश्यक असतं, हे तिच्या शरीरयष्टीसोबतच तिच्या उंचीवरही अवलंबून असतं. परंतु, यासाठी शरीराची स्थिती आणि वय या गोष्टीही लक्षात घेणं आवश्यक ठरतं.

एका व्यक्तीने एका दिवसामध्ये 3 तासांपेक्षा जास्त व्यायाम किंवा जिम करू नये. कारण एका संशोधनानुसार, जर व्यक्ती 5 तासांपेक्षा जास्त वर्कआउट दररोज करत असेल तर त्याला ब्लड प्रेशर आणि मसल्ससोबत हाडांच्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.

जास्त व्यायाम केल्याने होणारे नुकसान

जास्त व्यायाम केल्याने वेगवेगळे साइड इफेक्ट्स लोकांमध्ये दिसून येतात. काही साइड इफेक्ट्स असे असतात. जे सर्वांमध्ये एकसमान असतात.

- हार्ट रेट वाढणं
- भूक फार कमी लागणं किंवा खूप लागणं
- पायांमध्ये वेदना होणं आणि शरीराला थकवा जाणवणं
- शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणं
- शरीराच्या मेटाबॉलिज्म रेटवर परिणाम होणं
- आपण सर्वच जाणतो की, दररोज व्यायाम केल्याने मेटाबॉलिक रेटवर परिणाम होतो. परंतु जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त व्यायाम करता, त्यावेळी मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो.

जेव्हा मेटाबॉलिक रेट जास्त वाढतो, त्यावेळी भूक फार वाढते. जास्त भूक लागल्यामुळे पाचनतंत्र फार वेगाने काम करतं. अशावेळी तुम्ही जेकाही खाल, त्याचं वेगाने पचन होतं.

जास्त एक्सरसाइज केल्याने का वाढतं वजन?

जास्त एक्सरसाइज केल्याने वाढणाऱ्या वजनाचं अगदी सोपं कारण म्हणजे, मेटाबॉलिक रेटवर होणारा परिणाम. यामुळे आपल्याला भूक जास्त लागते आणि वजनही वेगाने वाढतं. यावर व्यक्तीचा कंट्रोलही राहत नाही.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. कारण प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

तुम्ही कॉफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ही बाब समोर आली आहे की, दररोज एक कप कॉफी प्यायल्याने शरीरातील फॅटसोबत लढणारी सुरक्षा उत्तेजित होते, ज्याने लठ्ठपणासोबतच डायबिटीसशी लढण्यास मदत मिळते. साइन्टिफिक रिपोर्ट्स नावाच्या जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे.

नेमका कसा होतो फायदा?

आपल्या शरीराचा एक भाग म्हणजे ब्राउन फॅट फंक्शन जो वेगाने कॅलरी बर्न करून एनर्जीमध्ये बदलण्यास आपली मदत करतो. आणि कॉफीमध्ये असे काही तत्त्व आढळतात, ज्यांचा या ब्राउन फॅट फंक्शनवर थेट प्रभाव पडतो. व्यक्तीच्या शरीरात २ प्रकारचे फॅट असतात. ज्यातील एका ब्राउन एडिपोज टिशू(BAT), ज्याला ब्राउन फॅटही म्हटलं जातं. याचं मुख्य काम शरीरात गरमी निर्माण करणं हे असतं, जेणेकरून शरीरातील कॅलरी बर्न केल्या जाव्यात. ज्या लोकांच्या शरीराचा बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स कमी असतो, त्यांच्या ब्राउन फॅटचं प्रमाण अधिक असतं.

ब्लड शुगर लेव्हलची लेव्हल चांगली करतं ब्राउन फॅट

युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगमचे प्राध्यापक आणि या रिसर्चचे मुख्य मायकल सायमंड्स म्हणाले की, 'ब्राउन फॅट शरीरात वेगळ्याप्रकारे काम करतं आणि गरमी निर्माण करून शुगर व फॅट बर्न करण्यास मदत करतं. जेव्हा या ब्राउन फॅटची अ‍ॅक्टिव्हिटी वाढवली जाते, तेव्हा याने शरीरातील ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते. सोबतच एक्स्ट्रा कॅलरी बर्न होतात, ज्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.


अशात एक कप कॉफीचा ब्राउन फॅट फंक्शन्सवर थेट प्रभाव पडतो. तसा लठ्ठपणा या दिवसात जगभरात एखाद्या माहामारीसारखा पसरत आहे आणि डायबिटीसची समस्याही वाढत आहे. त्यामुळे ब्राउन फॅटच्या माध्यमातून या दोन्ही समस्या दूर केल्या जाण्याची शक्यता आहे.


ब्राउन फॅटला उत्तेजित करण्यास मिळते मदत


सायमंड्स सांगतात की, कॉफीमध्ये असलेलं कॅफीन एक असं तत्व आहे, जे ब्राउन फॅटला उत्तेजित आणि अ‍ॅक्टिवेट करण्यास मदत करतं. अशात या कॉम्पोनेंटचा वापर वेट लॉस मॅनेजमेंटसोबतच ग्लूकोज रेग्यूलेशन प्रोग्रामसाठीही केला जाऊ शकतो. जेणेकरून लठ्ठपणा कमी करण्यासोबतच डायबिटीसही कंट्रोल केला जावा.

आपल्या आहारावर आरोग्य अवलंबून असते. दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, नाश्त्यापेक्षा कमी परंतू आवश्यक इतके दुपारचे जेवण आणि त्याहून कमी रात्रीचे जेवण असा आहार असावा हे डाएटचं गणित सांगितले जाते. मात्र आजकल धावपळीच्या झालेल्या आयुष्यात हे चक्र अगदी उलटं झालं आहे. अनेकांना सकाळी नाश्ता करायला वेळच नसतो, दुपारचं जेवण अत्यल्प आणि त्यानंतर रात्री आल्यानंतर पूर्ण जेवलं जातं. मात्र आपल्या लाईफस्टाईलचा आरोग्यावर गंभीर होतो हे आपण विसरतो.

जेवण्याच्या चूकीच्या सवयी आणि वेळा यामुळे वजन वाढतं. मग तुम्हीही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर रात्रीच्या जेवणाच्या या चूका टाळा.

रात्रीच्या जेवणात 'या' चूका नकोच !

1) रात्री झोपण्यापूर्वी भरपूर जेवणं

रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यामध्ये किमान 2 तासांचे अंतर असणं आवश्यक आहे. अन्न नीट पचलेले नसले तर यामधून अपचन, पित्त, गॅस, ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री 10 वाजता झोपणार असाल तर किमान संध्याकाळी 7.30 - 8
वाजेपर्यंत जेवण आवश्यक आहे.

2) अति खाणं

रात्रीच्या जेवणात फ्राईड राईस, बिरयाणी, छोले पराठे असे पचायला जड पदार्थांवर ताव मारणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. आहरात सार्‍या पोषकघटकांचा तोल सांभाळणं गरजेचे आहे. त्यामुळे रात्री फार जड पदार्थ खाणं टाळा. रिफाईन्ड फूड्सचा पर्याय टाळा.

3) वेळेत रात्रीचं जेवण तयार न होणं

तुमचा रात्रीचा मेन्यू आधीच प्लॅन करणं आवश्यक आहे. अनेकजण रात्री जेवन बनवण्याचा कंटाळा करतात मग हॉटेलमधून ऑर्डर केलेले पदार्थ खाल्ल्यने वजन वाढते. आठवडाभर पुरेल इतक्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे आठवडाभर काय काय बनवू शकता ? याचं प्लॅनिंग करू शकता.

4) अल्कोहल आणि कॅफिनयुक्त पदार्थ टाळा

अल्कोहल, कॅफिनयुक्त पदार्थांमुळे झोपेचं चक्र बिघडू शकते. साखर आणि कॅफिनयुक्त पदार्थांमुळे झोप कमी होते. परिणामी मधुमेह, लठ्ठपणा वाढतो.

गर्भधारणेदरम्यान मातेच्या शरीरात मास इंडेक्स (बीएमआय) आणि गर्भधारणादरम्यान वजन वाढण्याची शक्यता वाढते. गर्भधारणेदरम्यान अंतराळांमध्ये असामान्यता, नवीन अभ्यासातून दिसून येते. एक नवीन अभ्यास आढळला आहे. मातृ आणि बाल आरोग्य जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. जर हे घटक सुधारले गेले तर ते अकाली जन्माच्या जोखीम कमी करू शकते.

"कमीतकमी जन्मास आलेल्या महिलांना कमी वजनाच्या महिलांमध्ये, गर्भधारणेदरम्यान कमी वजन वाढले किंवा गर्भधारणेदरम्यान अल्प कालावधीत राहिल्या." लठ्ठ महिलेत जास्त वजन वाढल्याने देखील जोखीम वाढली, "असे एमिली डीफ्रान्को, विद्यापीठातील असोसिएट प्रोफेसर म्हणाले. सिनसिनाटी

डेफ्रान्को आणि तिच्या सहकाऱ्यांनी सुमारे 4,00,000 लोकांच्या जन्माच्या नोंदींमधून अभ्यास केला. अभ्यासात जन्मासाठी संभाव्यतः सुधारित जोखीम घटक 9 0 टक्के महिलांपेक्षा जास्त आहेत.

अर्ध्याहून अधिक स्त्रिया सामान्य वजनाने गर्भधारणेस प्रारंभ करतात आणि फक्त 32 टक्के गर्भधारणा वजन वाढवून घेतात.

"गर्भधारणेदरम्यान शैक्षणिक हस्तक्षेपांकडे लक्ष द्या, गर्भधारणेदरम्यान इष्टतम गर्भधारणेचे वजन प्राप्त करणे आणि गर्भधारणेदरम्यान पुरेसे पोषण आणि वजन वाढविणे सुनिश्चित करणे. या सुधारित जोखीम घटकांमध्ये सुधारणा केल्याने अकाली जन्म आणि शिशु मृत्युदरवर जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो. , "डेफ्रान्सो जोडले.

Dr. Dr Amrut Oswal
Dr. Dr Amrut Oswal
Specialist, Orthopaedics Joint Replacement Surgeon, 29 yrs, Pune
Dr. Sairandhri Shinde
Dr. Sairandhri Shinde
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Sivasubramanian Pachamuthu
Dr. Sivasubramanian Pachamuthu
MD - Allopathy, Dermatologist, 6 yrs, Dharmapuri
Dr. Nandita Bhati
Dr. Nandita Bhati
BDS, Dentist Implantologist, 14 yrs, Pune
Dr. Jyoti Sharma
Dr. Jyoti Sharma
BHMS, Homeopath, 5 yrs, Pune
Hellodox
x