Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पिंपल्समुळे कुणाच्याही चेहर्‍याची सुंदरता कमी होते. बर्‍याच वेळा फार प्रयत्न करून देखील लोकांच्या चेहर्‍यावर हे परत परत येतात. अशात तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही रोज़मैरी ऑयल ट्राए करू शकता. या एसेंशियल ऑयलमध्ये पिंपल्सशी लढणारे तत्त्व असतात, जे कुठलेही डाग न सोडता पिंपल्सला ठीक करतात.


रोज़मैरी ऑयल – कसे करत काम?
या ऑयलमध्ये एंटी-बैक्टीरियल तत्त्व असतात आणि प्रभावित जागेवर लावल्याने बॅक्टेरिया समाप्त होतात. बॅक्टीरियामुळे होणारे पिंपल्स याने साफ होऊ लागतात. फक्त 8 तासांमध्ये याचा प्रभाव दिसू लागतो.

या तेलाचा वापर कसा करावा ?
कापसाच्या बोळ्यात तीन थेंब रोज़मैरी ऑयल टाका आणि याला झोपण्याअगोदर पिंपल असणार्‍या जागेवर लावा. याला दिसवा नाही लावायला पाहिजे कारण दिवसा लावल्याने तुमच्या चेहर्‍या धूळ माती बसते, ज्यामुळे तुम्हाला अधिक समस्या होण्याची शक्यता असते. या तेलाचा वापर करण्याची एक अजून पद्धत आहे. तुम्ही याला तुमच्या लोशनमध्ये मिसळून घ्या. नंतर नेमाने या लोशनला लावा.

रोज़मैरी ऑयल फक्त चेहराच नव्हे तर पाठीवर होणारे पिंपल्स ज्याला बॅक एक्ने म्हणतात, त्यासाठी देखील उत्तम ठरेल. या साठी अंघोळीच्या पाण्यात 8-10 थेंब या तेलाचा मिसळ करा. काही दिवस या तेलाचा वापर करा, नक्कीच फायदा होईल.

डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही. काही लोक अगदी आमटी-भाजीतील कडीपत्ता शोधून खातात. तर काही तो दिसताच बाजूला काढतात. परंतु, कडीपत्ताचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचबरोबर सौंदर्याच्या समस्या दूर करण्यासही कडीपत्ता फायदेशीर ठरतो. पाहुया त्याचे फायदे...

# कडीपत्ता आयर्न आणि फॉलिक अॅसिडचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे अॅनेमियासारख्या समस्या दूर करण्यासाठी त्याचा फायदा होतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता आणि खजूर खाल्याने देखील खूप फायदा होतो.

# पचनासंबंधित समस्या असल्यास कडीपत्ता वाटून ताकात घालून प्या. यामुळे पोटात होणारी गडबड शांत होते आणि पोटाच्या समस्यांचे निवारण होते.

# मधुमेहींनी आहारात कडीपत्ताच्या समावेश केल्यास ब्लड शुगरची समस्या दूर होण्यास मदत होईल. ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे.

# केस काळेभोर, मजबूत करण्यासाठी कडीपत्ताचा हा प्रयोग करुन पहा. यासाठी खोबरेल तेलात कडीपत्ता उकळवा. थंड झाल्यावर ते तेल केसांना लावून मालिश करा.

# कफ झाल्यास किंवा कफ सुकल्यास वा फुफ्फुसात जमा झाल्यास यावर कडीपत्ता खूप फायदेशीर ठरतो. यासाठी कडीपत्ता वाटून त्याची पावडर करा आणि मधासोबत त्याचे सेवन करा.

# त्वचासंबंधित समस्यांवर कडीपत्ता फायदेशीर ठरतो. खूप काळापासून पिंपल्स किंवा त्वचेच्या अन्य समस्यांमुळे त्रासले असला तर रोज कडीपत्ता खा किंवा त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा.

वॉटरप्रूफ मेकअपला पर्याय आहे का? हे अवश्य वाचा.


स्विमींग पूल मध्ये डुंबताना अथवा पावसात भिजताना तुम्हाला तुमचा मेक-अप तसार रहावा असे वाटत असते.मग यासाठी तुम्ही अशा ठिकाणी जाताना वॉटरप्रूफ मेकअप करता.Cosmetologist डॉ.नंदीता दास यांच्याकडून जाणून घेऊयात वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का? तसेच वाचा मेकअप करताना कोणती काळजी घ्याल ?


वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का?

लक्षात ठेवा मेक-अप केल्यावर त्वचेतील घाम अथवा तेलामुळे तो खराब होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मेक-अप मध्ये वापरण्यात येणारे घटक हे त्वचेसाठी हानिकारक असू शकतात.वॉटरप्रुफ मेक-अप मधील काही घटक जे तुमच्या त्वचेमधील पिगमेंटेशन झाकण्यासाठी वापरण्यात येतात ते घटक जर नैसर्गिक सौदर्यप्रसाधनांप्रमाणे केमिकल-फ्री असतील तर ते वापरणे सुरक्षित असू शकते.पण काही वेळा अशा वॉटरप्रूफ मेक-अपची सौदर्यप्रसाधने वापरणे सुरक्षित असू शकत नाही.जाणून घ्या अ‍ॅक्नेचा त्रास असणार्‍यासाठी ‘4’ महत्त्वाच्या मेकअप टीप्स !


अॅनिमल व व्हेजीटेबल बेस वॅक्स,पॉलिमर व वॅक्स प्रमाणेच वॉटरप्रूफ मेक-अपच्या साहित्यामध्ये मध्ये देखील सिलिकॉन वापरण्यात येते ज्यामुळे तुमच्या त्वचेतील छिद्रे बंद होतात.ज्यामुळे तुम्हाला पिम्पल येऊ शकतात,त्वचेवर पुरळ व अॅलर्जी येऊ शकते.वॉटरप्रूफ फॉऊंडेशन मध्ये सामान्यपणे सिलिकॉन वापरण्यात येते.तसेच वॉटरप्रूफ मस्कारा मध्ये देखील कंडीशनिंग घटक असलेले तेल न वापरलेल्यामुळे या प्रसाधनाच्या वापरामुळे तुमच्या डोळ्याच्या पापण्या कोरड्या होण्याचा धोका असतो.वाचा फाऊंडेशनचा वापर करताना या ‘4’ चूका टाळा ‍!


वॉटरप्रूफ मेक-अप कसा काढावा?


चेह-यावरील जाड वॉटरप्रूफ मेक-अप काढण्यासाठी तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे महागडे क्लिनझर विकत घ्यावे लागते.वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरणे उत्तम ठरेल.यासाठी डोळे व डोळ्यांच्या पापण्यांवर थोडेसे ऑलिव्ह ऑईल लावा.थोड्यावेळ ते तेल तसेच राहू द्या व काही मिनीटांनी तो भाग स्वच्छ धुवा.चेहरा व मानेवरचा वॉटरप्रूफ मेक-अप काढण्यासाठी जुन्या पद्धतीचे कोल्ड क्रीम वापरणे देखील फायद्याचे ठरते.वाचा खोबरेल तेल- त्वचा स्वच्छ करण्याचा आणि मेकअप काढण्याचा उत्तम उपाय !

टीप-जर तुम्हाला मेक-अप केल्यावर घाम येत असेल तर लगेच त्यासाठी वॉटरप्रूफ मेक-अप करण्याऐवजी Water Resistant चा मेकअपचा पर्याय निवडा.तसेच वाचा तेलकट त्वचेच्या समस्या दूर करतील ही ‘6’ तेलं.वॉटर रेसिस्टंट मेक-अप वॉटरप्रूफ मेकअप पेक्षा हलका असतो.त्याचा परिणाम अगदी वॉटरप्रूफ मेकअप सारखाच असतो मात्र त्याचे वजन हलके असते.तसेच या मान्सून मेकअप टीप्सनी रहा पावसाळ्यातही ‘ मोस्ट ब्युटीफुल’ !

Dr. Dhananjay Ostawal
Dr. Dhananjay Ostawal
BHMS, General Physician, 34 yrs, Pune
Dr. Vijay E Chaudhari
Dr. Vijay E Chaudhari
BHMS, Homeopath, 25 yrs, Pune
Dr. Niranjan Vatkar
Dr. Niranjan Vatkar
MDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 10 yrs, Pune
Dr. Shubham Hukkeri
Dr. Shubham Hukkeri
BPTh, 1 yrs, Mumbai
Dr. Abhijit Sangule
Dr. Abhijit Sangule
BDS, Dentist, 8 yrs, Pune
Hellodox
x