Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

Here are 5 natural ways to ease arthritis pain, according to the Arthritis Foundation:

- Massage :- Massages have been shown to reduce joint pain and #JointStiffness as well as a range of motions. But the Arthritis Foundation warns to listen to your body and perhaps avoid getting a massage when joints are especially tender and sensitive.

- * Eat plenty of fish: Certain types of fish -- salmon, tuna, mackerel and herring, are full of inflammation-fighting #Omega-3 fatty acids, and for that reason, experts recommend you eat at least 3-4 ounces of fish twice a week.

- Weight loss: Losing 1 pound removes 4 pounds of pressure on swollen, painful joints. You can maintain a healthy weight by combining a #BalancedDiet with regular physical activity.

- Tai Chi : A Chinese practice of gentle flowing movements, deep breathing and #meditation, and has been shown to not only reduce joint pain, but also improve range of motion and function.

- Acupuncture: A form of Chinese medicine which involves inserting thin needles at specific points on the body is designed to stimulate nerves, muscles and connective tissue. Many experts recommend acupuncture to heal arthritis pain.



 सांधेदुखी आणि संधीवात समस्या :

सांधेदुखी ही जगभरातल्या लोकांना भेडसावणारी समस्या असल्याने याकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं जातं. एकूण लोकसंख्येच्या १५ टक्क्यांहून अधिक लोक या समस्येमुळे त्रस्त आहेत.

सांधेदुखी ही जगभरातल्या लोकांना भेडसावणारी समस्या असल्याने याकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं जातं. एकूण लोकसंख्येच्या १५ टक्क्यांहून अधिक लोक या समस्येमुळे त्रस्त आहेत. जगभरातल्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे या समस्येवर काही अंशी चांगलं यशही मिळालं आहे. इंग्रजीत आर्थ्रायटीस, अर्थातच संधीवात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजाराचे शंभरहून अधिक प्रकार आढळतात. ज्यात सांधेदुखी आणि सांध्यांमधील वेदना ही लक्षणं असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री-पुरुषांमध्ये हा आजार आढळतो. प्रामुख्याने स्त्रियांमध्ये याचं प्रमाण अधिक असून, जसं वय वाढतं तसं आजाराचं प्रमाणही वाढलेलं दिसून येतं. भारतामध्येच १८० दशलक्षाहून अधिक रुग्ण आढळतात. अगदी एड्स, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर यासारख्या व्याधींपेक्षाही ही समस्या अधिक आहे.

संधीवाताची लक्षणं
मुख्यतः सांध्यांना सूज येणं, सांध्यांमध्ये वेदना असणं, सांध्यांमध्ये कडकपणा येणं, सांध्यांची हालचाल मंदावणं अथवा त्यात अडथळा येणं, सांध्यांमध्ये विकृती होणं, सांधे वाकडे होणं ही लक्षणं कमी-अधिक प्रमाणात आढळतात. काहीवेळा ही लक्षणं तात्पुरत्या स्वरूपात तर काही लक्षणं ही कायमस्वरूपाची असतात. या लक्षणांमुळे दैनंदिन हालचालींमध्ये तसेच चालणं, उठणं, बसणं, चढ-उतार, वस्तू उचलणं आणि ठेवणं यावरही परिणाम होतो. काही संधीवाताचा परिणाम हा हृदय, किडनी, डोळे आणि फुप्फुसांवरही झाल्याचं दिसून येतं.

संधीवाताचे प्रकार

ढोबळमानानं सामान्यतः सगळ्या प्रकारच्या संधीवाताचं वर्गीकरण खालील पद्धतीनं करतात.

वयोमानाच्या झीजेमुळे होणारा संधीवात: याला डिजनरेटीव्ह आर्थ्रायटिस किंवा ऑस्टिओअर्थ्रायटिस असंही म्हटलं जातं. दोन हाडांच्यामध्ये असणारी कूर्चा झीज पावल्यामुळे हाडांमधलं घर्षण वाढतं. वेदना, सांध्यांमध्ये जडपणा, सांध्याना बाक येणं अशा स्वरूपाची लक्षणं गुडघ्याच्या सांध्यामध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढतं वजन, कौटुंबिक इतिहास यासारख्या कारणांमुळे हा आजार बळावतो. सांध्यातल्या झीजेच्या टप्प्यांनुसार औषधं, व्यायाम, वंगणयुक्त द्रवाचं इंजेक्शन, दुर्बिणीद्वारे उपचार, सांधेरोपण शस्त्रक्रिया यासारख्या उपचारांमुळे या प्रकारच्या संधीवातात पूर्णतः यश मिळतं. रोबोटीकच्या साहाय्यानं गुडघ्याचं सांधेरोपण शस्त्रक्रिया ही अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असल्याने शस्त्रक्रियेतल्या अचूकतेमुळे सांधेरोपण हा सर्वोत्तम खात्रीदायक उपाय आहे.

संधीगत वात किंवा आमवात : अर्वाचीन शास्त्रात सांध्यामध्ये आढळणारी सूज, त्यामुळे सांध्यामध्ये होणारे रचनात्मक आणि क्रियात्मक परिणाम या स्वरूपाच्या प्रकारात आढळतात. इन्फ्लमेटरी आर्थ्रायटीस, ऱ्ह्युमॅटॉईड आर्थ्रायटीस, अँकलॉयझिंग स्पाँडिलायसिस यासारखे आजार यात आढळतात. धूम्रपान, अनुवांशिकता ही कारणं त्यामागे असतात. आमवात अर्थात ऱ्ह्युमॅटॉईड अर्थ्रायटीस हा आजार स्वयंप्रतिकार क्षमतेच्या दुर्बलतेमुळे घडून येऊन सांध्यांना बाधा येते. सांध्याच्या ठिकाणी उष्णता, तीव्र वेदना आणि सूज यात आढळून येते. औषधं, नियमित स्वरूपाचा व्यायाम आणि सांध्यांमध्ये विकृती आल्यास शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतात.

या शिवाय वेगवेगळ्या जंतूसंसर्गामुळे त्याच्या प्रादुर्भावामुळे उद्भवणारा संधीवात इन्फेशियस आर्थ्रायटीस, युरिक असिड यासारख्या प्रथिनाच्या वृद्धीमुळे आत्यंतिक स्वरूपाच्या वेदना असलेला वातरक्त (गाऊट) यासारखे संधीवाताचे प्रकार विषान्न आहार सेवनानं होणारे मेटॅबोलिक आर्थ्रायटिस असेही प्रकार आढळतात. अपघातामध्ये होणाऱ्या इजांमुळे सांध्यावर परिणाम होऊन येणारा ट्रॉमॅटिक अर्थ्रायटिस हा प्रकारही आढळून येतो. फुटबॉल, हॉकी यासारख्या खेळामध्ये होणाऱ्या अतिधक्कादायक हालचाली (हाय इम्पॅक्ट, जर्की मूव्हमेंट) यामुळे तसंच अतिव्यायाम, उंच उडी, रनिंग, जॉगिंग यामुळेही सांध्यामध्ये वेदना आणि दुखणं आढळतं.

संधीवाताचं निदान आणि तपासणी

तज्ज्ञ डॉक्टर शारीरिक तपासणीद्वारे सांध्याची स्थिती, हालचाल, क्षमता, स्थिरता, स्थानिक तापमान, सूज, रचनात्मक बिघाड या अनुषंगानं निदान करतात. याबरोबरच रक्त तपासणीमध्ये अर्थ्रायटिस प्रोफाईल अर्थात ह्युमॅटाईड फॅक्टर (आरएफ) सीआरपी, युरिक असिड, एसीपीपी, एएनए यासारख्या तपासण्या केल्या जातात. एक्स-रे, बोनमॅरो डेन्सिटी, डेक्सा स्कॅन याद्वारे निदान करण्यास आणि उपचारास मदत होते.

संधीवाताचे उपचार
वेदनाशामक आणि सूज कमी करणारी औषधं, सांध्यांना बळकटी देणारी औषधं, सांध्याच्या वेदना आणि सूज यांची तीव्रता कमी करण्यासाठी मदत करतात. काही शास्त्रोक्त व्यायाम, भौतिकोपचार, व्यवसायजन्य जीवनशैलीतले बदल यामुळेही काही प्रमाणात फायदा होतो. वजन नियंत्रित ठेवणं, पथ्यकारक आहार, जीवनशैलीतले योग्य बदल रुग्णाच्या हिताचे असतात. प्रामुख्याने गुडघा, खुबा, खांदा, कोपरा, मनगट या स्नायूंमध्ये मात्र दुर्बिणीद्वारे तसेच सांधेरोपणाच्या शस्त्रक्रियेद्वारे खात्रीशीर उपाय करता येतात. स्टेमसेल अथवा काही जैविक पद्धतीचे उपचार यावर आजही मोठं संशोधन सुरू आहे.

Dr. Jyoti Shinde
Dr. Jyoti Shinde
BHMS, Diabetologist Homeopath, 9 yrs, Pune
Dr. Sanjay  Salve
Dr. Sanjay Salve
MBBS, Orthopaedics, 16 yrs, Pune
Dr. Snehal Toke
Dr. Snehal Toke
BDS, 2 yrs, Pune
Dr. Ankita  Bora
Dr. Ankita Bora
MBBS, Adolescent Pediatrics Allergist, 2 yrs, Pune
Dr. Atul Patil
Dr. Atul Patil
MS/MD - Ayurveda, Proctologist Ayurveda, 9 yrs, Pune
Hellodox
x