Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं.

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीक (World Breastfeeding Week) म्हणून साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.



आई झाल्यावर त्या महिलेच्या जबाबदाऱ्याही वाढतात. त्या बाळाला सांभाळणं न्हाऊ-माखू घालणं यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आईला कराव्या लागतात. पण यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला दूध पाजणं. हा अनुभव महिलेसाठी अत्यंत सुखद असतो, पण एखाद्या कोपऱ्यात किंवा बंद दाराआडच महिलेन बाळाला दूध पाजावं असं म्हटलं जातं. या सर्वांचा विरोध करून जर महिलेनं बाळाला सर्वांच्या डोळ्यादेखत, उघड्यावर दूध पाजलं तर ती महिला चर्चेचा विषय बनते. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण तुम्हाला माहीत आहे का? स्तनपान करणं हे बाळासोबतच आईसाठीही फायदेशीर असतं. जाणून घेऊया स्तनपान करण्याचे बाळ आणि आईला होणारे फायदे...

स्तनपान केल्याने बाळाला होणारे आरोग्यदायी फायदे :

- आईचं दूध बाळासाठी अमृतासमानच असतं. सहा महिने बाळाला इतर कशाचीही गरज नसते. जेवढं जास्त वेळ बाळाला आईचं दूध मिळतं तेवढाच वेगानं बाळाचा मानसिक आणि शारीरिक विकास होतो.

- संशोधनानुसार, बाळाच्या विकासासाठी आणि पोषणासाठी ज्या तत्वांची आवश्यकता असते. ती सर्व तत्व आईच्या दूधामध्ये सामावलेली असतात.

- आईच्या दूधामध्ये मुबलक प्रमाणात अ‍ॅन्टीबॉडिज असतात. त्यामुळे बाळाचा इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो.

- स्तनपान करण्याचे भावनात्मकही फायदे असतात, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. कारण ज्यावेळी आई बाळाला दूध पाजते, त्यावेळी बाळ आईच्या सर्वात जवळ असतं. त्यामुळे ते भावनात्मक पद्धतीने एकमेकांशी जोडले गेलेले असतात.

स्तनपान केल्याने आईला होणारे आरोग्यदायी फायदे :

- स्तनपानामुळे आईला ब्रेस्ट कॅन्सर आणि अन्य अनेक आजार होण्याचा धोका कमी होतो.

- स्तनपान केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी दूर होतात. त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहते.

- स्तनपानामुळे शरीरातील ऑक्सीटोक्सिन हार्मोनचा स्त्राव वाढतो. त्यामुळे गरोदरपणानंतर गर्भाशय आणि शरीराला पुन्हा त्याच अवस्थेत आणण्यास मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

गरोदरपणाचा काळ जितका महत्त्वाचा असतो तितकीच काळजी प्रसुतीनंतरही घेणं आवश्यक आहे. प्रसुतीनंतर बाळ किमान एक दीड वर्ष आईच्या दूधावर अवलंबून असते. अशावेळेस आईच्या आहारात असलेले पदार्थ बाळावर परिणाम करते. त्यांच्यांमध्ये इंफेक्शन वाढवू शकते. म्हणूनच आईच्या आहारात कोणते पदार्थ असावेत याबाबतचा काळजी घेणं आवश्यक आहे. बाळाला स्तनपानाने दूध किती वर्ष द्यावे

आंबट फळं -
स्तनपान करणार्‍या महिलांनी या काळात आंबट फळं खाऊ नये. यामधील व्हिटॅमिन घटक लहान मुलांचं पोट बिघडवण्यास मदत करते.

लसूण -
स्तनपान देणार्‍या महिलांनी लसणाचा आहारातील समावेश टाळावा. लसणामुळे दूधाचा स्वाद बिघडतो. परिणामी मुलं दूध पिणं नाकारू शकतात. आईच्या आहारात एखाद्या उग्र वासाच्या पदार्थांचा समावेश असल्यास बाळं दूध नाकारू शकते.


मिरची मसाला
मिरची, दालचिनी, काळामिरी यांचं सेवन टाळा. या पदार्थांमुळे गॅसचा त्रास होऊ शकतो. परिणामी मुलांमध्येही पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

अल्कोहल
अल्कोहलच्या सेवनापासून दूर रहा. यामुळे रक्तात अल्कोहलचे प्रमाण वाढू शकते. याचा परिणाम लहान मुलांवरदेखील होऊ शकतो.

भाज्या
महिलांच्या आहारातून कोबी, मटार, काकडी यांचा समावेश टाळा. यामुळे पोटात गॅस, पोटदुखी, बद्धकोष्ठता असा त्रास होऊ शकतो.

कॅफिन
स्तनपानादरम्यान महिलांनी कॉफीपासून दूर रहावे. कॉफीत कॅफिन घटक अधिक प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम बाळावरही होऊ शकतो. बाळाची झोप यामुळे बिघडू शकते. कॅफिन घटक हे चहा आणि सोड्यातही असतात.

बाळाच्या जन्मानंतर अवघ्या अर्धातासामध्ये बाळाला आईचं दूध पाजणं गरजेचे आहे. आईचं दूध हे बाळासाठी अमृतासमान मानले जाते. अनेक इन्फेक्शन्सपासून बाळाचं रक्षण करण्यासाठी त्याची वाढ आणि प्रकृती सुधारण्यासाठी आईच दूध मदत करते.

करियर आणि कुटुंब जीवन सांभाळत आज स्त्रिया बाळाचा विचार करतात अशावेळेस बाळाचं प्लॅनिंग करताना होणारा उशीर, वाढतं वय यामुळे काही स्त्रियांमध्ये समस्या निर्माण होतात. तसेच दूधाची पुरेशी निर्मिती होत नसल्याने बाळाच्या विकासावरही त्याचा परिणाम होतो. स्तनपान करणार्‍या महिलांंच्या आहारात नकोच 'हे' पदार्थ

स्त्रियांच्या आणि नवजात बाळाच्या या समस्येवर एक उपाय म्हणजे ' ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंक'

ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंक

ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंकेमध्ये स्त्रिया दूध दान करू शकतात. यासाठी त्यांची शारीरीक चाचणी करूनच त्यांचं दूध मिल्क बॅंकेमध्ये साठवले जाते. स्त्रियांकडून जमवलेलं हे दूध -20 डिग्री मध्ये साठवले जाते. हे दूध सहा महिन्यांपर्यंत वापरले जाऊ शकतात. त्यामुळे ज्या नवमातांमध्ये दूध निर्मितीमध्ये समस्या असते त्यांच्या बाळांसाठी ह्युमन मिल्क बॅंक मदत करते.

स्तनपान हे आईसोबतच बाळाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. बाळाला सुरूवातीचे काही महिने आवश्यक पोषणद्रव्य ही स्तनपानाच्या दूधातूनच मिळतात. आईचं दूध हे पचायला हलके असते. म्हणूनच आईच्या आहारातही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश असणं आवश्यक आहे. आईचं दूध कमी असल्यास या 'ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंक' करतात मदत

काही महिलांमध्ये आवश्यक दूधाची निर्मिती होऊ शकत नाही. अशावेळेस वेळीच तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनपान देणार्‍या महिलांनी आहाराचं पथ्यपाणी सांभाळल्यास दूधाची निर्मिती आणि त्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल. स्तनपान करण्याचे '६' जबरदस्त फायदे!

कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने स्तनपानामध्ये दूध वाढेल ?

बदामाचं दूध -
बदामाच्या दूधामधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स स्तनापान करणार्‍या स्त्रियांमधील दूध वाढवते. या दूधात कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, डी, ई घटक मुबलक असतात. काही मुलांना नट्स (सुक्यामेव्याची) अ‍ॅलर्जी असू शकते. अशावेळेस आईने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचा आहारात समावेश करावा.


फळांचा रस
फळं नैसर्गिक स्वरूपात आणि चावून खाणंच आरोग्यदायी आहे. मात्र काही फळांचा तुम्ही घरच्या घरी रस काढू शकता. मात्र बाळाला त्रास होत असल्यास सायट्रस म्हणजे आंबट स्वरूपाची, व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ टाळा. अतिसाखर टाळा. स्तनपान करणार्‍या महिलांंच्या आहारात नकोच 'हे' पदार्थ

आल्याचा चहा
आलं हे दूध वाढवण्यास फायदेशीर ठरते. आलं स्तनपान करणार्‍या स्त्रियांच्या आरोग्यात फायदेशीर आहे. या दिवसांमध्ये पचनाचा त्रास, मळमळ कमी करण्यास, शरीरात रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. दिवसाला 1-3 कप चहा पिणं पुरेसे आहे.

मेथी
मेथीदेखील आईचं दूध वाढवायला मदत करते. आहारात मेथीचा काढा, भाजी किंवा लाडवाच्या स्वरूपात समावेश केला जाऊ शकतो. दिवसाला 2-3 कप मेथीचा काढा पुरेसा आहे.

मूल म्हटले, की त्याचे खेळणे, हसणे आणि रडणे आलेच. ते जन्मताच रडू लागते आणि हे रडणेही सामान्य असते. परंतु जन्मानंतरही अनेकदा लहान मुले झोपेतून अचानक जागी होऊन रडू लागता. त्यांच्या रडण्याचे कारण पालकांच्या लक्षात येत न आल्याने काय करावे ते सुचत नाही. बाळाच्या रडण्याची काही मुख्य कारणे ही असू शकतात.

अनेकदा मुलांच्या रडण्याचे कारण हे शारीरिक त्रास असते. एवढेच नाही तर वातावरणातील तापमान खूप गरम किंवा थंड असले तरी झोपेतून अचानक उठून मुले रडतात.

बाळाच्या झोपण्याची जागा व्यवस्थित नसेल तर ते आरामात झोपू शकत नाहीत. हे सांगता येत नसल्याने ते रडू लागते.

थोडी मोठी झालेली मुले दीर्घकाळ शांत झोपू शकत नाहीत. त्यांना लवकर भूकही लागते. यामुळे मध्यरात्री भुकेमुळे मुले रडू लागतात.

मुलांचा ओला डायपर बदलला नाही तर त्यांना त्रास होऊन ते रडतात.

मुलांना जवळ कोणी नसेल तर असुरक्षित वाटू लागते. अनेकदा आईला न पाहूनही मुले रडतात.

कधी-कधी मुले विचित्र स्वप्ने पडल्यानेही घाबरुन झोपेतून उठून रडतात.

Dr. Avinash Deore
Dr. Avinash Deore
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 15 yrs, Pune
Dr. Rajendra kadam
Dr. Rajendra kadam
BAMS, Ayurveda, 10 yrs, Pune
Dr. Ashish Ingale
Dr. Ashish Ingale
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 7 yrs, Pune
Dr. Shilpa Jungare Tayade
Dr. Shilpa Jungare Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 8 yrs, Pune
Dr. Prasang Bharadwaj
Dr. Prasang Bharadwaj
MBBS, General Medicine Physician General Physician, 3 yrs, Mumbai
Hellodox
x