Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.



न्यूट्रोपीनिया :

न्यूट्रोपीनिया म्हणजे रक्‍तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होणे. संसर्गाशी लढण्याचे काम मुख्यतः याच पेशी करतात. केमोथेरेपी घेतल्यानंतर न्यूट्रोपीनिया आढळणे ही अगदी सर्वसामान्य बाब आहे; परंतु ह्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

केमोथेरेपीमुळे न्यूट्रोपीनिया का होतो?
कर्करोगाशी सामना देणारी ही औषधे शरीरातील वेगाने वाढणाऱ्या सर्वच पेशींना मारून टाकतात – त्यामुळे वाईटाबरोबर काही चांगल्या पेशीही मरतात. परिणामी रोगग्रस्त पेशींसोबत चांगल्या पांढऱ्या पेशीदेखील मरतात.

मला न्यूट्रोपीनिया झाला आहे अथवा नाही हे कसे समजेल?

आपले डॉक्‍टर किंवा नर्स आपणांस याबाबत सांगू शकतील. केमोथेरेपी घेतल्यानंतर न्यूट्रोपीनिया आढळत असल्याने त्याच्या तपासणीसाठी डॉक्‍टर आपले थोडे रक्त काढून घेतील.

मला न्यूट्रोपीनिया होण्याची जास्त शक्‍यता कधी आहे?

केमोथेरेपी घेतल्यानंतर 7 ते 12 दिवसांनी न्यूट्रोपीनिया आढळू शकतो. अर्थात आपण घेतलेल्या केमोथेरेपीच्या स्वरूपावर हा कालावधी अवलंबून असतो. आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण सर्वांत कमी कधी असू शकेल याबाबत डॉक्‍टर किंवा नर्स आपणांस सांगू शकतील. या दिवसांत आपण संसर्गांवर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे.

न्यूट्रोपीनिया टाळता येतो का?
न्यूट्रोपीनिया होण्या न होण्याबाबत आपण फारसे काही करू शकत नाही, परंतु पांढऱ्या पेशींची संख्या कमी असताना संसर्ग होणे आपण टाळू शकता.

संसर्ग कसा टाळता येईल?
- डॉक्‍टरांकडून केल्या जाणाऱ्या उपचारांबरोबरच, संसर्ग टाळण्यासाठी, आपण खालील सूचनांचे पालन करावे.
- हात वारंवार स्वच्छ धुवा.
- गर्दीमध्ये जाणे टाळळा, रोगग्रस्त व्यक्‍तीपासून दूर रहा.
- खाण्यापिण्याची भांडी, टूथब्रश इ. सारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू वेगळ्या ठेवा, इतरांच्या वापरू नका.
- दररोज अंघोळ करा, कातडी कोरडी पडू नये यासाठी सुगंध नसलेले क्रीम, लोशन इ. वापरा.
- अंडी व मांस खात असल्यास, जंतू मारण्यासाठी, ते पूर्णपणे उकडा किंवा शिजवा.
- कच्च्या भाज्या व फळे नीट धुवून खा.
- पीईटीनंतर स्वच्छता करताना व्हिनीलचे किंवा साधे हातमोजे वापरा, पीईटीनंतरच्या कचऱ्याशी (लघवी अथवा विष्ठा) आपल्या कातडीचा थेट संपर्क येऊ देऊ नका. नंतर लगेचच हात धुवा.
- बागकाम करताना हातमोजे वापरा.
- दात आणि हिरड्या घासताना नरम टूथब्रश वापरा. तसेच तोंडातील व्रण टाळण्यासाठी, डॉक्‍टर किंवा नर्सने सांगितल्यास, योग्य माउथवॉश वापरा.
- घरातील वस्तू स्वच्छ ठेवा
- हंगामी फ्ल्‌यूशी लस उपलब्ध होताच ती टोचुन घ्या.
- मला तातडीच्या सेवेसाठीच्या कक्षात दाखल व्हावे लागले तर मी काय करू?

- केमोथेरेपी घेणाऱ्या कर्करोग्यांनी वेटिंग रूममध्ये (विश्रामकक्षात) फार वेळ बसू नये. केमोथेरेपी घेताना ताप आल्यास ते संसर्गाचे लक्षण असू शकते. हे संसर्ग फार चटकन गंभीर रूप धारण करू शकतात. असे असल्यास पहिल्या भेटीतच संबंधितांना आपली केमोथेरेपी तसेच तापाबद्दल सांगा. कारण हे संसर्गाचे लक्षण असू शकते.

Dr. Manish Jawale
Dr. Manish Jawale
MD - Homeopathy, Homeopath, 17 yrs, Pune
Dr. Supriya Jagtap
Dr. Supriya Jagtap
BHMS, Family Physician Homeopath, Pune
Dr. Archana Bhilare
Dr. Archana Bhilare
BDS, Dentist Endodontist, 8 yrs, Pune
Dr. Sagar Salunke
Dr. Sagar Salunke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 2 yrs, Pune
Hellodox
x