Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत असतात. पण योग्य पद्धती फॉलो न केल्यास वजन कमी करणे कठीण आहे. वजन कमी करण्यात डाएटसोबतच तुम्ही खात असलेलं अन्न कशाप्रकारे शिजवता हेही महत्वाचं आहे. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी अन्न शिजवण्याची योग्य पद्धत.....

स्टीमिंग म्हणजेच वाफेवर शिजवा

पदार्थ वाफेवर शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे सुरक्षित राहतात. भाज्या, तांदूळ आणि डाळ या गोष्टी कमी पाण्यात वाफेवर शिजवा. भाज्या प्रेशर कुकरच्या वाफेवर शिजवणे कधीही चांगले. यात तेल टाकण्याचीही गरज नसते. भाजी अशाप्रकारे शिजवल्यास भाज्यांचा रंग आणि पोषक तत्वे कायम राहतात. याने तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल.

शिजवणे का गरजेचे आहे ?

जनरली आपण अन्न कितीही काळजीपूर्वक शिजवलं तरीही त्यातील 10 ते 15 टक्के पोषक तत्वे नष्ट होतात. पण वेगवेगळे पदार्थ शिजवून खाण्याचे अनेक फायदेही आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते. तर काही खाद्य पदार्थ हे शिजवल्याशिवाय आपण खाऊच शकत नाही.

जेवण बनवण्याची योग्य पद्धत

आपण काय खातो याहीपेक्षा आपण ते कसं तयार करतो आणि कसं शिजवतो हे महत्वाचं आहे. खाद्य पदार्थ दोन प्रकारे खाल्ले जातात. एक म्हणजे कच्चे आणि दुसरा म्हणजे शिजवून. अनेक भाज्या आणि फळे कच्चे खाणेच फायद्याचे असते. पण प्रत्येक गोष्ट कच्ची खाऊ शकत नाही. जेवण स्वादिष्ट करण्यासाठी आपण त्यात वेगवेगळे मसाले टाकून त्या भाजीतील पोषक तत्वे नष्ट करतो.

पोषक तत्वे सुरक्षित राहतात

वाफेवर शिजवण्यात आलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिकता अधिक प्रमाणात असते. पण ते शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण वाफेवर भाज्या-पदार्थ शिजवल्यास त्यातील पोषक तत्वे कायम राहतात. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

ब-याचदा तुम्ही वजन कमी करण्याचा संकल्प करता मात्र हा संकल्प पुर्ण करणे तुम्हाला काही केल्या जमत नाही.जर तुम्हाला खरंच मनापासून तुमचे वजन कमी व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी Vegan डाएट नक्की ट्राय करा.Vegan फूड खाण्यास चविष्ट असतातच पण त्याचसोबत त्यामुळे तुमचे वजन देखील कमी होऊ शकते.या डाएटसह योग्य पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे तुमचे काही किलो वजन नक्कीच कमी होईल.न्यूट्रीशनिस्ट व PETA India च्या कॅम्पेन कॉर्डिनेटर यांच्याकडून जाणून घेऊयात Vegan फूड ची तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कशी मदत होऊ शकते.तसेच वाचा वजन कमी करायचं ? मग करा या योगसाधना

जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी Vegan Diet करणे का योग्य आहे.

वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात.

अनेक लोकांच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मांस,अंडी व दूग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो.अशा पदार्थांमध्ये Saturated fat,कॅलरीज व कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणावर असते.प्राण्यांच्या शरीरामध्ये कॅलरीज साठवण्याची व्यवस्था असते ज्यामुळे मांसाहारी पदार्थांच्या सेवनामुळे तुमचे वजन वाढू शकते.एकूण फॅटपैकी मांसामध्ये कमीतकमी २० ते ४० टक्के कॅलरीज असतात.तसेच फळे,भाज्या,शेंगभाज्या व कडधान्यांच्या तुलनेमध्ये लो-फॅट डेअरी प्रॉडक्ट्स मध्ये देखील फॅट व कोलेस्टेरॉल असते.

आरोग्य समस्या कमी होतात.

शाकाहारी(जे मांसाहार व दूग्धजन्य पदार्थांचे सेवन करीत नाहीत) लोकांपेक्षा मांसाहार करणा-या लोकांमध्ये लठ्ठपणा व लठ्ठपणातील विकार जसे की मधूमेह,उच्च रक्तदाब,स्ट्रोक,हार्ट अॅटक,काही प्रकारचे कॅन्सरचा धोका जास्त प्रमाणात असतो.काही Vegan आहार घेणा-या लोकांचे अतिवजन असू शकते पण संशोधनानूसार मांसाहार करणा-यापैक्षा हे लोक १८ टक्कांनी बारीक असतात.

vegan फूडमुळे मेटाबॉलिझम सुधारतो.

सर्वसाधारणपणे Vegan आहारामध्ये नैसर्गिकरित्या फॅट व कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रित राखणे सोपे जाते.वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर व कॉम्लेक्स कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे या आहाराच्या सेवनाने मोठ्या प्रमाणावर कॅलरीज बर्न होतात व मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.American Academy of Dietetics and Nutrition च्या अहवालानूसार Vegan आहार घेणा-या लोकांचे वजन तर कमी असतेच शिवाय अशा लोकांना कॅन्सर,मधूमेह,ह्रदयविकार व उच्च रक्तदाबाची समस्या देखील कमी होते.यासाठी जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी रोज आहारात फायबर्स किती प्रमाणात असावे ?

Vegan वेट लॉस डाएट प्लॅनसाठी प्रमुख मुद्दे-

न्यूट्रीशनिस्टच्या मते लो-फॅट वनस्पतीजन्य आहारामध्ये व्हिटॅमिन्स व मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असून त्यामध्ये cancer-fighting phytochemicals देखील असतात.यासाठी जाणून घ्या या पदार्थांना तुमच्या आहारात कसे समाविष्ट कराल.

1. चिकन ऐवजी mock meat,मीट बर्गर ऐवजी व्हेजी बर्गर व पनीर व अंड्याऐवजी टोफूचा आहारात समावेश करा.
2. तुमच्या आवडत्या भाज्यांमध्ये कमीतकमी क्रीम,लोणी व तूपाचा वापर करा.
3. नास्त्यासाठी अंडे न खाता ओट्स मध्ये बदाम व सोया दूध व ताजी फळे घालून खा.
4. डिनर तयार करण्यासाठी बीन्स व पालक घालून व्हेजीटेबल पास्ता अथवा चायनीज नूडल्स अथवा थाय व्हेजीटेबल करी बनवा.यासाठी वाचा पास्ताप्रेमींसाठी हेल्दी पास्ता बनवण्याच्या काही सोप्या पद्धती
तुमच्या आहारामध्ये फळे,भाज्या,तृणधान्ये,डाळी व सोयाबीनचा समावेश करा.या चविष्ट पदार्थांमुळे तुम्हाला शाकाहार करणे सोपे जाईल.

Vegan वेट लॉस डाएट प्लॅनचा नमुना-

SHARAN (Sanctuary for Health and Reconnection to Animals and Nature) and Vegan च्या संस्थापक डॉ.नंदीता शाह यांच्याकडून वजन कमी कऱण्यासाठी Vegan वेट लॉस डाएट प्लॅनचा नमुना जरुर जाणून घ्या.

चांगल्या परिणामांसाठी हे अवश्य लक्षात ठेवा.

तुमचा आहारातील सर्व गोष्टी वनस्पतीजन्य घटकांपासून तयार गेल्या आहेत याची खात्री करुन घ्या.
प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करा.
कांदा व लसूण शिवाय इतर सर्व भाज्या न सोलता खा.
शक्य असल्यास सेंदीय पदार्थांचा आहारात समावेश करा.तसेच वजन घटवताना अवेळी लागणार्‍या भूकेवर मात मिळवण्यासाठी खास डाएट टीप्स जरुर करा.

निरोगी राहण्यासाठी आम्हाला आपल्या आहारात फळ भाज्यांसोबत वेग वेगळ्या बियांना देखील सामील करायला पाहिजे. अशाच बियांमध्ये एक आहे अलसी (अंबाडी बिया), ज्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड, प्रोटीन, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स असतात. हे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. अंबाडीच्या बियांपासून तयार काढ्याचे नियमित सेवन केल्याने बरेच आजार दूर होण्याची शक्यता असते.

कसा तयार करायचा काढा
दोन चमचे अलसीच्या बियांना दोन कप पाण्यात मिक्स करा आणि निम्मे होईपर्यंत त्याला उकळी येऊ द्या. तयार काढा गाळून घ्या आणि गार झाल्यावर त्याचे सेवन करावे.

याचे अनेक फायदे आहे

ब्लड शुगर नियंत्रित करणे : डायबिटीज आणि ब्लड शुगरची समस्या असणार्‍या लोकांसाठी अलसीचा काढा वरदान आहे. नियमित रूपेण सकाळी उपाशी पोटी असलीच्या काढ्याचे सेवन केल्याने डायबिटीजचे स्तर नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

थाइरॉएडमध्ये फायदेशीर : सकाळी उपाशी पोटी अलसीचा एक कप काढा हाइपोथाइरॉएड आणि हाइपरथाइरॉएड दोन्ही स्थितित फायदेशीर ठरतो.

हार्ट ब्लॉकेजला दूर करण्यासाठी : नियमित रूपेण तीन महिन्यापर्यंत अलसीचा काढा पिण्याने आर्टरीजमधील ब्लॉकेज दूर होतात आणि तुम्हाला एंजियोप्लास्टी करण्याची गरज पडत नाही. अलसीत उपस्थित ओमेगा-3 शरीरातील खराब कोलेस्टरॉल एलडीएलच्या स्तराला कमी करतो आणि हृदय संबंधी आजारांना रोखण्यास मदत करतात. हानिकारक विषाक्त पदार्थांना बाहेर काढून शरीराला डीटॉक्सीफाई करतात.

सांधेदुखीत आराम: साइटिका, सांधेदुखी, गुडघे दुखीत अलसीच्या काढ्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे.

गरम पाणी पिण्याच्या भारतीय संस्कृतीचे जागतिक संशोधकांनीही कौतुक केले असून, नियमित गरम पाणी पिल्याने वजन घटण्याबरोबरच अनेक आजार दूर होण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

पिता येण्यासारखे गरम पाणी लिंबासह घेतल्यास प्रकृतीच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात, असेही संशोधकांनी सांगितले. नियमित व्यायाम करणाऱ्या आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर आहार घेणाऱ्यांसाठी हादेखील एक अत्यावश्यक उपाय आहे. रिकाम्या पोटी गरम पाणी पिल्याने आतडय़ातील विषयुक्त घटक दूर होण्यास मदत होते. ‘सायनस’चा आजार असलेल्यांनी रोज गरम पाणी घेतल्यास श्वसनप्रक्रियेतील संसर्ग कमी होण्यास मदत होते, असे संशोधकांनी स्पष्ट केले.

नियमित गरम पाण्यामुळे दातही बळकट आणि आरोग्यदायी होण्यास मदत होते. मात्र अतिगरम पाण्यामुळे दातांना इजा होण्याचाही धोका असल्याने याबाबत काळजी घ्यावी, असे संशोधकांनी सांगितले. अवेळी खाण्यामुळे अपचन, अ‍ॅसिडिटी, पित्त या त्रासावरही गरम पाणी हा प्रभावी उपचार असल्याचे संशोधकांनी सांगितले. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यातही गरम पाण्याचा वाटा महत्त्वाचा आहे. शरीरातील मेदयुक्त घटक दूर करण्यात साहाय्यभूत ठरत असल्याने वजन घटण्यास गरम पाण्यामुळे मदत होते, असे संशोधकांनी सांगितले.

डॉक्टर दीक्षित/जिचकार सरांच्या या साध्या सोप्या उपायाने शरीरात अतिरिक्त इन्सुलिनची निर्मिति होणे थांबते.त्यामुळे शरीरात पोटासारख्या चुकीच्या ठिकाणी जमा झालेली चरबी ऊर्जा मिळवण्यासाठी वापरली जाते.त्यामुळे पोट व वजन कमी होते. या उपायामुळे शरीर इन्सुलिनला अधिक संवेदनशील बनते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते किंवा मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो.

परिणाम:

वजन कमी होते, पोट कमी होते, मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो किंवा त्याची शक्यता कमी होते.

१) हा उपाय किंवा आहार योजना अठरा वर्षाखालील मुलांसाठी तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाही (मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टर दीक्षित सरांशी संपर्क साधावा व त्यानी परवानगी दिली तरच हा उपाय अमलात आणावा)

२) तुम्हाला खरी कड़क भूक केंव्हा लागते त्या दोन वेळा ओळखा. त्या दोन वेळानाच जेवण करा. ह्या वेळा व्यक्तिनुसार वेगवेगळ्या असू शकतात. सामान्यपणे सकाळी ९ व संध्याकाळी ६ किंवा दुपारी १ व रात्रि ९ अश्या भुकेच्या वेळा असतात. प्रत्येक जेवणासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५५ मिनिटांचा वेळ उपलब्ध आहे. या वेळात तुम्हाला जे खायचे ते तुम्ही खाऊ शकता.

३) या दोन जेवणाच्या व्यतिरिक्त जर भूक लागली तर खालील पदार्थ हवे तेवढे घेऊ शकता:

अ) पातळ ताक (हवे असल्यास चवीसाठी मीठ, जिरेपुड टाकू शकता)

ब ) २५% दूध व ७५% पाणी वापरून बनवलेला बिन साखरेचा चहा (शुगर फ्री, मध, गुळदेखील नको); ग्रीन टी/ब्ल्याक टी देखील चालेल

क) लिम्बु पाणी (विना साखरेचे)

ड) नारळ पाणी (शहाळ्यातील मलई खाऊ नका)

इ) टोमॅटो (जास्तीत जास्त १)

ई) काकड़ी तसेच ताकात किसून काकड़ी किंवा संत्र्याचा रस हे पदार्थ घेण्याची परवानगी नाही (आमच्या नविन संशोधनामुळे असा बदल करण्यात आला आहे...)

४) एकदा जेवणाच्या वेळा ठरल्या की त्या वेळानाच जेवा. पंधरा वीस मिनिटे वेळ मागे पुढे झाले तर चालते पण खूप बदल करू नका.

५) बाहेर गावी जाणे किंवा लग्न आदी समारंभ असे काही असल्यास त्या दिवशी तुम्ही या डाइट प्लॅनला सुट्टी देऊ शकता! दुसरया दिवसापासून लगेच प्रामाणिकपणे डाइट प्लान चालू करा.

६) दररोज ४५ मिनिटात ४.५ किलोमीटर चाला. हा व्यायाम आठवड्यातून पाच दिवस तरी करा.(हृदयाची गति वाढवणारा कोणताही व्यायाम करू शकता.)

७) हा उपाय सुरु करण्याच्या पहिल्या दिवशी खालील गोष्टी करा:

अ) सकाळी पोट साफ झाल्यावर वजन करा. नंतर दर महिन्याला त्याच वजन काट्यावर त्याच पद्धतीने वजन करा.

ब) बेम्बिपाशी पोटाचा घेर मोजा. दर महिन्याला पोटाचा घेर मोजा.

क) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level) तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यांनी परत करा.

ड) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन एचबीएवनसी (HbA1C) तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यानी परत करा.

८) तुमचे योग्य वजन असे काढ़ा: तुमच्या सेंटीमीटर मधिल उंचीतून १०० वजा केले म्हणजे तुमचे कमाल वजन तुम्हाला कळेल. हे तुमचे जास्तीत जास्त वजन असायला हवे. उदाहरणादाखल, एखाद्याची ऊँची १७० सेमी असेल तर त्याचे जास्तीत जास्त वजन ७० किलो असायला हवे.

९)जर या आहार योजने चे अवलंबन केल्यावर आपणास फायदा झाला तर दुसऱ्यांनाही या आहार योजनेत सहभागी होण्यास सांगा व "स्थूलत्व
आणि मधुमेह मुक्त "भारत" अभियानात सामिल व्हा.

या आहार योजनेमुळे व साध्या उपायाने खालील चार फायदे होतात:

१) वजन कमी होते

२) पोटाचा घेर कमी होतो

३) एचबीएवनसी (HbA1C) कमी होते

४) उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) कमी होते

म्हणून या उपायाने आपल्याला काय फायदा होत आहे हे कळण्यासाठी वजन आणि पोटाचा घेर दर महिन्याला मोजा तर एचबीएवनसी (HbA1C) आणि उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) दर तीन महिन्याला मोजा.

Dr. Neha Dhakad
Dr. Neha Dhakad
BHMS, Homeopath Family Physician, 14 yrs, Bengaluru (Bangalore)
Dr. Anushree Bhonde
Dr. Anushree Bhonde
BPTh, Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Tushar Suryavanshi
Dr. Tushar Suryavanshi
BAMS, Garbh Sanskar Panchakarma, 24 yrs, Nashik
Dr. Nikhil N  Asawa
Dr. Nikhil N Asawa
MDS, Implantologist Prosthodontist, 6 yrs, Pune
Hellodox
x