Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

अनेकदा लहान मुलं अचानक रडायला लागतात. नेमकं काय होतंय हे घरात कोणालाच समजत नाही. बाळ अगदीच लहान असल्याने त्यांना होणारा त्रास बोलून व्यक्तदेखील होत नाही. अशावेळेस रडारड करून मुलं अधिक हैराण होतात. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते.

हिंग ठरते फायदेशीर ?

स्वयंपाकघरात वापरले जाणारे हिंग हा त्रास कमी करायला मदत करते. फेरुला या वनस्पतीपासून हिंग बनवले जाते. हिंग़ातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा व स्वच्छ होतो. पोटाचे विकार तसेच श्वसनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. लहान मुलांना थेट हिंग देणे त्रासदायक ठरू शकते. म्हणून त्यांच्या पोटावर हिंगाच्या पाण्याने मसाज करणे फायदेशीर ठरते.

कसा कराल हा उपाय ?

अर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा.
पोटाजवळ हलक्या हाताने या पेस्टने मसाज करा.
मात्र ही पेस्ट बेंबीत जाणारा नाही याची काळजी घ्या. बेंबीजवळील पेस्ट कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसा.
पाण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलातही हिंग मिसळून पेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.

पेस्ट लावल्यानंतर थोडावेळ ती थंड होऊ द्यावी तसेच सुकू द्या.

पोटदुखी कमी करण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम पाळा.

पेस्ट सुकल्यानंतर मुलांना ढेकर येऊ देण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे गॅस बाहेर पडेल तसेच पोटदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल.

त्यानंतर ओल्या कापडाने बाळाचे पोट स्वच्छ पुसावे.

लहान मुलांप्रमाणेच प्रौढांमध्येही हा उपाय फायदेशीर ठरतो.

लहान बाळं जेवत नाही, हट्ट करतं म्हणून त्याच्यासमोर मोबाईल ठेवला जातो. जवळजवळ सर्वच घरांमध्ये ही परिस्थीती पाहायला मिळते. पण आपल्या लहानग्यांना मोबाईल हाताळण्यास देणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी ऐकून तरी तुम्ही आपल्या चिमुरड्यांजवळ मोबाईल देताना दहा वेळा विचार कराल.

डोळे 'आळशी'

महाराष्ट्रातील जवळपास सव्वा लाख लहान मुलांचे डोळे 'आळशी' बनलेत... या मुलांना ‘अम्ब्लोपिया’ नावाचा डोळ्यांचा आजार झालाय... मोबाईल, टीव्ही आणि टॅबच्या प्रकाशामुळं लहान मुलांमध्ये हा दृष्टीदोष वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

आपल्या मुलांचे वजन इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे, असे अनेका पालाकांना वाटते. याचे कारण जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. ते म्हणजे, मुलांचे खाणेपिणे योग्य नसल्याने वयाच्या मानाने त्यांचे वजन कमी होते. यामुळे त्यांच्या वजनासाठी महत्त्वाचे म्हणजे आहार होय. परंतु, मुले खाण्याच्या बाबतीत फार कंटाळा करतात. अशा वेळी त्यांना पुढील पदार्थ दिल्यास त्यांचे वजन संतुलित राहू शकते…

मुलांचे वजन कमी असेल तर त्यांना सायीचे दूध द्या. त्यांना दूध पिणे आवडत नसेल तर शेक बनवून द्या.

वजन वाढवण्यासाठी तूप व लोणी फायद्याचे आहे. तूप किंवा लोणी वरणात मिसळून देता येईल.

सूप, सॅंडव्हिच, खीर व शिरा – या चारही गोष्टी योग्य प्रमाणात दिल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहेत. मुलेही हे पदार्थ आवडीने खातात.

बटाट्यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. बटाटा उकळून खायला द्या.
मोड आलेल्या कडधान्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. मुलांच्या वाढीसाठी हे लाभदायक आहे. मूल फार लहान असेल तर त्याला वरणाचे पाणी द्या.

मुलाला स्वस्त बनवण्यासाठी त्याचा व्यवहार व दिनचर्येकडे लक्ष द्या. लहान मुलांना याची नितांत आवश्‍यकता असते. लहान बाळांना योग्य वेळी खुराक द्या व त्यांच्याकडे लक्ष द्या.

मूल पहिल्यांदा खोटं बोलतं तेव्हा वाईट वाटतं. आपले संस्कार निष्प्रभ झाल्याची भावना दाटून येते. या निराशेपोटी मुलाला कठोर शिक्ष केली जाते.

त्यांच्याशी अबोला धरला जातो पण हाच क्षण असतो जेव्हा आपण आपल्या वगणुकीचं परीक्षण करायला हवं. चार-पाच वर्षाच्या मुलांना हेतूपुरस्सर खोटं बोलण्याचं ज्ञान नक्कीच नसतं. पालकांडून कौतूक मिळवण्यासाठी, त्यांच्या रागाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी, वेळ मारुन नेण्यासाठी अनाहूतपणे त्यांच्याकडून खोटं बोललं जातं.

कधी तरी त्यांनी आई बाबांना सिग्नल तोडताना, फोनवर खोटं कारण सांगताना, गॉसिप करताना पाहिलेलं असतं. ते केवळ अनुकरण करत असतात. म्हणूनच मूल खोटं बोलताना आढळलं तर न रागवता त्यांना विश्वासात घ्या. खोटं बोलण्यामागचं नेमकं कारण जाणून घ्या. शिक्षेने नव्हे तर संवादाने हा प्रश्न सुटू शकेल.

हायपर अॅक्टिव्ह, म्हणजेच अत्यधिक प्रमाणामध्ये सक्रिय असणारी मुले घरामध्ये असणे, ही घरातील सर्वच मोठ्या माणसांच्या धावपळीचा आणि सहनशक्तीचा कस लागेल अशी बाब आहे. ही मुले अतिशय चंचल म्हणता येतील.

ह्याचे न एका गोष्टीवर फार काळ स्थिर राहू शकत नाही. तसेच ही मुले एका ठिकाणी फार वेळ बसू शकत नाहीत. त्यांना सतत काहीतरी नवीन लागते.

अशी मुले नेही काहीतरी उचापती करून घरच्या मंडळींच्या नाकीनऊ आणत असतात. या मुलांना एकटे, देखरेखीच्या विना सोडूनही चालत नाही. कुठल्या क्षणी ह्यांच्या मनामध्ये कोणती कल्पना येईल याचा नेमका अंदाज घेणे कठीण असते.

अशा अति सक्रिय मुलांचे लक्ष एका गोष्टीवर केंद्रित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शरीरातील ऊर्जेला व्यवस्थित चालना देण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. अशा मुलांना खेळांमध्ये किंवा कामांमध्ये गुंतवावे, ज्यामध्ये त्यांची शारीरिक ऊर्जा खर्च होईल.

तसेच ह्या मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना बोर्ड गेम्स, कोडी सोडविणे अशा प्रकारचे बौद्धिक व्यायाम आवश्यक आहेत. अति सक्रिय मुलांचे मन शांत करण्यासाठी धुर, संथ संगीतचा उपयोग करण्याचा सल्ला मनोवैज्ञानिक देतात.

तसेच टीव्ही, प्ले स्टेशन, व्हिडिओ गेम्स, मोबाइल ह्यांचा वापर मर्यादित ठेवायला हवा. ह्या साधनांच्या अतिवापराने मुलांचे मन आणखी सक्रिय होत असते. तसेच ह्या साधनांधील मोठे, कर्कश आवाज, भडक रंग यांचाही मुलांच्या मनावर परिणाम होत असल्याचे मनोवैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Dr. Vrushali Sarode
Dr. Vrushali Sarode
BHMS, Homeopath Psychotherapist, 5 yrs, Pune
Dr. Kedarnath  Kalyanpur
Dr. Kedarnath Kalyanpur
MDS, Dental Surgeon Dentist, 8 yrs, Pune
Dr. Sheetal Jadhav
Dr. Sheetal Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, Pune
Dr. Vishnu Gawande
Dr. Vishnu Gawande
BHMS, Family Physician, 9 yrs, Pune
Dr. Devyani S. Ahire
Dr. Devyani S. Ahire
BDS, Dentist, 4 yrs, Pune
Hellodox
x