#Let's stay safe & beat COVID-19 together!
Published  

अक्कल दाढ

HelloDox Care
Consult



मोलर्स किंवा दाढीचा दात म्हणून संदर्भित, हे तोंडाच्या मागील बाजूस असलेल्या सपाट दांत आहेत. ते आकार आणि आकारात बदलू शकतात परंतु तोंडातील सर्वात मोठे दात असतात. मोलर्स गोलाकार असतात आणि ते सहजपणे गिळून टाकले जाते. लहान आणि तीव्र तोंडाचे दात चावत आणि अन्न फाडण्याकरिता वापरले जातात. मॉलर्स च्यूइंग, ग्राइंडिंग आणि क्लेनिंगपासून मोठ्या प्रमाणावर शक्ती टिकवून ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत आणि प्रत्येक दाताला दोन ते चार मुळे असलेला जड हाडांकडे आकर्षित केले जाते.


सरासरी प्रौढांकडे बारा मोलर्स असतात, ज्यात वरच्या जबड्यात सहा (आपल्या दंतवैद्याने ओळखल्याप्रमाणे वरच्या जबड्यात त्यांच्या स्थानासाठी "दाढेचा हाड " म्हणून ओळखले जाते) आणि खालच्या जबड्यात सहा (ज्याला दंतवैद्याने त्यांच्या स्थानासाठी "मंडप" म्हणून ओळखले जाते खालचा जबडा). वरच्या आणि खालच्या जबड्याच्या प्रत्येक बाजूला तीन मोलर्स असतात.

मोलर्स च्या प्रकार
तीन प्रकारचे मोलर्स आहेत. मुलास आपल्या बाळाचे दांत हरवून झाल्यावर असे होते:

पहिल्या मोलर्सला सहा वर्षांच्या मोलर्स देखील म्हणतात कारण ते सहा वर्षांच्या आसपास विखुरलेले तीनपैकी पहिले आहेत. दुसऱ्या मोलर्सला 12 वर्षांच्या मोलर्स देखील म्हणतात कारण ते 12 वर्षांच्या आसपास उडतात.
तिसरा मोलर्स, किंवा अक्कल दाढ, जी 17 ते 25 वयोगटातील दिसते.

आपल्याकडे बुद्धी का आहे?
तिसरा मोलर किंवा शहाणपणाचे दात, आमच्या उत्क्रांतीवादी काळातील निसर्गाचे आहेत जेव्हा मानवी तोंड मोठे होते आणि अतिरिक्त दांतांना जास्त अनुकूल होते. हे अतिरिक्त दात मुरुम, नट, पाने आणि कठीण मांसासारखे विशेषत: कोर्सचे खाद्यपदार्थ वापरण्यात उपयुक्त होते. या प्रकारचे आहार दातांवर कठीण होते.


अक्कल दाढ समस्या
आपल्या अक्कल दाढ अजून मोठे नसले तरी, दुर्दैवाने, आपल्या इतिहासाच्या काळात आमच्या जांभळ्या आकारात काही बदल केले आहेत. आधुनिक मानवांचे जबडे आमच्या पूर्वजांपेक्षा लहान आहेत. हे निरुपयोगी ज्ञान दांत निसटण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बर्याच समस्यांस सामोरे जाते.

जेव्हा अक्कल दाढ येते तेव्हा ते आपल्या इतर दांतांद्वारे अवरोधित होऊ शकतात आणि त्यांना "प्रभावित" असे म्हटले जाते. जर शहाणपणाचा दंश आंशिकपणे उदयास आला तर यामुळे जीवाणूंसाठी एक हार्ड-टू-एव्ह व्हायर तयार होऊ शकते ज्यामुळे हिरड्यांच्या आणि आसपासच्या ऊतींचे गंभीर संक्रमण होऊ शकते. यामध्ये समस्या असूनही त्यात सिस्ट किंवा ट्यूमरच्या संभाव्य विकासाचा समावेश आहे जो जडबोन आणि दात नसल्यास दात मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो.

या समस्या बर्याच लोकांना त्यांच्या अक्कल दाढ काढून टाकण्याची गरज आहे. कोणतीही शस्त्रक्रिया कमीतकमी आणि किमान असेल तेव्हा ही शस्त्रक्रिया तरुण प्रौढतेदरम्यान केली जाते.

काही लोकांसाठी, अंदाजे 15 टक्के लोकसंख्येची संख्या मोजण्यासाठी अक्कल दाढ काढून टाकण्याची तात्काळ गरज नसते कारण ते कोणत्याही समस्येत येत नाहीत. या बाबतीतही, अशी शिफारस केली जाऊ शकते की आयुष्यात नंतर विकसित होणारी समस्या टाळण्यासाठी शहाणपणाचे दांत काढले जातील जेव्हा शस्त्रक्रियांमध्ये जटिलता आणि दीर्घ उपचारांच्या वेळा अधिक संभाव्य असतात.

Like
Published  

चिपडलेले दात

HelloDox Care
Consult



जवळ जवळ सगळ्यांनाच माहित असेल की मोठ्या माणसांना ३२ दात असतात. वरच्या आणि खालच्या जबड्यात प्रत्येकी
सर्वात समोरचे चार पटाशीचे दात - मधले दोन सेण्ट्रल इनसायझर. त्या दोघांच्या बाजूचे दोन लॅटरल इनसायझर. त्यांच्या बाजूला प्रत्येकी एका बाजूला एक असे दोन सुळे - कनाईन, त्याच्या पुढे दोन्ही बाजूला दोन दोन उपदाढा - प्रीमोलर. त्यांच्या पुढे दोन्ही बाजूला दोन दोन दाढा - मोलर्स. आणि सर्वात शेवटची दाढ अक्कलदाढ - विस्डम टूथ - सगळ्यांनाच अक्कलदाढ असते असे नाही. सर्व मिळून एका जबडयात १४-१६ दात.

दातांची व्यवस्थित स्वच्छता राखली, आणि काळजी घेतली तर आपल्यावर फार कमी वेळा दाताच्या डॉ कडे जाण्याची वेळ येते. त्यामुळे सर्वात प्रथम आपण दाताची स्वच्छता कशी राखायची हे पाहू. पेस्ट वापरून ब्रश करने महत्त्वाचे. पेस्ट वापरण्याचे कारण हे की पेस्ट्मुळे तोंडात फोम तयार होतो ज्यामुळे अडकलेले अन्नकण दातापासून लवकर मोकळे होतात. ब्रश करताना शक्यतो बारीक डोक्याचा आणि मऊ केसांचा ब्रश वापरावा - उदा. कोलगेट अल्ट्रा सॉफ्ट (कोलगेट अल्ट्रा सॉफ्सारखा कोणताही ब्रश वापरलात तरी चालेल. मी कोलगेट कंपनीची जाहिरात करत नाही आहे.) तोंडात फोम तयार होण्याला वेळ मिळावा म्हणून आधी सर्व दातांना पेस्ट लावून घ्यावी, एखादे मिनिट थांबावे आणि मग दातांवरून ब्रश फिरवावा. दातांवरून ब्रश फिरवताना हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे अशा दिशेनेच ब्रश करावे. उलटे ब्रश करू नये. वरचे दात आणि खालचे दात वेगवेगळे साफ करावे. दात साफ करताना, दाताच्या मागच्या बाजूनेदेखील हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे ब्रश फिरवणे महत्वाचे. दाढांचा चावण्याचा सर्फेस साफ करताना मागेपुढे असा ब्रश फिरवावा. दातांचा ओठाकडील, गालाकडील आणि जिभेकडील सर्फेस साफ करताना कधीही आडवा ब्रश फिरवू नये.

प्रत्येक दाताला ५ सर्फेस असतात. प्रत्येक सर्फेस व्यवस्थित स्वच्छ झाला पाहिजे. ब्रशिंग मुळे दाताचा ओठाकडचा आणि जीभेकडचा आणि दाढेचा गालाकडचा, जिभेकडचा आणि चावण्याचा सर्फेस स्वच्छ होतो. दोन दातांच्या मधले दोन्ही सर्फेस ब्रशने साफ होऊ शकत नाहीत. काहीजण त्याकरता टूथपीक वापरतात. पण त्यानेही पूर्ण स्वच्छता होत नाही. दोन दातांच्या मधले सर्फेस स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंगचा दोरा वापरावा. (केवळ फ्लॉसिंगचाच दोरा वापरावा. शिवणकामाचा दोरा वापरून प्रयोग करू नयेत). हा दोरा निर्जंतुक केलेला असतो शिवाय तो स्ट्राँग असतो. त्या दोर्‍याने दोन दातांच्या मधला सर्फेस स्वच्छ करताना तो दोरा हिरडीकडून दाताच्या टोकाकडे असा सर्फेसला घासून बाहेर काढावा. लगेच धुवून दुसरी फट साफ करावी. फ्लॉसिंग नंतर व्यवस्थित चुळा भराव्यात.

तोंडाला वास येत असेल तर माऊथवॉश वापरण्यास हरकत नाही. परंतु एका वेळी सलग फक्त पंधरा दिवस माऊथवॉश वापरावा (भारतातले माऊथवॉश वापरताना तरी) त्यानंतर १५ दिवसाचा ब्रेक घ्यावा. ह्यापुढे तोंडाला वास येत नसेल तर माऊथवॉश वापरू नये.

न चुकता जिभलीने जीभ साफ करावी, कधी कधी जीभेवर चिकटलेले अन्नकण देखील तोंडात कीड वाढवू शकतात.

दिवसातून कमीतकमी तीन वेळा दात घासावेत. कमीत कमी अशा करता की आपली भारतीयांची सकाळी उठल्या उठल्या - खाण्यापूर्वी ब्रश करण्याची सवय पाहाता दोन वेळा हे कमीच आहे. सकाळचा चाहा-दूध नाश्ता केल्यानंतर ब्रश करणे जास्त महत्वाचे. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या ब्रशिंग झाले असले तरी चहा, दूध नाश्ता केल्यावर लगेच ब्रश, फ्लॉस करने जीभ घासणे महत्वाचे आहे. शक्य झाले तर दुपारच्या जेवणानंतरही दातांवर ब्रश फिरवावा.

असे केल्याने दातातील ९५% अन्नकण निघून जातात. राहिलेले ५% अन्नकण हिरडी आणि दात ह्यातल्या फटीत अडकून असतात. काही वेळा फ्लॉसिंगने दोन दाताम्च्या मधल्या फटीतल्या हिरडीतले अन्नकण निघून जातात परंतु दातावरची आणि मागची हिरडी आणि दात ह्यात अडकलेले अन्नकण साफ करायला दाताच्या डॉक्टरची मदतच घ्यावी लागते. दाताचे डॉक्टर ओरल प्रोफायलॅक्सिस म्हणजेच स्केलिंग म्हणजेच इंस्ट्रुमेंटस वापरून दाताची स्वच्छता करतात. काही डॉ हॅण्ड इंस्ट्रुमेंटस वापरून स्केलिंग करतात काही डॉ. मशिन वापरून करतात. अर्थात मशिनने केलेले स्केलिंग जास्त इफेक्टिव्ह असते.
स्केलिंग केल्यामुळे दात आणि हिरड्या ह्यात अडकलेले अन्नकण केवळ सफ होत नाहीत तर चहा सिगरेट ह्याने पडलेले डागही कमी होतात. ह्यामुळे हिरडीचे आणि हिरड्यांच्या आतील हाडाचे निरोगी पण टिकते आणि आयुष्य वाढते. ह्याशिवाय दातात अन्नकण अडकल्याने आपल्याला न कळलेली दाताला लागलेली कीडदेखील लगेच कळून येते आणि त्यावर ट्रीटमेण्ट करता येते.

ब्रशिंग, फ्लॉसिंग, स्केलिंग बद्दल काही समज आपल्यात असतात.
१. ब्रशिंग जोरात केले तरच दात साफ होतात - असे अजिबात नाही. उलट जोरात ब्रशिंग करून आपण दातावरचे इनॅमल कमी करतो. ज्यामुले दातांना सेन्सिटिव्हिटि चा त्रास होऊ शकतो. दात हलक्या हाताने घासावेत.

२. दात घासायला खूप वेळ लागतो - वर दिलेल्या टेक्निकने दात घासले तर दात घासायला दोन ते तीन मिनिटे पुरतात.

३. फ्लॉसिंगमुळे दातात फटी वाढतात. - फ्लॉसचा दोरा खूप बारिक असतो त्याच्यामुळे फटी अजिबात वाढत नाहीत. दात सरकून फटी वाढायला दातांवर कायम असा खूप जोर असावा लागतो. ऑर्थोच्या ट्रीट्मेण्ट मध्ये असतो तसा

४. जीभ घासणे, फ्लॉसिंग करने हे फक्त अ‍ॅडल्टसनी करायचे असते - वयाच्या चार पाच वर्षापासून मुलांना जीभ घासण्याची, फ्लॉसिंगची सवय लावावी.

५. स्केलिंगने दातात फटी वाढतात - अजिबात नाही. स्केलिंगमुळे दातात फटी झाल्यासारखे वाटत असेल तर - दातात मुळातच फटी होत्या. अन्नकण दातात अडकून त्या फटी बुजल्या होत्या. स्केलिंगनंतर अन्नकण निघून गेल्याने त्या फटी दिसायला लागल्या आहेत एवढेच. फार मोठ्या मोठ्या फटी नसतील तर त्यावर ट्रीटमेण्टची गरज नसते. तरीही तुम्हाला त्या फटी नको असतील तर कॄपया दात काढून तिथे दुसरा कृत्रिम दात बसवू नका. दाताचे रूट कॅनाल करून / न करून दातावर कॅप बसवू नका. फटी कमी करण्यासाठी वेगळे उपचार असतात. त्याकरता नैसर्गिक दात काढून तिथे खोटा दात बसवणे, कॅप बसवणे हे अयोग्य आहे.

६. स्केलिंग केल्याने दात कमकुवत होऊन हलतात - स्केलिंग नंतर दात हलतात हे खरे असले तरी सगळ्यांच्या बाबतीत हे खरे नाही. ज्यांच्या हिरड्यांमध्ये बराच काळ अन्नकण साठून त्याचा दगद झालेला असतो, त्यांचे दात स्केलिम्ग केल्यावर हलतात कारण स्केलिंग करून तो अन्नकणांचा दगड काढला जातो. ह्या अन्नकणांच्या दगडामुळे दाताखालचे हाडदेखील झिजायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे अन्नकणांचा दगड काढणे मस्ट आहे. अशा अडकलेल्या अन्नकणांमुळे दाताम्खालचे हाड कमकुवत होऊन दात हलतात व पडतात. जर व्यवस्थित काळजी घेतली- नीट ब्रशिंग केले, वरचे वर - वर्षातून एक / दोन वेळा स्केलिंग करून घेतल्यास हिरड्या, दाताखालचे हाड कमकुवत होणार नाही आणि दात पडणार नाहीत.

७. दातातून रक्त येत असताना ब्रशिंग करू नये.- मुळात दातातून रक्त येत नाही, रक्त हिरडीतून येते. हिरड्या कमकुमत झाल्याचे ते लक्षण आहे, कारण एकच दाताची स्वच्छता नीट झालेली नाही (किंवा हार्ड ब्रशने खूप जोरात ब्रशिंग केले.) हिरडीतून रक्त येत असल्यास लगेचच डेंटिस्टला दाखवावे. पायोरिया ह्या हिरड्यांच्या आजाराची ही सुरुवात असू शकते. स्केलिंग करून घ्यावे. स्केलिंग करूनही आठ दिवसात हिरड्यतून रक्त येणे थांबले नाही तर गरज पडल्यास डेंटिस्ट तुम्हाला हिरड्यांची सर्जरी करण्याचा सल्लाही देऊ शकतो. ही फारशी दुखवणारी ट्रीटमेण्ट नाही. ह्यात तोंडात दात काढताना देतात तसे इंजेक्शन देऊन हिरडीचा वरचा भाग हलकेच उघडून त्यातील अन्नकण साफ केले जातात. हिरड्या साफ करून घेतल्याशिवाय दातावर कॅप लावून घेऊ नये किंवा ऑर्थो ट्रीटमेंटही करू नये. हिरड्या आनखी कमकुवत होतील आणि दात पडतील.

८. पेस्ट एइवजी दंतमंजन वापरले तरी चालते - दंतमंजन किती वारीक आहे ते पाहावे. जाड दंतमंजन असेल तर त्याने इनॅमल कमी होत जाते.

९. दात सेन्सिटिव्ह झाले की सेन्सिटिव्ह टूथपेस्ट स्वतःच्या मनाने वापरली तर चालते आणि कायम वापरावी लागते. - डेंटिस्टला ला विचारूनच मग सेन्सिटिव्ह टूथेपेस्ट वापरावी. किती दिवस वापरायची हेही विचारून घ्यावे.

१०. दात दुखत असेल तर एखादी पेनकिलर / अ‍ॅण्टिबायोटिक घेऊन काम चालते - दात दुखतो आहे ह्याचा अर्थ कीड मुळापर्यंत गेली आहे. ती कीड रूट कॅनाल प्रोसिजरनेच काढावी लागते. पेनकिलर घेऊन दूख दाबण्यात अर्थ नाही. ती कीड आणि इन्फेक्शन आजूबाजूच्या दातातही पसरू शकते. पेनकिलर अँटिबायोटिक स्वत:च्या मनाप्रमाणे घेऊ नये किंवा केमिस्टने दिले म्हणूनही घेऊ नये. अँटिबायोटिक घेताना डेंटिस्टच्या सल्ल्यानेच घ्यावे. पेन्किलर आणि अँटिबायोटिक तुमच्या वजनाप्रमाणे तुम्हाला अ‍ॅसिडिटिचा त्रास आहे की नाही, कोणत्याही औषधाची अ‍ॅलर्जी आहे की नाही हे विचारूनच मग डॉ प्रीस्क्राईब करतात. शिवाय अँटिबायोटिक हे सांगितले तितके दिवस घेतली गेलीच पाहिजे नाहीतर मेडिसिन रेझिस्टन्स येऊन मग कोणतीच अँटिबायोटिक तुम्हाला लागू पडणार नाही अशीही वेळ येऊ शकते.

११. दात दुखण्यावर दात काढणे हाच उपाय आहे, दात तुटला असेल तर दात काढावाच लागतो. दात काढला तरी हरकत नाही इम्प्लाण्ट करून नवीन दात बसवता येतो. - आधुनिक तंत्रज्ञानात दात काढण्याऐवजी रूट कॅनाल, तुटलेल्या दाताला पूर्वीप्रमाणे बनवणे - पोस्ट अँड कोअर, कॅप करणे हे उपाय आहेत. केवळ इम्प्लांट जास्त आधुनिक आहे म्हणून नैसर्गिक दात काढून त्याठिकाणी कृत्रिम दात बसवणे योग्य नाही.

दात व हिरड्या साफ करून घेणे ही दंतस्वच्छतेची शेवटची ट्रीटमेण्ट नव्हे तर सर्वात पहिली प्रोसेस आहे. हिरड्या साफ असतील तरच तोंडात अगदी शेवटपर्यंत दात टिकतील.

Like
Published  

दातांचं दुखणं दूर करतील हे 2 घरगुती उपाय

Dr. HelloDox Support #
HelloDox Care
Consult

जेव्हा दातांचा प्रश्न येतो तेव्हा आपण म्हणतो की दात हा शरिराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण दातांशिवाय तुम्ही जेवण करु शकणार नाहीत. अनेक गोष्टींना तुम्हाला नाही म्हणावं लागेल. अनेकांना दात दुखण्याची समस्या असते. अशावेळी काही घरगुती उपाय करुन देखील तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

1. लवंग : लवंग एक अशी नैसर्गिक वस्तू आहे. जी आपल्या दातांसाठी खूप लाभदायक आहे. लवंगमध्ये अनेक औषधी गुण असतात. जे दातांमधील बॅक्टेरिया आणि जर्म्सला संपवतात आणि दातांना मजबूत करतात. तुमची दाढ जर दुखत असेल कर लवंग यावर गुणकारी उपाय आहे. लवंगमुळे दातांचं दुखणं कमी होतं. पण याचा वापर तुम्ही नियमित केला पाहिजे.

2. मीठ : मीठ देखील तुमच्या दातांमधील दुखणं कमी करतं. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या पाहिजे. यामुळे तुमच्या दातांचं दुखणं कमी होतं.

1 Like
Published  

दातदुखी दूर करण्यासाठी 'या' तेलाचा होतो फायदा!

Dr. HelloDox Support #
HelloDox Care
Consult

वेदना कोणत्याही असोत त्या सहन करणं त्रासदायकच असतं. त्यात दातांची समस्या असेल आणि वेदना होत असतील तर विचारायलाच नको. दाताची समस्या असेल आणि वेदना होत असतील तर व्यक्ती काही विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता गमावून बसतो.

अशावेळी तुमच्या टूथपेस्टमध्ये मिठ असो वा नसो पण मोहरीचं तेल असायला हवं. कारण दातांच्या दुखण्यासाठी मोहरीचं तेल फारच फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ मोहरीच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे.

मोहरीच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि बीटा कॅरोटीन आढळतात. त्यासोबतच यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न आणि फॅटी अॅसिड आढळतं. हे तेल आरोग्यासाठी फारच उपयुक्त मानलं जातं. चला जाणून घेऊ आता याचा दातांची वेदना दूर करण्यासाठी कसा उपयोग होतो.

दातांमध्ये वेदना होत असतील तर ज्या ठिकाणी वेदना होत आहे त्या ठिकाणी मोहरीचं तेल लावल्यास वेदना कमी होतात. ज्या पावडरने तुम्ही रोज दात स्वच्छ करता त्यात थोडं मोहरीचं तेल घातल्यास वेदना कमी होतील.

त्यासोबतच कधी कानात अचानक वेदना झाल्या तर अशावेळी मोहरीचं तेल कानात टाकल्यास आराम मिळतो. त्यासोबतच मोहरीचं तेल लसूण टाकून गरम करुन कानात टाकू शकता. यानेही आराम मिळतो.

तसेच मोहरीच्या तेलातील व्हिटॅमिनमुळे त्वचेचीही काळजी घेतली जाऊ शकते. सूर्याच्या किरणांपासून त्वचेचं रक्षण करतं. त्यामुळे घराबाहेर निघण्याआधी मोहरीचं तेल त्वचेवर लावल्यास फायदा होतो.

Like
Published  

अक्कलदाढीचं दुखणं सुसह्य करायला फायदेशीर '4' घरगुती उपाय

Dr. HelloDox Support #
HelloDox Care
Consult

मुंंबई : अक्कल दाढेचं दुखणं भयंकर गंभीर असतं. अचानक आणि तीव्र वेदनांचा त्रास असल्याने काहीवेळेस या दुखण्यामध्ये खाणं-पिणंही कठीण होऊन बसतं. सामान्यपणे अक्कलदाढ ही 17-25 या वयात येते. पण पंचविशी पुढेही अक्कलदाढ येऊ शकते. मग या अक्कल दाढीचं दुखणं आटोक्यात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकते.

अक्कल दाढीचं दुखणं सुसह्य कसं कराल ?
#1 दातदुखीमुळे जर तुमच्या हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर ग्लासभर कोमट पाण्यामध्ये मीठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. मीठात दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दातदुखीचा त्रास कमी होतो.

#2 खूपच तीव्र वेदना होत असतील तर दाताजवळ बर्फाचा तुकडा धरा. बर्फामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

#3 चिमूटभर हिंगामध्ये मोसंबीच्या रसाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट कापसाच्या बोळ्याने अक्कलदाढेजवळ लावा. यामुळे दातदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

#4 दातदुखीवर हमखास फायदेशीर ठरणारा एक घरगुती उपाय म्हणजे लवंग. लवंगामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तोंडातील कीटाणूंचा नाश करण्यास फायदेशीर ठरतात.
लवंगाचे तेलही दातदुखीचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते. कापसाच्या बोळ्याने लवंगाचे ते दाढेजवळ धरून ठेवा.

1 Like
Dr. Vinay Shankar Gupta
Dr. Vinay Shankar Gupta
MS - Allopathy, Dermatologist Family Physician, 40 yrs, Shimla
Dr. Rashmi Mathur
Dr. Rashmi Mathur
BPTh, Physiotherapist Homecare Physiotherapist, 5 yrs, Pune
Dr. Cliford John
Dr. Cliford John
BDS, Dental Surgeon Root canal Specialist, 6 yrs, Pune
Dr. Ashok Lathi
Dr. Ashok Lathi
MS - Allopathy, General Surgeon, 37 yrs, Pune
Dr. Yogesh Chavan
Dr. Yogesh Chavan
MS/MD - Ayurveda, Ayurveda Headache Specialist, 12 yrs, Nashik
Hellodox
x