Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात बदल झाल्यानंतर केवळ व्हायरल इंफेक्शन नव्हे तर केसांचे आरोग्यही बिघडते. अनेकांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात केसगळतीचा त्रास वाढल्याचे दिसून येते. म्हणूनच केसगळतीच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्यासाठी आहारात वेळीच सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे.
आहारात बदलांसोबतच आयुर्वेदातील काही औषधी वनस्पती, फळांचा आहारात समावेश करणं हितकारी आहे. त्यामुळे पहा पावसाळ्यातील केसगळती तुम्ही कशाप्रकारे रोखू शकाल?

पावसाळ्यातील केसगळती रोखण्यासाठी खास उपाय -
भृंगराज
मजबूत आणि घनादाट केसांसाठि भृंगराज अतिशय फायदेशीर आहे. भृंगराज तेलामुळे केवळ टकलेपणाच्या समस्येवर नियंत्रण ठेवता येते असे नव्हे तर अकाली केस पांढरे होण्याची समस्यादेखील आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

ब्राम्ही
ब्राम्ही आणि दह्याचा पॅक केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फयादेशीर आहे. यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते. ब्राम्हीचं तेलही केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. नियमित ब्राम्हीच्या तेलाचा मसाज केल्याने केस घनदाट होतात.


आवळा
आवळ्यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन घटक केसांना मजबूत करण्यासाठी मदत करते. आवळ्याला हीना, ब्राम्हीची पावडर, दही यामध्ये मिसळून लावल्याने केसांचे आरोग्य सुधारते.

कडूलिंब
कडूलिंबाची पानंदेखील केसांना घनदाट करण्यासाठी मदत करतात. कडूलिंबाची पावडर, दही आणि नारळाचं तेल एकत्र करून लावल्यास केस मजबूत होतात.

रीठा
रीठाचा वापर केसांना मजबूत आणि घनदाट करण्यासाठी होतो. त्यामुळे रीठाची पावडर तेलामध्ये मिसळून डोक्याला मसाज केल्यास केसगळती रोखण्यास मदत होते.

टीप - हे सारे आयुर्वेदीक उपाय असल्याने तुमच्या नजीकच्या उत्तम आयुर्वेदीक भंडारामधून विकत घ्या.

अधिकतर महिलांना झोपताना केस मोकळे सोडायची सवय असते. यामुळे झोपताना आरामदायी वाटते आणि रक्तप्रवाही सुरळीत होतो. पण एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, झोपताना केस बांधायला हवेत. कारण रात्री केस कोरडे आणि कमजोर होतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर केस विंचरताना केस तुटू लागतात. यामुळे रात्री झोपताना केस बांधणे अधिक फायदेशीर ठरेल.

रात्री केस बांधून झोपण्याचे इतर फायदे...

# केस गुंतू नये असे जर तुम्हाला वाटत असेलतर केस बांधून झोपा. पोनी, वेणी घालून तुम्ही झोपी शकता. केसांना कलर केल्यानंतर १-२ दिवस तरी केस बांधून झोपा.


# केस बांधायचे नसल्यास रात्री झोपताना केसांवर कॉटनचा स्कार्फ किंवा रुमाल बांधा. त्यामुळे चादर, उशीत केस गुंतून तुटणार नाहीत. केसात मॉईश्चर टिकून राहते. परिणामी केस कोरडे होत नाहीत.

# केस मऊ व मुलायम राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केसांना हेअर मास्क लावा आणि शॉवर कॅप घालून झोपा. सकाळी उठून केस धुवा. केस अधिक मुलायम होतील.

# केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कॉटनऐवजी सिल्कचे पिलोकव्हर वापरा. कॉटन पिलोकव्हरमुळे केस कोरडे होऊ शकतात. म्हणूनच केस आणि त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी सिल्क पिलोकव्हर वापरा. सिल्क पिलोकव्हरमुळे केस तुटणे, गुंतणे या समस्या दूर होण्यास मदत होईल.

आजकालच्या आधुनिक जीवनात केसगळतीची समस्या अगदी सामान्य झाली आहे. त्याचबरोबर केस अकाली पांढरे होण्याची समस्या वाढताना दिसत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा हे केसगळतीचे प्रमुख कारण आहे. पण यावर योगसाधना हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो आणि मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून सुटका होते.

भुजंगासन
वारंवार पित्त होणे हे देखील केसगळती एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी भुजंगासन खूप फायदेशीर ठरते.

पवनमुक्तासन
या आसनामुळे पोटातील गॅस दूर होवून पचनशक्ती सुधारते. कंबरच्या खालचे स्नायू मजबूत होतात.

वज्रासन
वज्रासन ही एक धानात्मक स्थिती आहे. यामुळे मूत्रासंबंधित समस्या, पोटातील गॅस दूर होण्यास मदत होते. अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते.

अधोमुख शवासन
या आसनामुळे शरीरभर रक्तसंचार सुरळीत होतो. डोक्याला रक्ताचा उत्तम पुरवठा होवून थकवा दूर होतो. निद्रानाशाचा त्रास दूर होण्यासही हे आसन फायदेशीर ठरते.

सर्वांगासन
या आसनामुळे थॉयरॉईड ग्रंथीचे पोषण होते. यामुळे पचनतंत्र सुधारते. डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह होतो. त्यामुळे केसगळती, केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

डोक्यात कोंडा होण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर त्वरित उपाय करणे फार महत्वाचे असते. खूप अधिक प्रमाणात डोक्यात कोंडा होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही घरगुती उपाय करूनही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

डोक्यातील स्किन मृत पावण्याची प्रक्रिया लवकर होत असल्यामुळे ही समस्या उद्भवते. पाणी कमी प्यायल्याने देखील ही समस्या उद्भवते.

साखर आणि कोरफड
डोक्यात कोंडा होत असेल तर साखर आणि कोरफड मधील जेल एकत्र करून डोक्याच्या स्किन वर लावावे. कोरफड आणि आणि साखर डोक्यातील मृतस्किन काढण्यास मदत करते.

साखर बारीक करून ती कोरफडच्या जेलमध्ये मिसळून घ्यावी. दोघांचं मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण डोक्याच्या स्किनवर लावावे. 30 मिनिटे झाल्यानंतर डोकं स्वच्छ धुवावे. केसांची वाढ करण्यासाठी देखील हे मदत करतं.

केस गळत असेल तर :

त्रिफळा चूर्ण (दर महिन्यात २ चमचे वाढवत जाणे) रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावे. जंत कृमी असेल तर ३ चमचे त्रिफळा चूर्ण, एक चमचा वावडींग पावडर मिक्स करुन ३ दिवस रात्री झोपतांना कोमट पाण्याबरोबर घेणे.

रोज मुठ मुठ फुटाणे खाण्याने हार्ट ऍटकचा त्रास होत नाही.

रोजच्या आहारामध्ये पुदिन्याचा वापर करावा म्हणजे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. सीतोपलादी चूर्ण व मध याची पेस्ट करुन चाटण घ्यावे व कोबींच्या पाण्याची वाफ घ्यावी.

चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर चेहऱ्यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे. चेहरा निखरतो.

Dr. Nitesh
Dr. Nitesh
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Yogesh Gholap
Dr. Yogesh Gholap
BAMS, Ayurveda General Physician, 12 yrs, Pune
Dr. Richa Lal
Dr. Richa Lal
MBBS, Anesthesiologist, 8 yrs, Pune
Dr. Pratibha Labade
Dr. Pratibha Labade
BAMS, Ayurveda Immuno Dermatologist, 19 yrs, Pune
Dr. Mukund Ghodke
Dr. Mukund Ghodke
BAMS, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Hellodox
x